Tuesday, July 18, 2017

यूपीएससीची तयारी : भारतीय वारसा आणि संस्कृती-२

यूपीएससीची तयारी : भारतीय वारसा आणि संस्कृती-२

भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकाची एकूण दोन लेखांमध्ये माहिती घेणार आहोत.

श्रीकांत जाधव | Updated: July 13, 2017 12:36 AM
1
Shares

आपण भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकाची एकूण दोन लेखांमध्ये माहिती घेणार आहोत. आजच्या  लेखामध्ये यामधील भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला या मुद्याविषयी सर्वागीण आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम आपण २०१३ ते २०१६मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची माहिती घेणार आहोत. या घटकावर एकूण चार प्रश्न विचारले गेलेले आहेत (२०१३ मध्ये १ प्रश्न, २०१४ मध्ये २ प्रश्न आणि २०१६ मध्ये १ प्रश्न) हे प्रश्न खालीलप्रमाणे होते.
  • मंदिर स्थापत्यकलेमध्ये चोल स्थापत्यकला उच्च विकास दर्शविते. – चर्चा करा.
  • सिंधू संस्कृतीमधील नगर नियोजन आणि संस्कृतीने वर्तमान स्थितीमधील नागरीकरणामध्ये किती योगदान दिलेले आहे. – चर्चा करा.
  • गांधार शिल्पकला जशी ग्रीकांची ऋणी लागते तसेच रोमन यांचीही लागते. – स्पष्ट करा.
  • सुरुवातीची बौद्ध स्तूपकला, लोकांची तत्व आणि कथानकाबरोबरच बौद्ध आदर्शाची यशस्वीरीत्या व्याख्या करते. – स्पष्टीकरण द्या.
उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर विचारण्यात आलेले आहेत. आणि या प्रश्नाची उकल करताना दोन महत्वपूर्ण पलूंचा विचार करणे गरजेचे आहे. यातील पहिला पलू हा भारतातील स्थापत्य कला आणि शिल्पकला याचा इतिहास आणि दुसरा पलू म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन कालखंडामध्ये या कलांचा विकासमध्ये झालेली प्रगती. भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांच्या इतिहासाची सुरुवात प्रागतिहासिक कालखंडापासून सुरु होते ज्यामुळे या कलांची सुरुवात नेमकी कशी व कोठून झालेली आहे याची माहिती आपणाला मिळते. पण या घटकावर साधारणत: सिंधू संस्कृतीपासून प्रश्न विचारले जातात त्यामुळे या मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करताना आपणाला सिंधू संस्कृतीपासून सुरुवात करावी लागते तसेच वैदिक कालखंडामध्ये या कलांची माहिती प्राप्त होत नाही. यातील सिंधू संस्कृतीचे पुरातत्वीय अवशेषांद्वारे स्थापत्यकला आणि शिल्पकला यामध्ये झालेल्या प्रगतीचा इतिहास पहावयास मिळतो आणि इ.स. पूर्व सहाव्या शतकापासून या कलांचा इतिहास अखंडितपणे पाहवयास मिळतो, ज्याची माहिती आपणाला तत्कालीन अवशेष आणि साहित्याद्वारे समजावून घेता येऊ शकतो.
उपरोक्त विचारले गेलेले प्रश्न हे प्राचीन भारत आणि सुरुवातीचा मध्ययुगीन भारत या कालखंडाशी संबंधित आहेत. प्राचीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर बौद्ध धर्माचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो आणि प्राचीन भारतात सर्वाधिक बौद्ध धर्माशी संबंधित स्थापत्यकला आणि शिल्पकला याची निर्मिती झालेली दिसून येते कारण मौर्य कालखंडापासून बौद्ध धर्माला राजाश्रय मिळालेला होता पण याच्या जोडीला जैन आणि हिंदू धर्माशी संबंधित स्थापत्यकला आणि शिल्पकला याचीही निर्मिती करण्यात आलेली होती. हिंदू धर्माशी संबंधित मंदिर शैलीचे नागर आणि द्राविड असे दोन प्रकार आहेत जे प्राचीन कालखंडापासून अस्तिवात आहेत. यातील नागर शैली ही प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये येते आणि द्राविड शैली ही दक्षिण भारतामध्ये येते आणि या दोन शैलीमधील काही वैशिष्टय़ घेऊन वेसर शैली तयार झालेली आहे, जी प्रामुख्याने मध्य भारतात वापरली जाते. साधारणता गुप्त कालखंडापासून िहदु धर्माशी संबंधित मंदिर शैलीच्या इतिहासाची सुरुवात झालेली दिसून येते. त्यापुढील काळामध्ये त्यात झालेला विकास याची आपणाला कालखंडनिहाय माहिती प्राप्त करावी लागते उदा – गुप्त कालखंड, गुप्तोत्तर कालखंड, सुरुवातीचा मध्ययुगीन कालखंड यामध्ये उत्तर आणि दक्षिण भारतातील राजकीय सत्ताच्या कालखंडातील विकास ज्यामध्ये प्रामुख्याने पल्लव, चालुक्य घराणे, चोल, राजपूत राज्ये, इत्यादीची काळातील स्थापत्यकला आणि शिल्पकला तसेच यांची वैशिष्टय़े याची तुलनात्मक पद्धतीने माहितीचे संकलन करणे महत्वाचे ठरते. याचबरोबर मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतात इंन्डो-इस्लामिक स्थापत्यकलेची सुरुवात झालेली होती. दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य याच्या कालखंडात ती विकसित झालेली होती. याचबरोबर  विजयनगर साम्राज्य, १३व्या आणि १४व्या शतकातील उत्तर भारतातील प्रादेशिक सत्ता, १८व्या शतकातील प्रादेशिक सत्ता आणि वसाहतकालीन स्थापत्यकला व शिल्प कला याचीही महिती असणे गरजेचे आहे. कारण प्रश्न हे कधी कधी संपूर्ण कालखंड गृहीत धरून विचारले जाऊ शकतात त्यामुळे या घटकाची तयारी सर्वागिण आणि सखोल पद्धतीने करणे अपरिहार्य आहे. कधी कधी या मुद्याशी सबंधित प्रश्न सद्यस्थितीला विचारात घेऊन विचारले जातात उदा. सिंधू संस्कृतीवरील विचारण्यात आलेला प्रश्न. थोडक्यात या मुद्याची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करताना कालखंडनिहाय योगदान आणि यामध्ये घडून आलेला विकास आणि बदल व याची वैशिषटय़े यासारख्या बाबींचा एकत्रित विचार करुन करावा लागणार आहे याची जाणीव असणे गरजेचे आहे.
या घटकाची मुलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता ११वीचे  Introduction to Indian Art – Part – I हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे तसेच याच्या जोडीला १२वीचे Themes in Indian History Part – I आणि II व जुन्या एनसीईआरटीचे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरील पुस्तकातील भारतीय वारसा आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा. याच्या जोडीला या विषयावर गाईडच्या स्वरूपात लिहीलेली अनेक पुस्तके बाजारामध्ये उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या मुद्याचा अधिक सखोल आणि सर्वागीण पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो.
या पुढील लेखामध्ये आपण भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकांमधील चित्रकला, साहित्य, आणि उत्सव या मुद्याचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त  ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत.
First Published on July 13, 2017 12:36 am
Web Title: indian heritage and culture upsc exam

