Saturday, June 29, 2019

विद्यापीठ विश्व : शैक्षणिक समृद्धी येल विद्यापीठ एकूण एक हजार एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे.

विद्यापीठ विश्व : शैक्षणिक समृद्धी

येल विद्यापीठ एकूण एक हजार एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे.

येल विद्यापीठ

येल विद्यापीठ
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com
विद्यापीठाची ओळख
येल युनिव्हर्सिटी किंवा येल या नावाने सर्वत्र परिचित असलेले विद्यापीठ अमेरिकेतील कनेटीकट या राज्यामधील प्रमुख विद्यापीठ आहे. न्यू हेवनमध्ये स्थित असलेले हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ आयव्ही लीग विद्यापीठांपैकी एक आहे.
येल विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले पंधराव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. प्रिन्स्टनसारखीच या विद्यापीठाची स्थापना अमेरिकन क्रांतीच्याही अगोदर इसवी सन १७०१ साली झालेली आहे. येल विद्यापीठ हे अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे जुने विद्यापीठ आहे. येल विद्यापीठ हे खासगी संशोधन विद्यापीठ आहे. ‘राइट अ‍ॅण्ड ट्रथ’ हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.
येल विद्यापीठ एकूण एक हजार एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. येलचा मध्यवर्ती कॅम्पस हा डाऊनटाऊन न्यू हेवनमध्ये जवळपास दोनशे साठ एकरांच्या परिसरामध्ये विस्तारलेला आहे. विद्यापीठाचे सर्व प्रशासन ‘येल कॉर्पोरेशन’ या नियामक मंडळातर्फे चालवले जाते. आज येलमध्ये चार हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. तर जवळपास बारा हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.
अभ्यासक्रम
येल विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधींचे आहेत. विद्यापीठामध्ये एकूण चौदा प्रमुख विभाग (स्कूल्स) कार्यरत आहेत. यामध्ये येल कॉलेज, स्कूल ऑफ मेडिसिन, डिव्हीनिटी स्कूल, लॉ स्कूल, आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस, शेफिल्ड सायंटिफिक स्कूल, फाइन आर्ट्स, म्युझिक, फॉरेस्ट्री अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस, पब्लिक हेल्थ, आर्किटेक्चर, नìसग, नाटय़ आणि व्यवस्थापन इत्यादी प्रमुख स्कूल्सचा समावेश आहे. विद्यापीठातील या स्कूल्सच्या अंतर्गत सर्व पदवी, पदव्युत्तर व संशोधन विभाग चालतात. येलमधील या स्कूल्सच्या माध्यमातून, विद्यापीठ सर्व मेजर्स आणि मायनर्स म्हणजेच पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम चालवते. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना त्या त्या क्षेत्रातील विविध संस्थांची मान्यता मिळालेली आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि स्प्रिंग या दोन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.
सुविधा
येल विद्यापीठातील शिक्षण जरी अतिशय महाग असले तरी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या आवारात विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा दिली जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. येल एक महत्त्वाची आयव्ही लीग संस्था असल्याने पदवीच्या चार वर्षांच्या कालावधीदरम्यान सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासाच्या सोयीची हमी विद्यापीठाकडून दिली जाते. विद्यापीठाशी संलग्न काही निवासी महाविद्यालये असून ती विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरणाबरोबरच उत्कृष्ट सामाजिक व सांस्कृतिक वातावरण प्रदान करतात.
वैशिष्टय़
येलच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये, अमेरिकेच्या बिल क्लिंटन, जॉर्ज बुश (सिनिअर व ज्युनिअर दोघेही ) विल्यम हॉवर्ड टफ्ट, गेराल्ड फोर्ड या पाच माजी राष्ट्राध्यक्षांचा समावेश आहे. याशिवाय, हिलरी क्लिंटन, मॉर्गन स्टॅनले,
बोइंगचे संस्थापक विल्यम बोइंग, नोबेल विजेते पॉल क्रुगमन यांसारखे नामवंत या विद्यापीठामध्ये कधीकाळी शिक्षण घेत होते. ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंतचे एकूण ६१ नोबेल पारितोषिक विजेते, पाच फिल्ड मेडॅलिस्ट्स, अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाचे १९ सरन्यायाधीश आणि तीन टय़ुिरग पुरस्कार विजेते या विद्यापीठाचे विद्यार्थी वा प्राध्यापक होते/आहेत.
संकेतस्थळ
https://www.yale.edu/
First Published on April 9, 2019 4:01 am
Web Title: yale university usa reviews

प्रश्नवेध यूपीएससी : आधुनिक जगाचा इतिहास आधुनिक जगाचा इतिहास

प्रश्नवेध यूपीएससी : आधुनिक जगाचा इतिहास

आधुनिक जगाचा इतिहास

(संग्रहित छायाचित्र)

श्रीकांत जाधव
आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक जगाचा इतिहास या घटकावर २०१३ ते २०१८ मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत.
“Latecomer” Industrial revolution in Japan involved certain factors that were markedly different from what west had experience.’’
‘‘उशिराने सुरू झालेल्या जपानमधील औद्योगिक क्रांतीमध्ये निश्चित काही असे घटक होते जे पश्चिमेतील देशांच्या अनुभवापेक्षा खूपच भिन्न होते.’’ विश्लेषण करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्द मर्यादा.)
“africa was chopped into states artificially created by accident of European competition. Analyse.’’
‘‘युरोपिय प्रतिस्पर्धीयांच्या आघातामुळे आफ्रिकेचे छोटय़ा छोटय़ा कृत्रिमरीत्या निर्मित राज्यामध्ये तुकडे करण्यात आले.’’ विश्लेषण करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्द मर्यादा.)
*    American Revolution was an economic revolt against mercantilism. Substantiate.
‘‘अमेरिकन क्रांती वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव होता.’’ सिद्ध करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्द मर्यादा.)
*    What policy instruments were deployed to contain the great economic depression?
आर्थिक महामंदीशी सामना करण्यासाठी कोणत्या धोरणात्मक साधनांचा वापर करण्यात आलेला होता? (२०१३, १० गुण आणि २०० शब्द मर्यादा.)
* What were the events that led to the Suez Crisis in 1956? How did it deal a final blow to Britain’s self-image as a world power?
कोणत्या घटनांमुळे १९५६ मधील सुवेझ संकट (Suez Crisis) निर्माण झालेले होते? त्याने कशा प्रकारे ब्रिटनच्या स्वयंकित जागतिक सत्तेच्या प्रतिमेवर शेवटचा प्रहर केला? (२०१४, १० गुण आणि १५० शब्द मर्यादा.)
*    Why did the industrial revolution first occur in England? Discuss the quality of life of the people there during the industrialization. How does it compare with that in India at present times?
सर्वप्रथम औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्येच का झाली? औद्योगिकीकरणाच्या काळामधील तेथील लोकांच्या जीवनाच्या गुणवत्तेची चर्चा करा. भारताच्या सद्यस्थितीमधील जीवन गुणवत्तेशी ती कशी तुलनात्मक आहे? (२०१५, १२.५ गुण आणि २०० शब्द मर्यादा.)
*   To what extend can Germany be held responsible for causing the two World Wars? Discuss critically.
कोणत्या मर्यादेपर्यंत जर्मनीला दोन जागतिक महायुद्धासाठी जबाबदार धरले जाऊ शकते? समीक्षात्मक चर्चा करा. (२०१५, १२.५ गुण आणि २०० शब्द मर्यादा.)
* The anti-colonial struggles in West Africa were led by the new elite of Western -educated Africans. Examine.
पश्चिमी आफ्रिकेतील वसाहतविरोधी संघर्षचे नेतृत्व पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या नव अभिजन वर्गाने केलेले होते. परीक्षण करा. (२०१५, १२.५ गुण आणि २०० शब्द मर्यादा.)
*     What problems are germane to the decolonization process in the Malay Peninsula?मलाय द्वीपकल्प (Malay Peninsula)
निर्वसाहतीकरण प्रक्रियेसाठी कोणकोणत्या समस्या सुसंगत होत्या? (२०१७, १० गुण आणि १५० शब्द मर्यादा.)
२०१८ मध्ये या घटकावर थेट प्रश्न विचारण्यात आलेला नाही.
प्रश्नांचे आकलन
औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद आणि वसाहतवाद यावरील प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी साम्राज्यवाद आणि वसाहतवाद हे नेमके काय होते? याची सुरुवात कशी झाली? यासाठी नेमके कोणते घटक कारणीभूत होते? आणि औद्योगिक क्रांतीला वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यामुळे कसा फायदा झाला? याविषयी सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे. युरोपातील प्रबोधन युग, त्याची पाश्र्वभूमी आणि त्याचे समाजाच्या सर्व जीवनावर झालेले परिणाम या घटकांचा सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो. त्या देशांनी सुरू केलेली वसाहतवाद आणि साम्राज्यवादाची प्रक्रिया, त्याअंतर्गत त्यांनी आशिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडात वसाहती स्थापन करून साम्राज्यवाद कशा प्रकारे निर्माण केला याचे योग्य आकलन करता येत नाही.
अमेरिकन क्रांतीसंबंधीचा प्रश्न समजून घेण्यासाठी आधी काही गोष्टींची माहिती घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम वाणिज्यवाद म्हणजे काय होते आणि इंग्लंड या देशांनी वाणिज्यवादाद्वारे अमेरिकन वसाहतीची आर्थिक नाकेबंदी कशी केलेली होती इत्यादीची माहिती घेणे गरजेचे आहे. या माहितीचा वापर करून अमेरिकन क्रांती ही वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव कसा होता हे आपणाला सोदाहरण सिद्ध करता येते.
आर्थिक महामंदीशी संबंधित प्रश्न सोडविताना आपणाला आर्थिक धोरणांचा मुख्यत्वे विचार करावा लागतो. ही धोरणे नेमकी कोणती होती व या धोरणांच्या परिणाम स्वरूप नेमके काय साध्य झालेले होते, अशी माहिती असावी लागते. तसेच या प्रश्नांचे स्वरूप संकीर्ण प्रकारात अधिक मोडणारे आहे म्हणून येथे फक्त धोरणाची माहिती नमूद करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.
पश्चिमी आफ्रिकेतील वसाहतविरोधी संघर्षांचे नेतृत्व पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या नव- अभिजन वर्गाने केलेले होते, परीक्षण करा.
हा प्रश्न व्यक्तिविशेष प्रकारात मोडणारा आहे आणि या देशातील ज्या महत्त्वाच्या व्यक्ती, त्यांची नावे, कार्य विचारसरणी याची माहिती देणे अपेक्षित आहे. शिवाय त्यांनी कशा पद्धतीने यांनी नेतृत्व केलेले होते आदी सर्व पलूंचा आधार घेऊन या प्रश्नाचे उत्तर लिहिले पाहिजे. उपरोक्त प्रश्न हे संकीर्ण आणि विश्लेषणात्मक या दोन्ही माहितीचा एकत्रित आधार घेऊन विचारण्यात आलेले आहेत.
First Published on April 6, 2019 12:27 am
Web Title: article on history of modern world

