Tuesday, September 18, 2018

संशोधन संस्थायण : संशोधनाचे पक्के रस्ते रस्ते आणि वाहतुकीच्या एकूण पायाभूत सुविधा देशाच्या सामाजिक-आíथक आणि तांत्रिक प्रगतीसाठी आवश्यक बाबी आहेत.

संशोधन संस्थायण : संशोधनाचे पक्के रस्ते 

रस्ते आणि वाहतुकीच्या एकूण पायाभूत सुविधा देशाच्या सामाजिक-आíथक आणि तांत्रिक प्रगतीसाठी आवश्यक बाबी आहेत.

रस्ते आणि वाहतुकीच्या एकूण पायाभूत सुविधा देशाच्या सामाजिक-आíथक आणि तांत्रिक प्रगतीसाठी आवश्यक बाबी आहेत. म्हणूनच या क्षेत्रातील संशोधन उत्तम, टिकाऊ आणि सुरक्षित रस्ते बांधण्यासाठी आणि परिणामी त्यावरील प्रभावी रहदारी निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. सीआरआरआय या नावाने ओळखली जाणारी सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिटय़ूट ही राष्ट्रीय महामार्ग, वाहतूक नियोजन आणि इतर सर्व संबंधित पलूंबद्दल संशोधन करणारी एक महत्त्वाची आणि अग्रगण्य राष्ट्रीय संशोधन संस्था आहे. राजधानी दिल्ली येथे असलेल्या सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिटय़ूट म्हणजेच केंद्रीय महामार्ग संशोधन संस्था या संशोधन संस्थेची स्थापना १९५२ साली झाली.  निजामुद्दीन रेल्वे स्थानकापासून पाच किमीवर दिल्ली मथुरा राष्ट्रीय महामार्गावर एका विशाल आणि सुंदर संकुलामध्ये ही संस्था उभी आहे.  केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारी ही संस्था सीएसआयआरशीदेखील (वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद) संलग्न आहे.
संस्थेविषयी – ही संशोधन संस्था रस्ते, धावपट्टी, वाहतूक, पूल आणि इतर भूतांत्रिक पलूंशी संबंधित संशोधन करते. रस्ते आणि वाहतुकीच्या क्षेत्रातील संशोधन व विकासकार्य करत असतानाच सल्लासेवाविषयक कामांसह एक उच्च दर्जाची व्यावसायिक सल्लागार म्हणूनही काम करते. या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम पर पाडत असतानाच येथील शास्त्रज्ञांनी संस्थेच्या संशोधन विषयांमध्ये वैविध्य बाळगले आहे. संस्थेच्या प्रमुख संशोधन विषयांपकी पॅव्हमेंट डिझाइन अ‍ॅण्ड परफॉर्मन्स, रोड स्टेटस मॉनिटिरग, पॅव्हमेंट डिटीरिओरेशन मॉडेलिंग, मेन्टेनन्स प्लॅनिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, फुटपाथ मॅनेजमेंट सिस्टम, ट्रॅफिक इंजिनीअिरग, लँडसाइड मॅनेजमेंट अ‍ॅण्ड हझार्ड मिटिगेशन, जिओटेक्निकल इन्व्हेस्टिगेशन अ‍ॅण्ड ग्राउंड इम्प्रूव्हमेंट टेक्निक्स, मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इम्प्रोव्ह्ड ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग टेक्नॉलॉजी फॉर इर्मजिंग अर्बन नीड्स, प्लॅनिंग अ‍ॅण्ड इंजिनीअिरग अ‍ॅस्पेक्ट्स ऑफ रुरल रोड्स, मटेरियल कॅरॅक्टरायझेशन, पॅव्हमेंट इव्हॅल्युएशन, हायवे इंस्ट्रमेंटेशन, कन्डिशिनग मॉनिटिरग अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन ऑफ ब्रिजेस, डिझाइन ऑफ हाय एम्बार्कमेंट्स अ‍ॅण्ड रिएन्फोर्स्ड अर्थ वॉल्स, सब वेज अ‍ॅण्ड अंडरपास कन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्टेशन प्लानिंग, रोड सेफ्टी अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल प्रॉब्लेम्स या विषयांमध्ये संशोधक मोलाचे संशोधन करत आहेत.
