Sunday, June 22, 2014

गंध पावसाचा- जिओस्मिन

गंध पावसाचा- जिओस्मिन

Published: Monday, June 23, 2014
पावसाळ्याला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा पहिल्या पावसाच्या सरी बरसतात आणि वातावरणात मातीचा एक वेगळाच गंध पसरतो. हा वास काही पावसाच्या थेबांचा नसतो तर अनेक रसायनांच्या मिश्रणाचा तो वास असतो. या वायूंच्या मिश्रणात ओझोन वायूचा समावेश असतो. वातावरणाभोवतीचा संरक्षक थर हा ओझोन वायूचा असतो. विजेच्या चमचमाट होतो तेव्हा हवेतील ऑक्सिजनचे (ड2) ओझोनमध्ये (ड3) रूपांतर होते. कोरडय़ा हवामानात पाऊस येतो तेव्हा जो वास सुटतो त्याला 'पेट्रीकोर' असे संबोधितात. 'पेट्रीकोर' हा शब्द ज्या गंधासाठी वापरतात तो गंध 'जिओस्मिन' या रेणूपासून येत असतो. 'जिओस्मिन' हा शब्द ग्रीक भाषेतील असून त्याचा अर्थ 'पृथ्वीचा वास' असा आहे. हा वासयुक्त रेणू स्ट्रिप्टोमायसेस या जीवाणूत आढळतो. हे जीवाणू मृत पावतात तेव्हा त्यांच्या शरीरातून हा रेणू उत्सर्जति होत असतो. हा रेणू एकप्रकारे बायसायक्लिक अल्कोहोल असून त्याचे रासायनिक सूत्र  उ12ऌ22ड  असे आहे. मानवी नाकाला या रेणूचा वास ५ पी.पी.एम (दशलक्षांश भाग) इतक्या कमी पातळीवर जाणवू शकतो. अन्नात जिओस्मिनचे अस्तित्व असेल तर तो अन्नाची चव बिघडवतो. बीटसारख्या पदार्थात तसेच गोडय़ा पाण्यातील माशात या रेणूचा अंश असतो. हे अन्न शिजविताना त्यात आम्लीय घटक वापरले तर जिओस्मिन वासरहित होते.
पावसाच्या सरीनंतर येणारा वास हा केवळ ओझोन आणि जिओस्मिनमुळेच येतो असे नव्हे तर तो सुगंध वनस्पती तेलापासूनसुद्धा येतो. हा संशोधकांना लागलेला नवा शोध आहे. पावसाआधीच कोरडय़ा वातावरणात काही वनस्पती तेलाचा अंश मुक्तकरतात. ती तेले सभोवतालच्या मातीत किंवा चिकणमातीत शोषली जातात. ही तेले जमिनीत पडलेल्या बियांचे रुजणे थोपविण्यासाठी असतात. अपुऱ्या पाण्याअभावी जर बिया रुजल्या तर त्यांची वाढ नीट होऊ नये, ही त्यामागची नसíगक योजना असते. हुंगावासा वाटणारा पहिल्या पावसानंतर येणारा मातीच्या वासाची ही पाश्र्वभूमी होय.

No comments:

Post a Comment