Friday, December 16, 2016

वेगळय़ा वाटा : कार्यक्षेत्राची गरज ओळखा!

वेगळय़ा वाटा : कार्यक्षेत्राची गरज ओळखा!

येणाऱ्या कंपन्यासुद्धा अतिशय काटेकोरपणे आपले भावी कर्मचारी निवडताना दिसतात.

  

नोकरी मिळवण्यासाठी आधी ज्या क्षेत्रात आपणाला काम करायचे आहेत्या क्षेत्राची गरज ओळखावी लागते. शिवाय त्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करायली हवी, हेसुद्धा समजून घ्यावे लागते.
सध्या स्पर्धा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. येणाऱ्या कंपन्यासुद्धा अतिशय काटेकोरपणे आपले भावी कर्मचारी निवडताना दिसतात. अनेकदा कंपन्या केवळ टक्क्याइतकीच विद्यार्थ्यांची निवड करतात. बऱ्याच कंपन्या जवळपास ,००० विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावतात पण त्यातील केवळ ७०७४ विद्यार्थ्यांनाच निवडतात. यातून हेच दिसून येते की या कंपन्यांच्या काही ठोस, ठरीव गरजा आहेत. ती कौशल्ये ज्या विद्यार्थ्यांकडे असतील त्यांनाच ते निवडतात. त्यामुळे कॅम्पस प्लेसमेंटसाठी उत्तम तयारी करणे अत्यावश्यक असते. कोणत्या क्षेत्रासाठी नेमकी काय तयारी करायला हवी, याविषयी..
बँकिंग क्षेत्र
व्यवस्थापनाचे विद्यार्थी कायमच बँकिंगची निवड करतात. बहुतांश बँका, अधिकारी किंवा शिकाऊ उमेदवार अशा पदावर विद्यार्थ्यांची भरती करतात. कारण बँकिंगमध्ये कर्ज, क्रेडिट अप्रायझल, जोखीम व्यवस्थापन, र्मचट बँकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, मोबाइल बँकिंग, इन्शुरन्स, रिलेशनशिप मॅनेजर, ऑडिटर्स, एचआर विभाग अशा अनेक विभागांचा समावेश होतो. बँकांना या सर्व क्षेत्रात काम करू शकणारे आणि फायनान्स, मार्केटिंग, एचआर अँड ऑपरेशन्स यात स्पेशलायझेशन केलेले विद्यार्थी हवे असतात. ज्यांना बँकेच्या क्षेत्रात काम करायचे आहे त्या विद्यार्थ्यांनी, तणावपूर्ण परिस्थितीत काम करण्याची तयारी, वैश्विक दृष्टिकोन, ग्राहककेंद्रित आणि शैक्षणिक दृष्टी हे गुण अंगीकारले पाहिजेत.
बँकांव्यतिरीक्त वित्तीय संस्था
या वित्तीय संस्था बँकेसारख्याच काही सुविधा देतात. परंतु त्यांच्याकडे बँकेसारखा परवाना नसतो. कर्जाऊ रक्कम किंवा क्रेडिट सुविधा देणे, निवृत्तीनंतरचे नियोजन, अंडररायटिंग, मर्जर अ‍ॅक्टिव्हिटीज आदी सुविधा ते देतात. या संस्थांमध्ये कर्ज वाटप, केंद्रीय व्यवहार, वापरलेल्या गाडय़ांची विक्री, उत्पादन अधिकारी, दुचाकींसाठी कर्ज, संपत्तीवर कर्ज आदी विषयांत पदे असू शकतात. या क्षेत्रामध्ये येण्यासाठी उमेदवाराकडे ध्येय, क्षमता, चपळाई, एखादी गोष्ट करून दाखवण्याची धमक असणे आवश्यक आहे. शिवाय विषयाचे सैद्धांतिक ज्ञानही असायला हवे. मुळात या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट हव्यात.

बाजारपेठ संशोधन (मार्केट रिसर्च) –
आपल्या संभाव्य ग्राहकाचा किंवा बाजारपेठेचा अभ्यास यामध्ये केला जातो. व्यावसायिक धोरणांची आखणी करताना या अभ्यासाचा खूप फायदा होतो. बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी कोणतीही संस्था या बाजारपेठ संशोधनसंस्थेचा सल्ला आणि सेवा घेते. यामध्ये तर्कशास्त्र आणि नियोजनपूर्वक अभ्यास केला जातो आणि नव्याने येऊ पाहणाऱ्या उद्योगाला त्याच्या संभाव्य ग्राहकांबद्दल माहिती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना बाजारपेठ संशोधन क्षेत्रात काम करायचे असेल त्यांच्याकडे उच्च दर्जाची विश्लेषण क्षमता असायला हवी. आकडय़ांशी कसरती करणे जमायला हवे. शिवाय संवादकौशल्ये उत्तम हवीत आणि शैक्षणिक दर्जाही चांगला हवा.
कॉमर्स आणि डिजिटल कंपनी
या कंपन्या बहुतांशवेळा ग्राहककेंद्रित असतात. त्यामुळे या कंपन्यांना प्रक्रियेची मांडणी माहिती असलेला विद्यार्थी हवा असतो. त्यांचा दृष्टिकोन ग्राहककेंद्रित असायला हवा. त्यांच्याकडे परिस्थितीतून मार्ग काढण्याचे कौशल्य असायला हवे, शिवाय नेतृत्त्वकौशल्य असले पाहिजे. लोकव्यवस्थापन, कार्यक्षेत्रातील व्यवस्थापन आणि व्यवसाय मदतनीस या मध्ये या कंपन्यांना उमेदवार नेमायचे असतात. ज्यांना डिजिटल विश्वात करिअर घडवायचे आहे, त्यांना नेतृत्वाची क्षमता, आयोजनक्षमता, अहवाल आणि विश्लेषणाचे ज्ञान असायला हवे. जसे आपण आधी पाहिले की, विद्यार्थ्यांला अर्थार्जनाचे पर्याय शोधण्याआधी स्वत:तील क्षमतांचे ज्ञान असायला हवे. तसेच सकारात्मक दृष्टिकोन, विषयातील ज्ञान, व्यवसायातील सैद्धांतिक ज्ञान आणि व्यावहारिक समज, नैतिकता, अद्ययावत राहण्याची प्रवृत्ती आणि हसरे व्यक्तिमत्त्व हेसुद्धा गरजेचे आहे. शिवाय संस्था किंवा क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाहीच.
(लेखिका मुंबई विद्यापीठातील अल्केश दिनेश मोदी, इन्स्टिटय़ूट ऑफ फायनान्शिअल अँड मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेत प्लेसमेंट अधिकारी आहेत.)
वेगळ्या वाटामध्ये पुढच्या आठवडय़ात वाचा कलेतील करिअर विषयी.

No comments:

Post a Comment