Friday, June 27, 2014

के.जी. टू कॉलेज 'टीवायबीकॉम'चा निकाल जाहीर

के.जी. टू कॉलेज


'टीवायबीकॉम'चा निकाल जाहीर

Published: Friday, June 27, 2014
मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीकॉमच्या मार्च महिन्यात घेतलेल्या सहाव्या सत्राच्या परीक्षांचा निकाल गुरूवारी रात्री उशीरा जाहर झाला. हा निकाल ७३.७१ टक्के लागला आहे. या परीक्षेला ६३ हजार ७३७ विद्यार्थी बसले होते. यापैकी ४६ हजार ८३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Sunday, June 22, 2014

गंध पावसाचा- जिओस्मिन

गंध पावसाचा- जिओस्मिन

Published: Monday, June 23, 2014
पावसाळ्याला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा पहिल्या पावसाच्या सरी बरसतात आणि वातावरणात मातीचा एक वेगळाच गंध पसरतो. हा वास काही पावसाच्या थेबांचा नसतो तर अनेक रसायनांच्या मिश्रणाचा तो वास असतो. या वायूंच्या मिश्रणात ओझोन वायूचा समावेश असतो. वातावरणाभोवतीचा संरक्षक थर हा ओझोन वायूचा असतो. विजेच्या चमचमाट होतो तेव्हा हवेतील ऑक्सिजनचे (ड2) ओझोनमध्ये (ड3) रूपांतर होते. कोरडय़ा हवामानात पाऊस येतो तेव्हा जो वास सुटतो त्याला 'पेट्रीकोर' असे संबोधितात. 'पेट्रीकोर' हा शब्द ज्या गंधासाठी वापरतात तो गंध 'जिओस्मिन' या रेणूपासून येत असतो. 'जिओस्मिन' हा शब्द ग्रीक भाषेतील असून त्याचा अर्थ 'पृथ्वीचा वास' असा आहे. हा वासयुक्त रेणू स्ट्रिप्टोमायसेस या जीवाणूत आढळतो. हे जीवाणू मृत पावतात तेव्हा त्यांच्या शरीरातून हा रेणू उत्सर्जति होत असतो. हा रेणू एकप्रकारे बायसायक्लिक अल्कोहोल असून त्याचे रासायनिक सूत्र  उ12ऌ22ड  असे आहे. मानवी नाकाला या रेणूचा वास ५ पी.पी.एम (दशलक्षांश भाग) इतक्या कमी पातळीवर जाणवू शकतो. अन्नात जिओस्मिनचे अस्तित्व असेल तर तो अन्नाची चव बिघडवतो. बीटसारख्या पदार्थात तसेच गोडय़ा पाण्यातील माशात या रेणूचा अंश असतो. हे अन्न शिजविताना त्यात आम्लीय घटक वापरले तर जिओस्मिन वासरहित होते.
पावसाच्या सरीनंतर येणारा वास हा केवळ ओझोन आणि जिओस्मिनमुळेच येतो असे नव्हे तर तो सुगंध वनस्पती तेलापासूनसुद्धा येतो. हा संशोधकांना लागलेला नवा शोध आहे. पावसाआधीच कोरडय़ा वातावरणात काही वनस्पती तेलाचा अंश मुक्तकरतात. ती तेले सभोवतालच्या मातीत किंवा चिकणमातीत शोषली जातात. ही तेले जमिनीत पडलेल्या बियांचे रुजणे थोपविण्यासाठी असतात. अपुऱ्या पाण्याअभावी जर बिया रुजल्या तर त्यांची वाढ नीट होऊ नये, ही त्यामागची नसíगक योजना असते. हुंगावासा वाटणारा पहिल्या पावसानंतर येणारा मातीच्या वासाची ही पाश्र्वभूमी होय.

