Sunday, December 18, 2016

वेगळय़ा वाटा : कार्यक्षेत्राची गरज ओळखा!

वेगळय़ा वाटा : कार्यक्षेत्राची गरज ओळखा!

येणाऱ्या कंपन्यासुद्धा अतिशय काटेकोरपणे आपले भावी कर्मचारी निवडताना दिसतात.

  
नोकरी मिळवण्यासाठी आधी ज्या क्षेत्रात आपणाला काम करायचे आहेत्या क्षेत्राची गरज ओळखावी लागते. शिवाय त्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करायली हवी, हेसुद्धा समजून घ्यावे लागते.
सध्या स्पर्धा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. येणाऱ्या कंपन्यासुद्धा अतिशय काटेकोरपणे आपले भावी कर्मचारी निवडताना दिसतात. अनेकदा कंपन्या केवळ टक्क्याइतकीच विद्यार्थ्यांची निवड करतात. बऱ्याच कंपन्या जवळपास ,००० विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावतात पण त्यातील केवळ ७०७४ विद्यार्थ्यांनाच निवडतात. यातून हेच दिसून येते की या कंपन्यांच्या काही ठोस, ठरीव गरजा आहेत. ती कौशल्ये ज्या विद्यार्थ्यांकडे असतील त्यांनाच ते निवडतात. त्यामुळे कॅम्पस प्लेसमेंटसाठी उत्तम तयारी करणे अत्यावश्यक असते. कोणत्या क्षेत्रासाठी नेमकी काय तयारी करायला हवी, याविषयी..
बँकिंग क्षेत्र
व्यवस्थापनाचे विद्यार्थी कायमच बँकिंगची निवड करतात. बहुतांश बँका, अधिकारी किंवा शिकाऊ उमेदवार अशा पदावर विद्यार्थ्यांची भरती करतात. कारण बँकिंगमध्ये कर्ज, क्रेडिट अप्रायझल, जोखीम व्यवस्थापन, र्मचट बँकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, मोबाइल बँकिंग, इन्शुरन्स, रिलेशनशिप मॅनेजर, ऑडिटर्स, एचआर विभाग अशा अनेक विभागांचा समावेश होतो. बँकांना या सर्व क्षेत्रात काम करू शकणारे आणि फायनान्स, मार्केटिंग, एचआर अँड ऑपरेशन्स यात स्पेशलायझेशन केलेले विद्यार्थी हवे असतात. ज्यांना बँकेच्या क्षेत्रात काम करायचे आहे त्या विद्यार्थ्यांनी, तणावपूर्ण परिस्थितीत काम करण्याची तयारी, वैश्विक दृष्टिकोन, ग्राहककेंद्रित आणि शैक्षणिक दृष्टी हे गुण अंगीकारले पाहिजेत.
बँकांव्यतिरीक्त वित्तीय संस्था
या वित्तीय संस्था बँकेसारख्याच काही सुविधा देतात. परंतु त्यांच्याकडे बँकेसारखा परवाना नसतो. कर्जाऊ रक्कम किंवा क्रेडिट सुविधा देणे, निवृत्तीनंतरचे नियोजन, अंडररायटिंग, मर्जर अ‍ॅक्टिव्हिटीज आदी सुविधा ते देतात. या संस्थांमध्ये कर्ज वाटप, केंद्रीय व्यवहार, वापरलेल्या गाडय़ांची विक्री, उत्पादन अधिकारी, दुचाकींसाठी कर्ज, संपत्तीवर कर्ज आदी विषयांत पदे असू शकतात. या क्षेत्रामध्ये येण्यासाठी उमेदवाराकडे ध्येय, क्षमता, चपळाई, एखादी गोष्ट करून दाखवण्याची धमक असणे आवश्यक आहे. शिवाय विषयाचे सैद्धांतिक ज्ञानही असायला हवे. मुळात या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट हव्यात.


बाजारपेठ संशोधन (मार्केट रिसर्च) –
आपल्या संभाव्य ग्राहकाचा किंवा बाजारपेठेचा अभ्यास यामध्ये केला जातो. व्यावसायिक धोरणांची आखणी करताना या अभ्यासाचा खूप फायदा होतो. बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी कोणतीही संस्था या बाजारपेठ संशोधनसंस्थेचा सल्ला आणि सेवा घेते. यामध्ये तर्कशास्त्र आणि नियोजनपूर्वक अभ्यास केला जातो आणि नव्याने येऊ पाहणाऱ्या उद्योगाला त्याच्या संभाव्य ग्राहकांबद्दल माहिती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना बाजारपेठ संशोधन क्षेत्रात काम करायचे असेल त्यांच्याकडे उच्च दर्जाची विश्लेषण क्षमता असायला हवी. आकडय़ांशी कसरती करणे जमायला हवे. शिवाय संवादकौशल्ये उत्तम हवीत आणि शैक्षणिक दर्जाही चांगला हवा.
कॉमर्स आणि डिजिटल कंपनी
या कंपन्या बहुतांशवेळा ग्राहककेंद्रित असतात. त्यामुळे या कंपन्यांना प्रक्रियेची मांडणी माहिती असलेला विद्यार्थी हवा असतो. त्यांचा दृष्टिकोन ग्राहककेंद्रित असायला हवा. त्यांच्याकडे परिस्थितीतून मार्ग काढण्याचे कौशल्य असायला हवे, शिवाय नेतृत्त्वकौशल्य असले पाहिजे. लोकव्यवस्थापन, कार्यक्षेत्रातील व्यवस्थापन आणि व्यवसाय मदतनीस या मध्ये या कंपन्यांना उमेदवार नेमायचे असतात. ज्यांना डिजिटल विश्वात करिअर घडवायचे आहे, त्यांना नेतृत्वाची क्षमता, आयोजनक्षमता, अहवाल आणि विश्लेषणाचे ज्ञान असायला हवे. जसे आपण आधी पाहिले की, विद्यार्थ्यांला अर्थार्जनाचे पर्याय शोधण्याआधी स्वत:तील क्षमतांचे ज्ञान असायला हवे. तसेच सकारात्मक दृष्टिकोन, विषयातील ज्ञान, व्यवसायातील सैद्धांतिक ज्ञान आणि व्यावहारिक समज, नैतिकता, अद्ययावत राहण्याची प्रवृत्ती आणि हसरे व्यक्तिमत्त्व हेसुद्धा गरजेचे आहे. शिवाय संस्था किंवा क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाहीच.
(लेखिका मुंबई विद्यापीठातील अल्केश दिनेश मोदी, इन्स्टिटय़ूट ऑफ फायनान्शिअल अँड मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेत प्लेसमेंट अधिकारी आहेत.)
वेगळ्या वाटामध्ये पुढच्या आठवडय़ात वाचा कलेतील करिअर विषयी.

