Tuesday, June 16, 2015

नवनीत [Print] [Email] कुतूहल - कापसापासून सूतनिर्मिती - भाग ३

नवनीत

कुतूहल - कापसापासून सूतनिर्मिती - भाग ३

thread production from Cotton
Published: Tuesday, June 16, 2015
nav01कापूस पूर्णपणे पिंजून झाल्यावर सलग अशा पेडाच्या आकारात त्याची रचना करणे ही पुढची नसíगक पायरी असते. विपिंजण यंत्रात कापूस पूर्णपणे पिंजून झाल्यावर आणि त्यातील संपूर्ण कचरा काढून टाकल्यावर कापसाच्या तंतूंची रचना ही पेडाच्या आकारात केली जाते. या अखंड आणि सलग पेडास पेळू असे म्हणतात.
खेचण : विपिंजण प्रक्रियेमध्ये तयार होणारा पेळू हा आता सूतकताई प्रक्रियेसाठी वापरला जाण्यासाठी तयार असतो. या पेळूची जाडी त्यापासून कातल्या जाणाऱ्या सुतापेक्षा जवळजवळ २०० ते ५०० पट अधिक असते. त्यामुळे या पेळूची जाडी कमी करून सूतकताई करणे हे पुढचे काम असते; परंतु चांगल्या दर्जाच्या सुतासाठी ज्या गोष्टी पेळूमध्ये आवश्यक असतात त्या वििपजण यंत्रातून निघणाऱ्या पेळूमध्ये नसतात. वििपजण यंत्रातून बाहेर पडणाऱ्या पेळूमध्ये कापसाचे तंतू हे अस्ताव्यस्तपणे रचले गेलेले असतात. याशिवाय वििपजण यंत्रात कापसाचे बहुतांश तंतू हे आकडय़ा (हूक) सारखे वाकडे झालेले असतात. चांगल्या दर्जाचे सूत बनविण्यासाठी पेळूमधील सर्व तंतूंचे आकडे सरळ करून तंतू सरळ करावे लागतात. याशिवाय पेळूमधील तंतूंचा अस्ताव्यस्तपणा काढून सर्व तंतू एकमेकांस आणि पेळूच्या आसास समांतर करावे लागतात.
वििपजण यंत्रातून बाहेर पडणारा पेळू हा त्याच्या संपूर्ण लांबीवर सारख्या जाडीचा असत नाही. त्याच्यामध्ये जाड बारीक असे भाग असतात. अशा पेळूपासून चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या ताकदीचे सूत तयार करता येत नाही. यासाठी हा पेळू सर्व लांबीवर एकसारख्या जाडीचा करावा लागतो.
खेचण प्रक्रियेमध्ये पेळूतील तंतूंचे आकडे काढून त्यांना सरळ करणे, तंतू एकमेकांस आणि पेळूच्या आसास समांतर करणे आणि पेळूची जाडी सर्व ठिकाणी एकसारखी करणे या प्रक्रिया केल्या जातात. यासाठी जे यंत्र वापरले जाते त्याला खेच साचा (ड्रॉ फ्रेम) असे म्हणतात. सहा ते आठ पेळू एकत्रित करून त्याला सहा किंवा आठची खेच दिली जाते. यामुळे पेळू जास्त नियमित स्वरूपाचा होतो.
एकाच टप्प्यात या सर्व क्रिया करणे शक्य असत नाही. यासाठी एकानंतर एक असे दोन खेच साचे वापरले जातात. यातील पहिल्या खेच साच्याला पहिला खेच साचा असे म्हणतात आणि दुसऱ्या साच्याला अंतिम किंवा शेवटचा (फिनिशर) खेच साचा असे म्हणतात.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

No comments:

Post a Comment