वेगळय़ा वाटा : नृत्यातील संधी
झेलम परांजपे यांच्या ‘स्मितालय’ या संस्थेत ओडिसी नृत्यप्रकार शिकवला जातो.
भक्ती आठवले - भावे | December 24, 2016 4:21 AM
नृत्याचे अनेक प्रकार आहेत आणि त्यात करिअरच्या अनेक संधीही. कथ्थक, भरतनाटय़म, कुचिपुडी, ओडिसी, मणिपुरी असे शास्त्रीय तर रुंबा, बॅले, टँगो, साल्सा असे काही पाश्चात्त्य नृत्यप्रकार आहेत. सोबतच सध्या चलती आहे, बॉलिवूड किंवा कंटेम्पररी नृत्यप्रकाराची.
* शिक्षणाच्या संधी
शास्त्रीय नृत्यप्रकारांचे शिक्षण घेण्यासाठी तुम्ही अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी (http://abgmvm.org/courses-and-examination/) संलग्न अशा कुठल्याही संस्थेतून तुम्ही नृत्याचे शिक्षण घेऊ शकता आणि अशा केंद्रावर परीक्षाही देऊ शकता. महाराष्ट्रात या संस्थेची अनेक केंद्रे आहेत. कनक रेळे यांच्या ‘नालंदा डान्स रिसर्च सेंटर’ या मुंबईतील संस्थेत नृत्य या विषयात बॅचलर, मास्टर्स आणि पीएचडीपर्यंतचे शिक्षण घेता येते. डॉ. संध्या पुरेचा यांची मुंबईतील ‘भरत कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स अँड कल्चर’ या संस्थेत भरतनाटय़म, कथ्थक या नृत्यप्रकारांचे वर्ग घेतले जातात. झेलम परांजपे यांच्या ‘स्मितालय’ या संस्थेत ओडिसी नृत्यप्रकार शिकवला जातो. भारती विद्यापीठ, पुणे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांचे नियमित आणि दूरस्थ नृत्य अभ्यासक्रम आहेत. पुण्यातील ललित कला केंद्रातही गुरुकुल पद्धतीने नृत्याचे शिक्षण दिले जाते. खैरागडमधील इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय, दिल्लीचे कथ्थक केंद्र, चेन्नईचे कलाक्षेत्र, इंदोर येथील देवी अहिल्या विश्वविद्यालय या वेगवेगळे नृत्यप्रकार शिकवणाऱ्या नामांकित संस्था आहेत. पंडित बिरजू महाराज यांची कथ्थकचे शिक्षण देणारी ‘कलाश्रम’ ही संस्थाही दिल्ली आणि महाराष्ट्रातील काही भागांत नृत्यप्रशिक्षण देत आहे.
मुंबई विद्यापीठामध्ये लोकनृत्याचेही प्रशिक्षण दिले जाते. संदीप सोपारकर, सरोज खान यांच्या अकॅडमीमध्ये पाश्चात्त्य आणि कंटेम्पररी नृत्याचं शिक्षण दिलं जातं. त्याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गुरू वैयक्तिक मार्गदर्शन करत असतात. हिंदी सिनेमांच्या गाण्यांवर कंटेम्पररी डान्स शिकवणारी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला असतात. त्यामुळे हा नृत्यप्रकार शिकायचा असल्यास प्रवेश घेण्यापूर्वी नीट चौकशी करावी. आता बऱ्याच ठिकाणी ‘ऑनलाइन डान्स क्लास’सुद्धा घेतले जातात, मात्र गुरुकडून प्रत्यक्ष शिकणे, कधीही उत्तमच.
* शिष्यवृत्ती
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे दोन वर्षांच्या कालावधीसाठी १८ ते २५ या वयोगटांतील विद्यार्थ्यांना दरमहा रुपये ५,०००/- इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांचे कमीत कमी पाच वर्षे नृत्याचे शिक्षण झालेले असावे. मुलाखत किंवा प्रत्यक्ष सादरीकरण या स्वरूपात विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाते. भरतनाटय़म, कथ्थक, कुचिपुडी, कथकली, मोहिनीअट्टम, ओडिसी तसेच मणिपुरी नृत्य / संगीत, थंग ता, गौडीया नृत्य, छाऊ नृत्य / संगीत, सत्तरीय नृत्य या नृत्यप्रकारांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.
* संधी कोणत्या?
नृत्यसंबंधी इतर विषयात करिअर करायचे असल्यास काही पर्याय उपलब्ध आहेत. ‘ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन’ (http://www. trinitycollege.com/site/?id=1585) यांच्यातर्फे ‘डिप्लोमा इन डान्स टीचिंग अँड लर्निग’ व ‘एटीसीएल (कंटेम्पररी डान्स)’ हे दोन अभ्यासक्रम घेतले जातात. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या चार केंद्रांवर या परीक्षा देता येतात. त्याच प्रमाणे नर्तकांना ‘आर्ट बेस थेरपी’साठीही विविध संस्थांमध्ये काम करता येऊ शकतं. तुम्हाला जर विविध नृत्यशैली येत असतील तर करिअरच्या संधी नक्कीच वाढतात. (http://www.narthaki. com/ index. html ) या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या भरतनाटय़म, कथ्थक, कंटेम्पररी, मणिपुरी, ओडिसी या नृत्यप्रकार शिकवणाऱ्या संस्था, गुरू आणि नृत्य महोत्सव यांची माहिती मिळू शकेल. शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी विविध महोत्सवांमध्ये, मनोरंजनाच्या कार्यक्रमात, पुरस्कार सोहळ्यांत आपली कला सादर करू शकतात. सिनेमा, नाटक यासाठी नृत्यदिग्दर्शन करण्याची संधीही मिळू शकते. हल्ली लग्नामध्ये संगीताचा कार्यक्रम करण्याची लाट आलेली आहे. त्यासाठी तसेच अनेक शाळांतील स्नेहसंमेलनासाठीही नृत्यदिग्दर्शक नेमले जातात. तिथेही करिअर करता येते.
यासोबतच डान्स थेरपीस्ट म्हणूनही करिअरच्या उत्तम संधी आहेत. परंतु यासाठी मानसशास्त्र विषयातील शिक्षणाची जोड हवी. लिखाणाची आवड असेल तर माध्यमांमध्ये नृत्याविषयी
लिखाण किंवा नृत्य समीक्षक म्हणूनही काम करता येते. नृत्य निर्मिती संस्था हासुद्धा एक चांगला पर्याय आहे. या संस्था नर्तकांचे कपडे, त्यांच्यासाठी माध्यमांशी संपर्क साधणे, प्रसिद्धीप्रमुख, नृत्याच्या कार्यक्रमांसाठी कल्पना लढवणे, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी लागेल त्या सर्व गोष्टी करणे या आणि अशा अनेक गोष्टी करत असतात. या संस्थात काम करता येते किंवा स्वतची संस्थाही काढता येऊ शकते.

No comments:
Post a Comment