Monday, June 30, 2014

नवनीत कुतूहल: इथेनॉल व जैववायू (बायोगॅस) इंधन

नवनीत


कुतूहल: इथेनॉल व जैववायू (बायोगॅस) इंध

Published: Monday, June 30, 2014
कोणती कबरेदके वापरली तर कशी दारू मिळेल याचे ज्ञान माणसाला अनादी कालापासून अवगत आहे आहे. या दारूत इथेनॉल नावाचा महत्वाचा घटक असतो. विविध वनस्पतीजन्य शर्कारामय कबरेदके आंबवून इथेनॉलची निर्मिती करता येते. त्यासाठी यीस्टचा उपयोग करतात. पेट्रोलमध्ये विविध प्रमाणात इथेनॉल मिसळून अमेरिकेत व ब्राझीलमध्ये मोटारी चालवतात. हे इथेनॉल कसावा, बटाटे, मका, ऊस यांपासून बनवितात. इथेनॉलवर चालण्यासाठी मात्र इंजिनात थोडा बदल करावा लागतो.
कुठल्याही जैव वस्तुमानाचे जेव्हा प्राणवायूशिवाय विघटन होते तेव्हा मिथेन, कार्बन मोनॉऑक्साइड, व हायड्रोजन इत्यादी ज्वालाग्राही वायू निर्माण होतात व ते नसíगक वायूप्रमाणे इंधन म्हणून वापरता येतात. साधारणत जैववायू शेणापासून तयार होतो. जैववायूपासून वीज निर्मिती सुद्धा होते. शिवाय वाहने चालवण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. कुठल्याही टाकाऊ जैववस्तुमानापासून किवा शेणापासून निर्माण झालेला जैववायू(बायोगॅस) इंधन म्हणून तर कामाला येतोच, पण त्यामुळे वातावरणाचे प्रदूषणही कमी होते. जिथे जिथे कबरेदके असतील ती सर्व कबरेदके जैववायू निर्मितीसाठी वापरता येतात. ही आंबवण्याचीच क्रिया असते, फक्त यात वापरण्यात येणारे सूक्ष्मजीव निराळे असतात.
भाभा अणुशक्ती केंद्राने मुंबईत एका 'निसर्गऋण संयंत्रा'ची कल्पना राबविली आहे. यात स्वयंपाकघर, दवाखाने व हॉटेल यांमधील घनजैव कचरा तसेच कागद, गवत, बगास्से, जंगली वनस्पती वगरेपासून जैववायू निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. यापासून प्रथम नसíगकरीतीने विघटन होणारा कचरा वेगळा केला जातो आणि त्याचे एका पातळ पेस्ट(स्लरी)सारख्या पदार्थात रुपांतर करतात. त्याचे पहिल्यांदा प्राणवायूच्या समवेत व नंतर प्राणवायूच्या शिवाय विघटन करण्यात येते. यासाठी वेगवेगळे सूक्ष्मजंतू वापरले जातात. प्राणवायूच्या समवेत होणाऱ्या विघटनात तापमान वाढवण्यासाठी सौरऊर्जा वापरतात. या प्रक्रियेपासून मिथेन, कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकले जातात. शिवाय उरलेले पाणी परत वापरता येते. मिथेन जळणासाठी किंवा विद्युत निर्मितीसाठी वापरता येतो. विघटन न झालेले सर्व वस्तुमान खत म्हणून वापरता येते. प्राणवायू समवेत जैव कचऱ्याचे विघटन करण्याची प्रक्रिया प्राण वायूशिवाय होणाऱ्या विघटनापूर्वी करणे हा मोठा फरक इतर जैववायू प्रकल्पात आणि निसर्गऋण प्रकल्पात आहे.

No comments:

Post a Comment