वेगळय़ा वाटा : मुलाखतीचा मंत्र
कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळवण्याचे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते.
कविता मिश्रा-पांडे | December 15, 2016 4:01 AM
कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळवण्याचे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. आजकाल ई कॉमर्स, बिझनेस कन्सल्टिंग, सोशल रीसर्च अशा अनेक नव्या क्षेत्रांचा कॅम्पस प्लेसमेंटमध्ये समावेश झालेला असल्याने कॅम्पस प्लेसमेंटच्या पद्धतीतही काही बदल झालेला आहे. केसस्टडी, तणावपूर्ण परिस्थितीतील वर्तन,
प्रोजेक्टवर आधारित
सादरीकरण आदी मुद्दय़ांचा वापर करतात. काहीवेळा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखती घेतल्या जातात. ज्यांचा अनुभव प्रत्यक्ष मुलाखतीपेक्षा बराच वेगळा असतो. त्यामुळेच मुलाखतीसंदर्भात काही खास टिप्स आज देत आहे.
* कंपनीची माहिती घ्या
ज्या कंपनीसाठी आपण मुलाखत द्यायला जात आहोत, त्याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असायला हवी. यासाठी कंपनीचे संकेतस्थळ, लिंक्डइन पेज आणि त्यांच्या व्यावसायिक गरजा समजून घ्यायला हव्यात. प्रत्येक संस्थेसाठी आवश्यक अशी काही कौशल्ये असतात, उमेदवारांनी त्याचा अभ्यास करायला हवा.
* नवीन गोष्टी शिका
आपल्या करिअरची आखणी आपणच करायला हवी. सर्वप्रथम आपल्याला ज्या क्षेत्रात रस आहे, त्या क्षेत्राचा शोध घ्या. ते ठरल्यावर त्यातील कौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी काही अभ्यासक्रम आहेत का, याची चाचपणी करा. तसे असल्यास त्यातील नेमके कोणते करायचे हे ठरवा आणि करा. अशा अल्पकाळाच्या अभ्यासक्रमांचाही खूप फायदा होऊ शकतो. मुलाखतीत या अभ्यासक्रमांची माहिती द्या आणि त्याविषयी पुरेशा ज्ञानाने बोला.
* उत्तरांची तयारी करा
मुलाखतीदरम्यान काही हमखास विचारलेले प्रश्न असतात, त्याची प्रभावी उत्तरे कशी द्यावीत, याची तयारी करा. म्हणजे स्वत:बद्दल सांगा किंवा तुम्ही अमुक विषयातच का स्पेशलायझेशन केले? किंवा उन्हाळी सुट्टीत केलेल्या इंटर्नशिपमधून काय शिकलात? अशा प्रकारच्या प्रश्नांना नेमकी कशा प्रकारे उत्तरे द्यायची ते ठरवून ठेवा. यासाठी आपल्या शिक्षकांची, प्लेसमेंट अधिकाऱ्यांची आणि माजी विद्यार्थ्यांचीही मदत घेता येईल.
* पेहराव
ज्याप्रमाणे आधीच्या लेखात सांगितले, त्याप्रमाणे उगाच ढगळ किंवा अनौपचारिक समारंभाना घालायचे कपडे घालून जाऊ नका. व्यवस्थित नीटनेटके जा.
* आत्मविश्वास हवा, अतिविश्वास नको
काही विद्यार्थी अतिशय हुशार असूनही मुलाखतीदरम्यान स्वत:ला योग्य पद्धतीने सादर करू शकत नाहीत. ‘मी उत्तम आहे, मला सर्व माहिती आहे’, असा दृष्टिकोन बाळगणे काही वाईट नाही; पण नम्रपणे आपली गुणवत्ता सिद्ध केलीत तर त्याची जास्त वाहवा होते.
* आवडीही असतात महत्त्वाच्या आपल्या आवडीच्या विषयांवर आवर्जून बोला. मग ते अभ्यासातील असोत किंवा इतर. यातून मुलाखतकाराला तुमच्याबद्दल जास्त जाणून घेता येते. तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल किती आवड आहे, रस आहे ते समजते.
* शांत राहा.
जर तुम्ही मुलाखत मंडळाच्या अपेक्षांवर खरे उतरला नाहीत, तर फार वाईट वाटण्याची किंवा अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. शांत राहा. मुख्य म्हणजे कधीही खोटे बोलू नका. स्वत:ला कोसू नका. अपयशातून शिका आणि बाहेर पडा.
* नेमके बोला
काही विद्यार्थी उत्साहाच्या भरात फार बोलतात. त्यामुळे ते अनेकदा नको असलेली माहितीही देतात. त्यापेक्षा आधी प्रश्न ऐकून घ्या, मग विचार करूनच त्याचे उत्तर द्या. प्रश्नाला त्वरित उत्तर देण्यापेक्षा योग्य उत्तर अपेक्षित असते. आपल्या उत्तराला पुराव्यांचा आधार द्या. नेमक्या शब्दांत आपले म्हणणे मांडा.
* बायोडेटा
प्रत्येक कंपनीनुसार आपल्या बायोडेटामध्ये थोडा फेरफार करा. म्हणजे माहिती खरीच असायला हवी. पण त्याची मांडणी बदला. एखाद्या कंपनीतील नोकरीसाठी काही विशिष्ट कौशल्ये गरजेची असतील आणि तुमच्याकडे ती असतील तर ती अधोरेखीत करा. प्रत्येक कंपनीच्या गरजेनुसार बायोडेटामधील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखीत करा. यामुळे समोरच्यावर तुमचा चांगला प्रभाव पडतो. मुलाखत घेणाऱ्यांनाही ते पाहून आपल्याबद्दल माहिती मिळवणे सोयीचे जाते.

No comments:
Post a Comment