सुनीत पोतनीस |
October 23, 2015 01:58 am
रामपूर संस्थानाचा पहिला नवाब फैजुलखान याची कारकीर्द २०
वर्षांची झाली. विद्वान, पंडितांचा आश्रयदाता फैजुलखान स्वत: अरेबिक,
पíशयन, टर्की आणि उर्दू भाषांचा जाणकार होता. या भाषांमधील दुर्मीळ
हस्तलिखितांचा संग्रह करण्याचा त्याचा छंद होता. त्याच्या पुढच्या
नवाबांनीही हा छंद जोपासला. नवाब मोहम्मद सईद खान (१८४०-१८५५) याने या सर्व
हस्तलिखितांची नीट जोपासना करण्यासाठी त्या त्या भाषांचे विद्वान नेमून
‘रामपूर रझा किताबखाना’ या ग्रंथालयाची स्थापना केली. नवाब अहमद अलीखान आणि
नवाब युसूफ अलीखान हे तर स्वत: उत्तम उर्दू कवी, चित्रकार आणि संगीतकार
होते. ते प्रख्यात कवी मिर्जा गमलिबम् याच्या मार्गदर्शनाखाली काव्य तयार
करीत. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरानंतर ठिकठिकाणच्या कवी, लेखक, संगीतकारांनी
रामपूरमध्ये आश्रय घेतला. नवाब युसूफ अलीखानच्या काळात तर संस्कृत, िहदी,
दाक्षिणात्य भाषा यांची हस्तलिखिते आणि पुस्तकांचाही संग्रह वाढला. नवाब
काल्ब अलीखानाने तज्ज्ञ चित्रकार, संगीतकारांना नेमून त्यांच्या
देखरेखीखाली दुर्मीळ चित्रे, शिल्पे, संगीताची वाद्य्ो यांचाही संग्रह करून
निराळे दालन सुरू केले. हजची यात्रा करून सातव्या शतकातील कुराणाची
हस्तलिखित प्रत त्याने रझा ग्रंथालयात ठेवली. १९०४ साली नवाब हमीद अलीखान
याने ‘हमीद मंजील’ ही भव्य इमारत बांधून तेथे हे ग्रंथालय तज्ज्ञांच्या
देखरेखीखाली सुरू केले. १९७५ साली भारत सरकारने प्रो. नुरूल हसन यांच्या
देखरेखीखाली सांस्कृतिक विभागाकडे रझा ग्रंथालयाचे व्यवस्थापन सोपविले.
सध्या या ग्रंथालयात २४ हजार हस्तलिखिते, ३० हजारांहून अधिक पुरातन दुर्मीळ
ग्रंथ आणि ऐतिहासिक दस्तावेज आणि अगणित कलावस्तू जतन केलेल्या आहेत. रझा
ग्रंथालय हे जगातील दुर्मीळ साहित्याचा संग्रह असलेल्या ग्रंथालयांमध्ये
गणले जाते.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
No comments:
Post a Comment