Published: Thursday, June 19, 2014
दहावीच्या
विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली असून मुंबई महानगर
क्षेत्रात ऑनलाइन प्रवेश असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी निकालापूर्वीच
अर्ज भरून ठेवले होते. निकाल लागल्यावर त्यांनी महाविद्यालयांच्या
पर्यायांचे अर्ज सादर केले. पहिल्या दिवशी मुंबई महानगर क्षेत्रातील एकूण २५,११० विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली. यातील ११ विभागांमधील १४,०८९ विद्यार्थ्यांनी पर्याय अर्ज अर्धवट ठेवले आहेत. तर ८,५६६ विद्यार्थ्यांनी हे अर्ज पूर्ण केले आणि २,४५५ विद्यार्थ्यांनी अर्ज नक्की केले.
अर्ज भरण्याचा पहिला टप्पा बुधवापर्यंत ९५,२५४ विद्यार्थ्यांनी सुरू केला आहे. यातील ७५,७८७ विद्यार्थ्यांचे अर्ज मान्य झालेले आहेत.
जेईई अॅडव्हान्सचा आज निकाल
मुंबई : आयआयटीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल http://jeeadv.iitd.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. जेईई मेन या परीक्षेतील पहिल्या दीड लाख विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स दिली होती. देशभरात आयआयटीमध्ये ९,७८४ जागा उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment