Tuesday, March 17, 2015

नवनीत [Print] [Email] कुतूहल - रसायनशास्त्रातील भारतीय

नवनीत

कुतूहल - रसायनशास्त्रातील भारतीय

Published: Tuesday, October 14, 2014
प्रा. बी. सी. हलदर  (१ जाने. १९२३ ते २७ फेब. १९८३)
प्रा. बरुणचंद्र ऊर्फ बी. सी. हलदर यांचे सर्व शिक्षण कोलकात्यात झाले. ते प्रा. पी. बी. सरकार यांचे आवडते विद्यार्थी होते. १९४८ साली त्यांना प्रेमचंद रायचंद सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर त्यांना फुलब्राइट, स्मिथ-मंद आणि पलित शिष्यवृत्त्या मिळाल्या. त्यामुळे १९५० साली त्यांना अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण घेणे शक्य झाले. नोत्रेदाम आणि रोचेस्टर विद्यापीठात तर त्यांनी संशोधन केलेच, पण नोबेल पुरस्कार विजेते प्रा. ग्लेनटी सीबॉर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली कॅलिफोíनयातील लॉरेन्स बर्कले लॅबोरेटरीत संशोधन करायची संधी मिळाली. या संशोधनाचे फलित म्हणजे त्यांनी संशोधिलेली चार रेडिओ समस्थानिके ऊर्फ आयसोटोप्स.
अमेरिकेहून ते १९५५ साली भारतात आले व प्रथम रंगून विद्यापीठ आणि नंतर त्यांनी अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठ येथे काम केले. तेथून १९६० साली ते मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये आले; पण लगेच पुढच्या वर्षी त्यांना नागपूरच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये पाठविले. १९७० साली ते मुंबईला आले व इन्स्टिटय़ूटचे संचालक झाले. त्यानंतर १९७२ साली त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक म्हणून पुण्यास पाठविण्यात आले. त्यांना खरा रस होता संशोधनात. त्यामुळे त्यांनी सरकारला विनंती केली की, मला परत मुंबईला इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये जाऊ दे व माझे संशोधन करू दे. त्यांची ही विनंती मान्य करण्यात येऊन ते वर्षभरात मुंबईला आले आणि १९८१ च्या त्यांच्या निवृत्तीपर्यंत त्या पदावर राहिले. महाराष्ट्र राज्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन समितीचे ते उपसचिव होते. डॉ. हलदर इंडियन केमिकल सोसायटी, इन्स्टिटय़ूशन ऑफ न्यूक्लिअर इंजिनीअर्स-लंडन इत्यादी अनेक संस्थांचे आणि त्यांच्या शास्त्रीय नियतकालिकांचे सभासद, संपादक, लेखक होते. या त्यांच्या अजोड कामगिरीबद्दल १९७८ साली कोलकाता विद्यापीठाने त्यांना आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय सुवर्ण पदकाने सन्मानित केले.
प्रा. हलदर यांनी अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री, न्यूक्लिअर केमिस्ट्री आणि परिसर रसायनशास्त्र यांचे अभ्यासक्रम भारतभर सुरू करून दिले. डॉ. हलदर यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थ्यांनी एमएस्सी आणि पीएचडी केली. त्यांचे स्वत:चे २०० संशोधन निबंध प्रसिद्ध झाले. काटेकोरपणा, टिकाऊपणा आणि कुतूहल हे त्यांच्या अध्यापन, संशोधन आणि वागणुकीचे विशेष हो

नवनीत [Print] [Email] वनस्पती आणि कार्बन

नवनीत

वनस्पती आणि कार्बन

Published: Monday, October 6, 2014
वनस्पतींना आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाकाहारी सजीव थेट वनस्पतींवर अवलंबून असतात, तर मांसाहारी सजीव शाकाहारी सजीवांवर अवलंबून असतात. म्हणजेच मांसाहारी सजीव अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात. इतरही अनेक फायदे वनस्पतींमुळे आपल्याला होतात. जसे ऑक्सिजनचा पुरवठा आणि कार्बन डायऑक्साइडचा वापर (शोषण), जमिनीची धूप थांबवणे, विविध पद्धतींनी इंधनाची गरज भागवणे इत्यादी. त्यामुळे वनस्पतीवाढीसाठी आपण काम केले पाहिजे, हे नक्की.
मूलत: वनस्पती सजीव आहेत; पण त्यांना इतर सजीवांसारखी एकदा दिलेली जागा सोडता येत नाही. त्यामुळे त्या जागेवर वनस्पतीवाढीच्या सर्व गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. पहिली गरज सूर्यप्रकाशाची, तो मिळेल अशी जागा निवडली पाहिजे.  सूर्यप्रकाशातच वनस्पती अन्न निर्माण करतात. अन्न निर्माण करणे म्हणजे वनस्पतीमधील जैव रासायनिक क्रिया. ती घडायला आपण आवश्यक अशा इतर बाबींची पूर्तता करायला हवी. सूर्यप्रकाशानंतर पानातले हरितद्रव्य महत्त्वाचे ठरते. त्याच्या उपस्थितीतच प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडते. बी लावून वनस्पती योग्य तऱ्हेने वाढवल्यास त्याची वाटचाल अन्न निर्माण करायच्या प्रक्रियेकडे होते. याच प्रक्रियेच्या वेळी वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेतात. अन्न उत्पादन प्रक्रियेत एका बाजूला मुख्य पदार्थ तयार होतो, तर त्या वेळी ऑक्सिजन हा उपपदार्थ तयार होऊन तो वनस्पतीद्वारे हवेत सोडला जातो.
 याचा दुसरा अर्थ असा की, हवेतील कार्बन डायऑक्साइड (उड2) मधील कार्बन (उ) वनस्पतीत राहतो आणि ऑक्सिजन (ड2) हवेत परत सोडला जातो. वनस्पतीतील एकूण सोळा घटकांपकी एका घटकाची- कार्बनची अंशत: पूर्तता अशी होते. शिवाय काही कार्बनचा अंश जमिनीतून घेतला जातो. म्हणूनच माती परीक्षणाच्या वेळी जी तपासणी करतात त्यामध्ये मातीमधील कार्बनचे प्रमाण प्राधान्याने लक्षात घेतले जाते. याशिवाय इतर घटकांची उपस्थिती आणि प्रमाण तपासले जाते. म्हणजेच आपल्याला नक्की समजते की, वनस्पतीवाढीसाठीचे कोणते घटक त्या मातीत आहेत आणि कोणत्या प्रमाणात आहेत. त्यानुसार कमतरता असलेल्या घटकांची पूर्तता अन्य मार्गाने आपण करू शकतो. त्याचबरोबर मातीत पुरेशा प्रमाणात असलेले घटक देण्याची गरज नाही.
दिलीप हेल्रेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