Friday, December 16, 2016

एमपीएससी मंत्र : स्पर्धा परीक्षांची डिअर जिंदगी

एमपीएससी मंत्र : स्पर्धा परीक्षांची डिअर जिंदगी

ज्यसेवा परीक्षेच्या तयारीविषयी पुढील काही लेखांत आपण चर्चा करणार आहोत.

  

राज्यसेवा पूर्वपरीक्षा २ एप्रिल २०१७ रोजी प्रस्तावित आहे. राज्यसेवा परीक्षेच्या तयारीविषयी पुढील काही लेखांत आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांविषयी चर्चा आवश्यक आहे. बरेच उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसोबतच एमपीएससी परीक्षांची तयारी करतात. काही जण यापकी एकाच परीक्षेवर फोकस ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर काही उमेदवार एखादी छोटी-मोठी पोस्ट मिळू दे, मग यूपीएससी किंवा राज्यसेवा परीक्षेच्या तयारीबाबत विचार करू असेही नियोजन करतात. काहींचे स्वप्न मोठे, पण त्यासाठीचे प्रयत्न मात्र अत्यंत छोटे असतात. अभ्यासाच्या खोलीत आय.ए.एस./आय.पी.एस.च्या पाटय़ा किंवा चिठ्ठय़ा आणि वेळ मिळाल्यावर बँकिंग/रेल्वेच्या परीक्षांची तयारी, जनरल नॉलेजच्या पुस्तकांचा अभ्यास अशी दिशाहीन जिंदगी जगणारेही अनेक उमेदवार असतात. आपले वय, परीक्षांचे प्रयत्न, कौटुंबिक पाश्र्वभूमी, आपले ध्येय आणि त्यासाठीचे प्रयत्न याचा कसलाही मेळ करिअर नियोजनात नसतो. परिणामी प्रयत्नांचा शेवट मनासारखा नसतो.
केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे सध्याचे प्रारूप, वयाची मर्यादा, परीक्षांची प्रयत्न संख्या याविषयी केंद्र आणि राज्य स्तरावर बराच वैचारिक खल झाला आहे. उमेदवारांनी वयाची पस्तिशी, चाळिशी गाठेपर्यंत त्यांना अधिकारी पदाच्या रेसमध्ये ठेवून संधी उपलब्ध करून देणे कितपत व्यवहार्य आहे किंवा प्रत्येक उमेदवाराला पुरेशी संधी मिळाली पाहिजे, त्याच्या क्षमतांना सिद्ध होण्यासाठी पुरेसा म्हणजे पस्तिशी/चाळिशीपर्यंतचा वेळ लागतोच, तो मिळालाच पाहिजे या भूमिकेत एखाद्या उमेदवाराला वयाच्या पस्तिशी/चाळिशीपर्यंत प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर त्याच्यासाठी ही जिंदगी डिअर कशी राहील याचा विचार आवश्यक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांच्या वयोमर्यादेबाबत बसवान आयोगाने सादर केलेल्या शिफारशी विचाराधीन आहेत.
आयोग परीक्षा घेण्याचे आपले काम चोखपणे बजावतो. आपण परीक्षा देण्याचे आणि त्यासाठी अभ्यास करण्याचे कर्तव्य चोखपणे कसे बजावता येईल हे पाहिले पाहिजे. यशस्वी करिअर घडविण्यासाठी त्याचे नियोजन गांभीर्याने करणे तितकेच महत्त्वाचे आहे. यूपीएससी आणि एमपीएससीच्या मोजक्या एक/दोन परीक्षांशिवाय इतर स्पर्धा परीक्षांची नीटशी माहितीसुद्धा बऱ्याच उमेदवारांना नसते.
जसे नागरी सेवा परीक्षेचा विस्तृत अभ्यासक्रम व्यवस्थित अभ्यासला तर त्या अभ्यासावर इतर अनेक स्पर्धापरीक्षांना सामोरे जाणे सोपे ठरते तसेच राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा ही एमपीएससीच्या परीक्षांसाठी मदर एक्झाम असली पाहिजे, कारण या परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थितपणे अभ्यासल्यास, आयोगाच्या इतर परीक्षांना सामोरे जाणे अवघड ठरत नाही.
उमेदवारांसमोर विविध परीक्षांनिमित्ताने संधीची संख्या वाढते. करिअरची सुरक्षितता वाढते. म्हणून राज्यसेवा परीक्षांसह आयोगाच्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांची व्यवस्थित माहिती घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी राज्याच्या प्रशासकीय सेवांसाठी अधिकारी निवडीची परीक्षा घेतो. प्रशासकीय सेवांमध्ये भरती तसेच त्याबाबत शासनाला सल्ला देण्याचे काम आयोग पार पाडतो. आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध सेवांसाठीच्या स्पर्धा परीक्षा एमपीएससीची परीक्षा याच नावाने ओळखल्या जातात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुढील सेवांकरिता स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येतात.
१. राज्यसेवा परीक्षा
२. महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
३. महाराष्ट्र कृषिसेवा परीक्षा
४. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-अ परीक्षा
५. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-ब परीक्षा
६. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी परीक्षा
७. साहाय्यक मोटारवाहन निरीक्षक
८. साहाय्यक अभियंता (विद्युत) श्रेणी-२,
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब
९. पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
१०. विक्रीकर निरीक्षक परीक्षा
११. साहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षा
१२. लिपिक टंकलेखक परीक्षा