एमपीएससी मंत्र : गट ‘क’ सेवा पूर्वपरीक्षा अर्थव्यवस्था प्रश्न विश्लेषण

एमपीएससी मंत्र : गट ‘क’ सेवा पूर्वपरीक्षा

अर्थव्यवस्था प्रश्न विश्लेषण

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा
जूनमध्ये गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होत आहे. संयुक्त पूर्वपरीक्षेचे हे दुसरे वर्ष असले तरी प्रश्नांचे स्वरूप आणि काठिण्य पातळी समजून घेण्यासाठी सन २०१८च्या पेपरचे विश्लेषण उपयुक्त ठरू शकते. अर्थव्यवस्था घटकाच्या तयारीच्या दृष्टीने सन २०१८च्या पेपरचे विश्लेषण या लेखामध्ये करण्यात येत आहे.
सन २०१८च्या पेपरमध्ये अर्थव्यवस्था घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न पुढीलप्रमाणे –
* प्रश्न १. केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते अशा प्रकारे दोन भागांत विभागले जाते. केंद्र शासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीलपकी कोणते दोन स्रोत / मार्ग आहेत?
अ. बा कर्ज ब. कर महसूल
क. अल्प बचती  ड. करेतर महसूल
पर्यायी उत्तरे –
१) अ आणि ब   २) ब आणि ड
३) क आणि ड   ४) अ आणि क
* प्रश्न २. भांडवली वस्तू उद्योग व पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती?
१) एस. व्ही. एस. राघवन प्रतिमान       २) चक्रवर्ती प्रतिमान
३) केळकर प्रतिमान              ४) महालनोबिस प्रतिमान
* प्रश्न ३. खालील विधाने विचारात घ्या.
अ.   मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे.
ब.   आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरण उद्दिष्ट आहे.
क.   बँक दर हे मौद्रिक धोरणाचे साधन आहे.
वरीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब   २) ब आणि क
३) अ आणि क   ४) वरील सर्व
*     प्रश्न ४. खालील विधाने विचारात घ्या.
अ.   शिलकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते.
ब.   तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
क.   भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे.
वरीलपकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/ आहेत?
पर्यायी उत्तरे –
१) अ आणि ब   २) ब आणि क
३) फक्त ब      ४) फक्त क
*     प्रश्न ५. खालील विधाने विचारात घ्या.
अ.   लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार तपासू शकत नाही.
ब.   लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम / निर्णायक स्वरूपाचा नसतो.
क.   लेखापरीक्षक तज्ज्ञावर विश्वास ठेवून असतो.
वरीलपकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/ आहेत?
पर्यायी उत्तरे –
१) फक्त अ           २) ब आणि क
३) फक्त क           ४) अ, ब आणि क
*     प्रश्न ५. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार खालील विधाने विचारात घ्या.
अ.   पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते.
ब.   दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते.
क.   तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण व औद्योगिकीकरण जलद होते.
ड.   १९२१ नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला.
वरीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
पर्यायी उत्तरे –
१) अ आणि ब   २) ब आणि क
३) क आणि ड   ४) वरील सर्व
सन २०१८च्या पेपरमधील अर्थव्यवस्था घटकाच्या प्रश्नांच्या विश्लेषणाच्या आधारे पुढील बाबी समजून घेणे आवश्यक आहे –
*    अर्थव्यवस्था घटकाच्या राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण अशा सर्व घटकांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत.
*    अभ्यासक्रमात स्पष्टपणे नमूद नसल्या तरी पंचवार्षकि योजनांवर प्रश्न विचारलेला आहे.
*    शासकीय अर्थव्यवस्थेचा आणि दारिद्रय़ निर्मूलन/ रोजगार निर्मितीचा भाग म्हणून विविध योजनांवर प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे अभ्यासक्रमात उल्लेख नाही म्हणून जुन्या योजनांचा अभ्यास सोडून देता येणार नाही.
*    सन २०१८मध्ये तथ्यात्मक प्रश्नांची संख्या नगण्य आहे आणि संकल्पनात्मक प्रश्नांवर जास्त भर देण्यात आला आहे.
*    मूलभूत अभ्यास झालेल्या उमेदवारांसाठी संकल्पनात्मक प्रश्नांची काठिण्य पातळीसुद्धा आत्मविश्वासाने प्रश्न सोडविता येतील अशा प्रकारची आहे.
*    बहुविधानी प्रश्नांची संख्या जास्त असली तरी प्रश्नांचे स्वरूप हे प्रत्येक विधान सत्य किंवा चूक / बरोबर आहे का हे स्वतंत्रपणे तपासणारे असे आहे. दिलेली विधाने काही वेळा एकाच मुद्याच्या अंतर्गत येत असली तरीही त्यांचा एकमेकांशी प्रत्यक्ष संबंध नाही अशा प्रकारचा बहुविधानी प्रश्नही विचारण्यात आला आहे. त्यामुळे प्रश्नांची लांबी जास्त असली तरी बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचा सर्वागीण अभ्यास झाला असेल तर ते सोडविताना ताण येणार नाही.
*  एकूण प्रश्नांचे स्वरूप व त्यांमधील मुद्दे पाहता अर्थव्यवस्था विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे, कायदेशीर तरतुदी, योजनांचे स्वरूप इत्यादी पारंपरिक मुद्दे आणि लोकसंख्या, अर्थसंकल्प, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्रय़, रोजगार इत्यादी महत्त्वाच्या मुद्दय़ांची अद्ययावत आकडेवारी व चालू घडामोडींबाबतची संकल्पनात्मक व तथ्यात्मक माहिती अशी या घटकाच्या तयारीची चौकट असायला हवी.
First Published on April 5, 2019 12:02 am
Web Title: article on economy question analysis

‘प्रयोग’ शाळा : विज्ञानाची जादू प्रवीण शिंदे गेल्या १० वर्षांपासून सेवेत आहेत. सुरुवातीला ते शिरूर (कासार) तालुक्यातील भडकेल या गावच्या शाळेत कार्यरत होते.

‘प्रयोग’ शाळा : विज्ञानाची जादू

प्रवीण शिंदे गेल्या १० वर्षांपासून सेवेत आहेत. सुरुवातीला ते शिरूर (कासार) तालुक्यातील भडकेल या गावच्या शाळेत कार्यरत होते.

(संग्रहित छायाचित्र)