नवनीत [Print] [Email] काचेतील घटक

नवनीत

काचेतील घटक

Published: Saturday, September 27, 2014
दैनंदिन जीवनात आपण काचेचा वापर सर्रास करतो. ग्लास, टिपॉय, घडय़ाळ, मोबाइल, संगणक, खिडक्या, आरसे अशा किती तरी वस्तूंमध्ये काच वापरलेली असते. काच ही अस्फटिकी घनरूप आहे. काच कठीण, पण ठिसूळ असते. सिलिका (सिलिकॉन डाय-ऑक्साइड) व सिलिकेटे यांचा रस तापवून वेगाने थंड झाल्यावर काच तयार होते. सिलिकेट हे सिलिकॉन, ऑक्सिजन आणि एक वा अधिक धातू यांनी बनलेले संयुग आहे. यात काही वेळा हायड्रोजनचाही समावेश असतो. काच ही मानवनिर्मित समजली जाते; पण नसíगक घटनांमधूनही काच तयार होते.
नसíगक काच ही ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हा वेगाने थंड झाल्यावर तयार होते. प्रत्येक लाव्ह्य़ाचे रासायनिक घटकांचे प्रमाण वेगवेगळे असते; पण त्या सर्वात सिलिकेचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून अधिक असते. नसíगक काचांपकी वारंवार आढळणाऱ्या काचेचा प्रकार म्हणजे ज्वालाकाच (ऑब्सिडियन), यात साधारणत: ७५ टक्के सिलिका असते. या काचेचा रंग काळा असतो.
वालुकामय प्रदेशात वीज पडली किंवा अशनीचा आघात झाला तर काही वेळा काच तयार होते. या घटनांमध्ये वाळूला (सिलिका) खूप उष्णता मिळते. वाळू वितळून वेगाने थंड होते आणि काच तयार होते. काचमय अशनी पडल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
कृत्रिमरीत्या तयार केल्या जाणाऱ्या काचांमध्येसुद्धा रासायनिक घटकांचे प्रमाण सारखे नसते. काचेतील मुख्य घटक सिलिकेचे (SiO2) प्रमाण एकूण प्रमाणाच्या साठ ते ऐंशी टक्के असते. उरलेला भाग एखाद्या किंवा अधिक ऑक्साइडांचा असतो. बहुधा सोडा (Na2O) व कॅल्शिअम ऑक्साइड (उंड-लाइम) हे ऑक्साइड्स वापरले जातात. काचेच्या एकूण उत्पादनांपकी सर्वात जास्त म्हणजे ऐंशी टक्क्यांहून अधिक उत्पादन या प्रकारच्या काचेचे असते. या काचेला सोडा लाइम काच म्हटले जाते. भांडी, बाटल्या, बरण्या, तावदानाच्या काचा अशा बहुतेक वस्तू या काचेच्या केलेल्या असतात. या काचेत सोडा, लाइमव्यतिरिक्त मॅग्नेशिया (MgO), अ‍ॅल्युमि

नवनीत [Print] [Email] चांदीचा वर्ख

नवनीत

चांदीचा वर्ख

Published: Friday, September 26, 2014
मिठाईच्या कोणत्याही दुकानात चांदीचा वर्ख लावलेली मिठाई हमखास आढळते, पण ती खाण्यास योग्य आहे का, असा प्रश्न हमखास प्रत्येकाच्या मनात येतो. याचबरोबर फक्त चांदीचाच वर्ख बनवता येतो का, की इतर मूलद्रव्यांचाही वर्ख बनवता येतो?
लाटता येण्यासारख्या कोणत्याही धातूपासून वर्ख बनविता येतो. मात्र वर्ख बनविण्यासाठी तन्य व प्रसरणशील धातू सोयीचा असतो. धातू जेवढा अधिक तन्य व वर्धनशील असतो तेवढा अधिक पातळ वर्ख तयार करता येतो. उदा. सर्वात तन्य असलेल्या सोन्याचा ०.०००००७५ सेंमी. जाडीचा वर्ख बनविता येतो. वर्खासाठी धातुशुद्धताही असावी लागते. कारण अशुद्ध घटकांमुळे धातूची तन्यता कमी होते. वर्ख सामान्यपणे ०.००५ सेंमी. वा त्याहून पातळ असतो.
सोन्याचांदीचे वर्ख सर्वसाधारणपणे घरगुती पातळीवर व मुख्यत्वे लाकडी हातोडय़ाने ठोकून तयार करतात. याकरिता अतिशुद्ध सोन्याच्या वा चांदीच्या पत्र्याचे छोटे तुकडे घेतात. त्यांच्यामध्ये चिवट कागदाचे वा श्ॉमॉय चामडय़ाचे तुकडे घालून एकावर एक रचतात. नंतर या चवडीवर लाकडी हातोडय़ाने ठोके देऊन वर्ख तयार करतात. प्रत्येक ठोक्यानंतर चवड फिरवितात. यामुळे पुढील ठोका दुसऱ्या जागी बसून पत्रा प्रसरण पावत जातो. या पद्धतीने दीर्घ काळाने हळूहळू प्रसरण पावत जाऊन पत्र्यापासून अतिशय पातळ असे वर्खाचे मोठे तुकडे तयार होतात.
चांदीचा वर्ख पानांचे विडे, मेवामिठाई आणि अन्य खाद्यपदार्थ सजविण्यासाठी, तसेच दंतवैद्यकात व विद्युत विलेपनातही वापरतात. वर्ख म्हणून खाण्याच्या पदार्थात या मूलद्रव्यांचा वर्ख वापरला जातो, पण यासाठी ही मूलद्रव्ये शुद्ध स्वरूपात असावी लागतात. वर्ख स्वरूपात चांदी, सोने ही मूलद्रव्ये निष्क्रिय असतात. चांदीच्या वर्खासाठी चांदी ९९.९% इतकी शुद्ध असणे आवश्यक आहे. एका किलोमागे चांदीचा वर्ख हा १ मि.ग्रॅमपेक्षा कमी असावा, जर जास्त प्रमाणात चांदी शरीरात गेल्यास अर्जयिा हा आजार उद्भवतो.
हल्ली खूपदा चांदीच्या वर्खाऐवजी अॅल्युमिनिअमचा वर्ख वापरला जातो. आरोग्याच्या दृष्टीने ते घातक आहे. शरीरात अॅल्युमिनिअमचं प्रमाण वाढल्यास चेतासंस्थेवर व मेंदूवर वाईट परिणाम होतो.

नवनीत [Print] [Email] अ‍ॅल्युमिनिअम फॉइल

नवनीत

अ‍ॅल्युमिनिअम फॉइल

Published: Thursday, September 25, 2014
आपल्या घरात अ‍ॅल्युमिनिअम फॉइलने एक महत्त्वाची जागा पटकावली आहे. खूपदा खायच्या वस्तू या अ‍ॅल्युमिनिअम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवल्या जातात. 'अ‍ॅल्युमिनिअम फॉइल' या नावामध्ये असल्याप्रमाणे अ‍ॅल्युमिनिअम या धातूपासून तयार केली जाते. घरांमध्ये वापरली जाणारी फॉइल ही साधारण ०.०१६ मि.मी. जाडीची असते. या फॉइलला हवा तो आकार देता येतो, हवी तशी वाकवता किंवा गुडाळता येते. शिवाय मुख्य म्हणजे या फॉइलची जाडी ०.०२५ मि.मी.(२५ मायक्रॉन)पेक्षा जास्त असल्यास या फॉइलमधून हवा व पाणी आरपार जाऊ शकत नाही. अन्नपदार्थाचा हवेशी संपर्क आल्यास कुबट वास येतो आणि चवही बदलते, म्हणून अन्नपदार्थ हवाबंद करण्यासाठी पॅकेजिंगमध्ये अ‍ॅल्युमिनिअम फॉइलचा वापर करतात. अ‍ॅल्युमिनिअम फॉइल या कमीत कमी ०.००४३ मि.मी. ते जास्तीत जास्त ०.२ मि.मी. या विविध जाडीच्या आढळून येतात.
ही फॉइल अपारदर्शक असल्यामुळे प्रकाशापासून पदार्थाचे संरक्षण होते. म्हणून खायच्या वस्तू, औषधे, सौंदर्य प्रसाधने इ. फॉइल वापरून प्रकाश आणि हवा यांपासून संरक्षित केली जातात. अ‍ॅल्युमिनिअम फॉइल ही कागदी किंवा प्लास्टिक बॉक्स यांवर लॅमिनेट करता येत असल्याने या फॉइलचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.
खरे तर अ‍ॅल्युमिनिअम हा धातू रासायनिकदृष्टय़ा क्रियाशील आहे. क्षरणाच्या संदर्भात अ‍ॅल्युमिनिअम धातूचे एक वैशिष्टय़ आहे. हा धातू हवेच्या संपर्कात आला, की हवेतील ऑक्सिजनबरोबर संयोग पावून अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साइड (अ‍ॅल्युमिना) तयार होऊन त्याचा एकसंध थर धातूवर जमा होतो. अ‍ॅल्युमिना रासायनिकदृष्टय़ा अक्रियाशील असल्याने त्यावर अन्नद्रव्यातील सौम्य आम्लांचा काहीच परिणाम होत नाही. हा थर आतील अ‍ॅल्युमिनिअम धातूला धट्ट धरून बसत असल्याने थराखालील अ‍ॅल्युमिनिअम धातूचा हवा आणि पाण्याशी संपर्क येत नाही, म्हणून अ‍ॅल्युमिनिअम धातूचे क्षरण होत नाही.
अशी ही फॉइल प्रथम १९१०मध्ये स्वित्र्झलडमध्ये तयार केली. यासाठी शुद्ध अ‍ॅल्युमिनिअम किवा अ‍ॅल्युमिनिअमची संमिश्रे वापरली जातात. पूर्वी टिन(कथिल)ची फॉइल वापरात होती. पण पॅकेजिंगमध्ये टिन फॉइल वापरल्याने आतील पदार्थाच्या स्वादात फरक पडत असे. त्यामुळे टिन फॉइलऐवजी आता अ‍ॅल्युमिनिअम फॉइलचा वापर होतो.

नवनीत [Print] [Email] कुतूहल - लोह, लोखंड, पोलाद यातील फरक

नवनीत

कुतूहल - लोह, लोखंड, पोलाद यातील फरक

Published: Wednesday, September 24, 2014
नेहमीच्या वापरातील वस्तू उदा. खुर्ची, कपाट, हत्यारे, यंत्राचे भाग हे लोखंडाचे किंवा पोलादाचे असतात, हे आपल्याला माहीत आहे. पण या लोखंड, पोलाद आणि कधीतरी वापरला जाणार लोह यामध्ये काय फरक आहे? लोह हे नाव १००% शुद्ध मूलद्रव्याला दिले तर लोखंड आणि पोलाद ही त्याची दोन महत्त्वाची संमिश्रे आहेत. लोह हा धातू आणि कार्बन हा अधातू यांच्या मिश्रणातून लोखंड आणि पोलाद तयार करतात. कार्बनव्यतिरिक्त या संमिश्रांमध्ये सिलिकॉन आणि मँगनीज असते.
साधारण २% पेक्षा जास्त कार्बन असलेल्या संमिश्रांना लोखंड असे म्हटले जाते. या संमिश्रापासून बनविल्या जाणाऱ्या वस्तू मुख्यत: ओतकामाने बनवत असल्याने यांना ओतीव लोखंड असेही म्हणतात. लोखंडामध्ये मिसळलेले कार्बन हे आयर्न कार्बाइडच्या स्वरूपात असतेच, पण त्याचबरोबर शोषण क्षमतेपेक्षा जास्तीचे कार्बन हे मुक्त स्वरूपात असते. लोखंडाचा सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास केल्यास त्यात मुक्त कार्बनच्या रेषा दिसतात. धातूमध्ये या मुक्त अधातूचे अस्तित्व बारीक चिरांसारखे काम करते. यामुळे लोखंडाची ताण सहन करण्याची क्षमता खूप कमी होते. परंतु या मुक्त कार्बनमुळे दाब आणि कंपने सहन करण्याची क्षमता मात्र वाढते. तयार करण्याच्या पद्धती आणि कार्बनचे प्रमाण यावरून व्हाइट आयर्न (कार्बन २ ते ४.५५%), ग्रे आयर्न (ग्रॅफाइट २.५ ते ४%) आणि नॉडय़ुलर आयर्न अशी वेगवेगळी संमिश्रे होतात.
पोलादामध्ये कार्बनचे प्रमाण २%पेक्षा कमी असते. सिलिकॉन आणि मँगनीजचे प्रमाणही लोखंडापेक्षा कमी असते, तर फॉस्फरसचे प्रमाण अत्यल्प असते. पोलादामधील कार्बन हा लोखंडाप्रमाणे मुक्त नसून आयर्न कार्बाइड या संयुगाच्या स्वरूपात असतो. त्यामुळे पोलादाची ताण सहन करण्याची क्षमता लोखंडापेक्षा खूपच जास्त आहे. पोलादाचा कठीणपणा त्यातील कार्बनच्या प्रमाणावर अवलंबून असतो. पोलादाच्या उपयुक्ततेचे क्षेत्र वाढविण्याकरिता कार्बनचे प्रमाण कमी असलेल्या पोलादात टंगस्टन, मँगनीज, निकेल व क्रोमियम यांसारख्या धातूंचे मिश्रण करण्यात येते. उदा. टंगस्टन हा धातू मुळात उच्च तापमानात टिकतो आणि त्यामुळे पोलादाची कठीणता वाढते, म्हणून हत्यारी पोलाद व उच्च तापमानास टिकणारे पोलाद यांमध्ये टंगस्टन वापरतात.
शुभदा वक्टे (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

नवनीत [Print] [Email] कुतूहल - शरीरात वापरलेली संमिश्रे

नवनीत

कुतूहल - शरीरात वापरलेली संमिश्रे

Published: Tuesday, September 23, 2014
काही कारणानं शरीरातील हाड मोडलं असेल किंवा सांधा उखडला असेल तर ते सांधण्यासाठी धातूंच्या संमिश्रांचा वापर केला जातो. पूर्वी सोनं-तांबं हे संमिश्र संपूर्ण दातांवर आवरण देण्याकरिता वापरत. याचं मुख्य कारण सोन्याची रासायनिक अक्रियशीलता. परंतु हल्ली त्याकरिता स्टेनलेस स्टीलचा वापर करतात.
दातांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संमिश्राचा रक्ताशी संबंध येत नाही. पण हाडांना आधार देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पट्टय़ा मात्र रक्ताच्या संपर्कात येतात. या संमिश्राकरिता गंज आणि रसायनरोधकतेबरोबर शरीराची त्यांना सामावून घेण्याची क्षमता हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. शरीरात आलेल्या धातूला शरीराच्या संरक्षण यंत्रणेनं अनावश्यक किंवा अपायकारक ठरविलं तर शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात. या सर्व बाबींचा विचार करता स्टेनलेस स्टील गटातील काही संमिश्रं आणि टायटॅनिअम हा धातू आणि त्याची काही संमिश्रं हाडांना सांधण्यासाठी किंवा आधार देण्यासाठी वापरली जातात. कृत्रिम गुडघा रोपण ही आता सामान्य शस्त्रक्रिया समजली जाते. कृत्रिम गुडघ्याचा सांधा हा टायटॅनिअम या धातूचं संमिश्र आहे.
आपल्या सर्वाच्या परिचयाचं संमिश्र जे दातांसाठी वापरलं जातं ते म्हणजे चांदी-पारा (अमॅलगम) यांचं संमिश्र होय. हे वापरण्याचं मुख्य कारण म्हणजे चांदी पाऱ्यामध्ये एकजीव होते आणि एक मऊ संमिश्र तयार होतं, जे दातांमधल्या पोकळीत सहज भरता येतं. दाबून भरलेलं हे संमिश्र पोकळीचा आकार घेतं. सुरूवातीला मऊ असणारं हे संमिश्र थोडय़ाच वेळात टणक होऊ लागतं आणि चावण्याच्या क्रियेत ते घासून निघून जात नाही. शिवाय चांदीची गंजरोधकता खूपच जास्त असल्यानं अन्नातील आम्लांचा त्यावर काहीच परिणाम होत नाही. संपूर्ण दातांवर जे आवरण बसविलं जातं त्यासाठी मात्र पारा-चांदी या संमिश्राचा वापर करीत नाहीत, तर स्टेनलेस स्टील वापरतात. कारण त्याचा पत्रा बनू शकत नाही. पारा हा सामान्य तापमानाला द्रवरूप असलेला एकमेव धातू आहे. खरंतर शरीरात पारा गेल्यास अपायकारक ठरतो. त्यामुळे दातांसाठी पाऱ्याचं संमिश्र वापरण्यावर काही देशांमध्ये बंदी आहे.