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : ऑक्सफर्डमध्ये शिकण्याची संधी

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : ऑक्सफर्डमध्ये शिकण्याची संधी

जगभरातील वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य व इतर खाद्य उत्पादनांची कमतरता भविष्यात सर्वत्र भासणार आहे.

  

जगद्विख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठातील सर्व विद्याशाखांच्या पदव्युत्तर विभागांकडून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. विकसनशील देशांमधील हुशार व उत्तम शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या अर्जदारांना या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासहित शिष्यवृत्ती मिळते. २०१७-१८ साठी दिल्या जाणाऱ्या या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून ६ जानेवारी २०१७ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल
जगभरातील वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य व इतर खाद्य उत्पादनांची कमतरता भविष्यात सर्वत्र भासणार आहे. त्यामुळेच आजमितीस होणाऱ्या या खाद्य उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन विकसनशील देशांतून वाढीस लागावे व त्यातून भविष्यातल्या वाढत्या लोकसंख्येच्या खाद्य आवश्यकतांची पूर्तता व्हावी या हेतूने लुईस द्रेफस फाऊंडेशन काम करते. गेली अनेक वर्षे ते सातत्याने विकसनशील देशांमधील कृषी व अन्न सुरक्षा या विषयांवर काम करत आहेत. फाऊंडेशनकडून या व अशा अनेक समस्यांचा वेध घेत असतानाच फक्त कृषी व अन्न सुरक्षाच नव्हे तर आरोग्य, पर्यावरण, जल व्यवस्थापन, अर्थशास्त्र, शासकीय योजना, परराष्ट्र योजना या व इतर अनेक विषयांवर अशा प्रकारचे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार व्हावे अशी गरज निर्माण होताना दिसू लागली. भविष्यात या विषयांवर काम करणारे नेतृत्व तयार व्हावे व ऑक्सफर्डमधील घेतलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची व त्यांच्या निश्चित केलेल्या क्षेत्राची योग्य सांगड घालता यावी अशा प्रयोजनाने लुईस द्रेफस फाऊंडेशनने ही शिष्यवृत्ती ‘लुईस द्रेफस-वेनफेल्ड शिष्यवृत्ती’ या नावाने सुरू केली आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे संपूर्ण शिक्षण शुल्क विद्यापीठाकडून दिले जाणार आहे. त्याशिवाय शिष्यवृत्तीधारकाला भोजन, निवास व इतर आवश्यक खर्चासाठी मासिक वेतनाच्या स्वरूपात निधी देण्यात येणार आहे. ही आर्थिक मदत त्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी त्याला बहाल केली जाणार आहे.
आवश्यक अर्हता
ही शिष्यवृत्ती विकसनशील देशांतील सर्व अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील संशोधन किंवा तत्सम कोणताही अनुभव असेल, तर त्याला प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराने ते त्याच्या संशोधनाचे किंवा अनुभवाचे प्रशस्तिपत्र जोडावे. अर्जदाराची पदवी स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. भारतातील अर्जदारांनी टोफेल किंवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. अर्जदाराने त्याला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्जदाराकडे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर मायदेशात परत येऊन निवडलेल्या क्षेत्रामध्ये दीर्घकाळ काम करण्याची योजना तयार असावी, ही फाऊंडेशनच्या आवश्यक अर्हतांपैकी एक प्रमुख अर्हता आहे.
अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकच अर्ज असल्याने अर्जदाराने त्याचा अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून जमा करावा. अर्ज जमा करताना त्याबरोबर अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल व या शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड का व्हावी याबद्दल माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., त्याने केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन अहवाल, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या तीन प्राध्यापकांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयईएलटीएस या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठास कळवावेत. अर्जदार संशोधनाच्या विषयाबद्दल किंवा संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी त्याचा अर्ज जमा करण्यापूर्वी विद्यापीठातील संबंधित विभागातील किंवा विषयातील प्राध्यापकांना ई-मेलद्वारे संपर्क करू शकतो. अर्जासह अर्जदाराने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेली एक प्रश्नावली सोडवून त्याच्या उत्तरांसहित जमा करावी.
  • निवड प्रक्रिया :
फक्त अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना मे २०१७ पर्यंत कळवण्यात येईल.
  • अंतिम मुदत:-
या शिष्यवृत्तीसाठी पूर्ण झालेले अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत ६ जानेवारी २०१७ ही आहे.
  • महत्त्वाचा दुवा :- ox.ac.uk
itsprathamesh@gmail.com

वेगळय़ा वाटा : कार्यक्षेत्राची गरज ओळखा!