जि.प. प्राथमिक शाळा जरेवाडी, ता. पाटोदा,
जि. बीड या शाळेतला रोजचा परिपाठ मोठा मजेशीर असतो. कारण त्यात रोज पाहायला मिळते विज्ञानाची एक जादू अर्थात वैज्ञानिक प्रयोग. पुस्तकातले विज्ञान विद्यार्थ्यांच्या रोजच्या जगण्यात आणण्यासाठी त्यांचे शिक्षक प्रवीण शिंदे सतत कार्यरत असतात.
प्रवीण शिंदे गेल्या १० वर्षांपासून सेवेत आहेत. सुरुवातीला ते शिरूर (कासार) तालुक्यातील भडकेल या गावच्या शाळेत कार्यरत होते. त्यानंतर २०१२-२३ मध्ये त्यांची बदली झाली, जि.प. प्राथमिक शाळा जरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड या शाळेमध्ये. ही शाळा जिल्ह्य़ातील पहिली आयएसओप्राप्त शाळा. इथे शिक्षणाचा दर्जा उत्तम होताच आणि प्रवीणसरांसारखे शिक्षक तो अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रवीण म्हणतात, ‘‘संदीप पवारसरांनी शाळेसाठी जवळपास २०-२२ वर्षे अथक मेहनत घेतली आहे. त्यांचा आम्हा सर्व शिक्षकांना खूप पाठिंबा असतो. विद्यार्थ्यांना मुळात शिकण्याची आवड असल्याने आम्हालाही अधिकाधिक प्रयोग करावेसे वाटतात.’’
प्रवीण शिंदे यांना शिक्षकच व्हायचे होते त्यामुळे बारावीनंतर ते थेट दाखल झाले ते डीएड कॉलेजलाच. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना जाणवले की, आपल्याला विज्ञानविषयक वाचन, माहिती अधिक आवडते. मग या विषयातील अधिकाधिक पुस्तके वाचताना त्यांच्या लक्षात आले की, विज्ञान शिका असे आपण सारेच म्हणतो पण खरी गरज आहे, विज्ञान जगण्याची. हा मुद्दा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी मग त्यांनी अनेक उपक्रम राबवण्यासाठी सुरुवात केली.
जरेवाडीच्या शाळेमध्ये विज्ञानविषयक अनेक उपक्रम चालतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे जिओ सायन्स क्लब. जिओ (जिओग्राफी) म्हणजे भूगोल तर सायन्स म्हणजे विज्ञान. हे दोन्ही विषय विद्यार्थ्यांच्या परिसरातले आणि समजण्यासाठी गरजेचेच. जिओ सायन्स क्लबचे सदस्य आहेत, सहावी ते आठवीतले विद्यार्थी. जवळपास १४-१५ विद्यार्थी मिळून या क्लबचे काम पाहतात. या क्लबमार्फत अनेक उपक्रम राबवण्यात येतात. विज्ञानविषयक माहितीचे भित्तिपत्रक विद्यार्थ्यांकडून तयार केले जाते. विज्ञानाशी संबंधित मासिकांचे, पुस्तकांचे नियमित वाचन होते.
शाळेमध्ये वर्गाना केवळ सहावीचा किंवा आठवीचा वर्ग न म्हणता एक वेगळी वैज्ञानिक ओळख आहे. प्रत्येक वर्गाला एकेका शास्त्रज्ञाचे नाव दिलेले आहे. त्या त्या शास्त्रज्ञाची माहिती त्या त्या वर्गाच्या दारावर लिहिलेली असते. जिओसायन्स क्लबमध्ये विज्ञानविषयक चित्रपटांचे किंवा माहितीपटांचेही प्रदर्शन होत असते.
‘माय सायन्स लॅब’ या उपक्रमांतर्गत अगदी साध्या गोष्टींतून, वस्तूंतून विज्ञान प्रयोग केले जातात. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जातो. प्रयोगशाळेत नेहमीच सगळ्यांना सगळी उपकरणे हाताळायला मिळतात, प्रयोग करायला मिळतात असे नसते. त्यामुळेच ‘माय सायन्स लॅब’ ही कमीतकमी खर्चातली प्रत्येकाची प्रयोगशाळा सजते. एका साध्या खोक्यात चुंबक, पट्टी, दोरा, मेणबत्ती, आरसा, काच, बशी, रबर, लाकडी ठोकळा, लोकर इ. वस्तूंच्या साहाय्याने विज्ञानातील अनेक संज्ञा प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांना समजावल्या जातात.
रोजचा परिपाठ हासुद्धा विज्ञानमय व्हावा यासाठी ‘विज्ञान अध्ययन समृद्धी’ कार्यक्रम राबवला जातो. त्याअंतर्गत संपूर्ण आठवडय़ाचा वैज्ञानिक कार्यक्रमच नक्की केलेला आहे. वैज्ञानिक शब्दकोडे, प्रश्नमंजूषा, आपले पर्यावरण, गंमत विज्ञानाची, शास्त्रज्ञ आणि आपले आरोग्य अशाप्रकारे सहा दिवसांसाठी सहा उपक्रम राबवले जातात. परिपाठात या सर्व उपक्रमांचे सादरीकरण होते.
विद्यार्थ्यांनी नवनवी माहिती शोधावी, यासाठी प्रवीण आणि सहकारी अनेक उपक्रम राबवत असतात. त्यातीलच एक म्हणजे, ‘धिस फ्रेम माय फ्रेंड’. विद्यार्थ्यांनी शोधलेली नवनवी माहिती नव्या नव्या आठवडय़ात या फ्रेममध्ये झळकते. त्यासाठीचे पोस्टरही विद्यार्थीच बनवतात. पुस्तकातलेच विज्ञान आपल्या जगण्यात आहे, हे दाखवून देण्यासाठी प्रवीण शिंदे ‘कर के देखो’ हा उपक्रम घेतात. त्यामध्ये परिसरातल्या वस्तू घेऊन परिपाठात सोपे प्रयोग करून दाखवले जातात. ही शाळा सेमी इंग्रजी माध्यमातील आहे. पाचवीपर्यंत मराठीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सहावीत आल्यावर इंग्रजीमधून विज्ञान शिकणे काहीसे अवघड जाऊ शकते. अशा वेळी या विद्यार्थ्यांच्या मदतीला येतात, वरच्या वर्गातले विद्यार्थी. ‘इच मी टीच मी’ उपक्रमांतर्गत दररोज मधल्या सुट्टीच्या वेळात मोठे विद्यार्थी छोटय़ा विद्यार्थ्यांना शिकवतात. यातून दोन गोष्टी होतात. मोठय़ांचा अभ्यास पक्का होतो तर लहान विद्यार्थ्यांना आपल्याच मित्राकडून दडपणाविना विज्ञान शिकताना ते अधिक जवळचे वाटू लागते.
जसे विज्ञान महत्त्वाचे तसेच भूगोलही. पाटोदा तालुका हा मोरांकरता प्रसिद्ध. पण कमी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती यामुळे मोरांची संख्या कमी होत आहे. म्हणूनच ‘मूठभर धान्य पक्ष्यांसाठी’ या उपक्रमांतर्गत तालुक्यातील शाळांकडून पक्ष्यांसाठी जमेल त्याप्रमाणे धान्य गोळा केले जाते. त्याचेही बरेचसे काम विद्यार्थीच पाहतात. हे जमलेले धान्य पक्ष्यांच्या पाणवठय़ाच्या आसपासच्या जागांवर विखरून टाकण्यात येते. हा उपक्रम सुरू झाल्यापासून अनेक विद्यार्थीही आपल्या घरांजवळ पक्ष्यांसाठी दाणा-पाणी ठेवू लागले आहेत. याचबरोबर शाळेत राबवला जाणारा आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे रद्दीतून ग्रंथनिर्मिती. रद्दी पेपर हे टाकाऊ पण त्यातूनही चांगल्या माहितीची कात्रणे काढून त्याची चिकटवही तयार केली जाते. अशाप्रकारे या रद्दीतून एकप्रकारे नवनिर्मिती होत असते.
या साऱ्यासोबत विज्ञान प्रदर्शने, निबंध स्पर्धा, चित्र प्रदर्शन, विज्ञान नाटय़ोत्सव, बालविज्ञान परिषद अशा उपक्रमांमध्ये जरेवाडीचे विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतच असतात शिवाय पारितोषिकेही मिळवतात. एकूणच प्रवीण शिंदे यांच्या कल्पक उपक्रमांमुळे आणि प्रयत्नांमुळे जरेवाडीचे विद्यार्थी विज्ञान फक्त पुस्तकामध्ये शिकत नाहीत तर जगायचाही प्रयत्न करत आहेत.
First Published on April 4, 2019 11:59 pm
Web Title: prayogshala article by swati pandit 2

यूपीएससीची तयारी : सामाजिक, आर्थिक भूगोल प्रस्तुत लेखामध्ये भूगोल विषयातील सामाजिक व आर्थिक भूगोल या अभ्यासघटकांविषयी जाणून घेऊ.

यूपीएससीची तयारी : सामाजिक, आर्थिक भूगोल

प्रस्तुत लेखामध्ये भूगोल विषयातील सामाजिक व आर्थिक भूगोल या अभ्यासघटकांविषयी जाणून घेऊ.

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण चौगुले
मागील लेखामध्ये आपण प्राकृतिक भूगोल व पूर्वपरीक्षेमध्ये नकाशा वाचनाचे महत्त्व या बाबींचा आढावा घेतला. प्रस्तुत लेखामध्ये भूगोल विषयातील सामाजिक व आर्थिक भूगोल या अभ्यासघटकांविषयी जाणून घेऊ.
आर्थिक व सामाजिक भूगोलाचा अभ्यास भारत व जगाच्या अनुषंगाने करावा लागेल. या घटकांच्या अभ्यासाचे नियोजन करताना यामध्ये कोणकोणते उपघटक समाविष्ट आहेत याची माहिती असणे क्रमप्राप्त आहे. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास कोणत्या घटकावर अधिक प्रश्न विचारलेले आहेत याची माहिती मिळते.
आर्थिक भूगोलामध्ये प्रामुख्याने मानवी आर्थिक प्रक्रिया व नसíगक साधनसंपत्ती यांचा अभ्यास केला जातो. राष्ट्रातील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्र यामधील सद्य:स्थिती, त्याबाबतचे सरकारी धोरण, योजना यांचा चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून आढावा घ्यावा. उदा. भारतातील दुसरी हरितक्रांती, मेक इन इंडिया इत्यादी.
आर्थिक भूगोलावर पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न पाहू –
२०१८ – भारतीय कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये ‘संवर्धन कृषी’ या संकल्पनेचे महत्त्व वाढत आहे. खालीलपकी कोणकोणत्या बाबी कृषी संवर्धनांतर्गत येतात? –
(१) एकपिक पद्धती टाळणे.
(२) न्यूनतम लागवडीखालील क्षेत्र
(३) प्लांटेशन क्रॉप्सची लागवड टाळणे.
(४) मृदेचा पृष्ठभाग आच्छादीत करण्यासाठी पिकांच्या अवशेषाचा वापर (५) स्थानिक व काल्पिक पीक आवर्तनाचा स्वीकार करणे.
*     २०१६ – खालीलपैकी कोणत्या प्रदेशात शेल गॅस संसाधने आढळतात?
(१) बेसीन (२) कावेरी बेसीन
(३) कृष्णा-गोदावरी बेसीन.
* २०१५ – सस्टेनेबल शुगरकेन इनिशिएटीव्हचे महत्त्व काय आहे?
* २०१४ – इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम या अंमलबजावणीचे फायदे काय आहेत?
* २०१३ – भारतातील खालीलपैकी कोणते उद्योग पाण्याचे अधिक उपभोक्ते आहेत?
(१) अभियांत्रिकी
(२) पेपर व पल्प
(३) टेक्सटाइल्स
(४) औष्णिक ऊर्जा.
* २०१३ – यापैकी कोणती पिके खरीप आहेत?
(१) कापूस   (२) भुईमूग
(३) भात   (४) गहू
आर्थिक भूगोलाचा अभ्यास चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे हितावह ठरेल. उदा. गेल्या काही वर्षांमध्ये शेल गॅस या संसाधनाची चर्चा सुरू होती. त्या संदर्भामध्ये शेलगॅसवर आधारित प्रश्न २०१६ मध्ये विचारला होता.
सामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल यांचा अभ्यास करावा लागतो. लोकसंख्या भूगोलामध्ये विविध लोकसंख्या शास्त्रीय घटक उदा. लोकसंख्यावृद्धी, वितरण, जन्मदर, मृत्यूदर, लिंग गुणोत्तर, कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, लोकसंख्या लाभांश इ. घटकांची माहिती करून घ्यावी. यासोबतच स्थलांतराची कारणे, प्रकार, परिणाम, अभ्यासावे. भारताचे लोकसंख्या धोरण, लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना, वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा इ. बाबींचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.
वसाहत भूगोलामध्ये मानवाच्या ग्रामीण व नागरी वसाहतींचा अभ्यास केला जातो. भारताचा औद्योगिक विकास झाल्यानंतर स्थलांतर मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी क्षेत्रांमध्ये समस्या निर्माण झाल्या. तसेच या समस्यांवर सरकारकडून विविध धोरणे अवलंबिली जातात.
उदा. स्मार्ट सिटी. याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.
२०१४ मध्ये चांगपा (Changpa) या जमातीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
२०१३ मध्ये जमातींची नावे व त्यांचे राज्य यांच्या योग्य जोडय़ा लावण्याचा प्रश्न आला होता. असे काही प्रश्न सामाजिक भूगोलाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासता येतील.
भूगोलामध्ये पर्यावरण भूगोल हा घटक देखील महत्त्वाचा आहे. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये भूपर्यावरण हा स्वतंत्र घटक आपल्याला अभ्यासावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अभ्यासणे आवश्यक आहे. सध्याची सर्वात गंभीर समस्या म्हणजे हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ होय. यासोबतच जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे प्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमींचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटनांचा सखोलपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांची नोंद घ्यावी.
प्रदूषणासंदर्भात २०१८ मध्ये पुढील प्रश्न विचारला होता –
नदीतळातून मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा केल्याने खालीलपैकी कोणते गंभीर परिणाम संभवतात?
(१) नदीच्या क्षारतेमध्ये घट  (२)भूजलाचे प्रदूषण
(३)भूजल पातळी खालावणे.
First Published on April 4, 2019 12:06 am
Web Title: article on social economic geography

शब्दबोध : घट्टकुटी प्रभात न्याय घट्ट म्हणजे जकात. कुटी म्हणजे झोपडी. घट्टकुटी म्हणजे जकात नाका. प्रभात म्हणजे पहाट हे आपल्याला माहीतच आहे.

शब्दबोध : घट्टकुटी प्रभात न्याय

घट्ट म्हणजे जकात. कुटी म्हणजे झोपडी. घट्टकुटी म्हणजे जकात नाका. प्रभात म्हणजे पहाट हे आपल्याला माहीतच आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर
संस्कृतमध्ये जे अनेक मजेशीर न्याय आहेत त्यातलाच एक म्हणजे घट्टकुटी प्रभात न्याय. हे नाव ऐकून ‘हे नेमके काय?’ असा प्रश्न अनेकांना पडेल. हा फार जुना आणि संस्कृत साहित्यातील न्याय आहे.
घट्ट म्हणजे जकात. कुटी म्हणजे झोपडी. घट्टकुटी म्हणजे जकात नाका. प्रभात म्हणजे पहाट हे आपल्याला माहीतच आहे. सध्या अनेक शहरांतील जकात रद्द झाली आहे, पण काही वर्षांपूर्वी सर्व नगरांत आणि शहरांत प्रवेश करताना मालावर जकात द्यावी लागे. त्या वेळी ‘इतक्या लाखांची जकात चुकवलेला मालट्रक पकडला’ अशा तऱ्हेच्या बातम्या वर्तमानपत्रांत वाचायला मिळत. जकात चुकविण्याची प्रवृत्ती त्यातून दिसून येई. पण गंमत म्हणजे ही प्रवृत्ती आजकालचीच नाही तर फार पुरातन आहे. कारण जकातीची परंपराही तितकीच जुनी आहे. जकात चुकविण्यासाठी हल्ली जशा युक्त्या योजल्या जातात, तशाच पूर्वीही योजल्या जात. पूर्वी व्यापारी आपला माल बैलगाडय़ांतून वाहून नेत. जकात नाका टाळण्यासाठी सहसा रात्री प्रवास करत, तेदेखील आडमार्गाने. पण कित्येकदा गंमत काय व्हायची की, आडमार्गाचा रस्ता चुकायचा. मग रात्रभर अंधारात भरपूर हिंडल्यावर पहाटेच्या प्रकाशात गाडी हमरस्त्याला लागायची आणि नेमका जकात नाकाच समोर दृष्टीस पडायचा. हाच तो घट्टकुटी प्रभात न्याय. मूळ उद्देश फसणे, असफल होणे हा या न्यायाचा अर्थ.
First Published on April 4, 2019 12:05 am
Web Title: article on word sense

एमपीएससी मंत्र : भौगोलिक घटकांचा अभ्यास भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे.

एमपीएससी मंत्र : भौगोलिक घटकांचा अभ्यास

भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे.

फारुक नाईकवाडे
विज्ञानाच्या अभ्यासाप्रमाणे भूगोलाचा अभ्यासही व्याख्या (definition) व प्रक्रियांचा संकल्पनांवर आधारित अभ्यास कमी वेळेत चांगले आकलन होण्यास मदतगार ठरतो.
अभ्यासामध्ये काही ठळक बाबींचा क्रम लावून घ्यायला हवा. सगळ्यात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजावून घ्यायला हव्यात. यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया (उदा. भूरुप निर्मिती, भूकंप/वादळ इत्यादींची निर्मिती) समजून घेणे आवश्यक आहे. संकल्पनात्मक बाबी समजून घेतल्यावर त्यांच्याबाबतची तथ्ये लक्षात ठेवायला सोपी जातात. उपघटकनिहाय तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.
*     भौगोलिक संज्ञा व संकल्पना –
*   भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाण वेळ इ. पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.
*   पृथ्वीचे वजन, वस्तुमान, ढगांचे प्रकार इ. बाबी सोडता येतील. भूरुपांपैकी केवळ प्रसिद्ध नद्या, पर्वत, सरोवरे इ. या घटकांचाच अभ्यास केलास थोडा भार कमी होईल.
*   जगातील हवामान विभाग व त्यांची थोडक्यात वैशिष्टय़े समजून घ्यावीत. जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हवामान विभागांना असलेली वेगवेगळी नावे तसेच वाऱ्यांना असलेली वेगवेगळी नावे यांच्या टेबल स्वरूपात नोट्स काढता येतील.
*   मान्सूनची निर्मिती, वितरण, भारताच्या / महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व, ऋतूंची निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.
*   कोणत्याही भौगोलिक घटना / प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत.
भौगोलिक व वातावरणीय पाश्र्वभूमी; घटना घडू शकते/घडते ती भौगोलिक ठिकाणे ; प्रत्यक्ष घटना/प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे / प्रक्रियेचे परिणाम; पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिक महत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना / प्रक्रिया (current events)
*   नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळांची नावे यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
*   भूरूप निर्मितीचा वारा, नदी, हिमनदी व समुद्र या चार कारकांच्या शीर्षकाखाली मुद्दय़ांच्या वा टेबलच्या स्वरूपात नोट्स काढता येतील. प्रत्येक कारकाकडून होणाऱ्या अपक्षयामुळे होणारी भूरुपे व संचयामुळे होणारी भूरुपे असे विभाजन करता येईल. प्रत्येक भूरुपासाठी उपलब्ध असल्यास जागतिक पातळीवरील प्रसिद्ध उदाहरण भारतातील व असल्यास महाराष्ट्रातील उदाहरण नमूद करावे.
*   भारतातील व महाराष्ट्रातील
खडकांचे प्रकार आर्थिकदृष्टया महत्त्वाचे असल्याने या भागाचा परिपूर्ण अभ्यास करायला हवा.
* खडकांचा प्रकार
*  निर्मिती’  कोठे आढळतो
* भौगोलिक व वैज्ञानिक वैशिष्टय़े
* रचना ’  आर्थिक महत्त्व या मुद्दयांच्या अनुषंगाने अभ्यास करावा.
*     भौतिक भूगोल
*   भौतिक भूगोलामध्ये नकाशावर आधारित किंवा बहुविधानी किंवा जोडय़ा लावणे अशा प्रकारचे संकल्पनात्मक प्रश्न विचारले जातात. यासाठी भूगोलाचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करायला हवा. नदीप्रणाली, पर्वतप्रणाली, प्राकृतिक विभाग, मान्सूनचे वितरण इ. बाबत भौतिक भूगोलातून प्रश्न विचारले जाऊ शकतात.
*   भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे.
*   भारतातील पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे.
या नदी व पर्वतप्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी.
*   जागतिक भूगोलाचा फक्त प्रसिद्ध नद्या, पर्वत, प्राकृतिक विभाग इ. चा टेबल फॉरमॉटमध्ये factual अभ्यास पुरेसा आहे.
*     महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल
*   महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल हा कृषीविषयक प्रश्न वगळता बहुतांश तथ्यात्मक घटक आहे. महत्त्वाचे पायाभूत उद्योग, महत्त्वाची धरणे/प्रकल्प व महत्त्वाची पर्यटनस्थळे यांचा टेबल पद्धतीमध्ये अभ्यास करायचा आहे. टेबलमध्ये समाविष्ट करायचे मुद्दे पुढीलप्रमाणे. –
* स्थान ’  वैशिष्टे  ’  आर्थिक महत्त्व
* असल्यास वर्गीकरण
*  असल्यास संबंधित चालू घडामोडी.
*   खनिजे व ऊर्जास्रोत यांचेबाबत सर्वाधिक उपलब्धतेचे जिल्हे, सर्वात जास्त उत्पादन करणारे जिल्हे, त्या त्या ठिकाणची भौगोलिक व प्राकृतिक वैशिष्टय़े यांचा टेबल पद्धतीमध्ये नोट्स काढून अभ्यास करायला हवा. या सर्व बाबींचा परस्परसंबंध व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.
*   महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने, वने माहीत असायला हवीत. भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्य:स्थितीत चच्रेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी.
*   महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, मृदेचे प्रकार, त्यांची वैशिष्टय़े, त्यांचे वितरण, त्या त्या जमिनीवर / मृदेमध्ये घेतली जाणारी प्रमुख पिके यांचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच प्रमुख पिके व त्यांचे प्रमुख उत्पादक जिल्हे यांचा आढावा आवश्यक आहे.
First Published on April 3, 2019 1:21 am
Web Title: mpsc exam 2019 mpsc exam preparation tips 2

यूपीएससीची तयारी : पूर्वपरीक्षा : भूगोलाची तयारी यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने भूगोल विषयातील प्राकृतिक भूगोल अभ्यासघटकाची उकल केली.

यूपीएससीची तयारी : पूर्वपरीक्षा : भूगोलाची तयारी

यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने भूगोल विषयातील प्राकृतिक भूगोल अभ्यासघटकाची उकल केली.

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण चौगुले
प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी पूर्वपरीक्षेकरिता भूगोल अभ्यासघटकाविषयी माहिती घेणार आहोत. भूगोलाची व्याप्ती व परीक्षेतील वेटेज लक्षात घेता परीक्षार्थीना निश्चितच योग्य रणनीतीचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे. संकल्पना स्पष्ट करून घेतल्यास हा विषय अत्यंत सुलभ बनवता येतो. दरवर्षी भूगोल या विषयावर किमान १५ ते २० प्रश्न विचारले जातात. २०१८ सालच्या पूर्वपरीक्षेत १० प्रश्न विचारण्यात आले होते.
सर्वप्रथम आपण प्राकृतिक भूगोल या अभ्यासघटकांची तयारी कशी करावी याची माहिती घेऊ.
प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वीचा सर्वागीण अभ्यास केला जात असल्याने त्यास भूगोल विषयाचा गाभा मानला जातो. यामध्ये शिलावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण आणि पर्यावरण इत्यादी घटक अभ्यासावे लागतात. प्राकृतिक भूगोल हा घटक संकल्पनात्मक बाबींशी अधिक जवळीक साधणारा आहे. परिणामी या सर्व घटकांचे पारंपरिक ज्ञान सर्वप्रथम अभ्यासावे लागते.
भूरूपशास्त्रामध्ये खडक, पृथ्वीचे कवच, अंतरंग, अंतरंगातील प्रक्रिया अभ्यासाव्या लागतात. यात जगातील ज्वालामुखी व भूकंपप्रवण क्षेत्रे, मुख्य नद्यांची खोरी, इ. महत्त्वपूर्ण घटक आहेत.
सागरशास्त्र (Oceanography) मध्ये सागरतळ रचना, सागरी साधनसंपत्ती, सागरजल तापमान, सागराची क्षारता, सागरी प्रवाह, प्रवाळभित्तिका (Coral Reefs), सागरी प्रदूषण इ.सोबत सागरमाला प्रकल्प, सागरी हद्दीवरून राष्ट्राराष्ट्रांमध्ये होणारे वाद String of pearls इ. बाबी लक्षात घ्याव्यात.
वातावरणाचे घटक, रचना, हवेचे तापमान व दाब, वारे, मान्सून, जेटप्रवाह, सायक्लोन्स, एल निनो, ला निना. इ. हवामानशास्त्राशी संबंधित मुद्दे महत्त्वाचे आहेत. जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, अनपेक्षित हवामानशास्त्रीय घटना या चालू घडामोडींशी संबंधित घटना अभ्यासणे आवश्यक आहे.
यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने भूगोल विषयातील प्राकृतिक भूगोल अभ्यासघटकाची उकल केली. यानंतर या अभ्यासघटकावर आर्जपत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊ.
२०१८ मध्ये खाली दिलेली विधाने लक्षात घ्या, असा प्रश्न विचारला होता. त्यासाठी पुढील विधाने दिली होती.
१. बॅरन आयलँड ज्वालामुखी हा जिवंत ज्वालामुखी असून भारतीय क्षेत्रामध्ये स्थित आहे. २. बॅरन आयलँड ग्रेट निकोबार बेटाच्या १४० किमी. पूर्वेस आहे. ३. मागील वेळेस १९९१मध्ये या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता त्या वेळेपासून हा निष्क्रिय आहे.
या प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतातील नदीप्रणालीचा अभ्यास आवश्यक आहे. यामध्ये भारतातील प्रमुख नद्या, त्यांची उगमस्थाने, त्यांच्या उपनद्या आदी बाबींची माहिती असावी. प्राकृतिक भूगोल हा भूगोलाचा गाभा असल्याने या विषयातील संकल्पना स्पष्ट असतील तर त्याचा भूगोलातील इतर घटकांचे आकलन करून घेण्यास फायदा होतो. प्राकृतिक भूगोल या विषयावर पकड मिळवण्यासाठी या विषयाच्या स्वत:च्या नोट्स तयार करा. तसे केल्यास कमीतकमी वेळामध्ये हा घटक अभ्यासता येऊ शकतो.
प्राकृतिक भूगोलाचे मूलभूत आकलन एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांमधून करावे, ज्यामुळे या विषयाला सुलभपणे समजून घेता येते. पुढील वाचनाकरिता Certificate physical and human Geography by Goe Cheng Leang  हे पुस्तक वापरावे. नोट्स काढण्यापूर्वी उपरोक्त संदर्भग्रंथ वाचून त्यानंतर या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे आकलन करून घ्यावे.
भूगोलाच्या अध्ययनामध्ये पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे नकाशावर आधारित प्रश्न विचारले जातात, उदा. सद्य:स्थितीत घडलेली एखादी घटना, सदर घटना भौगोलिक किंवा इतर विषयांशी संबंधित असू शकतात. नकाशामध्ये प्रामुख्याने पर्वत, पर्वतरांगांचे दक्षिण उत्तर किंवा पूर्वपश्चिम क्रम, विषुववृत्त ज्या प्रदेशामधून जाते त्यांची नावे, नद्या, शहरे, देशांच्या सीमा, समुद्र, इ. बाबी ध्यानात घ्याव्या लागतात.
२०१८मध्ये पुढील प्रश्न विचारला होता –
बातम्यांमध्ये उल्लेख असणारे काही प्रदेश   देश पुढीलप्रमाणे
१. कॅटॅलोनिया   स्पेन
२. क्रिमीया      हंगेरी
३. मिंडानाओ   फिलिपिन्स
४. ओरोमिया    नायजेरिया
वरीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?
यासारखे चालू घडामोडींवर आधारित मात्र भूगोलाचा संदर्भ असणारे प्रश्न विचारले जातात.
२०१७ साली पुढील प्रश्न विचारला होता –
खालीलपैकी कोणता देश भौगोलिकदृष्टय़ा ग्रेट निकोबार बेटाच्या अधिक जवळ आहे?
१. सुमात्रा २. बोर्नियो ३. जावा ४. श्रीलंका.
वरील प्रश्नांवरून नकाशाधारित प्रश्न व नकाशा वाचनाचे महत्व अधोरेखित होते. नकाशा वाचनाकरिता Oxford किंवा ttk ‘चा अ‍ॅटलास घ्यावा. भूगोलाचा अभ्यास करताना व वर्तमानपत्र वाचत असताना अ‍ॅटलास नेहमी जवळ ठेवला पाहिजे.
First Published on April 2, 2019 2:31 am
Web Title: upsc exam 2019 useful tips for upsc exam preparation

विद्यापीठ विश्व : संशोधन आणि संधी विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना सुरुवातीपासून मान्यता मिळालेली आहे.