बहि:शाल शिक्षण विद्यापीठाजवळ अभ्यासक्रम, अध्यापक व ग्रंथालय या गोष्टी तयार असतात.

बहि:शाल शिक्षण

विद्यापीठाजवळ अभ्यासक्रम, अध्यापक व ग्रंथालय या गोष्टी तयार असतात.

लोकसत्ता टीम | Updated: July 13, 2017 12:35 AM
0
Shares
शैक्षणिक संस्थांत रीतसर प्रवेश घेऊ  न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना, विशेषत: प्रौढ नागरिकांना, उपलब्ध असणारा आधुनिक शिक्षणाचा प्रकार, मानव्यविद्या, निसर्गविज्ञाने आणि तंत्रविद्या, समाजशास्त्रे, कायदा, वाणिज्य, वैद्यक अशा बहुतेक सर्व विषयांचा अंतर्भाव बहि:शाल शिक्षणात होतो.
  • विद्यापीठाजवळ अभ्यासक्रम, अध्यापक व ग्रंथालय या गोष्टी तयार असतात. त्यांचा लाभ प्रौढ नागरिकांना द्यावा, या उद्देशाने प्रथम हा उपक्रम सुरू झाला.
  • पुढे केवळ बहि:शाल शिक्षणासाठी लागणारे मनुष्यबळ, साधनसामग्री व अभ्यासक्रम यांच्या स्वतंत्र योजना कार्यान्वित करण्यात आल्या.
  • यासाठी विद्यापीठांच्या अध्यापक वर्गाबरोबर बाहेरील शिक्षितांचे अध्यापकवर्ग (अंशकालीन) उपयोगात आणले जातात.
  • प्रौढ वर्गाकरिता स्वतंत्र ग्रंथसंग्रहाची सामग्री पुरवली जाते आणि त्यांना उपयुक्त असे नवनवीन अभ्यासक्रम तयार केले जातात.
  • या कामी सरकारी संस्था, शिक्षण खाते, खासगी संघटना, कामगारसंघ व स्वयंसेवी नागरिक यांचा उपयोग विद्यापीठे करून घेतात.
  • बहि:शाल विद्यार्थी वर्गाचा दर्जा त्या त्या देशातील पूर्वशिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. भारतात अद्याप प्राथमिक शिक्षण न घेतलेले ७०.६५% नागरिक आहेत. माध्यमिक शिक्षणही बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे बहि:शाल शिक्षणाचे विषय व त्याची पातळी सामान्यपणे माध्यमिक दर्जावर ठेवावी लागते.
  • पुणे विद्यापीठाने १९४९ साली बहि:शाल शिक्षणाचा उपक्रम सुरू केला. दिल्ली, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, म्हैसूर इ. विद्यापीठांनी बहि:शाल शिक्षणाचा विभाग सुरू केलेला आहे.
  • महाराष्ट्रात पुणे विद्यापीठाच्या धर्तीवर मराठवाडय़ा व शिवाजी या विद्यापीठांनीही बहि:शाल शिक्षण योजना सुरू केल्या आहेत. मुंबई विद्यापीठातही बहि:शाल विभाग आहे.
  • अधिक माहितीसाठी: बहि:शाल शिक्षण विभाग- दुसरा मजला, आरोग्य केंद्र इमारत, विद्यानगरी, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-४०० ०९८, दूरध्वनी- ०२२२६५४३०११, ०२२२६५३०२६६
First Published on July 13, 2017 12:35 am
Web Title: external education educational institutions

एमपीएससी मंत्र : अभ्यासाचे नियोजन व स्रोत जागतिक तसेच भारतातील - योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके.

एमपीएससी मंत्र : अभ्यासाचे नियोजन व स्रोत

जागतिक तसेच भारतातील - योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके.एमपीएससी मंत्र : अभ्यासाचे नियोजन व स्रोत जागतिक तसेच भारतातील - योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके.

वसुंधरा भोपळे | Updated: July 12, 2017 2:11 AM
4.7K
Shares

संदर्भग्रंथ निवडताना प्रामुख्याने त्या संदर्भग्रंथाचे प्रकाशन आणि लेखकाचा अनुभव याचाही विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे.

विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेखांमधून आपण संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि प्राथमिक नियोजन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या लेखातून आपण या परीक्षेतील सामान्य अध्ययन या विषयाच्या अभ्यासघटकांची व अभ्यासस्रोतांची निवड आणि त्यांचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहू या.
अभ्यासक्रमाची तीन गटांत विभागणी
प्रत्यक्षात अभ्यासाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांनी विषयानुरूप अभ्यासक्रमातील मुद्दय़ांची तीन विभागांत विभागणी करावी.
अ) विभाग १ – यामध्ये त्या विषयामधील ज्या ज्या उपघटकांवर आयोगाने आत्तापर्यंत प्रश्न विचारले आहेत त्या सर्व घटकांचा समावेश करणे.
उदा.  २०१६ च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतील भूगोल विषयातील प्रश्न – आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते? हा प्रश्न अरण्यांच्या प्रकारांवर असल्यामुळे ‘अरण्याचे प्रकार’ हा भूगोल या घटकातील विभाग १ अंतर्गत येणारा घटक होय.
ब) विभाग २ – आंबोली आणि इगतपुरी येथे आढळणाऱ्या अरण्याच्या प्रकाराबरोबरच महाराष्ट्रात आणि भारतात आढळणाऱ्या अरण्यांचे प्रकार, त्यांची वैशिष्टे, त्या प्रदेशातील हवामान, संस्कृती आणि लोकजीवनही अभ्यासने गरजेचे आहे. हे घटक विभाग २अंतर्गत येतात.
क) विभाग ३- वरील दोन विभागांमध्ये समाविष्ट न झालेले अभ्यासक्रमाचे मुद्दे या विभागामध्ये समाविष्ट करावेत. वरीलप्रमाणे अभ्यासक्रमाची विभागणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना नक्की कोणत्या मुद्दय़ावर कितपत भर द्यावा आणि त्या मुद्दय़ावर प्रश्न कसा येऊ शकेल याचा अंदाज येऊ शकतो. सर्वसाधारणपणे पहिल्या दोन विभागांतील घटकांवर ७० ते ७५ टक्के प्रश्न येतात आणि उर्वरित प्रश्न हे तिसऱ्या विभागावरील असतात, त्यामुळे अभ्यास करताना पहिल्या दोन विभागांतील घटकांवर अधिक भर द्यावा आणि त्या घटकांतील सर्व आयामांची चोख उजळणी करावी.
संदर्भग्रंथ निवड
नेमका अभ्यास कोणता करावा याचा तपशील काढून झाल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे संदर्भग्रंथांची निवड. संदर्भग्रंथ निवडताना प्रामुख्याने त्या संदर्भग्रंथाचे प्रकाशन आणि लेखकाचा अनुभव याचाही विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. शासनाद्वारे प्रकाशित केले गेलेले संदर्भग्रंथ आणि शासनाच्या संकेतस्थळांवरून मिळणारी माहिती ही या परीक्षेच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे स्रोत आहेत; परंतु हे स्रोत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेले नसल्यामुळे आपण अभ्यास करताना त्यामधून नेमका कोणता मुद्दा उचलायचा आणि कोणता सोडून द्यायचा हे आपल्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून ठरविणे क्रमप्राप्त ठरते. प्रत्येक विषयाचे अभ्यासस्रोत पुढीलप्रमाणे आहेत.
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील – योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके.
२.  नागरिकशास्त्र – महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता ६ वी ते १०वी पर्यंतची नागरिकशास्त्र आणि ११वी, १२वीची राज्यशास्त्राची पुस्तके.
३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास – महाराष्ट्र बोर्डाची पाचवी, आठवी आणि अकरावीची पुस्तके, त्याचबरोबर बिपीन चंद्र यांचे ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’ हे पुस्तक.
४.  भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह – ४ थी ते १२वीपर्यंतची महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके, ऑक्सफर्ड व नवनीत स्कूल अ‍ॅटलास, ९वी ते १२वी  N.C.E.R.T ची पुस्तके.
५.  अर्थव्यवस्था – भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, भारतीय अर्थव्यवस्था हे दत्त आणि सुंदरम यांचे पुस्तक.
६.  सामान्य विज्ञान – ५ वी ते १०वीपर्यंतची महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके, ९वी ते १२वी  N.C.E.R.T ची पुस्तके.
७.  बुद्धिमापन चाचणी व अंकगणित – वा. ना. दांडेकर यांची गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांची पुस्तके, सातवी स्कॉलरशिप, आठवी व नववीची पुस्तके आणि १०वीची पुस्तके
हे झाले अभ्यास कोणता आणि कोणत्या संदर्भ ग्रंथातून करायचा या संदर्भात, परंतु खरी कसोटी असते ती एका तासात १००प्रश्न सोडविण्याची. यासाठी केलेल्या अभ्यासाची उजळणी, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा भरपूर सराव आणि ऋणात्मक गुणपद्धतीचा सामना करण्यासाठी अचूकतेवर भर देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अभ्यास, सराव आणि उजळणी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपण आपल्या ध्येयप्राप्तीपर्यंत निश्चितच पोहोचू शकतो.
First Published on July 12, 2017 2:11 am
Web Title: mpsc 2017 exam how to prepare for mpsc exam
4.7K
Shares