वेगळय़ा वाटा : कार्यक्षेत्राची गरज ओळखा!

येणाऱ्या कंपन्यासुद्धा अतिशय काटेकोरपणे आपले भावी कर्मचारी निवडताना दिसतात.

  

नोकरी मिळवण्यासाठी आधी ज्या क्षेत्रात आपणाला काम करायचे आहेत्या क्षेत्राची गरज ओळखावी लागते. शिवाय त्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करायली हवी, हेसुद्धा समजून घ्यावे लागते.
सध्या स्पर्धा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. येणाऱ्या कंपन्यासुद्धा अतिशय काटेकोरपणे आपले भावी कर्मचारी निवडताना दिसतात. अनेकदा कंपन्या केवळ टक्क्याइतकीच विद्यार्थ्यांची निवड करतात. बऱ्याच कंपन्या जवळपास ,००० विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावतात पण त्यातील केवळ ७०७४ विद्यार्थ्यांनाच निवडतात. यातून हेच दिसून येते की या कंपन्यांच्या काही ठोस, ठरीव गरजा आहेत. ती कौशल्ये ज्या विद्यार्थ्यांकडे असतील त्यांनाच ते निवडतात. त्यामुळे कॅम्पस प्लेसमेंटसाठी उत्तम तयारी करणे अत्यावश्यक असते. कोणत्या क्षेत्रासाठी नेमकी काय तयारी करायला हवी, याविषयी..
बँकिंग क्षेत्र
व्यवस्थापनाचे विद्यार्थी कायमच बँकिंगची निवड करतात. बहुतांश बँका, अधिकारी किंवा शिकाऊ उमेदवार अशा पदावर विद्यार्थ्यांची भरती करतात. कारण बँकिंगमध्ये कर्ज, क्रेडिट अप्रायझल, जोखीम व्यवस्थापन, र्मचट बँकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, मोबाइल बँकिंग, इन्शुरन्स, रिलेशनशिप मॅनेजर, ऑडिटर्स, एचआर विभाग अशा अनेक विभागांचा समावेश होतो. बँकांना या सर्व क्षेत्रात काम करू शकणारे आणि फायनान्स, मार्केटिंग, एचआर अँड ऑपरेशन्स यात स्पेशलायझेशन केलेले विद्यार्थी हवे असतात. ज्यांना बँकेच्या क्षेत्रात काम करायचे आहे त्या विद्यार्थ्यांनी, तणावपूर्ण परिस्थितीत काम करण्याची तयारी, वैश्विक दृष्टिकोन, ग्राहककेंद्रित आणि शैक्षणिक दृष्टी हे गुण अंगीकारले पाहिजेत.
बँकांव्यतिरीक्त वित्तीय संस्था
या वित्तीय संस्था बँकेसारख्याच काही सुविधा देतात. परंतु त्यांच्याकडे बँकेसारखा परवाना नसतो. कर्जाऊ रक्कम किंवा क्रेडिट सुविधा देणे, निवृत्तीनंतरचे नियोजन, अंडररायटिंग, मर्जर अ‍ॅक्टिव्हिटीज आदी सुविधा ते देतात. या संस्थांमध्ये कर्ज वाटप, केंद्रीय व्यवहार, वापरलेल्या गाडय़ांची विक्री, उत्पादन अधिकारी, दुचाकींसाठी कर्ज, संपत्तीवर कर्ज आदी विषयांत पदे असू शकतात. या क्षेत्रामध्ये येण्यासाठी उमेदवाराकडे ध्येय, क्षमता, चपळाई, एखादी गोष्ट करून दाखवण्याची धमक असणे आवश्यक आहे. शिवाय विषयाचे सैद्धांतिक ज्ञानही असायला हवे. मुळात या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट हव्यात.