विद्यापीठ विश्व : संशोधन आणि संधी

विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना सुरुवातीपासून मान्यता मिळालेली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

कॉन्रेल विद्यापीठ, अमेरिका
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com
विद्यापीठाची ओळख – कॉन्रेल युनिव्हर्सिटी हे अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एक प्रमुख खासगी संशोधन विद्यापीठ आहे. कॉन्रेल विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले चौदाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना एझरा कॉन्रेल आणि अँड्रय़ू डिक्सन व्हाईट या अमेरिकन उद्योगपतींनी १८६५ साली केली. एझरा कॉन्रेल यांनी म्हटल्याप्रमाणे ‘आय वूड फाउंड अ‍ॅन इन्स्टिटय़ुशन व्हेअर एनी पर्सन कॅन फाइंड इन्स्ट्रक्शन इन एनी स्टडी’ हा या विद्यापीठाचा तात्त्विक सिद्धांत आहे.
कॉन्रेल विद्यापीठ एकूण चार हजार आठशे एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. कॉन्रेलचा मुख्य कॅम्पस न्यूयॉर्कमधील इथाका येथे आहे तर इतर दोन ‘वेल कॉन्रेल’ आणि  ‘कॉन्रेल टेक’ हे कॅम्पस न्यूयॉर्क शहरामध्ये आहेत. सप्टेंबर २००४ मध्ये विद्यापीठाने कतार, दोहा येथे आपला अजून एक कॅम्पस सुरू केला आहे. या सर्व कॅम्पसमध्ये मिळून कॉन्रेलमध्ये जवळपास तीन हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. तसेच जवळपास पंचवीस हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.
अभ्यासक्रम – कॉन्रेल विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधींचे आहेत. कॉन्रेलमधील शैक्षणिक विभाग हे वेगवेगळ्या  ‘कॉलेजेस’च्या माध्यमातून विभागलेले आहेत. विद्यापीठातील कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, कॉलेज ऑफ कॉम्प्युटिंग अ‍ॅण्ड इन्फॉम्रेशन सायन्स, कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड लाइफ सायन्सेस, कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या प्रमुख विभागांमार्फत संस्थेतील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टििफकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना सुरुवातीपासून मान्यता मिळालेली आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे ऑटम, फॉल आणि स्प्रिंग या तीन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.
सुविधा – कॉन्रेल विद्यापीठातील शिक्षण जरी अतिशय महाग असले तरी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या आवारात विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा बहाल करण्यात येते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. कॉन्रेल एक महत्त्वाची संस्था असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणेतर प्रगतीची संधी प्रदान करते.
वैशिष्टय़
कॉन्रेलच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये, रतन टाटा, सिटीग्रूप, गोल्डमॅन सॅक समूह इत्यादी अनेक उद्योग समूहांचे प्रमुख यांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंतचे एकूण ५८ नोबेल पारितोषिक विजेते आणि चार टय़ुरिंग पुरस्कार विजेते या विद्यापीठाचे विद्यार्थी वा प्राध्यापक होते/आहेत.
संकेतस्थळ –  https://www.cornell.edu/
First Published on April 2, 2019 2:27 am
Web Title: reviews of cornell university usa ranking

एमपीएससी प्रश्नवेध : अर्थव्यवस्था गट क सेवा पूर्वपरीक्षा

एमपीएससी प्रश्नवेध : अर्थव्यवस्था

गट क सेवा पूर्वपरीक्षा

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा
गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा जूनमध्ये होत आहे. या परीक्षेच्या सरावासाठी या सदरातून घटकनिहाय सराव प्रश्न देण्यात येत आहेत. या लेखामध्ये अर्थव्यवस्था घटकाचे सराव प्रश्न देण्यात येत आहेत.
*      प्रश्न १-  योजना खर्च व योजनेतर खर्च हे ……. खर्चाचे भाग आहेत.
१) महसुली
२) भांडवली
३) उत्पादक
४) अनुत्पादक
*      प्रश्न २ – पुढीलपकी कोणते नाबार्डचे कार्य नाही?
१)   सहकारी बँका व प्रादेशिक ग्रामीण बँकांचे नियोजन व पुनर्वत्तिपुरवठा.
२)   प्राथमिक सहकारी बँकांची तपासणी.
३)   ग्रामीण पतपुरवठा संस्था उभारणे व देखरेख.
४)   ग्रामीण विकासात्मक पतपुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांची शिखर संस्था म्हणून कार्य.
*      प्रश्न ३ – पुढीलपकी कोणते रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे कार्य नाही?
१) नवीन बँकांना परवाने देणे.
२) चलनवाढीच्या वेगाचे नियंत्रण करणे.
३) पतनिर्मिती करणे.
४) चलन जारी करणे.
*      प्रश्न ४ – पुढीलपकी कोणते शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण म्हणता येणार नाही?
१) सिंचन सुविधांचा अभाव
२) शेतीचे व्यावसायिकीकरण
३) स्वस्त शेतमालाची आयात
४) शेतीमधील कमी सार्वजनिक गुंतवणूक
*      प्रश्न ५ – सन २०११च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्या आहे?
१) महाराष्ट्र      २) तामिळनाडू    ३) गोवा        ४) उत्तर प्रदेश
*      प्रश्न ६ – सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांमधील व्यापारी विचारसरणीचे मोजमाप करण्यासाठी कोणता निर्देशांक विकसित करण्यात आला आहे?
१) इनोव्हेशन इंडेक्स
२) क्रिसीडेक्स
३) रेसीडेक्स
४) इझ ऑफ डुइंग बिझनेस इंडेक्स
*      प्रश्न ७ – अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतरच्या उच्च शिक्षणाकरिता भोजन, निवास व निर्वाह भत्ता देणारी योजना कोणती?
१)   शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना
२)   डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना.
३)   दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना.
४) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.
*      प्रश्न ८ – बेसल नियम मुख्यत्वे कशाशी संबंधित आहेत?
१)   बँकेचे भांडवल व जोखीमभारित संपत्ती यांचे गुणोत्तर
२)   बँकेचे भांडवल व अकार्यकारी संपत्ती यांचे गुणोत्तर
३)   बँकेची जोखीमभारित संपत्ती व अकार्यकारी संपत्ती यांचे गुणोत्तर.
४)   बँकांमधील संकुचित पसा व विस्तृत पसा यांचे गुणोत्तर.
*      प्रश्न ९ – सरकारी लेख्यांची रचना, प्रपत्रे तयार करण्याची जबाबदारी कोणाची आहे?
१) भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक
२) केंद्रीय वित्त मंत्रालय
३) भारताचे महालेखा नियंत्रक
४) १ व ३ दोन्ही
*      प्रश्न १० – पुढीलपकी कोणती पंचवार्षकि योजना सामाजिक सेवा योजना म्हणून ओळखली जाते?
१) नववी        २) दहावी
३) अकरावी      ४) बारावी
*      प्रश्न ११ – ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेबाबत कोणते विधान चुकीचे आहे?
१)   साडेसात लाखांपर्यंत वार्षकि उत्पन्न असलेल्या सर्व कुटुंबांना लागू.
२)   योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांनी १८व्या वर्षांपर्यंत अविवाहित असणे आवश्यक.
३)   मुलीने दहावी परीक्षा उत्तीर्ण होणे योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक.
४)   दि. १ एप्रिल २०१७ पासून राज्यामध्ये लागू.
*      प्रश्न १२ – राखीव रोखता प्रमाण (cash reserve ratio) व वैधानिक रोखता प्रमाण  (Statutory liquidity ratio) वाढविल्यास पतनिर्मिती ————
१) कमी होते.
२) वाढते
३) आहे तेवढीच राहते.
४) आधी घटून मग वाढते.
*      प्रश्न १३ – जेव्हा करवसुली व कराघात वेगवेगळ्या व्यक्तींवर पडतो तेव्हा त्यास ——– कर म्हणतात.
१) प्रगतिशील    २) प्रमाणशीर
३) अप्रत्यक्ष ४) प्रत्यक्ष
उत्तरे
प्रश्न १. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (१)
प्र. २. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (२) (राज्य सहकारी बँका, जिल्हा केंद्रीय सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका यांची तपासणी नाबार्ड करते. प्राथमिक सहकारी बँकांची तपासणी निबंधक, सहकारी संस्था हे करतात.)
प्र. ३. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (३) (पतनिर्मिती करणे हे व्यापारी बँकांचे कार्य आहे. तर पत नियंत्रण हे रिझव्‍‌र्ह बँकेचे कार्य आहे.)
प्र. ४. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (२)
प्र. ५. योग्य उत्तर पर्याय क्रमांक  (१)
प्र. ६. योग्य उत्तर पर्याय क्रमांक  (२)
प्र. ७. योग्य उत्तर पर्याय क्रमांक  (२) (दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना ही अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता देणारी योजना आहे.)
प्र. ८. योग्य उत्तर पर्याय क्रमांक   (१)
प्र. ९. योग्य उत्तर पर्याय क्रमांक    (३) (भारताचे महालेखा नियंत्रक यांची काय्रे कलम १५० नुसार सन १९६१मध्ये विहित करण्यात आली आहेत. हे पद भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक पदासारखे घटनात्मक पद नाही.)
प्र. १०. योग्य उत्तर पर्याय क्रमांक  (३)
प्र. ११. योग्य उत्तर पर्याय क्रमांक  (४) (‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राज्यामध्ये  दि. १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली आहे.)
प्र. १२. योग्य उत्तर पर्याय क्रमांक  (१) (राखीव रोखता प्रमाण व वैधानिक रोखता प्रमाण वाढविल्यास बँकांकडील उपलब्ध चलन कमी झाल्याने कर्जपुरवठा व पर्यायाने पतनिर्मितीस मर्यादा येतात. त्यामुळे या दोन्हीत वाढ केल्यास पतनिर्मिती कमी होते.)
प्र. १३. योग्य उत्तर पर्याय क्रमांक  (३) (वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे.)
First Published on March 29, 2019 11:58 pm
Web Title: article on group services pre exam

एमपीएससी मंत्र : गट क सेवा पूर्वपरीक्षा (भूगोलाच्या प्रश्नांचे विश्लेषण)

एमपीएससी मंत्र : गट क सेवा पूर्वपरीक्षा

(भूगोलाच्या प्रश्नांचे विश्लेषण)