संशोधनातील योगदान  – ही संस्था रस्ते, वाहतूक आणि तत्सम इतर भूतांत्रिक पलूंशी संबंधित संशोधन क्षेत्रात अद्ययावत संशोधन करण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि पायाभूत सुविधांसह संस्था सुसज्ज आहे. ही संस्था या क्षेत्रातील इंटरडिसिप्लिनरी संशोधन करणारी देशातील एकमेव संशोधन संस्था आहे. यामुळेच संस्थेची सेवा घेणाऱ्या प्रमुख आस्थापनांमध्ये उद्योगक्षेत्र, केंद्रीय मंत्रालय वा महामंडळ, विविध राज्य सरकारांची मंत्रालये यांचा समावेश आहे. संशोधन विषयांमध्ये असलेली विविधता व उपलब्ध पायाभूत सुविधा या संस्थेच्या जमेच्या बाजू आहेत. सीआरआरआयने प्रशिक्षण ही संस्थेच्या एकूण संशोधन प्रक्रियेमधील एक महत्त्वाची क्रिया मानली आहे. त्यामुळेच ही संस्था आपल्या संशोधकांना संशोधनातील वेगवेगळ्या आवश्यकतेनुसार तयार केल्या गेलेल्या रिफ्रेशर कोस्रेसचे प्रशिक्षण देतात. सीआरआरआयमध्ये आतापर्यंत पंचवीस हजारहून अधिक सेवा-महामार्ग अभियंत्यांना प्रशिक्षणाचा लाभ घेता आलेला आहे. रस्ते व वाहतुकीशी जोडल्या गेलेल्या विज्ञान आणि अभियांत्रिकीशी संबंधित असलेल्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांशी संवाद साधणे आणि परस्पर सहकार्य करणे या गोष्टींनासुद्धा संस्था प्राधान्य देत आहे. त्यामुळेच सीआरआरआयने या क्षेत्रातील माहिती आणि तांत्रिक कौशल्य इत्यादींचे आदान-प्रदान करण्यासाठी देशातील तसेच परदेशातील विविध महामार्ग संशोधन  संस्थांबरोबर सक्रिय संपर्क ठेवलेला आहे. म्हणूनच संस्था जागतिक स्तरावर टीआरबी  (यूएसए), एआरआरबी (ऑस्ट्रेलिया), टीआरएल (यूके), वर्ल्ड रोड असोसिएशन (पीआयएआरसी) इत्यादी संस्थांबरोबर काही संशोधन प्रकल्प सहकार्याने राबवत आहे.
विद्यार्थ्यांसाठी संधी – रस्ते व वाहतुकीशी संबंधित क्षेत्र व त्याच्याशी निगडित असलेल्या अभियांत्रिकीच्या विविध शाखा यांमधील संशोधनासाठी कुशल मनुष्यबळ मिळावे व संशोधनाच्या माध्यमातून रस्ते-वाहतुकीशी संबंधित असलेल्या समस्यांचे निराकरण व्हावे या उद्दिष्टाने संस्थेने आतापर्यंत अभियांत्रिकीच्या अनेक विद्यार्थ्यांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रेरित केलेले आहे. त्यामुळेच संस्थेचे अनेक पीएचडी पदवीधारक अभियंते-संशोधक भारतात व परदेशातदेखील औद्योगिक आणि संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. सीआरआरआय ही संस्था आजसुद्धा देशातील विविध विद्यापीठांबरोबर संलग्न होऊन अनेक शैक्षणिक व संशोधन प्रकल्प राबवत आहे. भारतातील इतर संशोधन संस्थांसारखे या Academy of Scientific & Innovative Research (AcSIR)  च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. सीआरआरआय अनेक विद्यापीठांशी पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. विद्यापीठांमध्ये पीएचडीचे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी संशोधनाचा विशिष्ट भाग अथवा माहिती संकलन किंवा माहिती प्रक्रिया इत्यादीसारख्या बाबी पूर्ण करण्यासाठी इथे  ठरावीक काळ व्यतीत करत असतात. तसेच दरवर्षी सीएसआयआरच्या परीक्षांमधून गुणवत्ताप्राप्त अनेक जेआरएफ व एसआरएफ विद्यार्थी इथे पीएचडीचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. या संशोधक विद्यार्थ्यांना देशविदेशातील अनेक कार्यशाळांना पाठवून त्यांचे कार्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.
संपर्क – सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिटय़ूट, दिल्ली – मथुरा मार्ग,  पी.ओ. सीआरआरआय नवी दिल्ली – ११००२५. दूरध्वनी  +९१-११- २६८४८९१७
ईमेल  –  director.crri@nic.in
संकेतस्थळ  – http://www.crridom.gov.in
itsprathamesh@gmail.com
First Published on September 14, 2018 1:32 am
Web Title: article about central road research institute new delhi

No comments:

Post a Comment