बाजारपेठ संशोधन (मार्केट रिसर्च) –
आपल्या संभाव्य ग्राहकाचा किंवा बाजारपेठेचा अभ्यास यामध्ये केला जातो. व्यावसायिक धोरणांची आखणी करताना या अभ्यासाचा खूप फायदा होतो. बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी कोणतीही संस्था या बाजारपेठ संशोधनसंस्थेचा सल्ला आणि सेवा घेते. यामध्ये तर्कशास्त्र आणि नियोजनपूर्वक अभ्यास केला जातो आणि नव्याने येऊ पाहणाऱ्या उद्योगाला त्याच्या संभाव्य ग्राहकांबद्दल माहिती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना बाजारपेठ संशोधन क्षेत्रात काम करायचे असेल त्यांच्याकडे उच्च दर्जाची विश्लेषण क्षमता असायला हवी. आकडय़ांशी कसरती करणे जमायला हवे. शिवाय संवादकौशल्ये उत्तम हवीत आणि शैक्षणिक दर्जाही चांगला हवा.
कॉमर्स आणि डिजिटल कंपनी
या कंपन्या बहुतांशवेळा ग्राहककेंद्रित असतात. त्यामुळे या कंपन्यांना प्रक्रियेची मांडणी माहिती असलेला विद्यार्थी हवा असतो. त्यांचा दृष्टिकोन ग्राहककेंद्रित असायला हवा. त्यांच्याकडे परिस्थितीतून मार्ग काढण्याचे कौशल्य असायला हवे, शिवाय नेतृत्त्वकौशल्य असले पाहिजे. लोकव्यवस्थापन, कार्यक्षेत्रातील व्यवस्थापन आणि व्यवसाय मदतनीस या मध्ये या कंपन्यांना उमेदवार नेमायचे असतात. ज्यांना डिजिटल विश्वात करिअर घडवायचे आहे, त्यांना नेतृत्वाची क्षमता, आयोजनक्षमता, अहवाल आणि विश्लेषणाचे ज्ञान असायला हवे. जसे आपण आधी पाहिले की, विद्यार्थ्यांला अर्थार्जनाचे पर्याय शोधण्याआधी स्वत:तील क्षमतांचे ज्ञान असायला हवे. तसेच सकारात्मक दृष्टिकोन, विषयातील ज्ञान, व्यवसायातील सैद्धांतिक ज्ञान आणि व्यावहारिक समज, नैतिकता, अद्ययावत राहण्याची प्रवृत्ती आणि हसरे व्यक्तिमत्त्व हेसुद्धा गरजेचे आहे. शिवाय संस्था किंवा क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाहीच.
(लेखिका मुंबई विद्यापीठातील अल्केश दिनेश मोदी, इन्स्टिटय़ूट ऑफ फायनान्शिअल अँड मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेत प्लेसमेंट अधिकारी आहेत.)
वेगळ्या वाटामध्ये पुढच्या आठवडय़ात वाचा कलेतील करिअर विषयी.

Wednesday, December 14, 2016

वेगळय़ा वाटा : मुलाखतीचा मंत्र

वेगळय़ा वाटा : मुलाखतीचा मंत्र

कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळवण्याचे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते.

  

कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळवण्याचे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. आजकाल ई कॉमर्स, बिझनेस कन्सल्टिंग, सोशल रीसर्च अशा अनेक नव्या क्षेत्रांचा कॅम्पस प्लेसमेंटमध्ये समावेश झालेला असल्याने कॅम्पस प्लेसमेंटच्या पद्धतीतही काही बदल झालेला आहे. केसस्टडी, तणावपूर्ण परिस्थितीतील वर्तन,


प्रोजेक्टवर आधारित
सादरीकरण आदी मुद्दय़ांचा वापर करतात. काहीवेळा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखती घेतल्या जातात. ज्यांचा अनुभव प्रत्यक्ष मुलाखतीपेक्षा बराच वेगळा असतो. त्यामुळेच मुलाखतीसंदर्भात काही खास टिप्स आज देत आहे.
*  कंपनीची माहिती घ्या
