Published: Tuesday, June 17, 2014
मुंबई
विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन
नोंदणीची मुदत १९ जूनपर्यंत वाढविली आहे. यामुळे अद्याप नाव नोंदणी न करता
आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नोंदणी करता येणार आहे. आधीच्या
वेळापत्रकानुसार ही मुदत सोमवारी संपणार होती. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठाने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २ जूनपासून प्रवेशपूर्व नोंदणी सुरू असून विद्यार्थ्यांना १६ जूनपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येणार होती. अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नोंदणी करता न असल्याने ही मुदत १९ जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळपर्यंत २ लाख ४८ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांनी ६ लाख ५३ हजार ३५४ अर्ज भरले आहेत.
No comments:
Post a Comment