Saturday, September 9, 2017

पुढची पायरी : अष्टावधानी बना कार्यालयात आपली कार्यक्षमता व उत्पादकता वाढवायचा एक उत्तम मार्ग म्हणजे अष्टावधानी होणे.

पुढची पायरी : अष्टावधानी बना 

कार्यालयात आपली कार्यक्षमता व उत्पादकता वाढवायचा एक उत्तम मार्ग म्हणजे अष्टावधानी होणे.

डॉ. जयंत पानसे | Updated: August 12, 2017 1:30 AM
0
Shares
एखाद्या व्यस्त कार्याल यात चुणचुणीत स्वागतिका सुहास्य वदनाने एकाच वेळी अनेक कामे करताना दिसते. तेव्हा तुम्ही तिच्या कार्यशैलीवर एकदम खूश होता. कुणाला ती गुड मॉर्निग म्हणते, कुणाला आठवणीने साहेबांचा निरोप सांगते, कुणाला फोन लावून देते तर कुणाला योग्य त्या सहकाऱ्याकडे काम पूर्ण करायला पाठवते. या सगळ्या गोष्टी ती जवळपास एकाच वेळी करत असते. कार्यालयातील एखाद्या वरिष्ठ साहेबांच्या कामाबद्दल माहिती घेताना आपण ऐकतो की त्यांनी कशा प्रकारे एकाच वेळी अनेक कामं, अचूक आणि वेळेत केली. अशा व्यक्तींच्या यशामागचे रहस्य म्हणजे अष्टावधानीपणा – शब्दश सांगायचं तर एकाच वेळी आठ कामे करणे. पण मथितार्थ म्हटला तर एकाच वेळी अनेक गोष्टी सहज हाताळणे आणि पूर्णत्वास नेणे.
कार्यालयात आपली कार्यक्षमता व उत्पादकता वाढवायचा एक उत्तम मार्ग म्हणजे अष्टावधानी होणे. सुरुवातीला वाटते हे अवघड, पण सरावाने तुम्ही अशी अनेक कामे अचूकतेने एकाच वेळी करू शकता. त्यासाठी प्रयत्न मात्र करावयाला हवेत. एक काम संपल्यानंतर दुसरे काम अशा रीतीने क्रमश: कामे करत गेल्यास खूप वेळ लागतो. त्यातून तुमचा अनेक ग्राहकांशी संबंध येत असेल तर ते कंटाळूनच जातात.

No comments:

Post a Comment