ज्या कंपनीसाठी आपण मुलाखत द्यायला जात आहोत, त्याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असायला हवी. यासाठी कंपनीचे संकेतस्थळ, लिंक्डइन पेज आणि त्यांच्या व्यावसायिक गरजा समजून घ्यायला हव्यात. प्रत्येक संस्थेसाठी आवश्यक अशी काही कौशल्ये असतात, उमेदवारांनी त्याचा अभ्यास करायला हवा.
*  नवीन गोष्टी शिका
आपल्या करिअरची आखणी आपणच करायला हवी. सर्वप्रथम आपल्याला ज्या क्षेत्रात रस आहे, त्या क्षेत्राचा शोध घ्या. ते ठरल्यावर त्यातील कौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी काही अभ्यासक्रम आहेत का, याची चाचपणी करा. तसे असल्यास त्यातील नेमके कोणते करायचे हे ठरवा आणि करा. अशा अल्पकाळाच्या अभ्यासक्रमांचाही खूप फायदा होऊ शकतो. मुलाखतीत या अभ्यासक्रमांची माहिती द्या आणि त्याविषयी पुरेशा ज्ञानाने बोला.
*  उत्तरांची तयारी करा
मुलाखतीदरम्यान काही हमखास विचारलेले प्रश्न असतात, त्याची प्रभावी उत्तरे कशी द्यावीत, याची तयारी करा. म्हणजे स्वत:बद्दल सांगा किंवा तुम्ही अमुक विषयातच का स्पेशलायझेशन केले? किंवा उन्हाळी सुट्टीत केलेल्या इंटर्नशिपमधून काय शिकलात? अशा प्रकारच्या प्रश्नांना नेमकी कशा प्रकारे उत्तरे द्यायची ते ठरवून ठेवा. यासाठी आपल्या शिक्षकांची, प्लेसमेंट अधिकाऱ्यांची आणि माजी विद्यार्थ्यांचीही मदत घेता येईल.
*  पेहराव
ज्याप्रमाणे आधीच्या लेखात सांगितले, त्याप्रमाणे उगाच ढगळ किंवा अनौपचारिक समारंभाना घालायचे कपडे घालून जाऊ नका. व्यवस्थित नीटनेटके जा.
*  आत्मविश्वास हवा, अतिविश्वास नको
काही विद्यार्थी अतिशय हुशार असूनही मुलाखतीदरम्यान स्वत:ला योग्य पद्धतीने सादर करू शकत नाहीत. ‘मी उत्तम आहे, मला सर्व माहिती आहे’, असा दृष्टिकोन बाळगणे काही वाईट नाही; पण नम्रपणे आपली गुणवत्ता सिद्ध केलीत तर त्याची जास्त वाहवा होते.
*  आवडीही असतात महत्त्वाच्या आपल्या आवडीच्या विषयांवर आवर्जून बोला. मग ते अभ्यासातील असोत किंवा इतर. यातून मुलाखतकाराला तुमच्याबद्दल जास्त जाणून घेता येते. तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल किती आवड आहे, रस आहे ते समजते.
*  शांत राहा. 
जर तुम्ही मुलाखत मंडळाच्या अपेक्षांवर खरे उतरला नाहीत, तर फार वाईट वाटण्याची किंवा अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. शांत राहा. मुख्य म्हणजे कधीही खोटे बोलू नका. स्वत:ला कोसू नका. अपयशातून शिका आणि बाहेर पडा.
*  नेमके बोला
काही विद्यार्थी उत्साहाच्या भरात फार बोलतात. त्यामुळे ते अनेकदा नको असलेली माहितीही देतात. त्यापेक्षा आधी प्रश्न ऐकून घ्या, मग विचार करूनच त्याचे उत्तर द्या. प्रश्नाला त्वरित उत्तर देण्यापेक्षा योग्य उत्तर अपेक्षित असते. आपल्या उत्तराला पुराव्यांचा आधार द्या. नेमक्या शब्दांत आपले म्हणणे मांडा.
*  बायोडेटा
प्रत्येक कंपनीनुसार आपल्या बायोडेटामध्ये थोडा फेरफार करा. म्हणजे माहिती खरीच असायला हवी. पण त्याची मांडणी बदला. एखाद्या कंपनीतील नोकरीसाठी काही विशिष्ट कौशल्ये गरजेची असतील आणि तुमच्याकडे ती असतील तर ती अधोरेखीत करा. प्रत्येक कंपनीच्या गरजेनुसार बायोडेटामधील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखीत करा. यामुळे समोरच्यावर तुमचा चांगला प्रभाव पडतो. मुलाखत घेणाऱ्यांनाही ते पाहून आपल्याबद्दल माहिती मिळवणे सोयीचे जाते.

