Tuesday, July 25, 2017

एमपीएससी मंत्र : विज्ञान व तंत्रज्ञान विकास अर्थव्यवस्था, कृषी व विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा तीन विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.


एमपीएससी मंत्र : विज्ञान व तंत्रज्ञान विकास

अर्थव्यवस्था, कृषी व विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा तीन विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

रोहिणी शहा | Updated: July 19, 2017 1:58 AM 
राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर – ४ मध्ये अर्थव्यवस्था, कृषी व विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा तीन विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. ‘विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास’ हा विषय अर्थशास्त्र विषयाशी संलग्न करून मुख्य परीक्षेच्या पेपर ४ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेचा विकास हा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाशी अपरिहार्यपणे जोडला गेलेला आहे. अभ्यासक्रम पाहिल्यावर हे लक्षात येते की ‘तंत्रज्ञान’ व त्याचा मानवी कल्याणासाठी वापर या अनुषंगाने अभ्यास करणे आयोगाला अभिप्रेत आहे.
*  ऊर्जा पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा साधने – सौर, वारा, जैववायू, जीववस्तुमान, भूऔष्णिक व इतर नवीकरणयोग्य ऊर्जा साधनांची संभाव्यता, सौर साधने -सौरकुकर, पाणीतापक, इ. बायोगॅस तत्त्वे व प्रक्रिया, शासकीय धोरणे आणि वीजनिर्मितीसाठी कार्यक्रम- अणुशक्ती, औष्णिक वीज, जलविद्युत. वीज वितरण व राष्ट्रीय विद्युतपुरवठा, ऊर्जा संकट, ऊर्जा सुरक्षा, संशोधन व विकास यात गुंतलेली अभिकरणे व संस्था.
*  संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, माहितीची देवाणघेवाण, नेटवìकग, वेब तंत्रज्ञान यांसारख्या जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील त्याचे उपयोजन, विविध सेवांमधील माहिती तंत्रज्ञानाचा वापर, मीडिया लॉब आशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, कम्युनिटी माहिती केंद्र, इ.सारखे शासकीय कार्यक्रम, सायबर गुन्हे, त्यावरील प्रतिबंध, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील महत्त्वाचे प्रश्न- त्याचे भवितव्य.
*  अवकाश तंत्रज्ञान – भारतीय अवकाश कार्यक्रम, दूरसंचार, दूरदर्शन, शिक्षण, प्रसारण, हवामान अंदाज, जीपीएस, आपत्ती इशारा याकरिता भारतीय कृत्रिम उपग्रह, भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रम, सुदूर संवेदना, भौगोलिक माहिती यंत्रणा (जीआयएस) आणि हवामान अंदाज, आपत्ती इशारा यामधील तिचे उपयोजन, जल, मृदा, खनिज संपत्ती विकास, कृषी व मत्स्यविकास, नागरी नियोजन, पारिस्थितीकी अभ्यासक्रम, भौगोलिक यंत्रणा व भौगोलिक माहिती यंत्रणा.
*  जैव तंत्रज्ञान – कृषी, औद्योगिक विकास व रोजगारनिर्मितीद्वारे मानवी जीवन व राष्ट्रीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी संभाव्य शक्यता, नसíगक साधनसंपत्ती विकासाचे आवश्यक व महत्त्वाचे साधन म्हणून जैवतंत्रज्ञान उपयोजनाची क्षेत्रे –  कृषी, पशुपदास व पशुवैद्यकी, औषधनिर्माणविद्या, मानवी आरोग्य, अन्न तंत्रज्ञान, ऊर्जानिर्मिती, पर्यावरण संरक्षण, इ. देशातील जैवतंत्रज्ञानाबाबत प्रचालन, नियमन व विकासामधील शासनाची भूमिका व प्रयत्न, जैवतंत्रज्ञानाशी संबंधित नतिक, सामाजिक व कायदेशीर प्रश्न, जैवतंत्रज्ञान विकासाचे संभाव्य प्रतिकूल परिणाम, बियाणे तंत्रज्ञान, त्याचे महत्त्व, बियाणांची गुणवत्ता, प्रकार आणि उत्पादन व प्रक्रिया तंत्रे, बी.टी. कापूस, बी.टी. वांगे, इ.
*  भारताचे आण्विक धोरण – ठळक वैशिष्टय़े, ऊर्जेचा स्रोत आणि स्वच्छ ऊर्जा म्हणून अणुऊर्जा, त्याचे महत्त्व, आण्विक कचऱ्याची समस्या, भारतातील औष्णिक वीजनिर्मिती, एकूण वीजनिर्मितीमधील त्याचे अंशदान, आण्विक चाचणी निर्धारके – पोखरण एक (१९७४) आणि पोखरण दोन (१९९८) न्यूक्लिअर नॉन-प्रोलिफरेशन ट्रिएटी आणि कॉप्रेहेन्सिव टेस्ट बॉन ट्रिएटी यांसारख्या आण्विक धोरणांबाबतचा अलीकडला कल, २००९चा इंडो-यूएस न्यूक्लिअर करार.
*  आपत्ती व्यवस्थापन -आपत्तीची व्याख्या, स्वरूप, प्रकार व वर्गीकरण, नैसर्गिक धोके, कारणीभूत घटक व ते सौम्य करणारी उपाययोजना, पूर, भूकंप, त्सुनामी, दरड कोसळणे, इ. सौम्य करणाऱ्या उपाययोजनांवर परिणाम करणारे घटक,

किल्लारी (१९९३), भूज (२००१), सिक्कीम-नेपाळ (२०११) भूकंप, बंदा आले (२००४) (सुमात्रा), फुकुशिमा (२०११) (जपान) भूकंप व त्सुनामी यांसारख्या मोठय़ा भूकंप व त्सुनामी प्रकरणांचा अभ्यास, महाराष्ट्र २००५चा मुंबईतील पूर,
डिसेंबर १९९३, जून २००६, नोव्हेंबर २००९,
जुलै २०११चे बॉम्बस्फोट आणि अतिरेक्यांचा हल्ला, त्यांचा परिणाम.
First Published on July 19, 2017 1:58 am
Web Title: useful tips for mpsc exam 2017

 

 

No comments:

Post a Comment