वेगळय़ा वाटा : क्रीडा प्रशिक्षकांना संधी
विविध खेळांमध्ये प्रशिक्षक म्हणूनही उत्तम संधी प्राप्त होऊ लागली आहे.
मिलिंद ढमढेरे | December 8, 2016 12:45 AM
नवी दिल्ली येथे १९८२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर आपल्या देशात खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्राचे महत्त्व वाढले. क्रीडा क्षेत्रातही करिअर करता येते हे हळूहळू लोकांना लक्षात येऊ लागले आहे. विविध खेळांमध्ये प्रशिक्षक म्हणूनही उत्तम संधी प्राप्त होऊ लागली आहे. विशेषत: क्रीडा क्षेत्रात व्यावसायिक स्पर्धाच्या वाढत्या प्रभावामुळे शासनामधील विविध आस्थापनांबरोबरच विविध व्यावसायिक क्लब किंवा संस्थादेखील पूर्णवेळ क्रीडा प्रशिक्षक नियुक्त करीत असतात.
प्रशिक्षकाचे करिअर
क्रीडा प्रशिक्षक म्हणून दोन स्वरूपाचे करिअर करता येते. एक म्हणजे विविध खेळांमधील पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून नोकरी करता येते. अलीकडे फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, कुस्ती आदी खेळांमधील व्यावसायिक लीग व वाढत्या स्पर्धामुळे या खेळांकरिता विविध संघटना किंवा क्लबतर्फे पूर्णवेळ प्रशिक्षक नियुक्त करीत असतात. अर्थात त्यासाठी संबंधित खेळांच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संघटनांतर्फे प्रशिक्षकांकरिता अधिकृत प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित केले जातात. विविध श्रेणींमध्ये हे अभ्यासक्रम घेतले जातात. तुमची श्रेणी जेवढी जास्त असते त्यानुसार व्यावसायिक प्रशिक्षक म्हणून तुमची किंमत वाढत जाते. टेनिस, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट आदी खेळांमध्ये अनेक देशांमध्ये काही वैयक्तिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली असे अभ्यासक्रम घेतले जातात व त्यामध्ये अनेक देशांचे प्रशिक्षक भाग घेत असतात. व्यावसायिक प्रशिक्षकांबरोबरच शासन नियुक्त क्रीडा प्रशिक्षक म्हणूनही काम करता येते. भारतीय क्रीडा प्राधिकरण, विविध शासकीय क्रीडा संस्था, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ आदी ठिकाणी पूर्णवेळ क्रीडा प्रशिक्षक म्हणून नोकरी मिळते. शासनाने ठरविल्यानुसार त्याला सर्व सुविधा व सवलती मिळत असतात. अलीकडे काही खेळांकरिता राज्य व राष्ट्रीय स्तरावरही पूर्णवेळ क्रीडा प्रशिक्षकांची नियुक्ती केली जात असते. हे प्रशिक्षक कोणत्या शाळा किंवा महाविद्यालयाशी संलग्न नसतात, मात्र शासनाच्या विविध क्रीडा योजनांखाली प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या प्रशिक्षकाकडे असते.

No comments:
Post a Comment