नोकरीची संधी
मेकॅट्रॉनिक्स अॅप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सुहास पाटील | Updated:
July 8, 2017 3:13 AM
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )
ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये अद्ययावत नवीन टेक्नॉलॉजीसह मेटल, टìनग, मिलग, इलेक्ट्रिकल, ऑटोमेशन, वेल्डग, रोबोटिक्स, न्यूमॅटिक्स, हायड्रोटिक्स, पीएल्सी, इलेक्ट्रॉन्यूमॅटिक्स, इंटर बस, एच्एम्आय्, सीएन्सी, प्रोजेक्ट या विषयांतील बेसिक/अॅडव्हान्सड ट्रेनग दिले जाणार. प्रशिक्षणानंतर एनसीव्हीटी आणि डीआयएचके (एएचके) या परीक्षा द्याव्या लागतील.
पात्रता – २०१६ किंवा २०१७ साली १०वी गणित आणि विज्ञान विषयांत प्रत्येकी किमान ७०% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अजसाठी ६०% गुण).
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ जून २००० नंतरचा असावा. (अजा/अजसाठी उमेदवाराचा जन्म १ जून १९९८नंतरचा असावा.)
निवड पद्धती – अॅप्टिटय़ूड टेस्ट आणि मुलाखत. अॅप्टिटय़ूड टेस्ट २२ आणि २३ जुल, २०१७ रोजी होईल. ठिकाण – वोल्क्स वॅगन अॅकॅडमी, वोल्क्स वॅगन इंडिया प्रा.लि., ई-१, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया फेज- ३, खराब वाडी, ता. खेड, चाकण, पुणे.
ट्रेिनग – जर्मन डय़ुएल सिस्टीम ऑफ वोकेशनल एज्युकेशनप्रमाणे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड दरमहा रु. ७,०००/- (पहिल्या वर्षी), रु. ८,०००/- (दुसऱ्या वर्षी), रु. ९,०००/- (तिसऱ्या वर्षी) दिले जाईल.
उमेदवारांनी आपला सीव्ही/अर्जासह शाळेचा दाखला, वयाचा दाखला, १० वीचे गुणपत्रक जोडून वरील पत्त्यावर अथवा volkswagen.academy@volkswagen.co.in
या ई मेल आयडीवर ८ जुलै २०१७पर्यंत पाठवावे. अर्जाचा नमुना पुढील संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येईल.
http://www.volkswagen.co.in/en/volkswagen_world/mechatronics-apprenticeship-program.html
- नॅशनल सेंटर फॉर अंटाíक्टक अँड ओशन रिसर्च, गोवा येथे पुढील पदांची सरळ मुलाखतीद्वारे भरती.
(२) व्हेहिकल इलेक्ट्रिशियन (२ पदे),
(३) स्टेशन इलेक्ट्रिशियन (२ पदे),
(४) ऑपरेटर (एक्स कॅव्हेरिंग मशीन – डोझर्स/एक्स कॅव्हेटर्स) (१ पद).
पात्रता – हलकी व जड वाहने चालविण्याचा परवाना किमान १ वर्ष २० टनपेक्षा अधिक क्षमतेचा हायड्रोलिक क्रेन चालविण्याचा अनुभव. पद क्र. १ ते ६ साठी वॉक इन इंटरह्यू दि. १९ जुल २०१७
(७) वेल्डर (१ पद)
(८) बॉयलर ऑपरेटर आणि मेकॅनिक/प्लंबर/फिटर (१ पद)
(९) कारपेंटर (१ पद)
(१०) मल्टिटास्किंग स्टाफ.
पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय ४ वर्षांचा अनुभव किंवा संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका २ वर्षांचा अनुभव.
पद क्र. (७) ते (१०) साठी मुलाखतीचा दिवस २० जुल २०१७.
(११) मेल नर्स (२ पदे). पात्रता – जनरल नìसगमधील डिप्लोमा/पदवी.
(१२) लॅब टेक्निशियन – (२ पदे). फिजिकल सायन्सेसमधील पदवी, ४ वर्षांचा अनुभव.
(१३) इन्व्हेंटरी/बुकिंग स्टाफ – (२ पदे). पात्रता – १२वी उत्तीर्ण, कॉम्प्युटर अँड प्रोग्रॅिमग असिस्टंट (सीओपीए)मधील आयटीआय.
(१४) कुक – (५ पदे). पात्रता – हॉटेल मॅनेजमेंट/ कलिनरी आर्टमधील पदवी/पदविका, २ वर्षांचा अनुभव. पद क्र. (११) ते (१४) साठी मुलाखत दि. २१ जुल २०१७.
नोकरीच्या अटी – सुरुवातीला ५ ते १४ महिन्यांसाठी रु. २६,७००/- दरमहा वेतन.
रजिस्ट्रेशन फॉर्म एएल-२००७ ६६६. www.ncaor.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तो व्यवस्थित भरून logistics@ncaor.gov.in या इमेल आयडीवर दिनांक १४ जुलै २०१७ पर्यंत पाठवावा.
संपर्क – दूरध्वनी – (०८३२) २५२५५२३
First Published on July 8, 2017 3:13 am
Web Title: marathi articles on job opportunity
No comments:
Post a Comment