Tuesday, July 18, 2017

करिअरमंत्र किंग व फायनान्स किंवा बँकिंग व इन्शुरन्स या दोन्ही क्षेत्रात समान दर्जाच्या संधी मिळू

करिअरमंत्र

किंग व फायनान्स किंवा बँकिंग व इन्शुरन्स या दोन्ही क्षेत्रात समान दर्जाच्या संधी मिळू

सुरेश वांदिले | Updated: July 14, 2017 12:47 AM
0
Shares

मी टीवाय बी. कॉमची परीक्षा दिली आहे. मला बँकिंग क्षेत्रात रस आहे. बँकिंग आणि फायनान्स किंवा बँकिंग आणि इन्शुरन्स यांपैकी कोणता पर्याय चांगला राहील? मी काही संस्थांची निवड करून ठेवली आहे. पुण्यातील एनआयबीएम ही संस्था कशी आहे
श्रिया नेर्वेकर
श्रिया, तू बँकिंग क्षेत्रात जाण्याचे मनापासून ठरवल्याने तुला या क्षेत्रात निश्चितच यश मिळेल ही खात्री बाळग. बँकिंग व फायनान्स किंवा बँकिंग व इन्शुरन्स या दोन्ही क्षेत्रात समान दर्जाच्या संधी मिळू शकतात. नॅशनल  इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट-एनआयबीएम या संस्थेमार्फत चालविण्यात येणारा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस हा चांगला अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विविध बँकांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते.
मी सध्या दहावीची परीक्षा दिली आहे. मला यूपीएस्सीची परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी मी ११वी-१२वीमध्ये कोणते विषय घेऊ ? त्यासाठी तयारी कशी करू?
ओमकार देशमुख
ओमकार, यूपीएस्सीद्वारे घेण्यात येणाऱ्या नागरीसेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेत ऐच्छिक विषयाचा पेपर असतो. त्याचा अभ्यास आतापासूनच केल्यास ही परीक्षा देताना त्याचा फायदा होऊ  शकतो. त्यामुळे तुला आवड आणि गती असलेल्या विषयांची निवड करू शकतोस. नागरी सेवा परीक्षा देणारे बरेच विद्यार्थी हे कला शाखेतील इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र किंवा भाषा हे विषय निवडतात.
विद्यार्थ्यांचा हा कल पाहता तू सुद्धा कला शाखेतील विषय निवडण्यास हरकत नाही. मात्र या विषयांचा परिपूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे. पदवी परीक्षेच्या पलीकडे जाऊन या अभ्यासक्रमांचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी विषयाच्या मूलभूत संकल्पना स्वयंस्पष्ट व्हायला हव्यात. मूळ दर्जेदार पुस्तके वाचायला हवीत. स्वत:च्या नोट्स काढायला हव्यात. शिवाय संबंधित विषयाच्या अनुषंगाने जे काही आधुनिक प्रवाह, नवे संशोधन, नवी माहिती असेल त्याकडेही लक्ष द्यावे लागेल. यासाठी चौफेर वाचनाची सवय लावावी लागेल. संबंधित विषयाच्या तज्ज्ञाकडून असे साहित्य मिळवावे लागेल.
माझ्या मुलाला वैमानिक व्हायचे आहे. कोणता अभ्यासक्रम केल्यास तो सहजतेने वैमानिक होऊ  शकेल?
विरेन ठेंगे
विरेनजी, सहजतेने वैमानिक होऊ शकेल असा तर अभ्यासक्रम कुठेही उपलब्ध नाही. वैमानिक होण्यासाठी डायरेक्टोरट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन या संस्थेने मान्यता दिलेला अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे. आपल्या देशात काही अधिकृत संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम चालविला जातो. यामध्ये
(१) इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकॅडेमी रायबरेली – http://igrua.gov.in
(२) बॉम्बे फ्लाइंग क्लब – http://www.thebombayflyingclub.com
(३) सिएई ऑक्सफोर्ड एविएशन अ‍ॅकॅडेमी – http://www.caeoaa.com/gondia/
(४) पवन हंस लिमिटेड – http://www.pawanhans.co.in
(५) ओरिएंट फ्लाइट अकॅडेमी – www.orientflights.com
या संस्थांचा समावेश आहे. संबंधित विद्यार्थ्यांने १२वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. तो मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असावा. या अभ्यासक्रमाचे शुल्क साधारणत: ३० ते ४० लाख रुपयांच्या आसपास असते.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.
First Published on July 14, 2017 12:47 am
Web Title: career guidance 28
0
Shares

No comments:

Post a Comment