भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये एमएस्सी- पीएच.डी पात्रताधारकांना संधी
उमेदवारांनी पॉलिमर केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी एनर्जी सिस्टीम्स, हायड्रो प्रोसेसिंग, मेकॅनिकल, थर्मल इंजिनीअरिंग, कॅटेलॉसिस यांसारख्या विषयांतील
द. वा. आंबुलकर |
October 5, 2015 07:25 am
उमेदवारांनी पॉलिमर केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी एनर्जी सिस्टीम्स, हायड्रो प्रोसेसिंग, मेकॅनिकल, थर्मल इंजिनीअरिंग, कॅटेलॉसिस यांसारख्या विषयांतील एमटेक-पीएच.डी पात्रता प्राप्त केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा. अधिक माहितीसाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या www.bpclcareers.com या संकेतस्थळावर ७ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.
नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये कनिष्ठ अभियंत्यांच्या (सिव्हिल) च्या २० जागा
अर्जदारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविका किमान ६० टक्के गुणानी उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ ऑगस्ट-४ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा www.nbccindia.gov.in CAREER या एनबीसीसीच्या या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (एचआरएम), एनबीसीसी लिमिटेड, एनबीसीसी भवन, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर८ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये वरिष्ठ अभियंत्यांच्या १२ जागा
वयोमर्यादा ३६ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या www.powergridindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १० ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.
मिलिटरी इंजिनीअरिंग सव्र्हिसेसमध्ये कुशल कामगारांसाठी २४१ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पात्रताधारक आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ सप्टेंबर २०१५ च्या अंकातील ‘मिलिटरी इंजिनीअरिंग सव्र्हिसेस’ची जाहिरात पाहावी. आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडर वर्क्स इंजिनीअर, लखनऊ, एम. जी. रोड, लखनऊ-२२६००२ या पत्त्यावर १० ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.
नौदलात अभियंत्यांसाठी संधी
उमेदवारांनी बीई/बीटेक पात्रता किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांनी बारावीच्या परीक्षेला गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेतलेले असावेत. उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २४ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय नौदलाची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या www.joinindianavy.gov.in या संकेतस्थळाला भेट
द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १२ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.
‘हेवी वॉटर बोर्ड’मध्ये लघुलेखक- स्टेनोग्राफर्सच्या २१ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता प्राप्त केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी www.hwb.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १५ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सोलर एनर्जीमध्ये एक्झिक्युटिव्ह असिस्टंटच्या ५ जागा
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सोलर एनर्जीची जाहिरात पाहावी. www.mnre.gov.in या इन्स्टिटय़ूटच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १५ ऑक्टोबपर्यंत अर्ज करावा.
First Published on October 5, 2015 1:03 am
Web Title: employment opportunity 52
No comments:
Post a Comment