Tuesday, July 18, 2017

एमपीएससी मंत्र : परीक्षेला जाता जाता.. या दृष्टीने करंट ग्राफ वार्षकिी २०१७ हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

एमपीएससी मंत्र : परीक्षेला जाता जाता..

या दृष्टीने करंट ग्राफ वार्षकिी २०१७ हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

वसुंधरा भोपळे | Updated: July 14, 2017 12:52 AM
0
Shares

विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, अभ्यासाचे नियोजन तसेच अभ्यास्रोत याबद्दल सविस्तर माहिती घेतली आहे. आता परीक्षा अगदीच तोंडावर आली आहे तर परीक्षेला जाता जाता नेमक्या कोणत्या घटकांवर भर द्यावा आणि परीक्षेच्या दिवशी पेपर सोडविताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल या लेखात माहिती घेऊयात. परीक्षेला जाता जाता काही अत्यावश्यक घटकांची उजळणी करणे क्रमप्राप्त ठरते तर ते घटक खालीलप्रमाणे आहेत.
चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील 
हा घटक पूर्व तसेच मुख्य या दोन्ही परीक्षांसाठी आहे. हा घटक अभ्यासताना परीक्षेच्या किमान एक वर्ष अगोदर घडलेल्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी विचारात घ्यावे लागतात. या दृष्टीने करंट ग्राफ वार्षकिी २०१७ हे पुस्तक उपयुक्त ठरेल. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था भारतीय राजकारण, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निकाल, नवीन लागू झालेल्या करप्रणाली, जागतिक उच्चांक, राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे अधिनियम, विविध योजना, विविध क्षेत्रातील पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील वैशिष्टय़पूर्ण कामगिरी या घटकांवर विशेष भर द्यावा. या घटकावर साधारणपणे १५ ते २० प्रश्नांचा समावेश होतो.
नागरिकशास्त्र 
या विभागांतर्गत भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास तसेच ग्रामप्रशासन आणि राज्यव्यवस्थापन यांमधील मूलभूत संकल्पनांचे आकलन या घटकांवर विशेष भर द्यावा. साधारणपणे ८ ते १२ प्रश्न या घटकावर विचारले जातात.
आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास  –
या विभागांतर्गत भारतातील स्वातंत्र्यलढय़ात महाराष्ट्राचे योगदान, ब्रिटिशांची धोरणे, कायदे, राष्ट्रीय सभा आणि अधिवेशने, सामाजिक-धार्मिक सुधारणा, महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकांवर विशेष भर द्यावा. या विभागावर साधारणपणे १२ ते १५ प्रश्न विचारण्यात येतात.
भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह –
या विभागांतर्गत भुरूपे, वारे, पर्यटनस्थळे, मानवी भूगोल, आदिवासी जमाती, अक्षांश, रेखांश, बंदरे, पर्वत, उद्योगधंदे या घटकांवर अधिक भर असून अभ्यासक्रमातील इतर घटक म्हणजे ते महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, पृथ्वी, जगातील हवामान विभाग या घटकांवर देखील भर देणे अपेक्षित आहे. या विभागावर साधारणपणे १२ ते १४ प्रश्न विचारले जातात.
अर्थव्यवस्था –
या विभागांतर्गत पंचवार्षकि योजना, चलनव्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक उद्योगांची सद्यस्थिती, विविध समित्या सरकारी धोरणे, वित्त आयोग व शिफारसी, परकीय गुंतवणुकीचे प्रवाह, बेरोजगारी मापनाचे निकष, मानव विकास निर्देशांक, जीडीपी कृषी क्षेत्र आणि ग्रामीण विकास अशा मुद्दय़ांवर विशेष भर द्यावा. या विभागावर साधारणपणे १० ते १४ प्रश्न विचारण्यात येतात.
सामान्य विज्ञान –
यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र यांतील मूलभूत संकल्पनांवर आधारित घटकांवर विशेष भर द्यावा. या घटकावर साधारणपणे १२ ते १६ प्रश्न विचारण्यात येतात.
बुद्धिमापन चाचणी व अंकगणित –
या विभागामध्ये दहावीच्या स्तरापर्यंतची गणिते आणि बुद्धिमापनविषयक प्रश्न विचारले जातात. यासाठी भरपूर सरावाची आवश्यकता आहे. या विभागावर साधारणपणे १३ ते १५ प्रश्न विचारले जातात.
पेपर सोडविण्याचे तंत्र
परीक्षेच्या दिवशी पेपर सोडविताना आपली खरी कसोटी असते ती म्हणजे एका तासात शंभर प्रश्न सोडविण्याची. प्रश्नपत्रिका सोडविताना सर्व प्रथम आपल्याला अचूक माहिती असणारे प्रश्नच सोडवावेत. अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न पेपर सुरू झाल्यानंतर २० ते २५ मिनिटांनी घ्यावेत जेणेकरून या घटकावर पूर्ण लक्ष देऊन कमी वेळात जास्त प्रश्न सोडविता येतील. यातूनही एखादा प्रश्न अधिक वेळ खाऊ आहे असे वाटल्यास तो प्रश्न सोडून पुढे जावे व सोपे प्रश्न सोडवून अधिकाधिक मार्क कसे मिळविता येतील याकडे लक्ष द्यावे. त्यानंतर उर्वरित इतर घटकांच्या प्रश्नांकडे मोर्चा वळवावा. काही विधानांवर आधारित प्रश्न तर विद्यार्थ्यांकडून क्षुल्लक चुका व्हाव्यात असेच बनविलेले असतात असे प्रश्न हेरून ते सोडविताना विशेष लक्ष ठेवावे लागते. उदा. खालीलपकी अचूक नसलेले कोणते विधान नाही? याचा अर्थ बरोबर विधान ओळखायचे असते परंतु शब्दरचनेतील बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो तेव्हा असे प्रश्न असतील तेव्हा अधिक जागरूक राहून प्रश्न सोडवावा आणि होणाऱ्या क्षुल्लक चुका टाळाव्यात.  विद्यार्थी मित्रहो, एकंदरीतच येत्या १६ तारखेला जय्यत तयारीनिशी आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. परीक्षेसाठी हार्दकि शुभेच्छा!
First Published on July 14, 2017 12:52 am
Web Title: mpsc exam preparation

No comments:

Post a Comment