पुढची पायरी : कामाची गुणवत्ता
आपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजे.
डॉ. जयंत पानसे | Updated:
July 29, 2017 1:49 AM
बहुतेक सर्व कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेची चर्चा सुरू होते ती वार्षिक मूल्यमापनाच्या वेळेला किंवा एखाद्या अयशस्वी झालेल्या कामामुळे. कोण कुठे चुकले, त्यामुळे काय झाले, नाहीतर काय झाले असते वगैरे. पण गुणावगुणाबद्दल चर्चा करायच्या या दोन्ही चुकीच्या वेळा आहेत. गुणवत्ता पाळणे ही फक्त एखाद्या वेळी करावयाची गोष्ट नसून ती वर्षभर, नव्हे तर सातत्याने कायमची अंगी बाणवण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे आपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजेआपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजे..
दुर्दैवाने कामात गुणवत्तेची अंमलबजावणी करणे हे माझे काम नाही, वरिष्ठांचे आहे ही अनेकांची भावना असते. तसेच हे काम फक्त उत्पादन खात्याचे आहे; असाही एक गैरसमज असतो. पण प्रत्येक काम, मग ते कार्यालयातील असो वा कारखान्यातील; गुणवत्तेच्या मापदंडाप्रमाणेच झाले पाहिजे हा आग्रह कंपनीतील प्रत्येकानेच धरला तर आपोआपच सर्व कामे उत्कृष्ट पद्धतीने होतील. साहजिकच कंपनीच्या उत्पादकतेतही लक्षणीय वाढ होईल.
गुणवत्तापूर्ण काम म्हणजे काय?
वरिष्ठांनी तुम्हाला गुणवत्ता पालन कसे करावयाचे शिकवले नाही तरी पुढे दिलेल्या पायऱ्यांप्रमाणे अंमलबजावणी केल्यास तुम्हालाही त्याचा लाभ करून घेता येईल.
शेवटी सर्व विभागवार कामांचे संकलन करा व परत एकदा परीक्षण करा, त्रुटी असतील तर सुधारून घ्या. हे काम करताना काय अडचणी आल्या व त्यावर तुम्ही कशी मात केली याचे एक लिखित तयार करा. ते तुम्हाला पुढचे काम हाताळताना उपयोगी पडेल.
प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण करण्याचे हे साधे व सोपे नियम तुम्ही हे दैनंदिन व्यवहारात पाळा. मग पाहा, वर्षभरात तुमच्यामध्ये सगळ्यांच्या डोळ्यात भरणारा सकारात्मक बदल झालेला दिसून येईल. तुमची उत्पादकता वाढेल, आत्मविश्वास दुणावेल. अशी गुणवत्ता अंगी बाणविण्यासाठी “Quality for the first time, every time!” एवढेच लक्षात ठेवा.
dr.jayant.panse@gmail.com

- कामाचा उद्देश लक्षात ठेवून केलेले समर्पक काम
- पहिल्याच प्रयत्नांत केलेले संपूर्ण काम
- अपेक्षित अशाच स्वरूपात व पद्धतीने केलेले, समाधान देणारे काम
- कुठलेही दोष अथवा वैगुण्य नसलेले काम
- मापदंडानुसार केलेले काम
वरिष्ठांनी तुम्हाला गुणवत्ता पालन कसे करावयाचे शिकवले नाही तरी पुढे दिलेल्या पायऱ्यांप्रमाणे अंमलबजावणी केल्यास तुम्हालाही त्याचा लाभ करून घेता येईल.
- प्रथम कामाचे स्वरूप व त्यातून काय निष्पत्ती अपेक्षित आहे हे नीट समजावून घ्या.
- काम किती वेळात पूर्ण करून कुणाकडे अहवाल द्यायचा आहे त्याची माहिती घ्या.
- कामाच्या संदर्भात सहकाऱ्याकडून काही माहिती हवी असल्यास किंवा द्यावी लागणार असल्यास लगेचच सहकाऱ्याशी संवाद साधून माहितीचे स्वरूप व लागणारा वेळ याबद्दल जबाबदारी निश्चित करा.
- काम वेळेत व चांगल्या पद्धतीने पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे योग्य क्षमता, ज्ञान, सामग्री व वेळ आहे याची खातरजमा करा.
- दुर्दैवाने यापैकी काही कमतरता असेल तर नि:संकोचपणे वरिष्ठांकडे ज्ञान/ सामग्री मागा. न मिळाल्यास कामाच्या निष्पत्तीवर या अभावांचा कसा परिणाम होईल ते अभ्यास करून वरिष्ठांना सांगा.
- कामाच्या संदर्भात अगोदरच गुणवत्तेचे काही दृश्य/ अदृश्य मापदंड आहेत का याचा तपास करा. असतील तर त्या मापदंडाप्रमाणे किंवा त्यापेक्षा चांगले काम करावयाचा प्रयत्न करा.
- संपूर्ण कामाचे छोटे विभाग करून त्या विभागानुसार काम पूर्ण करा. ते अधिक चांगले व वेळेत होते असे तुम्हाला अनुभवाला येईल.
- नेहमी कराव्या लागणाऱ्या कामांची प्रतिक्षिप्त क्रिया करा; म्हणजे त्यामध्ये वेगळा विचार करायला न लागल्याने काम नेटके व गतिमान होईल.
शेवटी सर्व विभागवार कामांचे संकलन करा व परत एकदा परीक्षण करा, त्रुटी असतील तर सुधारून घ्या. हे काम करताना काय अडचणी आल्या व त्यावर तुम्ही कशी मात केली याचे एक लिखित तयार करा. ते तुम्हाला पुढचे काम हाताळताना उपयोगी पडेल.
प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण करण्याचे हे साधे व सोपे नियम तुम्ही हे दैनंदिन व्यवहारात पाळा. मग पाहा, वर्षभरात तुमच्यामध्ये सगळ्यांच्या डोळ्यात भरणारा सकारात्मक बदल झालेला दिसून येईल. तुमची उत्पादकता वाढेल, आत्मविश्वास दुणावेल. अशी गुणवत्ता अंगी बाणविण्यासाठी “Quality for the first time, every time!” एवढेच लक्षात ठेवा.
dr.jayant.panse@gmail.com
First Published on July 29, 2017 1:49 am
Web Title: quality of work work issue