Tech नॉलेज : सीडीएमए व जीएसएम एकाच मोबाइलमध्ये हवे
आमच्या राजापूर तालुक्यात सीडीएमए नेटवर्क चांगले आहे. माझा सीडीएमएचा क्रमांक मला बदलवायचा नाही.
तंत्रस्वामी |
October 13, 2015 06:13 am
उत्तर – सीडीएमए आणि जीएसएम या दोन्ही प्रकारचे नेटवर्क एकाच फोनमध्ये वापरायचे असेल तर तुम्हाला यासाठी विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. यापैकी तुम्ही म्हणत असलेला एचटीसी डिझायर ८२० याचबरोबर एचटीसी डिझायर ८२६ आणि डिझायर एक्ससी हे तिन्ही एचटीसीचे असे डय़ुएल सिम फोन आहेत ज्यामध्ये आपल्याला फोरजी जोडणी मिळते याचबरोबर आपण एकाच फोनमध्ये जीएसएम आणि सीडीएमए असे कार्ड वापरू शकतो. ८२०च्या तुलनेत ८२६ अधिक अद्ययावत ठरतो. यामध्ये कॅमेरा आणि साठवणूक क्षमता जास्त देण्यात आली आहे. तर एक्ससी हा फोन मध्यम प्रतीचा आहे. यामध्ये आपल्याला अधिक कमी आणि खूप जास्त सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. पण नियमित कामकाज होऊ शकेल असा हा फोन आहे. या शिवाय एचटीसीच्या वन मालिकेतील ८०२ डी हाही फोन जीएसएम आणि सीडीएमएमची सुविधा वापरण्याची मुभा देतो. या फोनचे हार्डवेअर चांगले असले तरी तो इतर बाबतीत खूप जुना ठरतो. तुम्हाला एचटीसी व्यतिरिक्तचे पर्याय हवे असतील तर तुम्हाला एमटीएसचा ब्लेझ ५.०, हेअरचा ई ६१९, स्वाइपचा सॉनिक, झेडटीईचा ब्लेज यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. सॅमसंगसारख्या मातब्बर ब्रँड्समध्ये काही पर्याय उपलब्ध आहेत. मात्र त्यातील अनेक गोष्टी या कालबाह्य ठरल्या आहेत. यामुळे जर तुम्हाला ब्रँड हवा असेल तर तुम्ही एचटीसीच्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडू शकता.
First Published on October 13, 2015 6:01 am
Web Title: cdma and gsm mobile must in one
No comments:
Post a Comment