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रश्नांचे स्वरूप व व्याप्ती समजून घेऊन अभ्यासक्रमाच्या चौकटीमध्ये अभ्यास करणे आवश्यक असते. त्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण खूप महत्त्वाचे ठरते. पण गट क सेवांच्या संयुक्त पूर्वपरीक्षेचे हे दुसरे वर्ष आहे. म्हणजे विश्लेषणासाठी २०१८चा एकच पेपर उपलब्ध, अशी अवस्था. तरीही या पेपरच्या विश्लेषणातून किमान प्रश्नांचे स्वरूप, काठीण्य पातळी आणि अभ्यासाची दिशा कशी असावी याचा अंदाज नक्कीच बांधता येईल. भूगोल घटकाच्या तयारीच्या दृष्टीने सन २०१८च्या पेपरचे विश्लेषण या लेखामध्ये करण्यात येत आहे.
सन २०१८ च्या पेपरमध्ये भूगोल घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न
पुढीलप्रमाणे –
*     प्रश्न १. खालीलपकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे?
१)   भूमीखंडाचा विस्तृत भाग
२)   भारताच्या तिन्ही बाजूंनी असणारा समुद्र
३)   ३०० ते ४०० अक्षांशाच्या पटय़ात जेट वायूचे अस्तित्व
४) वरील सर्व
*    प्रश्न २. सिमेंट उद्योग केंद्रांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा.
१)   चित्तौडगढ, सवाई माधोपूर, खेतडी, दालमिया दाद्री
२)   दालमिया दाद्री, सवाई माधोपूर, चित्तौडगढ, खेतडी
३)   सवाई माधोपूर, चित्तौडगढ, खेतडी, दालमिया दाद्री
४)   दालमिया दाद्री, खेतडी, सवाई माधोपूर, चित्तौडगढ
*     प्रश्न ३. खालील विधानांची सत्यता तपासा.
विधान अ – महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे.
विधान ब – महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयनाने झालेली आहे.
१) विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत.
२) विधान अ सत्य असून आणि विधान ब असत्य आहे.
३) विधान ब सत्य असून आणि विधान अ असत्य आहे.
४) विधान अ आणि ब दोन्ही असत्य आहेत.
*     प्रश्न ४. खालील विधानांची सत्यता तपासा.
विधान अ – एखाद्या प्रदेशात उपलब्ध नसíगक साधन सामुग्रीचे प्रमाण भरपूर असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण कमी असेल तर अशा लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या म्हणतात.
विधान ब – एखाद्या प्रदेशात उपलब्ध नसíगक साधन सामुग्रीचे प्रमाण कमी असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर अशा लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या म्हणतात.
१)        विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत.
२)   विधान अ सत्य असून विधान ब असत्य आहे.
३)   विधान ब सत्य असून विधान अ असत्य आहे.
४)   विधान अ आणि ब दोन्ही असत्य आहेत.
*     प्रश्न ५. रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन ————- या पिकासाठी उत्कृष्ट आहे.
१) रबर         २) कॉफी
३) ताग         ४) कापूस
वरील प्रश्नांच्या आधारे पुढील बाबी समजून घेणे आवश्यक आहे
*    सर्व प्रश्नांचे स्वरूप हे थेट व पारंपरिक स्वरूपाचे आहे.
*    संपूर्ण पेपरमधील बहुविधानी प्रश्नांचे स्वरूप हे विधानांची सत्यता तपासणारे किंवा योग्य-अयोग्य / चूक-बरोबर ठरविणारे असे आहे. याचा अर्थ मूलभूत अभ्यास चांगला झाला असेल तर असे प्रश्न हे पारंपरिक प्रश्नांच्याच काठीण्य पातळीचे ठरतात.
*    भूगोलाच्या बहुविधानी प्रश्नांची संख्या जास्त असली तरी हे प्रश्न विश्लेषणात्मक नाहीत. पायाभूत अभ्यास झाला असेल तर कॉमन सेन्सच्या आधारे त्यांची उत्तरे सहज मिळून जातात.
*    नकाशावर आधारित प्रश्न विचारलेले नसले तरी नकाशावर आधारित अभ्यासाचा फायदा होईल असे प्रश्न विचारलेले आहेत.
*    तथ्यात्मक प्रश्नांवरही भर दिलेला दिसून येतो. त्यामुळे सारणी पद्धतीत अभ्यासाची टिप्पणे काढून तयारी करणे ऐनवेळच्या उजळणीसाठी उपयुक्त ठरेल.
*    भूगोलाच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक उपघटकावर प्रश्न विचारण्यात आला आहे.
*    सन २०१८मध्ये आíथक आणि प्राकृतिक भूगोलावर जास्त भर होता. म्हणजेच कोणत्या तरी ठरावीक उपघटकावर भर देऊन प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक उपघटकाच्या मूलभूत व संकल्पनात्मक बाबी समजून घ्यायलाच हव्यात.
*    लोकसंख्या उपघटकावर जास्त सखोल प्रश्न विचारलेले आहेत. त्यांचा समावेश भूगोल व अर्थव्यवस्था अशा दोन्ही घटकांमध्ये केलेला आहे. त्यामुळे या घटकाचा संकल्पनात्मक आणि तथ्यात्मक अशा दोन्ही बाजूंनी बारकाईने अभ्यास केलेला असेल तर किमान दोन ते चार गुण खात्रीने मिळवता येतील.
वरील विश्लेषणाच्या आधारे या घटकाची तयारी नेमकी कशी करता येईल याबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.
First Published on March 29, 2019 12:06 am
Web Title: article on geography questionnaire

एमपीएससी मंत्र : भारतीय स्वातंत्र्य चळवळ भारतीय स्वातंत्र्य चळवळ

एमपीएससी मंत्र : भारतीय स्वातंत्र्य चळवळ

भारतीय स्वातंत्र्य चळवळ

(संग्रहित छायाचित्र)

श्रीकांत जाधव
आजच्या लेखामध्ये आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळ या विषयाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. या विषयावर २०११ ते २०१८ दरम्यान एकूण ४७ प्रश्न विचारण्यात आले आहेत.
भारतीय स्वातंत्र्य चळवळ या विषयाची तयारी करताना प्रामुख्याने भारतीय राष्ट्रवाद आणि तिच्या उदयाची कारणे, विविध प्रादेशिक राजकीय संघटना, १८८५मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि येथून पुढे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संघटित पद्धतीने सुरू झालेला लढा; या घटकांचा अभ्यास करावा लागतो.
राष्ट्रीय चळवळीची सर्वसाधारणपणे तीन टप्प्यांत विभागणी केली जाते – मवाळ अथवा नेमस्त कालखंड (१८८५-१९०५), जहालवादी कालखंड (१९०५-१९१९) आणि गांधी युग (१९२०-१९४७) तसेच याला समांतर असणारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील इतर प्रवाह ज्यामध्ये कामगार चळवळ, क्रांतिकारी चळवळ इत्यादी चळवळीचा समावेश होतो. त्याचबरोबर स्वराज पार्टी, आझाद हिंद सेना, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचे योगदान, भारतीय सांप्रदायिकतेचा उदय, मुस्लीम लीग, हिंदू महासभा, भारतीय संस्थाने व संस्थानमधील प्रजेच्या चळवळी, कनिष्ठ जातीतील चळवळी, आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती तसेच गव्हर्नर जनरल (व्हाइसरॉय) आणि भारतमंत्री यांची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. तसेच १८५७ नंतर ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे- १८५८, १८६१, १८९१, १९०९, १९१९, १९३५ व १९४७ ज्यांना आपण ब्रिटिशकालीन भारतातील राज्यघटनेचा विकास म्हणून पाहतो त्याबद्दलही विद्यार्थ्यांना माहिती असायला हवी. सायमन कमिशन, गोलमेज परिषद, ऑगस्ट ऑफर, क्रिप्प्स मिशन, वावेल प्लान, कॅबिनेट मिशन इत्यादीशी संबंधित मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे.
मागील परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न व स्वरूप
*   २०१२ मध्ये
भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये दादाभाई नौरोजींचे सर्वात महत्त्वाचे योगदान कोणते होते? या प्रश्नासाठी पुढील ३ विधाने दिली होती. त्यातून योग्य विधान/ विधाने निवडायची होती.
१) ब्रिटिशांकडून भारतीयांची होणारी आíथक पिळवणूक उघड केली.
२) प्राचीन भारतीय साहित्याचा अर्थ स्पष्ट करून भारतीयांचा आत्मविश्वास वाढविला.
३) सामाजिकदृष्टय़ा दुष्ट प्रवृत्तीचे उच्चाटन करण्याच्या गरजेवर भर दिला.
*   २०१३ मध्ये
इलबर्ट बिल कशाशी संबंधित होते? या प्रश्नासाठी पुढील चार पर्याय देऊन त्यातील योग्य पर्याय निवडायचा होता.
१) भारतीयांना शस्त्र बाळगण्यासाठी निश्चित स्वरूपाचे र्निबध लादणे.
२) भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणारी वर्तमानपत्रे आणि मासिकांवर र्निबध लादणे.
३) युरोपियन लोकांवर खटला चालविण्यासाठी भारतीयांवर लादलेली अपात्रता काढून टाकणे.
४) आयात केलेल्या सुती कपडय़ावरील कर रद्द करणे.
*   २०१४ मध्ये
१९२९चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भारतीय इतिहासामध्ये का महत्त्वपूर्ण मानले जाते? हा प्रश्न होता. त्यासाठी खालील पर्यायांमधून योग्य पर्याय निवडायचा होता.
१) स्व-सरकार मिळविणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे ही घोषणा केली.
२) पूर्णस्वराज मिळविणे हा काँग्रेसचा उद्देश आहे याची घोषणा केली.
३) असहकार चळवळ सुरू करण्यात आली.
४) लंडनमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेत सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
*   २०१५मध्ये
खालीलपकी कोणत्या चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विभाजन होऊन मवाळवादी आणि जहालवादी गटांचा उदय झाला? हा प्रश्न होता. त्यासाठी, स्वदेशी चळवळ, चलेजाव चळवळ, असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग चळवळ  हे चार पर्याय देण्यात आलेले होते व यातून योग्य पर्याय निवडायचा होता.
*   २०१६ मध्ये
माँटेग्यू – चेम्सफोर्ड प्रस्ताव कशाशी संबंधित होता? या प्रश्नासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडायचा होता.
सामजिक सुधारणा, शैक्षणिक सुधारणा, पोलीस प्रशासनातील सुधारणा, घटनात्मक सुधारणा.
*   २०१७मध्ये
बट्लर समिती, १९२९चा ट्रेड डिस्प्युट कायदा, १८८१ चा फॅक्टरी कायदा, तसेच द्विदलशासन पद्धती (Dyarchy) इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
*   २०१८ मध्ये
१९३५ चा भारत सरकार कायदा, हिंद मजदूर सभा आदींवर प्रश्न विचारले गेले होते. तसेच कोणत्या संघटनेचे नाव बदलून स्वराज्य सभा ठेवण्यात आलेले होते? हाही प्रश्न विचारला होता.
वरीलप्रमाणे प्रश्न पाहताना आणि विषयाचा अभ्यास करताना आपणाला वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन, तसेच व्यक्तिविशेष माहिती, विविध चळवळी आणि संबंधित घडामोडी इत्यादी पलूंच्या आधारे या विषयाचे आकलन करणे गरजेचे आहे. हा विषय पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तयार करावा लागतो. त्यामुळे या विषयाच्या सखोल आणि व्यापक पलूंचा विचार करून तयारी करावी लागते. या विषयाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी बिपिन चंद्र लिखित आधुनिक भारतावरील एनसीईआरटीची जुनी पुस्तके अभ्यासावीत.  त्यानंतर या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बिपिन चंद्र लिखित ‘आयडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’; बी. एल. ग्रोवर आणि एस. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’, सुमित सरकार लिखित ‘आधुनिक भारत’ इत्यादी संदर्भग्रंथ वाचावेत. महत्त्वाचे म्हणजे या संदर्भग्रंथांवर आधारित स्वतची टिप्पणे काढावीत. जेणेकरून हा विषय कमीतकमी वेळेमध्ये अभ्यासला जाऊ शकेल.
First Published on March 28, 2019 12:08 am
Web Title: article on indian freedom movement