यूपीएससीची तयारी : पॅरिस हवामान बदल करार

यूपीएससीची तयारी : पॅरिस हवामान बदल करार

जपानमध्ये क्योटो येथे भरलेल्या सीओपी-३ मध्ये क्योटो नियमावली अमलात आली.

  

 

हवामान बदलाशी लढा देण्यासाठी पहिल्या जागतिक करारावर सुमारे दोनशे देशांनी १३ डिसेंबर २०१५ रोजी सही केली. हरितगृहवायू प्रदूषण नष्ट करण्यासाठी सामूहिकरीत्या प्रयत्न करण्याचे आवाहन सर्व देशांना या कराराद्वारे करण्यात आले. २१००पर्यंत जागतिक तापमान आणखी एका अंशाने वाढू नये यासाठी पॅरिस करार करण्यात आला आहे.


जपानमध्ये क्योटो येथे भरलेल्या सीओपी-३ मध्ये क्योटो नियमावली अमलात आली. यामध्ये ठरलेल्या प्रमाणात हरितवायू उत्सर्जन कमी करण्याचे आंतरराष्ट्रीय बंधन श्रीमंत व औद्योगिकीकरण झालेल्या देशांवर घालण्यात आले. अशा प्रकारचा करार सीओपी-१५ कोपनहेगन येथे करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो अयशस्वी ठरला. शेवटी सर्व देशांनी हवामान बदलासंबंधीचा जागतिक करार २०१५ साली पॅरिस इथे होणाऱ्या सीओपीमध्ये करायचा निर्णय घेण्यात आला. ‘सीओपी-२१’ परिषदेत उपस्थित ९५ देशांनी या कराराला मान्यता दिली. जागतिक तापमानवाढ या शतकामध्ये दोन अंश सेल्सिअसपेक्षा खाली ठेवणे हे या जागतिक कराराचे मुख्य ध्येय आहे आणि त्यासोबत औद्योगिकपूर्व काळातील पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसहून अधिक तापमानवाढ होणार नाही अशी मर्यादा येण्यासाठी प्रयत्न करणे या करारात अपेक्षित आहे. २०२० पासून विकसित देशांनी दरवर्षी शंभर अब्ज अमेरिकी डॉलर विकसनशील देशांच्या मदतीसाठी खर्च करण्याचे मान्य केले आहे. मानवी कृतीमुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंचे प्रमाण झाडे, माती व समुद्र यांना हा वायू नसíगकरीत्या सामावून घेता येईल, इतक्याच मर्यादेत ठेवण्याचे अभिवचन संबंधित देशांनी या कराराद्वारे दिले आहे. २०१५ ते २१०० पर्यंत हा टप्पा गाठायचा आहे. या करारावर जागतिक उत्सर्जनातील ५५% वाटा असणाऱ्या किमान ५५ देशांनी या करारावर शिक्कामोर्तब करणे आवश्यक होते. ४ नोव्हेंबर २०१६ ला ५६% वैश्विक ग्रीनहाउस गॅस उत्सर्जनासाठी जबाबदार असणाऱ्या ७२ देशांनी या कराराला अनुमोदन दिले व पॅरिस करार अमलात आला आहे. तत्पूर्वी २ ऑक्टोबर २०१६ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या पाश्र्वभूमीवर भारताने या कराराला अनुमोदन दिले होते.
या कराराला पर्यावरणवादी व तज्ज्ञांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे, कारण उत्सर्जन कमी करण्यासाठी विकसित देशांसमोर काहीही महत्त्वपूर्ण लक्ष्ये ठेवण्यात आलेली नाहीत. तापमानाच्या लक्ष्यासंदर्भात आयपीसीसीने सूचित केलेली ‘जागतिक कार्बन बजेट’ ही संकल्पना या करारामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्षिण्यात आली आहे. दोन अंश सेल्सिअस किंवा १.५ अंश सेल्सिअस असे लक्ष्य समोर ठेवताना या करारामध्ये विकसित देशांना त्यांच्या इच्छेनुसार उत्सर्जन कपात करण्याची मुभा दिली आहे. या प्रक्रियेमध्ये ऐतिहासिक जबाबदारीचा मुद्दा बाजूला सारण्यात आला आहे. या करारामध्ये विशिष्ट स्वरूपामध्ये समानतेचे तत्त्व उपयोजनात आलेले नाही. सर्वात धोकादायक स्थानी असलेल्या लहान बेटस्वरूपी देशांना या करारामध्ये आश्वासने दिली आहेत, परंतु त्यांच्या पूर्ततेची ग्वाही देण्यात आलेली नाही. पॅरिस करार व संबंधित निर्णय अनेक गोष्टी भविष्यावर सोडून देणारे आहेत.
समानता व सीबीडीआर (समान पण विभाजित जबाबदारी) यासंबंधी कराराच्या मसुद्यात अनेक ठिकाणी स्पष्ट भाषा वापरण्यात आली आहे, हे काही अंशी विकसनशील देशांचे यश म्हणता येईल. पॅरिस परिषदेपूर्वी हे दोन्ही घटक मसुद्यात नव्हते. उपशमन, तडजोड, वित्तपुरवठा, तंत्रज्ञान हस्तांतरण, विकसनशील देशांच्या क्षमताविकासासाठी सहकार्य या मुद्दय़ांवर करण्यात आलेल्या विभाजनालाही यश मानता येईल.
भारताच्या दृष्टीने पॅरिस करारातील विकसनशील देशांसाठीची ‘विभागणी’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. उपशमन, तडजोड व सहकार्य अशा हवामानविषयक कृतीच्या विविध मुद्दय़ांवर विभाजनाची ही तरतूद लागू पडणार आहे.
अलीकडे मार्राकेश, मोरक्को येथे ७-१८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान सीओपी-२२, क्योटो प्रोटोकॉलसाठी पक्षांची बठक (MOP) म्हणून कार्य करणारे सीओपीचे १२ वे सत्र (CMP12)आणि पॅरिस करारासाठी एमओपी म्हणून कार्य करणारे सीमए १ हे सत्र पार पडले. हवामान बदल व जागतिक तापमान वाढ याबाबत उपाययोजना व या मुद्दय़ाप्रति प्रत्येक राष्ट्राची बांधिलकी यावर सीओपी-२२ परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली.
या वेळी सर्व सहभागी राष्ट्रांकडून हवामान आणि शाश्वत विकासासाठीचा नवा अध्याय म्हणवला जाणारा ‘मार्राकेश कृती जाहीरनामा’ जारी करण्यात आला. या जाहीरनाम्यामुळे हवामान बदलावरील पॅरिस करारासाठी जागतिक समर्थन प्राप्त झाले व पॅरिस कराराची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी त्यांच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. या परिषदेमध्ये सर्व राष्ट्रांना सुधारित क्षमता आणि तंत्रज्ञान यासोबत हवामान प्रकल्पासाठी वाढीव स्वरूपात आíथक योगदान देण्यासाठी सुचविले गेले. तसेच विकसित राष्ट्रांनी त्यांचे १००अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचे योगदान देण्याचे ध्येय पुन्हा एकदा मान्य केले.

Friday, December 9, 2016

वेगळय़ा वाटा : क्रीडा समालोचनाची कला

वेगळय़ा वाटा : क्रीडा समालोचनाची कला

दूरचित्रवाणी किंवा आकाशवाणीसाठी समालोचनाबरोबरच टेक्स्ट कॉमेंट्री हा नवा प्रकार रूढ होतो आहे.

  

समालोचन ही वर्णन कला आहे. मैदानावर किंवा बंदिस्त वातावरणात होणाऱ्या खेळाचे बारकावे फक्त आवाजाच्या वा मजकुराच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवणे हे कौशल्याचे काम आहे.  हे काम सोपे वाटू शकते पण प्रत्यक्षात ते अत्यंत कठीण आहे. खेळवाहिन्या किंवा खेळविषयक संकेतस्थळांना मोठा जनाधार आहे. मैदानावर घडणाऱ्या घडामोडींचे वर्णन आणि त्या विश्लेषण अशी दुहेरी जबाबदारी समालोचकावर असते. दूरचित्रवाणी किंवा आकाशवाणीसाठी समालोचनाबरोबरच टेक्स्ट कॉमेंट्री हा नवा प्रकार रूढ होतो आहे.
खेळाडू कारकीर्दीत यशोशिखर गाठतात. त्याचप्रमाणे त्यांच्या या कामगिरीच्या यथोचित वर्णनाची जबाबदारी समालोचकाची असते. त्यामुळे खेळाडू लोकप्रिय होण्यात समालोचकाचा सिंहाचा वाटा असतो. घरी टीव्हीवर पाहणाऱ्या किंवा कामात व्यस्त असणाऱ्या, प्रवासात असणाऱ्या चाहत्यांसाठी समालोचक हा दूत असतो. स्टेडियममध्ये बसून आपणच खेळ पाहतोय अशी अनुभूती चाहत्याला देणे समालोचकाचे आद्य कर्तव्य आहे.
खेळाडूंप्रमाणे समालोचकाची वर्णनाची, शब्दभांडाराची स्वत:ची शैली असते. आवाजाचे चढउतार आणि ओघवते हुबेहूब प्रवाही वर्णन यासाठी क्रिकेट समालोचक टोनी ग्रेग यांची ख्याती होती. प्रत्येक खेळात असे दर्दी समालोचक आहेत. भारतालाही दर्जेदार क्रीडा समालोचकांचा वारसा लाभला आहे.
*   कौशल्ये
*  समालोचन करण्यासाठी विशिष्ट खेळाची प्रचंड आवड असावी लागते. ती मारून मुटकून नव्हे तर मुळातून असावी लागते. खेळाप्रति निस्सीम भावना व्हावी. खेळातल्या घडामोडींशी तादात्म्य पावणे अत्यंत आवश्यक आहे. अशी एकाग्रता खेळाच्या प्रचंड आवडीतून निर्माण होऊ शकते.
*  सातत्याने प्रवाही बोलणे हे अवघड काम आहे. खेळताना समोर घडणाऱ्या गोष्टींचे आकलन होऊन त्याचे विविधांगी आकलन होणे आणि त्याचे कंगोरे चाहत्यांपर्यंत नेणे हे आव्हानात्मक आहे. अखंडित बोलायचे असल्याने पाठ करून बोलू, काहीतरी समोर ठेवून बोलू असे होऊ शकत नाही. समालोचकाला प्रसंगावधानी असावे लागते.
*  घटना एकच असली तरी खेळाचे नियम, आकडेवारी, खेळाडूंची कारकीर्द आणि वैैयक्तिक आयुष्य, आवडीनिवडी, मैदाने आणि शहराविषयी माहिती, समोर घडणाऱ्या घटनेच्या इतिहासाचे संदर्भ हे सगळे समालोचकाला ओघवत्या शैलीत मांडायचे असते. या मांडणीत जिवंतपणा हवा. ते यांत्रिक न वाटता उत्स्फूर्त हवे. यासाठी खेळ आणि त्याच्याशी संलग्न गोष्टींचा दांडगा अभ्यास हवा. तो अभ्यास योग्य वेळी मांडता येण्यासाठी स्मरणशक्ती चोख हवी.
*  दिवसेंदिवस खेळातले नियम जटिल होत आहेत. प्रत्येक खेळात अनेकविध नवीन गोष्टी येत आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग वाढतो आहे. या बदलांची अद्ययावत माहिती समालोचकाला करून घेणे अत्यावश्यक असते.
*  स्थळकाळाचे भान ठेवून बोलणे नितांत गरजेचे असते. प्रत्येक ठिकाणाची सामाजिक परिस्थिती भिन्न असते. शहराचे, राज्याचे, देशाचे कायदेकानून आणि अलिखित संकेत पाळूनच समालोचकाने बोलावे. यासाठी सभोवातालची जाण हवी आणि कॉमन सेन्स आवश्यक.
*  समालोचकाला तटस्थ राहणे गरजेचे असते. कारण तरच तो चाहत्यांसमोर सम्यक वर्णन करू शकतो. समालोचकाला वैयक्तिक आवडनिवड बाजूला सारून काम करणे आवश्यक असते. आवडीनिवडी, पूर्वग्रह यांचा कामात अडसर येता कामा नये.
*  लोकांपर्यंत पोहचण्यासाठी वाणी स्वच्छ हवी. खेळाडूंच्या नावांचे उच्चार समजून घेणे अत्यावश्यक असते. कारण प्रसारण लाखो घरांपर्यंत जात असते. एक चूक लाखो ठिकाणी जाऊ शकते. यासाठी बोलतोय त्या विषयाबाबत अचूकता बाळगणे अनिवार्य आहे. समालोचकासाठी आवाज हेच प्रमुख अस्त्र असते. तो जपण्यासाठी आपल्या शरीरप्रकृतीनुसार योग्य ती काळजी घेणे अनिवार्य आहे. टेक्स्ट कॉमेंट्रीसाठी संगणकाचं अद्ययावत ज्ञान आणि टायपिंगचा स्पीड उत्तम असणे अनिवार्य आहे.
*  पात्रता
समालोचक होण्यासाठी विशिष्ट शाखेचा पदवीधर असावा अशी अट नाही. परंतु पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम पूर्ण केलेला असल्यास उपयुक्त ठरू शकतो. फक्त समालोचन शिकवणारे अभ्यासक्रम अत्यंत मर्यादित आहेत. बहुसंख्य क्रीडा वाहिन्यांवर माजी खेळाडूंचीच समालोचक म्हणून निवड होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किंवा प्रथम श्रेणी पातळीवर प्रतिनिधित्व केलेले असणे समालोचक होण्यासाठी जमेची बाजू असते.
*  अभ्यासक्रम
शहीद भगतसिंग कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, फरीदाबाद. एमआयटी जनसंवाद, लातूर. एमआयटी इंटरनॅशनल, पुणे.
*   मानधन
समालोचनासाठी ठोस असे मानधन नसते. मात्र क्रीडावाहिन्यांवर समालोचक म्हणून कार्यरत माजी खेळाडूंना प्रतिदिवस २५,००० ते ५०,००० मानधन मिळते. नवीन उमेदवारांना प्रतिदिवस ५,००० रुपये मानधन मिळू शकते.