नवनीत
Published: Wednesday, June 18, 2014
इंधनांची
वानवा होत चालली आहे. त्यामुळे दोन हायड्रोजन अणूंनी बनलेला हा स्फोटक
वायू इंधन म्हणून वापरता येईल किंवा कसे? त्यावर विचार चालू आहे. खनिज तेल,
कोळसा, लाकूडफाटा या इंधनांमुळे हवेचे प्रदूषण घडते व जागतिक स्तरावर
वातावरण बदलत जाते. याउलट वाहतुकीसाठी गाडय़ांच्या इंजिनात हायड्रोजन वायूचा
वापर केला तर केवळ ऑक्सिजन वायू व बाष्पाची निर्मिती होते. हे दोन्ही घटक
वातावरणाला बाधा आणणारे नाहीत.निसर्गातील आम्ल-अल्कलीचा समतोल राखण्यास हायड्रोजनचा हातभार लागतो. कारण त्याचा अणू निरनिराळ्या परिस्थितीत धनभार वा ऋणभार धारण करू शकतो. हायड्रोजनचा समस्थानिक असलेल्या प्रोटियम या मूलद्रव्यात एक प्रोटॉन असतो व न्यूट्रॉन नसतो. त्याचे हे एक अणुरूप या विशाल विश्वात मोठय़ा प्रमाणात अस्तित्वात आहे. ताऱ्यांमध्ये हा वायू प्लाझ्माच्या रूपात असतो. हेन्री स्कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने १७६६-८१ च्या दरम्यान धातूवर आम्लाची प्रक्रिया करून या वायूची निर्मिती केली होती. औद्योगिक क्षेत्रात नसíगक वायूपासून त्याची उत्पत्ती होते.
परंतु हायड्रोजन वायूचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करून तो 'फ्युएल सेल'द्वारा दूरवर पसरवलेल्या ग्राहकांना पुरवणे खíचक असते. 'फ्युएल सेल'ची अवास्तव किंमत आणि हायड्रोजन वायूची वितरण करणारी यंत्रणा या दोन समस्या मोठय़ा जिकिरीच्या ठरत आहेत. जनरल मोटार, टॉयोटा, होंडा या दादा कंपन्या मात्र हायड्रोजन वायूवर धावणाऱ्या गाडय़ा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव तसेच भरपूर खर्च आणि कमी मागणी त्यामुळे पेट्रोल पंपावर हायड्रोजन वायूच्या वितरणाची यंत्रणा बसवून घ्यायला वितरक नाखूश असतात.
हायड्रोजन वायू एक तर खनिज तेलांतून मिळवला जातो किंवा खनिज इंधनाद्वारे घडवून आणल्या जाणाऱ्या विद्युतप्रक्रियांतून निर्माण केला जातो. त्यामुळे या निर्मितीत नकळत हवेचे प्रदूषण होत राहतेच. त्यामुळे जल-वायू-सौरऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करून हायड्रोजन वायूची निर्मिती करता आली तरच या वायुरूप इंधनाची 'क्लीन फ्युएल' म्हणून प्रशंसा होईल.
हायड्रोजन वायूचा वाहनातील इंधन म्हणून वापर करण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून प्रयत्न चालू आहेत. 'मोअर िथग्स चेंज मोअर दे स्टे', हीच गत हायड्रोजन इंधनाबाबत होत आहे.
जोसेफ तुस्कानो (वसई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
No comments:
Post a Comment