एमपीएससी मंत्र : गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा इतिहास स्वातंत्र्योत्तर कालखंडावर सन २०१८ मध्ये प्रश्न विचारलेला नाही.

एमपीएससी मंत्र : गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा इतिहास

स्वातंत्र्योत्तर कालखंडावर सन २०१८ मध्ये प्रश्न विचारलेला नाही.

फारुक नाईकवाडे
गट क सेवांच्या पूर्वपरीक्षेमध्ये इतिहास घटकाचा अभ्यासक्रम ‘आधुनिक भारताचा विशेषत महाराष्ट्राचा इतिहास’ अशा प्रकारे विहित करण्यात आला आहे. या घटकाची तयारी कशा प्रकारे करावी याची चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.
इतिहास या घटकावर साधारणपणे १२ ते १५ प्रश्न विचारले जातात. सन २०१८ ची प्रश्नपत्रिका पाहता सर्व प्रश्न स्वातंत्र्यपूर्व कालखंडावर विचारलेले आढळतात. ब्रिटिशांचे राजकीय आणि सामाजिक धोरण, त्यांचे कायदे, १८५७चा उठाव, सामाजिक सुधारणा चळवळी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने व आंदोलने, समांतर संघटना व त्यांचे लढे आणि त्यांची वैशिष्टय़े, नियतकालिके, राष्ट्रीय चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान विशेषत: फारशी चच्रेत नसलेली व्यक्तिमत्त्वे या बाबींवर भर देण्यात आलेला आहे. उपघटकनिहाय तयारी करताना पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात.
*     स्वातंत्र्यपूर्व इतिहास
#   १८५७चा उठाव हा स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील मलाचा दगड आहे. त्यामुळे या बाबतचे सर्व मुद्दे बारकाईने अभ्यासावेत. सहभागी सामाजिक प्रवर्ग, त्यामागची कारणे, उठावाची सामाजिक – राजकीय कारणे, तात्कालिक कारणे, व्याप्ती, विविध नेते, त्यांचे कार्यक्षेत्र व उठावादरम्यान वा नंतरची त्यांची स्थिती, महत्त्वाच्या घोषणा
#   ब्रिटिशांचे राजकीय धोरण, त्यांचे विविध नागरी व राजकीय निर्णय / कायदे, महत्त्वाचे व्हाइसरॉय / गव्हर्नर जनरल व त्यांचे ठळक निर्णय या बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
#   सन १९०९, १९१९, १९३५ व १९४७ च्या कायद्यांमधील महत्त्वाच्या तरतुदी समजून घ्यायला हव्यात
आणि त्यावरील महत्त्वाच्या भारतीय नेत्यांच्या प्रतिक्रिया व तरतुदींचे परिणाम समजून घ्यायला हवेत. इतर ब्रिटिश कायद्यांच्या ठळक बाबी माहीत करून घ्याव्यात.
#   व्हाईसरॉय / गव्हर्नर जनरल यांचे निर्णय कालानुक्रमे माहीत असावेत. तसेच ठळक निर्णयांचे परिणाम व त्यावरील भारतीयांच्या प्रतिक्रिया माहीत करून घ्याव्यात.
#   ब्रिटिशांच्या धोरणांवर भारतीयांच्या प्रतिक्रिया, राजकीय संस्था / संघटनांची स्थापना आणि कार्ये यांचा आढावा घ्यावा. या संघटनांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे टेबलमध्ये नोट्स काढून करावा – स्थापना वर्ष, ब्रीदवाक्य, असल्यास मुखपत्र, स्थापना करणारे तसेच महत्त्वाचे सक्रिय नेते व त्यांची उल्लेखनीय कामगिरी, यांचा आढावा घ्यावा.
#   भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, तीन ठळक कालखंड, त्यांतील महत्त्वाची अधिवेशने व ठराव, आंदोलने, त्यांचे स्वरूप व परिणाम यांचा आढावा घ्यायला हवा.
#   सशस्त्र / क्रांतिकारी चळवळींचे दोन कालखंड, त्यांतील महाराष्ट्र, पंजाब व बंगालमधील क्रांतिकारक, त्यांच्या संघटना, महत्त्वाच्या घडामोडी, दैनिके / नियतकालिके, पुस्तके यांच्या टेबलमध्ये नोट्स काढता येतील.
#   यामध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीतील वैशिष्टय़पूर्ण बाबी समजून घ्याव्यात. उदाहरणार्थ साताऱ्याचे ‘पत्री’ सरकार, नाटकांचा प्रचारासाठी उपयोग, इत्यादी. महाराष्ट्रामध्येच सक्रिय असलेल्या संघटना तसेच त्यांचे नेते व कामगिरी यांचा बारकाईने आढाव घ्यायला हवा.
#   या कालखंडातील महाराष्ट्रातील नेते, घडामोडी, आंदोलने, राजकीय संस्था यांचा जास्त बारकाईने आढावा घ्यायला हवा. नागपूरचा झेंडा, सत्याग्रह यांसारखे महाराष्ट्रातील वैशिष्टय़पूर्ण योगदान माहीत असायला हवे.
#   देशातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा अभ्यास करीत असताना पुढील पलूंचा विचार केल्यास लक्षात ठेवणे सोपे जाते – जन्म ठिकाण, मूळ ठिकाण, शिक्षण, नोकरी / व्यवसाय, स्थापन केलेल्या संस्था, वृत्तपत्रे, पुस्तके, महत्त्वाचे लिखाण, भाषण, घोषणा. प्रबोधन कार्यासाठी दिलेले विशेष योगदान. या मुद्दय़ांच्या नोट्स कालानुक्रमे काढल्यास उजळणी करताना क्रम लक्षात ठेवणे सोपे जाते.
#   सामाजिक प्रबोधनाबरोबरच धार्मिक सुधारणांचाही यामध्ये समावेश करणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्योत्तर कालखंड
#   स्वातंत्र्योत्तर कालखंडावर सन २०१८मध्ये प्रश्न विचारलेला नाही. मात्र कर सहायक, लिपिक टंकलेखक आणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदांच्या स्वतंत्र परीक्षांमध्ये पूर्वी या उपघटकावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे या कालखंडावर प्रश्न विचारले जाण्याची अपेक्षा ठेवावी लागेल.
#   या कालखंडामधील परराष्ट्र धोरण विशेषत: अलिप्ततेचे धोरण, इंदिरा गांधींच्या कलातील युद्धे व आण्विक धोरण, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व त्यातील सर्व बारकावे, पहिल्या पाच पंचवार्षिक योजना व त्यातील महत्त्वाचे निर्णय / प्रकल्प यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
या घटकाचा अभ्यास करण्यासाठी स्टेट बोर्डाची आधुनिक भारताच्या इतिहासाची माहिती असणारी पुस्तके, आधुनिक भारताचा इतिहास हे ग्रोव्हर आणि बेल्हेकर यांचे पुस्तक, अनिल कठारे यांचे पुस्तक तसेच, बिपिन चंद्र यांचे ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स’ आणि ‘इंडिया सिन्स इंडिपेन्डन्स’ ही पुस्तके अभ्यासोपयोगी आहेत. प्रश्नांच्या सरावासाठी राष्ट्रचेतनाचे गट क सेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल.
First Published on March 27, 2019 1:33 am
Web Title: mpsc exam 2019 mpsc exam preparation tips