Tuesday, July 18, 2017

क्लिनिकल सायकॉलॉजीमधील एमफिल अभ्यासक्रम अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा ६ ऑगस्ट २०१७ रोजी घेण्यात येईल

क्लिनिकल सायकॉलॉजीमधील एमफिल अभ्यासक्रम

अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा ६ ऑगस्ट २०१७ रोजी घेण्यात येईल

लोकसत्ता टीम | Updated: July 7, 2017 1:05 AM
0
Shares
इन्स्टिटय़ूट ऑफ ह्य़ुमन बिहेविअर अ‍ॅण्ड अलाइड सायन्सेस, नवी दिल्ली येथे क्लिनिकल सायकॉलॉजीमधील एमफिल अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाच्या २०१७-१९ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी  पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
मानसशास्त्र वा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना त्याच विषयातील एमफिल पात्रतेसह पुढे करिअर करायचे असेल त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर ठरू शकतो.
जागांची संख्या व तपशील – अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची १०. यापैकी ६ जागा अनारक्षित असून प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती-जमातींच्या तर दोन जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार विद्यार्थ्यांनी मानसशास्त्र, अप्लाइड सायकॉलॉजी, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, क्लिनिकल सायकॉलॉजी, काउन्सिलिंग सायकॉलॉजी वा हेल्थ सायकॉलॉजी यांसारख्या विषयांतील एमए- एमएस्सी पदव्युत्तर पदवी कमीतकमी ५५% गुणांसह (राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी ५०% गुणांसह) उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
निवड प्रक्रिया – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा ६ ऑगस्ट २०१७ रोजी घेण्यात येईल. अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना ७ व ८ ऑगस्ट २०१७ रोजी मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क – अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी २००० रु. चा (राखीव वर्गगटातील उमेदवारांनी १००० रु. चा) डायरेक्टर, आयएचबीएएस यांच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अर्जाचा नमुना व अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इन्स्टिटय़ूट ऑफ ह्य़ुमन बिहेविअर व अप्लाइड सायन्सेस, नवी दिल्लीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या  m.phil.co2012@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज प्रोफेसर सायकॅइट्री अ‍ॅण्ड डायरेक्टर, इन्स्टिटय़ूट ऑफ ह्य़ुमन बिहेविअर अ‍ॅण्ड अप्लाइड सायन्सेस एचओडी (क्लिनिकल सायकॉलॉजी) रूम नं. १२२, फर्स्ट फ्लोअर, अ‍ॅकेडेमिक ब्लॉक, दिलशाह गार्डन, नवी दिल्ली- ११००९५ या पत्त्यावर पाठवावे. ते पाठविण्याची शेवटची तारीख १० जुलै २०१७.
First Published on July 7, 2017 1:05 am
Web Title: mphil course in clinical psychology
0
Shares

No comments:

Post a Comment