नवनीत कुतूहल: सिगारेटचा धूर

नवनीत

कुतूहल: सिगारेटचा धूर

Published: Friday, June 20, 2014
धूम्रपानाचे दुष्परिणाम सर्वज्ञात आहेत. तंबाखूयुक्त सिगारेटच्या धूम्रपानाने स्वास्थ्याला धोका असतो व त्यासंबंधी सूचना देणाऱ्या जाहिराती ठायी ठायी नजरेस पडतात. तंबाखूतील निकोटीन हे रसायन, मानसिक उभारी देणारे (सायकोअ‍ॅक्टिव) असते व त्यामुळे सिगारेटचे व्यसन जडते. सिगारेट ओढणाऱ्यांचे आयुर्मान साधारण १४ वर्षांनी कमी होते. गर्भवती बाईने सिगारेटी फुंकल्यास विकृती असलेले बाळ जन्माला येते. त्यात कमी वजन, शारीरिक व्यंग, अकाली जन्म यांचा समावेश असतो. सिगारेटच्या तंबाखूत प्रोपेलिन ग्लायकोल, ग्लिसरॉल यांसारखे आद्र्रता टिकविणारे पदार्थ, सुगंधित द्रव्ये इ. मिसळलेले असतात.
प्रत्यक्ष धूम्रपान करणाऱ्याइतकाच अप्रत्यक्ष धूर पोटात जाणाऱ्यांनादेखील या धुरातील घातक रसायनांचा फटका बसतो. त्यासाठीच तर गाडीघोडय़ातील प्रवासात तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला मज्जाव असतो. धूम्रपानाचे इशारे तर सर्वत्र झळकत असतात. इतके असूनही काही शौकीन मंडळी या व्यसनाच्या आहारी गेलेली आढळतात.
त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ी-्रूॠं१ी३३ी२ किंवाी-्रूॠ२) चा शोध लागलेला आहे. विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या या सिगारेटमधून धूर येत नाही, विशिष्ट प्रमाणातले निकोटिन (तंबाखूमधले नशा देणारे रसायन) धूम्रशौकीनांच्या पोटात जाते. आजूबाजूच्यांना त्याचा कोणताच त्रास होत नसतो.
नव्या शोधांनुसार या सिगारेटमध्ये तंबाखूतले कर्कप्रेरकी असतातच पण त्याव्यतिरिक्त एरवीच्या तंबाखूत न आढळणारी घातक रसायनेदेखील त्यात असतात. तंबाखूत चार प्रकारची नायट्रोसामाइन गटातील रसायने असतात आणि ती कर्कप्रेरकी असतात. तंबाखूत एन- नायट्रोसोनिकोटिन (ठठठ) एन-नायट्रोसोनबेसिक (ठअइ) एन-नायट्रोसोअनाटॅब्बाईट (ठअळ) आणि ४ (मिथाईल नायट्रोसो)-१- (३ पायरीडिल -१ ब्युटेनॉन (ठठङ) ही ती विषारी रसायने होत. ई-सिगारेट्मध्ये तर यांच्या व्यतिरिक्त फॉर्मोल्डिहाइड, 'असिटाल्डिहाइड आणि अक्रोलिन यांसारखी कबरेलीन संयुगे आढळली आहेत. या ई-सिगारेटमधून उत्सर्जति होणारी ग्लिसरॉल आणि प्रोपिलिन ग्लायकोल ही बाष्परूपातील रसायने फारशी अपायकारक नसतात, पण त्यातून बाहेर पडणाऱ्या कॅडमियम, शिसे आणि निकेल या धातूंच्या वाफा संशोधकांना चिंताजनक वाटतात. साधारण सिगारेटमध्ये ही रसायने नसतात. त्यातच ई-सिगारेटमधून बाहेर पडणाऱ्या रसायनांवर नियंत्रण ठेवणारे कायदेकानून अमेरिकेसारख्या प्रगत देशातदेखील नाहीत. भविष्यातला धोका ई-सिगारेटचाही आहे

नवनीत - कुतूहल: कार्बन डायऑक्साइडची विषबाधा

नवनीत - कुतूहल: कार्बन डायऑक्साइडची विषबाधा

कुतूहल: कार्बन डायऑक्साइडची विषबाधा
Published: Saturday, June 21, 2014
आपल्या श्वासोच्छ्वासात कार्बन डायऑक्साइड हा वायू असतो. वनस्पती या वायूचा वापर करून शर्करा तयार करीत असतात. आपल्या श्वसनातील बायप्रोडक्ट म्हणून हा कार्बन डायऑक्साइड वायू आपण श्वासातून मुक्त करतो. वातावरणात वावरणारा कार्बन डायऑक्साइड हा हरितगृह वायूच्या रूपात असतो. तो वायू सोडा वॉटर, थंड पेयांत वापरतात. याच्यापासून कोरडा बर्फ तयार करून औद्योगिक क्षेत्रात वापरला जातो. हा वायू विषारी आहे का, अशी शंकाही आपल्याला येत नाही. पण खरंच तो विषारी आहे? साधारणत: कार्बन डायऑक्साइड वायू विषारी नसतो. आपल्या पेशीतील ज्वलनातून मुक्त झाला की तो रक्तप्रवाहात घुसतो. मग फुप्फुसातून बाहेर पडतो. तरीही तो शरीरभर वावरत असतो.
परंतु जर का आपल्या श्वसनात तो मोठय़ा प्रमाणात आला किंवा आपण प्लास्टिक बॅग किंवा एखाद्या तंबूत वास्तव्य करून पुन:पुन्हा श्वास घेतला आणि जर वायुविजनची सोय नसेल तर या वायूने विषबाधा होऊ शकते. कार्बन डायऑक्साइड वायूच्या विषबाधेचा ऑक्सिजन वायूच्या प्रमाणाशी संबंध नसतो. श्वसनातून पुरेसा ऑक्सिजन मिळत असला तरी कार्बन डायऑक्साइडच्या रक्तातील व ऊतीतील अवाजवी प्रमाणाने काही दुष्परिणामांना तोंड द्यावे लागतेच. रक्तदाबातील वाढ, डोकेदुखी, त्वचेचे फुगणे आणि स्नायूचे आखडणे या त्रासांचा भडिमार होतो. त्याचे प्रमाण वाढले तर हृदयक्रिया अनियमित होणे, जीव घाबरणे, उलटय़ा होणे, बेशुद्ध होणे किंवा मृत्यू येणे या विपरीत गोष्टी घडू शकतात. या विषबाधेला 'हायपर कॅप्निया' किंवा 'हायपर कार्बयिा' असे नाव आहे. शरीरातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अती प्रमाणात वाढले आणि या वायूचा शरीराशी दीर्घकाळ संपर्क आला की वरील जैवरासायनिक प्रक्रिया घडतात. त्यास कारणीभूत ठरणाऱ्या काही बाबी म्हणजे फुप्फुसाचे विकार, बेशुद्ध अवस्था, कमी वायुविजन, निद्राविकारावर ऑक्सिजनचा उपाय करतो त्या वेळचा प्रारंभीचा परिणाम, ज्वालामुखीच्या उद्रेकातील वायू श्वासात जाणे, श्वास रोखून धरणे, कमी दाबाच्या हवेत वावरणे (उदा. अंतराळ, खाणी, बोगदा, बंदिस्त खोली.) इत्या