यूपीएससीची तयारी : भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास – १ सर्वसाधारणपणे आपणाला उपरोक्त पद्धतीने या घटकाची विभागणी करून अभ्यासाचे नियोजन करता येऊ शकते.

यूपीएससीची तयारी : भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास – १

सर्वसाधारणपणे आपणाला उपरोक्त पद्धतीने या घटकाची विभागणी करून अभ्यासाचे नियोजन करता येऊ शकते.

श्रीकांत जाधव | Updated: July 11, 2017 5:30 AM
0
Shares

(संग्रहित छायाचित्र)

आजच्या लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर पहिला यातील भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास या घटकावर २०१३ ते २०१६ मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि या घटकाचे स्वरूप याची माहिती घेणार आहोत. या घटकांतर्गत आपणाला भारतीय संस्कृती आणि वारसा, आधुनिक भारताचा इतिहास व १८व्या शतकापासून ते सद्यस्थितीपर्यंतच्या महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, मुद्दे, याचबरोबर स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण अथवा दृढीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना आणि जगाचा इतिहास १८व्या शतकाच्या मध्यापासून ते जवळपास १९९१ पर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना इत्यादीचा आपणाला अभ्यास करावा लागतो.
अभ्यासाच्या दृष्टीने या घटकाची विभागणी आपणाला भारतीय वारसा आणि संस्कृती, आधुनिक भारताचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक जगाचा इतिहास अशा पद्धतीने करता येऊ शकते. या घटकावर २०१३ ते २०१६ मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या खालीलप्रमाणे होती.
आता आपण उपरोक्त घटकाचा थोडक्यात आढावा घेऊ या –
भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकांतर्गत प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचे कलाप्रकार, साहित्य आणि स्थापत्यकला यांच्या मुख्य वैशिष्टय़ांचा अभ्यास करावा लागतो. या घटकामध्ये आपणाला भारतीय चित्रकला, भारतीय स्थापत्यकला, भारतीय शिल्पकला, भारतीय संगीत, नृत्य आणि नाटय़, भारतीय साहित्य, भारतीय उत्सव, भारतीय हस्तकला इत्यादीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या घटकाची तयारी आपणाला प्राचीन काळापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत करावी लागते त्यामुळे हे उपरोक्त कलाप्रकार, साहित्य, उत्सव यांची उत्पत्ती तसेच प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडनिहाय यामध्ये नेमके कोणते बदल झाले व याची वैशिष्टय़े काय आहेत इत्यादीसंबंधित बाबींची सखोल माहिती असणे गरजेचे आहे.
आधुनिक भारताचा इतिहास  या घटकांतर्गत आपणाला १८व्या शतकापासून ते १९४७पर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, व्यक्ती, मुद्दे, भारतीय स्वातंत्र्य चळवळ व या चळवळीचे विविध टप्पे याचबरोबर देशाच्या विविध प्रदेशांतील योगदान किंवा महत्त्वाचे योगदानकत्रे इत्यादीशी संबंधित अभ्यास करावा लागणार आहे. या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या घटकाची सखोल आणि सर्वागीण तयारी करणे अधिक गरजेचे आहे.
स्वातंत्र्योत्तर भारत या घटकामध्ये भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानाचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, विकासासाठी आखली गेलेली धोरणे व नियोजन, नेहरूंचे परराष्ट्र धोरण व भारताची आंतरराष्ट्रीय भूमिका, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांमधील भारताची प्रगती, चीन आणि पाकिस्तान या देशांनी भारतासोबत केलेली युद्धे व त्याच्याशी निगडित करार व त्याचे परिणाम, इंदिरा गांधी यांचा कालखंड-बांगलादेश मुक्ती, आणीबाणी व जयप्रकाश नारायण, जमीन सुधारणा धोरण व जमीन सुधारणा, नक्षलवाद व माओवाद, नवीन सामाजिक चळवळी-वांशिक चळवळी, पर्यावरण चळवळ व महिला चळवळ इत्यादी, पंजाब व आसाममधील दहशतवाद व पूर्वोत्तर राज्यातील घुसखोरी, राजकीय क्षेत्रातील बदल व प्रादेशिक वादाचे राजकारण तसेच या सर्व घटकांशी संबंधित घटना, व्यक्ती आणि मुद्दे या अनुषंगाने याची तयारी करावी लागते.
car01
आधुनिक जगाचा इतिहास या घटकांतर्गत आपणाला १८व्या शतकातील महत्त्वाच्या घटना जसे राजकीय क्रांती-अमेरिकन, फ्रेंच औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद आणि वसाहतवाद, आशिया, आफ्रिका आणि अमेरिकन खंडामधील युरोपियन साम्राज्यवाद, जपानचा आशिया खंडातील साम्राज्यवाद, राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञान-भांडवलवाद, समाजवाद आणि साम्यवाद इत्यादी, तसेच १९व्या शतकातील युरोपातील राज्यक्रांती व राष्ट्रवादाचा उदय आणि जर्मनीचे एकत्रीकरण आणि इटलीचे एकत्रीकरण,  २०व्या शतकातील घडामोडी दोन जागतिक महायुद्धे, रशियन क्रांती, लीग ऑफ नेशन, अरब राष्ट्रवाद, फॅसिझम आणि नाझीझम, आíथक महामंदी, तसेच दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरचे जग- संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना, निर्वसाहतीकरण, चीनची क्रांती, अलिप्ततावाद चळवळ, शीतयुद्ध व संबंधित घटना, युरोपियन संघ, इत्यादी घटकांशी संबंधित अभ्यास करावा लागतो.
सर्वसाधारणपणे आपणाला उपरोक्त पद्धतीने या घटकाची विभागणी करून अभ्यासाचे नियोजन करता येऊ शकते. यातील नेमका कोणता भाग परीक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे याचे आकलन आपणाला गतवर्षीय परीक्षेमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून लक्षात येते. या घटकाची व्याप्ती खूप मोठी आहे, तसेच याचे स्वरूप पारंपरिक पद्धतीचे आहे. त्यामुळे हा घटक सर्वप्रथम सखोल पद्धतीने अभ्यासणे गरजेचे आहे. या घटकाची तयारी आपणाला सर्वागीण पद्धतीने करावी लागते व या घटकावर बाजारामध्ये अनेक संदर्भ पुस्तके तसेच नोट्स पद्धतीने लिहिलेली गाइड्स उपलब्ध आहेत आणि यातील नेमकी कोणती संदर्भ पुस्तके वाचावीत याची निवड करणे कठीण जाते. या घटकासाठी उपरोक्त वर्गीकरणानुसार लागणारी एनसीईआरटीची पुस्तके तसेच या घटकाची सखोल तयारी करण्यासाठी लागणारी महत्त्वाची संदर्भ पुस्तके यांच्याविषयी यापुढील प्रत्येक लेखामध्ये या घटकांच्या अभ्यासाचे नियोजन आणि तयारी याच्यासोबत ही माहिती घेणार आहोत.
यापुढील लेखामध्ये आपण भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत.
First Published on July 11, 2017 5:30 am
Web Title: upsc preparation ias preparation tips preparation for upsc 2017 exam

नोकरीची संधी मेकॅट्रॉनिक्स अ‍ॅप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाणार आहे.

नोकरीची संधी

मेकॅट्रॉनिक्स अ‍ॅप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सुहास पाटील | Updated: July 8, 2017 3:13 AM
0
Shares

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

वोल्क्स वॅगन इंडिया प्रा. लि. कंपनी संचालित ‘वोल्क्स वॅगन अ‍ॅकॅडमी’ तर्फे ‘फुल टाइम जॉब ओरिएंटेड अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम’च्या माध्यमातून साडेतीन वर्षांचे मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स अ‍ॅप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये अद्ययावत नवीन टेक्नॉलॉजीसह मेटल, टìनग, मिलग, इलेक्ट्रिकल, ऑटोमेशन, वेल्डग, रोबोटिक्स, न्यूमॅटिक्स, हायड्रोटिक्स, पीएल्सी, इलेक्ट्रॉन्यूमॅटिक्स, इंटर बस, एच्एम्आय्, सीएन्सी, प्रोजेक्ट या विषयांतील बेसिक/अ‍ॅडव्हान्सड ट्रेनग दिले जाणार. प्रशिक्षणानंतर एनसीव्हीटी आणि डीआयएचके (एएचके) या परीक्षा द्याव्या लागतील.
पात्रता – २०१६ किंवा २०१७ साली १०वी गणित आणि विज्ञान विषयांत प्रत्येकी किमान ७०% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अजसाठी ६०% गुण).
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ जून २००० नंतरचा असावा. (अजा/अजसाठी उमेदवाराचा जन्म १ जून १९९८नंतरचा असावा.)
निवड पद्धती – अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट आणि मुलाखत. अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट २२ आणि २३ जुल, २०१७ रोजी होईल. ठिकाण – वोल्क्स वॅगन अ‍ॅकॅडमी, वोल्क्स वॅगन इंडिया प्रा.लि., ई-१, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया फेज- ३, खराब वाडी, ता. खेड, चाकण, पुणे.
ट्रेिनग – जर्मन डय़ुएल सिस्टीम ऑफ वोकेशनल एज्युकेशनप्रमाणे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड दरमहा रु. ७,०००/- (पहिल्या वर्षी), रु. ८,०००/- (दुसऱ्या वर्षी), रु. ९,०००/- (तिसऱ्या वर्षी) दिले जाईल.
उमेदवारांनी आपला सीव्ही/अर्जासह शाळेचा दाखला, वयाचा दाखला, १० वीचे गुणपत्रक जोडून वरील पत्त्यावर अथवा volkswagen.academy@volkswagen.co.in
या ई मेल आयडीवर ८ जुलै २०१७पर्यंत पाठवावे. अर्जाचा नमुना पुढील  संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येईल.
http://www.volkswagen.co.in/en/volkswagen_world/mechatronics-apprenticeship-program.html
  • नॅशनल सेंटर फॉर अंटाíक्टक अँड ओशन रिसर्च, गोवा येथे पुढील पदांची सरळ मुलाखतीद्वारे भरती.
(१)व्हेहिकल मेकॅनिक (२ पदे),
(२) व्हेहिकल इलेक्ट्रिशियन (२ पदे),
(३) स्टेशन इलेक्ट्रिशियन (२ पदे),
(४) ऑपरेटर (एक्स कॅव्हेरिंग मशीन – डोझर्स/एक्स कॅव्हेटर्स) (१ पद).
पात्रता – हलकी व जड वाहने चालविण्याचा परवाना किमान १ वर्ष २० टनपेक्षा अधिक क्षमतेचा हायड्रोलिक क्रेन चालविण्याचा अनुभव. पद क्र. १ ते ६ साठी वॉक इन इंटरह्यू दि. १९ जुल २०१७
(७) वेल्डर (१ पद)
(८) बॉयलर ऑपरेटर आणि मेकॅनिक/प्लंबर/फिटर  (१ पद)
(९) कारपेंटर (१ पद)
(१०) मल्टिटास्किंग स्टाफ.
पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय ४ वर्षांचा अनुभव किंवा संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका २ वर्षांचा अनुभव.
पद क्र. (७) ते (१०) साठी मुलाखतीचा दिवस २० जुल २०१७.
(११) मेल नर्स (२ पदे). पात्रता – जनरल नìसगमधील डिप्लोमा/पदवी.
(१२) लॅब टेक्निशियन – (२ पदे). फिजिकल सायन्सेसमधील पदवी, ४ वर्षांचा अनुभव.
(१३) इन्व्हेंटरी/बुकिंग स्टाफ – (२ पदे). पात्रता – १२वी उत्तीर्ण, कॉम्प्युटर अँड प्रोग्रॅिमग असिस्टंट (सीओपीए)मधील आयटीआय.
(१४) कुक – (५ पदे). पात्रता – हॉटेल मॅनेजमेंट/ कलिनरी आर्टमधील पदवी/पदविका, २ वर्षांचा अनुभव. पद क्र. (११) ते (१४) साठी मुलाखत दि. २१ जुल २०१७.
नोकरीच्या अटी – सुरुवातीला ५ ते १४ महिन्यांसाठी रु. २६,७००/- दरमहा वेतन.
रजिस्ट्रेशन फॉर्म एएल-२००७ ६६६. www.ncaor.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तो व्यवस्थित भरून  logistics@ncaor.gov.in या इमेल आयडीवर दिनांक १४ जुलै २०१७ पर्यंत पाठवावा.
संपर्क – दूरध्वनी – (०८३२) २५२५५२३

First Published on July 8, 2017 3:13 am
Web Title: marathi articles on job opportunity
0
Shares

एमपीएससी मंत्र : अभ्यासाचे नियोजन या परीक्षांसाठी आयोगाने ठरवून दिलेला निश्चित अभ्यासस्रोत नसल्यामुळे या परीक्षा अवघड ठरतात.

एमपीएससी मंत्र : अभ्यासाचे नियोजन

या परीक्षांसाठी आयोगाने ठरवून दिलेला निश्चित अभ्यासस्रोत नसल्यामुळे या परीक्षा अवघड ठरतात.

वसुंधरा भोपळे | Updated: July 7, 2017 1:11 AM
80
Shares

विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेखात आपण साहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेचे स्वरूप पाहिले. आज आपण प्रश्नपत्रिका विश्लेषणाची प्राथमिक माहिती आणि अभ्यासाचे नियोजन करताना पार कराव्या लागणाऱ्या टप्प्यांची सविस्तर माहिती घेऊ या.
स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षांतील फरक
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे या परीक्षांचे वेगळेपण. या परीक्षांना सामोरे जाताना आपल्यासमोर असणाऱ्या आव्हानांचा वेध घेऊन पुढे मार्गक्रमण करावे लागते. सर्वसाधारणपणे पदवीपर्यंतचे शिक्षण घेताना आपण आपल्या विद्यापीठाने किंवा बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित अभ्यासस्रोतातून (पाठय़पुस्तके) अभ्यास केलेला असतो. पदवीपर्यंत दिल्या गेलेल्या शाळा-कॉलेजातील परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये प्रामुख्याने खालील फरक दिसून येतो.
या परीक्षांसाठी आयोगाने ठरवून दिलेला निश्चित अभ्यासस्रोत नसल्यामुळे या परीक्षा अवघड ठरतात. आयोगाच्या अपेक्षा जाणून घेऊन जर योग्य रणनीती अमलात आणली तर या अवघड वाटेवरचा प्रवास निश्चितच पूर्ण करता येतो. आयोग विद्यार्थ्यांशी फक्त तीनच माध्यमातून संवाद साधतो.
१. अभ्यासक्रम
२. प्रश्नपत्रिका
३. निकाल
आयोगाने या तीन माध्यमातून जे संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहेत त्यांचा योग्य अन्वयार्थ ज्याला लावता येतो तो या स्पर्धा परीक्षांची बाजी मारून जातो. म्हणूनच संयुक्त पूर्व परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम आपण या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहू या.
पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन.)
३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
५. अर्थव्यवस्था –
अ) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
ब) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.
६. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झुलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजीन).
७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि अभ्यासक्रमाशी सांगड यातून अभ्यासाचे नियोजन –
अभ्यासाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे अत्यावश्यक आहे. जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करताना प्रथम प्रत्येक प्रश्न वाचून स्वतला पुढील प्रश्न विचारावेत.
१. हा प्रश्न का विचारला गेला असावा?
२. या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडून का अपेक्षित आहे?
३. हा प्रश्न अभ्यासक्रमाच्या कोणत्या घटकाशी निगडीत आहे?
४. अभ्यासक्रमाच्या एकाच घटकाशी संबंधीत प्रश्न आहे की इतर घटकांशी संबंधीत प्रश्न आहे?
५. याच घटकावर अजून कोणकोणत्या आयामांतून प्रश्न विचारता येतील.?
६. प्रश्नातील घटकाचे उपघटक कोणते असू शकतील?
वरील प्रश्नांची जी उत्तरे तुम्हाला मिळतील ती उत्तरे म्हणजेच तुमची  Primary To Do List असेल. ही  बनविल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि अभ्यासक्रमाशी सांगड घालणे होय. या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी २०१३ सालापासून अर्थात परीक्षेचे स्वरूप बदललेल्या सालापासून आत्तापर्यंत STI, PSI व Assistant/ASO (सहायक कक्ष अधिकारी) या पदांसाठी झालेल्या सर्व पूर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका समोर ठेवून अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते टिपून ठेवले पाहिजे.
STI, PSI U Assistant/ASO या तिनही पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम समानच असल्यामुळे गेल्या चार वर्षांतील या सर्वच प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास विद्यार्थ्यांना आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे सुकर होऊ शकते. या प्रकारचे विश्लेषण केल्यानंतर आपल्याला अभ्यासक्रमातील कोणत्या घटकावर अधिक भर द्यायचा आणि कोणत्या घटकावर कमी भर द्यायचा याचा अंदाज येऊ शकतो आणि आपले अभ्यासाचे नियोजन नक्की करता येते.
निकालाचे विश्लेषण केल्यास आपल्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे पूर्व परीक्षा असो वा मुख्य परीक्षा असो तुम्ही ६० टक्क्यांपर्यंत जर
पोहोचू शकलात तर तुम्हाला पद मिळण्याची शाश्वती नक्कीच असते. त्यामुळे योग्य अभ्यासघटकांची निवड, त्यांची अभ्यासक्रमाशी योग्य सांगड आणि निवडलेल्या घटकांचा सारासार अभ्यास व उजळणी या त्रिसुत्रीच्या माध्यमातून आपण आपल्या ध्येय्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. पुढील लेखांत आपण पूर्व परीक्षेच्या अभ्यासस्त्रोतांबद्दल  चर्चा करुयात.
First Published on July 7, 2017 1:11 am
Web Title: mpsc exam mpsc competitive exam mpsc exam study

क्लिनिकल सायकॉलॉजीमधील एमफिल अभ्यासक्रम अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा ६ ऑगस्ट २०१७ रोजी घेण्यात येईल

क्लिनिकल सायकॉलॉजीमधील एमफिल अभ्यासक्रम

अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा ६ ऑगस्ट २०१७ रोजी घेण्यात येईल

लोकसत्ता टीम | Updated: July 7, 2017 1:05 AM
0
Shares
इन्स्टिटय़ूट ऑफ ह्य़ुमन बिहेविअर अ‍ॅण्ड अलाइड सायन्सेस, नवी दिल्ली येथे क्लिनिकल सायकॉलॉजीमधील एमफिल अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाच्या २०१७-१९ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी  पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
मानसशास्त्र वा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना त्याच विषयातील एमफिल पात्रतेसह पुढे करिअर करायचे असेल त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर ठरू शकतो.
जागांची संख्या व तपशील – अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची १०. यापैकी ६ जागा अनारक्षित असून प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती-जमातींच्या तर दोन जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार विद्यार्थ्यांनी मानसशास्त्र, अप्लाइड सायकॉलॉजी, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, क्लिनिकल सायकॉलॉजी, काउन्सिलिंग सायकॉलॉजी वा हेल्थ सायकॉलॉजी यांसारख्या विषयांतील एमए- एमएस्सी पदव्युत्तर पदवी कमीतकमी ५५% गुणांसह (राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी ५०% गुणांसह) उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
निवड प्रक्रिया – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा ६ ऑगस्ट २०१७ रोजी घेण्यात येईल. अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना ७ व ८ ऑगस्ट २०१७ रोजी मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क – अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी २००० रु. चा (राखीव वर्गगटातील उमेदवारांनी १००० रु. चा) डायरेक्टर, आयएचबीएएस यांच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अर्जाचा नमुना व अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इन्स्टिटय़ूट ऑफ ह्य़ुमन बिहेविअर व अप्लाइड सायन्सेस, नवी दिल्लीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या  m.phil.co2012@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज प्रोफेसर सायकॅइट्री अ‍ॅण्ड डायरेक्टर, इन्स्टिटय़ूट ऑफ ह्य़ुमन बिहेविअर अ‍ॅण्ड अप्लाइड सायन्सेस एचओडी (क्लिनिकल सायकॉलॉजी) रूम नं. १२२, फर्स्ट फ्लोअर, अ‍ॅकेडेमिक ब्लॉक, दिलशाह गार्डन, नवी दिल्ली- ११००९५ या पत्त्यावर पाठवावे. ते पाठविण्याची शेवटची तारीख १० जुलै २०१७.
First Published on July 7, 2017 1:05 am
Web Title: mphil course in clinical psychology
0
Shares