Tuesday, July 18, 2017

बहि:शाल शिक्षण विद्यापीठाजवळ अभ्यासक्रम, अध्यापक व ग्रंथालय या गोष्टी तयार असतात.

बहि:शाल शिक्षण

विद्यापीठाजवळ अभ्यासक्रम, अध्यापक व ग्रंथालय या गोष्टी तयार असतात.

लोकसत्ता टीम | Updated: July 13, 2017 12:35 AM
0
Shares
शैक्षणिक संस्थांत रीतसर प्रवेश घेऊ  न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना, विशेषत: प्रौढ नागरिकांना, उपलब्ध असणारा आधुनिक शिक्षणाचा प्रकार, मानव्यविद्या, निसर्गविज्ञाने आणि तंत्रविद्या, समाजशास्त्रे, कायदा, वाणिज्य, वैद्यक अशा बहुतेक सर्व विषयांचा अंतर्भाव बहि:शाल शिक्षणात होतो.
  • विद्यापीठाजवळ अभ्यासक्रम, अध्यापक व ग्रंथालय या गोष्टी तयार असतात. त्यांचा लाभ प्रौढ नागरिकांना द्यावा, या उद्देशाने प्रथम हा उपक्रम सुरू झाला.
  • पुढे केवळ बहि:शाल शिक्षणासाठी लागणारे मनुष्यबळ, साधनसामग्री व अभ्यासक्रम यांच्या स्वतंत्र योजना कार्यान्वित करण्यात आल्या.
  • यासाठी विद्यापीठांच्या अध्यापक वर्गाबरोबर बाहेरील शिक्षितांचे अध्यापकवर्ग (अंशकालीन) उपयोगात आणले जातात.
  • प्रौढ वर्गाकरिता स्वतंत्र ग्रंथसंग्रहाची सामग्री पुरवली जाते आणि त्यांना उपयुक्त असे नवनवीन अभ्यासक्रम तयार केले जातात.
  • या कामी सरकारी संस्था, शिक्षण खाते, खासगी संघटना, कामगारसंघ व स्वयंसेवी नागरिक यांचा उपयोग विद्यापीठे करून घेतात.
  • बहि:शाल विद्यार्थी वर्गाचा दर्जा त्या त्या देशातील पूर्वशिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. भारतात अद्याप प्राथमिक शिक्षण न घेतलेले ७०.६५% नागरिक आहेत. माध्यमिक शिक्षणही बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे बहि:शाल शिक्षणाचे विषय व त्याची पातळी सामान्यपणे माध्यमिक दर्जावर ठेवावी लागते.
  • पुणे विद्यापीठाने १९४९ साली बहि:शाल शिक्षणाचा उपक्रम सुरू केला. दिल्ली, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, म्हैसूर इ. विद्यापीठांनी बहि:शाल शिक्षणाचा विभाग सुरू केलेला आहे.
  • महाराष्ट्रात पुणे विद्यापीठाच्या धर्तीवर मराठवाडय़ा व शिवाजी या विद्यापीठांनीही बहि:शाल शिक्षण योजना सुरू केल्या आहेत. मुंबई विद्यापीठातही बहि:शाल विभाग आहे.
  • अधिक माहितीसाठी: बहि:शाल शिक्षण विभाग- दुसरा मजला, आरोग्य केंद्र इमारत, विद्यानगरी, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-४०० ०९८, दूरध्वनी- ०२२२६५४३०११, ०२२२६५३०२६६
First Published on July 13, 2017 12:35 am
Web Title: external education educational institutions

No comments:

Post a Comment