Thursday, November 9, 2017

करिअरमंत्र मी एम.कॉम.च्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला लेक्चरर व्हायचे आहे.

करिअरमंत्र

मी एम.कॉम.च्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला लेक्चरर व्हायचे आहे.

सुरेश वांदिले | Updated: October 14, 2017 3:09 AM

मी एम.कॉम.च्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला लेक्चरर व्हायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल? त्यासाठी कोणती परीक्षा आहे? अभ्यासक्रम काय आहे? परीक्षा किती वेळा देता येते? या परीक्षेचे काय स्वरूप असते? ही परीक्षा कधी असते? – राणी मेहकर, नांदेड
नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच नेट किंवा स्टेट इलिजिबिलीटी टेस्ट म्हणजे सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर) या पदासाठी पात्र ठरतात.
अर्हता – खुल्या संवर्गातील उमेदवारांसाठी पदव्युत्तर परीक्षेत ५५ टक्के गुण आणि नॉन क्रीमीलेअर इतर मागास वर्ग वा अनुसूचित जाती आाणि जमाती संवर्गातील उमदेवारांसाठी ५० टक्के गुण आवश्यक. पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असलेले उमेदवार या परीक्षेला बसू शकतात. तथापी निर्धारित मुदतीत संबंधित उमेदवाराच्या परीक्षेचा निकाल लागायला हवा आणि त्यास विहित केलेली टक्केवारी मिळायला हवी. नेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवार विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेल्या देशातील कोणत्याही महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करू शकतात. सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी केवळ राज्यातील अशाच प्रकारच्या महाविद्यालयातील साहाय्यक पदासाठी पात्र ठरू शकतात. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ही संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने ही परीक्षा घेत असते. यंदा ही परीक्षा ५ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देशभरातील ९१ केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षा घेणे व निकाल घोषित करणे या पुरताच बोर्डाचा अधिकार मर्यादित आहे. नेट उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र यूजीसी-नेट ब्युरो मार्फत दिले जाते.

या परीक्षेसाठी तीन पेपर्स असतात.
पेपर (१) वेळ – सव्वातास, एकूण गुण १००.  या पेपरमध्ये ६० प्रश्न विचारले जातात. त्यापैकी पन्नास प्रश्न सोडवणे आवश्यक. प्रत्येक अचूक उत्तराला दोन गुण. पेपर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचा असतो.
पेपर (२) वेळ – सव्वातास, एकूण गुण १००, या पेपरमध्ये ५० प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक. प्रत्येक अचूक उत्तराला दोन गुण. पेपर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचा असतो.
पेपर (३) वेळ – अडीच तास, एकूण गुण १५०, या पेपरमध्ये ७५ प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक. प्रत्येक अचूक उत्तराला दोन गुण. पेपर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचा असतो. तिन्ही पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या संवर्गातील उमेदवारास सरासरीने ४० टक्के आणि राखीव संवर्गातील उमेदवारास सरासरीने ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, पुणे.
संपर्क- हेड, यूजीसी-नेट ब्युरो, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, साऊथ कॅम्पस, न्यू दिल्ली- ११००२१, दूरध्वनी-०११-२४११६३१६, संकेतस्थळ – https://www.ugc.ac.in/ आणि http://cbsenet.nic.in/cms/public/home.aspx

मी सध्या एम ए (भूगोल) च्या पहिल्या वर्षांला आहे. मला  सरकारी नोकरी करायची आहे.  करिअरच्या  कोणत्या संधी आहेत ?  – ललित चांगोले
भूगोल या विषयात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर थेट शासकीय नोकरी मिळण्याची शक्यता नाही. शासकीय नोकरीसाठी तुला राज्य लोक सेवा आयोग, केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षा द्याव्या लागतील. नेट/सेट परीक्षा देऊन तू मान्यताप्राप्त महाविद्यालये, विद्यापीठातील भूगोल विभाग यामध्ये नोकरी मिळवू शकतोस.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण संधी
महाराष्ट्रा शासनाच्यावतीने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा- २०१८ च्या पूर्व प्रशिक्षणासाठी अकरा महिने पूर्ण वेळ व विनामूल्य प्रशिक्षण उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक-
  • उपलब्ध जागांची संख्या- उपलब्ध जागांची संख्या ७० असून त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे द्वारा अनुदानित १० जागांचा समावेश आहे.
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत.
  • वयोमर्यादा – अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांचे वय १ ऑगस्ट २०१८ रोजी ३२ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील अर्जदारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
  • निवड परीक्षा- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची प्रवेश पात्रता परीक्षा नाशिक परीक्षा केंद्रावर १०-१२-२०१७ रोजी घेण्यात येईल. २०० गुणांच्या या प्रवेश पात्रता परीक्षेत सामान्य अध्ययन १०० गुण व सी-सॅट १०० गुण या प्रश्नपत्रिकांचा समावेश असेल.
  • अर्जासह भरावयाचे शुल्क- अर्जदारांनी आपल्या अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून ते सर्वसाधारण गटातील असल्यास ३०० रु. व राखीव वर्गगटातील असल्यास १५० रु. चलनद्वारा भारतीय स्टेट बँकेच्या कुठल्याही शाखेत भरणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- वरील संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासन- भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकची जाहिरात पहावी. दूरध्वनी क्र. ०२५३- २२३०१०० वर संपर्क साधावा अथवा प्रशिक्षण केंद्राच्या iasnashik.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६.१०.२०१७
राज्यातील ज्या पदवीधर उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस, आयपीएस वा आयएफएस यांसारख्या राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांच्या तयारीसाठी पूर्व प्रशिक्षण घ्यायचे असेल अशांनी राज्य सरकारद्वारा त्यांच्यासाठी राज्यातील अमरावती व नाशिक केंद्रांवर उपलब्ध करण्यात आलेल्या या मार्गदर्शनपर संधीचा अवश्य फायदा घ्यावा.
– द. वा. आंबुलकर
First Published on October 14, 2017 12:30 am
Web Title: loksatta career mantra 6

No comments:

Post a Comment