युजीसीचा आदेश दिल्ली विद्यापीठाने डावलला

युजीसीचा आदेश दिल्ली विद्यापीठाने डावलला

Published: Monday, June 23, 2014
विद्यापीठ अनुदान आयोगाने(युजीसी) सर्व महाविद्यालयांना तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राबवण्यास सांगितलेले असताना दिल्ली विद्यापीठाने मात्र हा आदेश मोडीत काढून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राबवला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या अधिसभेत विद्यार्थ्यांना बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम यांसारख्या पदवीसाठी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार असून त्यात एक मुख्य विषय असणार आहे. दिल्ली विद्यापीठाने काढलेल्या निवेदनानुसार त्यांचा निर्णय हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून आहे. अधिसभेत याबाबतचा ठराव ८१ विरुद्ध १० मतांनी मंजूर करण्यात आला. चौथे वर्ष हे वैकल्पिक असून ज्या विद्यार्थ्यांना, बी.ए., बी. एस्सी. ऑनर्स, बी. कॉम. ऑनर्स व बी.टेक. ऑनर्स करायचे आहे त्यांनी चौथे वर्ष पूर्ण करावे, असे विद्यापीठाचे म्हणणे आह़े

Thursday, June 19, 2014

नवनीत कुतूहल - हायड्रोजन वायू (H2)

नवनीत

Published: Wednesday, June 18, 2014
इंधनांची वानवा होत चालली आहे. त्यामुळे दोन हायड्रोजन अणूंनी बनलेला हा स्फोटक वायू इंधन म्हणून वापरता येईल किंवा कसे? त्यावर विचार चालू आहे. खनिज तेल, कोळसा, लाकूडफाटा या इंधनांमुळे हवेचे प्रदूषण घडते व जागतिक स्तरावर वातावरण बदलत जाते. याउलट वाहतुकीसाठी गाडय़ांच्या इंजिनात हायड्रोजन वायूचा वापर केला तर केवळ ऑक्सिजन वायू व बाष्पाची निर्मिती होते. हे दोन्ही घटक वातावरणाला बाधा आणणारे नाहीत.
निसर्गातील आम्ल-अल्कलीचा समतोल राखण्यास हायड्रोजनचा हातभार लागतो. कारण त्याचा अणू निरनिराळ्या परिस्थितीत धनभार वा ऋणभार धारण करू शकतो. हायड्रोजनचा समस्थानिक असलेल्या प्रोटियम या मूलद्रव्यात एक प्रोटॉन असतो व न्यूट्रॉन नसतो. त्याचे हे एक अणुरूप या विशाल विश्वात मोठय़ा प्रमाणात अस्तित्वात आहे. ताऱ्यांमध्ये हा वायू प्लाझ्माच्या रूपात असतो. हेन्री स्कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने १७६६-८१ च्या दरम्यान धातूवर आम्लाची प्रक्रिया करून या वायूची निर्मिती केली होती. औद्योगिक क्षेत्रात नसíगक वायूपासून त्याची उत्पत्ती होते.
परंतु हायड्रोजन वायूचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करून तो 'फ्युएल सेल'द्वारा दूरवर पसरवलेल्या ग्राहकांना पुरवणे खíचक असते. 'फ्युएल सेल'ची अवास्तव किंमत आणि हायड्रोजन वायूची वितरण करणारी यंत्रणा या दोन समस्या मोठय़ा जिकिरीच्या ठरत आहेत. जनरल मोटार, टॉयोटा, होंडा या दादा कंपन्या मात्र हायड्रोजन वायूवर धावणाऱ्या गाडय़ा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव तसेच भरपूर खर्च आणि कमी मागणी त्यामुळे पेट्रोल पंपावर हायड्रोजन वायूच्या वितरणाची यंत्रणा बसवून घ्यायला वितरक नाखूश असतात.
हायड्रोजन वायू एक तर खनिज तेलांतून मिळवला जातो किंवा खनिज इंधनाद्वारे घडवून आणल्या जाणाऱ्या विद्युतप्रक्रियांतून निर्माण केला जातो. त्यामुळे या निर्मितीत नकळत हवेचे प्रदूषण होत राहतेच. त्यामुळे जल-वायू-सौरऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करून हायड्रोजन वायूची निर्मिती करता आली तरच या वायुरूप इंधनाची 'क्लीन फ्युएल' म्हणून प्रशंसा होईल.
हायड्रोजन वायूचा वाहनातील इंधन म्हणून वापर करण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून प्रयत्न चालू आहेत. 'मोअर िथग्स चेंज मोअर दे स्टे', हीच गत हायड्रोजन इंधनाबाबत होत आहे.
जोसेफ तुस्कानो (वसई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

