Saturday, September 9, 2017

नोकरीची संधी दहा महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड रु. १५,०००/- दरमहा.

नोकरीची संधी

दहा महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड रु. १५,०००/- दरमहा.

सुहास पाटील | Updated: August 11, 2017 1:44 AM
0
Shares
भारतीय नौकानयन महामंडळ मर्यादित (भारत सरकारचा उपक्रम) एससीआयच्या मेरिटाइम ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, पवई, मुंबई येथे १ ऑक्टोबर २०१७ पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षणाकरिता ग्रॅज्युएट मरिन इंजिनीअर्स (जीएमई)कोर्ससाठी प्रवेश.
एकूण जागा ६० (यूआर – ४०, इमाव – ११, एस्सी – ६, एसटी – ३)
पात्रता – बी. ई. (मेकॅनिकल) (अविवाहित पुरुष.)
वय – दि. १ ऑक्टोबर २०१७ रोजी कमाल २८ वष्रे, (इमाव – ३१ वष्रे, अजा/अज – ३३ वष्रे.) दहा महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड रु. १५,०००/- दरमहा.
ऑनलाइन अर्ज  www.shipindia.com/careers/fleet-personnel.aspx या संकेतस्थळावर दि. २३ ऑगस्ट २०१७ पर्यंत करावेत.
भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरतर्फे होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूटमार्फत डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स (डिप. आर.पी.) कोर्ससाठी प्रवेश.
हा कोर्स रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर होण्यासाठी महत्त्वाचाआहे.
एकूण प्रवेश ३० जागा (२५ नॉन-स्पाँसर्ड ५ स्पाँसर्ड्). कोर्स ऑक्टोबर, २०१७ पासून सुरू होणार. कालावधी एक वर्ष.
या कोर्समध्ये रेडिएशन फिजिक्समधील अभ्यास, प्रॅक्टिकल्स आणि फिल्ड ट्रेिनग (जे मेडिकल फिजिसिस्ट आणि रेडिओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर या पदांवर काम करणाऱ्यासाठी आवश्यक आहे.) मिळेल.

No comments:

Post a Comment