स्थानिक व अस्थानिक वनस्पती
सध्या पावसाळा संपत आलेला आहे व छोटी झाडे संपण्याच्या मार्गावर आहेत.
डॉ. राहुल मुंगीकर |
October 11, 2015 00:25 am
निसर्गातील विविध गोष्टींचीही माहिती
बालमित्रांनो, आपण मागील लेखामध्ये श्रावण महिन्यात, तसेच या काळात असणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टींचीही माहिती घेतली होती. सध्या पावसाळा संपत आलेला आहे व छोटी झाडे संपण्याच्या मार्गावर आहेत. मोठी झाडे हळूहळू बहरू लागली आहेत. म्हणूनच या वेळी आपण निसर्गसृष्टीतील आणखी काही नवीन बाबींची माहिती घेण्याचा प्रयत्न करू या.
तुम्ही सर्वानी टणटणीची झाडे पाहिली असतील. गेल्या काही वर्षांमधे या टणटणीची वाढ मोठय़ा प्रमाणात होताना दिसत आहे. तुम्ही कधी या टणटणीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे का? खरे तर या झाडावर मोठय़ा प्रमाणात फुलपाखरे येत असतात. त्यामुळे अनेक वेळा उद्याने विकसित करताना बागेमध्ये खासकरून वेगवेगळे फुलांचे रंग असलेल्या टणटणी लावतात; परंतु टणटणी हे आपल्याकडचे मूळ झाड नाही, याची तुम्हाला कल्पना आहे का? अर्थात, तुम्ही असेही म्हणाल, की आपल्याकडील एखादे झाड मूळचे नसेल तर काय फरक पडतो? खरे तर याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या पकी काही जणांनी गाजर गवताचे नाव ऐकले असेल. हेसुद्धा आपल्याकडील मूळ झाड नव्हे. हे झाड भारतात ७० च्या दशकात गव्हाच्या बियाणांबरोबर आले व सर्वत्र वेगाने पसरले. या प्रकारच्या झाडांचा अभ्यास करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, या प्रकारच्या प्रजातींमुळे नसíगक परिसंस्थेवर बराच परिणाम होत असतो. परंतु अशा प्रकारचे विषय आपल्या अभ्यासक्रमात येत नाहीत. या प्रकारच्या झाडांना इंग्रजीमधे कल्ल५ं२्र५ी ढ’ंल्ल३२ असे संबोधले जाते. या प्रजाती मूळच्या स्थानिक नसल्याने या झाडांचा उपयोग किडे, फुलपाखरे, पशू-पक्षी यांना फारसा कधीही होत नाही. गाजर गवतासारख्या वनस्पतीशी आपला संपर्क झाला तर खाज सुटते. या प्रकारच्या वनस्पतींमुळे होणारा तोटा वेगळाच आहे. या वनस्पती ज्या ठिकाणी वाढीस लागतात, त्या ठिकाणी अन्य स्थानिक वनस्पतींची वाढ हळूहळू कमी होते व पर्यायाने या स्थानिक प्रजातींवर अवलंबून असणारी जीवसृष्टीही कमी होण्यास सुरुवात होते. या प्रकारच्या झाडांवर कोणतेही पक्षी आपले घरटे बांधत नाही. तुम्ही अशाप्रकारचे निरीक्षण कधी केले आहे का? आपल्याकडे सुरुवातीला वेगाने हिरवेगार जंगल वाढावे म्हणून ऑस्ट्रेलियन बाभळीची (अूूं्रं ं४१्रू४’्रऋ१्रे२) लागवड करण्यात आली होती. तर आपल्याला अगदी परिचित असलेली सुबाभुळीची लागवड चाऱ्याच्या उपलब्धतेकरिता करण्यात आली. परंतु जेव्हा याची लागवड मोठय़ा प्रमाणात रस्त्याच्या कडेला वृक्ष म्हणून करण्यास सुरुवात झाली; तेव्हा परिसंस्थेवर याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली. तुम्हाला माहीत असलेले आणखी एक झाड म्हणजे ऊंदीरमार किंवा ॅ्र१्र२्र्िरं २ंस्र््र४े. गेल्या काही वर्षांत याची लागवड मोठय़ा प्रमाणात करण्यात आली आहे. या झाडाला पांढरी व गुलाबी रंगाची फुले येतात. परंतु याची वाढ मोठय़ा प्रमाणात झाल्यावर अगदी गवतसुद्धा येणे मुश्कील होऊन जाते. या सर्व परदेशी झाडांची वैशिष्टय़े म्हणजे, यांची वाढ अगदी जोमात होत असते, पण या झाडांवर अवलंबून असणारे पशू नसल्याने त्यांची वाढ नसíगकरीत्या नियंत्रित करणारे घटक निसर्गात आढळत नाहीत.
तुम्ही रहात असलेल्या किंवा शाळेच्या परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. याकरिता आपण एक प्रयोग करू या. स्थानिक नसलेली झाडे रस्त्याच्या कडेला किंवा डोंगरांवर तसेच शेताच्या आजूबाजूलादेखील आपणास निश्चितच बघावयास मिळू शकतील. प्रथमत: आपल्या भागातील किती झाडे ही स्थानिक प्रकारची आहेत व किती झाडे स्थानिक नसलेली आहेत याचे वर्गीकरण करा. याकरिता तुम्ही अशा प्रकारच्या झाडांसंबंधात आपले शिक्षक किंवा ज्यांना झाडांची माहिती आहे त्यांना याबाबत विचारू शकतात. स्थानिक असलेल्या व नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या झाडांवर कोणते कीटक, फुलपाखरे व पक्षी येतात यांचे दररोज थोडा वेळ जरी निरीक्षण केले, तरी आपणास या दोन्ही प्रकारच्या झाडांमधील फरक सहजगत्या समजून येईल. याचप्रमाणे आपल्या गावाभोवती जर वनविभागाचे क्षेत्र असेल, तर अशा क्षेत्रावर कोणत्या प्रजातींची लागवड केली आहे तेही बघण्याचा प्रयत्न करा. बघुयात आपल्यापकी किती जणांना वर नमूद केलेल्या झाडांव्यतिरिक्त अस्थानिक प्रजातींची माहिती गोळा करता येते. या झाडांचे निरीक्षण करताना या झाडांच्या अवतीभवती कोणत्या प्रकारच्या अन्य प्रजाती आहेत याचेही निरीक्षण नोंदविले तर अशा झाडांचा व स्थानिक प्रजातींचा अन्य जीवसृष्टीशी असलेला संबंध तुम्हाला कळू शकेल. यातूनच आगामी काळात या स्थानिक नसलेल्या प्रजातींची लागवड टाळण्याकरिता प्रयत्न करता येऊ शकेल.
-rahumungi@gmail.com
First Published on October 11, 2015 12:22 am
Web Title: rahul mungikar article on nature
No comments:
Post a Comment