नवनीत
कुतूहल - रसायनशास्त्रातील भारतीय
Published: Tuesday, October 14, 2014
प्रा. बरुणचंद्र ऊर्फ बी. सी. हलदर यांचे सर्व शिक्षण कोलकात्यात झाले. ते प्रा. पी. बी. सरकार यांचे आवडते विद्यार्थी होते. १९४८ साली त्यांना प्रेमचंद रायचंद सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर त्यांना फुलब्राइट, स्मिथ-मंद आणि पलित शिष्यवृत्त्या मिळाल्या. त्यामुळे १९५० साली त्यांना अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण घेणे शक्य झाले. नोत्रेदाम आणि रोचेस्टर विद्यापीठात तर त्यांनी संशोधन केलेच, पण नोबेल पुरस्कार विजेते प्रा. ग्लेनटी सीबॉर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली कॅलिफोíनयातील लॉरेन्स बर्कले लॅबोरेटरीत संशोधन करायची संधी मिळाली. या संशोधनाचे फलित म्हणजे त्यांनी संशोधिलेली चार रेडिओ समस्थानिके ऊर्फ आयसोटोप्स.
अमेरिकेहून ते १९५५ साली भारतात आले व प्रथम रंगून विद्यापीठ आणि नंतर त्यांनी अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठ येथे काम केले. तेथून १९६० साली ते मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये आले; पण लगेच पुढच्या वर्षी त्यांना नागपूरच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये पाठविले. १९७० साली ते मुंबईला आले व इन्स्टिटय़ूटचे संचालक झाले. त्यानंतर १९७२ साली त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक म्हणून पुण्यास पाठविण्यात आले. त्यांना खरा रस होता संशोधनात. त्यामुळे त्यांनी सरकारला विनंती केली की, मला परत मुंबईला इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये जाऊ दे व माझे संशोधन करू दे. त्यांची ही विनंती मान्य करण्यात येऊन ते वर्षभरात मुंबईला आले आणि १९८१ च्या त्यांच्या निवृत्तीपर्यंत त्या पदावर राहिले. महाराष्ट्र राज्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन समितीचे ते उपसचिव होते. डॉ. हलदर इंडियन केमिकल सोसायटी, इन्स्टिटय़ूशन ऑफ न्यूक्लिअर इंजिनीअर्स-लंडन इत्यादी अनेक संस्थांचे आणि त्यांच्या शास्त्रीय नियतकालिकांचे सभासद, संपादक, लेखक होते. या त्यांच्या अजोड कामगिरीबद्दल १९७८ साली कोलकाता विद्यापीठाने त्यांना आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय सुवर्ण पदकाने सन्मानित केले.
प्रा. हलदर यांनी अॅनालिटिकल केमिस्ट्री, न्यूक्लिअर केमिस्ट्री आणि परिसर रसायनशास्त्र यांचे अभ्यासक्रम भारतभर सुरू करून दिले. डॉ. हलदर यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थ्यांनी एमएस्सी आणि पीएचडी केली. त्यांचे स्वत:चे २०० संशोधन निबंध प्रसिद्ध झाले. काटेकोरपणा, टिकाऊपणा आणि कुतूहल हे त्यांच्या अध्यापन, संशोधन आणि वागणुकीचे विशेष हो
No comments:
Post a Comment