कुतूहल - कार्बन मोनॉक्साईड (CO)

कुतूहल - कार्बन मोनॉक्साईड (CO)

Published: Thursday, June 19, 2014
वातावरणातील कार्बन डायॉक्साईड (CO2)चा दबदबा वाढल्यामुळे की काय, आपण त्याच्या धाकटय़ा भावंडाकडे म्हणजे कार्बन मोनॉक्साईड (CO)कडे कानाडोळा केलेला आढळतो. पण हा एक अल्प प्रमाणात वावरणारा घातक वायू आहे.
एका गॅरेजमधल्या मेकॅनिकला एकदा दुपारची वामकुक्षी घ्यायची होती म्हणून गिऱ्हाईकाच्या गाडीतील वातानुकूलित यंत्रणा सुरू करून आरामात आत पहुडला. त्याला मस्त झोप लागली खरी, पण त्याच्या गाडीतल्या आतल्या वातावरणात जमा झालेला कार्बन-मोनॉक्साईड वायू वातानुकूलित यंत्रणेच्या हवेत फिरत राहिला. तो त्या मेकॅनिकच्या शरीरात गेला. तो बिचारा मेकॅनिक झोपेतून उठलाच नाही. आपल्या बेडरूममध्ये वातानुकूलित यंत्रणा (ए.सी.) सुरू असेल तर मेणबत्ती मुळीच लावू नये. मेणबत्ती अर्धवट जळत असताना आजूबाजूला कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जति होतो.
कार्बन मोनॉक्साईड जेव्हा फुप्फुसात घुसतो तेव्हा तो रक्तातील हिमोग्लोबिनशी संयोग पावतो. त्यामुळे शरीरभर एरवी ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या हिमोग्लोबिनसोबत हा घातक वायू शरीरपेशीत पोहोचतो. शरीरपेशी ऑक्सिजनला वंचित होतात व माणसाला 'हायपोक्सिया' ही व्याधी जडते.
शरीरात कार्बन मोनोक्साईड असेल तर डोकेदुखी, मळमळ, थकवा ही फ्ल्यू तापासारखी लक्षणे आढळतात. जसे त्याचे प्रमाण वाढत जाते तसतशी मन:स्थितीचा गोंधळ, अशक्तपणा, चक्कर येणे, सुस्ती येणे ही लक्षणे उठून दिसतात. मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही म्हणजे माणूस बेशुद्ध पडतो, मेंदूला इजा होते, माणूस कोमात जातो आणि मृत्युमुखी पडतो. हा वायू सतत शरीरात गेला तर काही मिनिटांतच हे सारे घडते आणि आपण बळी जाऊ शकतो. हळूहळू आणि कमी प्रमाणात हा वायू शरीरात जातो तेव्हा इंद्रियांना इजा होते, विविध व्याधी माणसाचा जीव घेतात. मुले आणि पाळीव प्राण्यांना विशेषकरून या वायूची त्वरित बाधा होते.
हा वायू वाहतूक करणाऱ्या गाडय़ांतून बाहेर पडणारा धूर, आग, धूम्रपान, खराब धुरांडी, लाकडाचे जळण, नादुरुस्त गॅसवर चालणारी उपकरणे यांद्वारे आपल्या नाकातून शरीरात घुसतो. या वायूचा आजूबाजूच्या परिसरातील थांगपत्ता लागावा म्हणून 'इलेक्ट्रॉनिक अलार्म' उपलब्ध असतात. हे तपासक आपणास त्यासंबंधी सावध करतात.
जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंब