Tuesday, October 13, 2015

अनुभव हाच शिक्षक संस्कार हा फार मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. आपल्याला रोज येणारे अनुभव डोळसपणे पाहिले

अनुभव हाच शिक्षक

संस्कार हा फार मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. आपल्याला रोज येणारे अनुभव डोळसपणे पाहिले

शोभा भागवत | October 10, 2015 05:03 am
संस्कार हा फार मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. आपल्याला रोज येणारे अनुभव डोळसपणे पाहिले, त्याबद्दल विचार केला तर अनेक कल्पना सुचत राहतात. अनुभव हाच मोठा शिक्षक असतो.
जी माणसं समाज बदलण्याचं काम करतात, लढे उभारतात, माणसांना चांगल्या कामाची स्फूर्ती देतात, नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्यांच्या फौजा उभ्या करतात, अशा माणसांवर कोण संस्कार करतं? त्यांच्या म्हणण्यानुसार, लहानपणी पालक, शिक्षक, आणखीही कोणी जवळची माणसं यांचं मार्गदर्शन होतं. पण ते काही काळच असतं. त्यातून एक गोष्ट घडते की माणसाच्या मनाचा टिपकागद बनतो. आजूबाजूच्या घटना त्याच्यावर परिणाम करतात. तो संवेदनशील बनतो आणि त्या संवेदनेला प्रामाणिक प्रतिसाद देत तो मोठा होत जातो. गांधीजी म्हणत, ‘माझं जीवन हाच माझा संदेश आहे.’ त्यांनी स्वत: सफाईपासून राजकीय लढा उभारण्यापर्यंत सर्व कामं केली. सर्व कामं ते जीव ओतून करत.
हातातलं काम जीव ओतून आणि चांगलंच करायचं हा संस्कार आपण मुलांवर करू शकतो का? तसं घरात वातावरण असलं तर मुलांनाही ती सवय लागते. आई तिचं काम नीटनेटकं करते, तिच्या मनात उद्याचं प्लॅनिंग असतं. ‘डबा करायला विसरलेच!’, असं ती म्हणत नाही, बाबा त्यांचं काम मनापासून, जबाबदारीने करतात हे घरात पाहणारं मूल तसाच विचार करणार. मनापासून, जबाबदारीने याबरोबर ‘वेळेवर’ हेही महत्त्वाचं असतं.
आमच्या घरात अनिल बाहेर जाताना ‘मी तीनच्या ठोक्याला परत येईन’, असं सांगून जायचा. मुलं ते ऐकत असायची. आणि मग खेळताना छोटा शोनिल मला सांगायचा, ‘मी तीनच्या ठोक्याला येतो.’ त्याला त्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता तो हळूहळू कळला आणि ‘वेळेवर’ या गोष्टीचं महत्त्वही कळलं.
आपल्या शब्दाची किंमत आपणच ठेवावी लागते. एखादं जबाबदारीचं काम मी करीन म्हटल्यावर ‘विसरलेच!’ असं म्हणायची वेळ येऊ नये आणि आली तर लाज वाटली पाहिजे हे लहानपणापासून मूल ऐकतं तेव्हा ते वक्तशीर होण्याची शक्यता असते. शक्यता असते एवढंच आपण म्हणू शकतो. या गोष्टीचा अतिरेक झाला, तर मुलं त्याला विरोधही करतात आणि ‘वेळेवर’ या शब्दाला थाराच देत नाहीत.
संस्कार सहजपणेच व्हायला हवेत. मारून, जबरदस्ती करून नाही होत संस्कार! पहाटे उठून दिवस सुरू करायचा तो प्रार्थनेने, अशी पद्धत अनेक निवासी शाळा, सुधारगृहं यांच्यात असते. पण ती झोपमोड करणारी घंटा किंवा भोंगा यांचा काही मुलांना इतका राग येतो की मोठेपणी ती कधीही सकाळी उठून प्रार्थना म्हणत नाहीत. असा मुलांच्या मनात विरोध निर्माण होईल अशी जबरदस्ती घरात असू नये. घरात आपल्याच मुलांशी संवाद साधायला वाव असतो. रात्री ती झोपत असताना असा वेळ मिळतो तेव्हा आपण त्यांना शांतपणे ‘वेळेवर’ शब्दाचं महत्त्व सांगू शकतो. वेळा पाळल्या तर आपल्या हातून दुप्पट कामं होतात. पण मुलांवर हा संस्कार कसा होणार? त्यांना तर सवय असते एक तास, दोन तास, चार तास ही उशिरा शाळेत येणाऱ्या राजकीय पाहुण्यांची. त्यासाठी मुलं ताटकळून उभी असतात, उन्हात बसलेली असतात. उशिरा गेलं तर आपलं महत्त्व वाढतं असं काही लोकांना वाटत असतं! राजकीय व्यक्तींचं जाऊ द्या पण आपण सामान्य माणसं एक गोष्ट करू शकतो की वेळ पाळायची तर उलटा हिशेब करायचा. मला तीन वाजता एका ठिकाणी पोचायला हवं तर अडीचलाच घरातून निघायला हवं याचा अर्थ दोनला माझं आवरून मी तयार असायला हवं म्हणजेच दीडला जेवणं आटोपलेली हवीत. म्हणजे एकला जेवायला बसावं लागेल, साडेबाराला स्वयंपाक तयार असायला हवा. अकरा साडेअकरालाच स्वयंपाकाला सुरुवात व्हायला हवी, पुढची घाई लक्षात घेता त्या दिवशी पालेभाजी निवडत बसायला वेळ नसेल, गवारीसारखी भाजी चालणार नाही, चटकन् होणारी भाजी करावी लागेल. असा उलटा हिशेब करता आला तर वेळेवर पोचणं हा प्रश्न उरत नाही.
वेळेवर पोचण्यासारखे इतरही अनेक किरकोळ वाटणारे पण अतिशय उपयोगी संस्कार असतात. संस्कार साधेपणाचे असतात, कामाबद्दलचे असतात, पर्यावरणाबद्दलचे असतात, साफसफाईचे असतात, पैसे योग्य प्रकारे वापरण्याचे असतात, माणसांशी वागण्याचे असतात, काटकसरीचे असतात, व्यायामाचे असतात, भाषेचेही संस्कार असतात. महत्त्वाची कागदपत्रं नीटनेटकी ठेवण्याचे असतात.
दिवाळीच्या सुट्टीपूर्वी आम्ही ‘बालभवन’मधल्या मुलांना फटाक्यांबद्दल सांगतो. फटाके का उडवायचे नाहीत त्याने हवा खराब होते, तीच आपल्या शरीरात जाते, मोठय़ा आवाजाने कान दुखावणं, ऐकू न येणं असं होऊ शकतं. वयस्कर आजी-आजोबांना आवाजाचा त्रास होतो. लहान बाळं दचकून उठतात, फटाके वाजवणं म्हणजे पैसे जाळून टाकणं आहे, अपघात होतात, मुलांना भाजू शकतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फटाकांच्या कारखान्यात लहान मुलं काम करतात, तिथली दारू पावडर त्यांच्याही शरीरात जाते त्यांचं आयुष्य कमी होतं. मग आपण फटाके उडवायचे का? मुलं निर्धार करतात आणि बरीच मुलं फटाके उडवत नाहीत. मात्र एखाद दुसरा सांगतो, ‘बाबा म्हणाले, असं काही नसतं, आपण मजा करायची असते.’ म्हणजे आपण सांगितलेलं गेलं का सगळं पाण्यात? समाजात अशी गंभीरपणाची अॅलर्जी असलेली, पार्टी मूडमध्ये सतत वावरणारी माणसं असतातच. त्यांना समाजाशी काही घेणंच नसतं.
शरीराच्या आरोग्यात आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींचं फार महत्त्व आहे. शेळीच्या समोर एका ताटात पाला आणि एकात बर्फी ठेवली तर शेळी पालाच खाते. बर्फीकडे बघतही नाही. हेच जन्मत: आहाराचं ज्ञान मुलांना असतं. त्यांचा कल योग्य गोष्टी खाण्याकडेच असतो. गरजेपेक्षा जास्त ती खात नाहीत पण हळूहळू खाण्यासाठी जबरदस्ती, बिस्किट, चॉकलेट, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक अशा गोष्टींची ओळख झाली की ती चांगलं खाणं विसरतात आणि चटकमटक खाऊ लागतात. मध्ये ग्रामीण भागात राहणारी, वाढणारी जागरूक आई-वडील असलेली एक छोटी सांगत होती, ‘माझ्या हातात हे काय आहे? काकडी! पण मी तिचं नाव चॉकलेट ठेवलंय् आणि ती मी खातेय.’ तिची युक्ती फारच छान! एरवीदेखील ही मुलगी भूक लागली की टोमॅटो, गाजर, काकडी, चिक्की अशा गोष्टी खाते. चॉकलेट, बिस्किट नाही. तिची आई आणि बाबा अशी खरेदीच करत नाहीत. काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा मात्र घरात ठेवतात.
व्यायाम खरं तर नियमित करायला हवा पण लहान मुलांच्या आयांनी वेळ कुठून काढावा? एक तास केवळ स्वत:साठी ठेवून बघावा काय जादू होते ती! हवं तर सहाला उठायची सवय असेल तर पाचला उठायची सवय करावी आणि त्या वेळात व्यायाम करावा. घरी व्यायाम होत नसेल तर जवळपास जिमला जावं. किंवा चालून यावं तासभर, योगासनं, प्राणायाम करता येईल. एखाद्या मैत्रिणीसह व्यायाम करावा, पण व्यायाम केलाच पाहिजे. व्यायामात तोचतोचपणा नको. नवीन काही शिकत राहिलं तर आणखीनच छान वाटतं. आई-वडील घरात नियमित व्यायाम करतात हे पाहिलं की मुलांनाही ती आवड वाटू लागते.
खरं तर संस्कार हा फार मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. पण तो सगळा हातात घेण्यापेक्षा आपल्याला रोज येणारे अनुभव डोळसपणे पाहिले, त्याबद्दल विचार केला तर अनेक कल्पना सुचत राहतात. आपले आपले प्रयोग करता येतात. आपल्या मुलाचं मन टिपकागदासारखं आहे का? त्याला अनुभवांमधलं सौंदर्य, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा लक्षात येतं का? दुसऱ्याचा विचार करून त्याला काय हवं आहे ते कळलं का? संवेदनक्षम मुलाला संस्कार म्हणजे काय ते अनुभवांमधूनच शिक्षकांना शिकवावं लागते. प्रत्यक्ष अनुभव हाच मोठा शिक्षक असतो. तो कोणापेक्षाही अधिक चांगलं शिकवतो.
shobhabhagwat@gmail.com
First Published on October 10, 2015 5:03 am
Web Title: experience a great teacher

Friday, October 9, 2015

व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केंद्र किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी लागणारा कालावधी हा सर्वसाधारणपणे पूर्व परीक्षा, मुख्य

व्यक्तिमत्त्वाची जडणघडण

केंद्र किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी लागणारा कालावधी हा सर्वसाधारणपणे पूर्व परीक्षा, मुख्य

फारूक नाईकवाडे | October 5, 2015 07:25 am
9
केंद्र किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी लागणारा कालावधी  हा सर्वसाधारणपणे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असा वर्षभराचा असतो. त्यातही राज्य लोकसेवा आयोगाचा कार्यक्रम थोडा धीमा असतो. एखादी परीक्षाप्रक्रिया वर्षभराहूनही अधिक काळ सुरू राहण्याची शक्यता असते. स्पर्धापरीक्षेच्या एका प्रयत्नासाठी किमान वर्षभरापासून अभ्यास सुरू करणे अपेक्षित असते. म्हणजेच परीक्षेच्या एका प्रयत्नासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो आणि बहुतांश उमेदवारांना यशस्वी होण्यासाठी दोन-तीन प्रयत्न लागतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षा तयारीच्या प्रक्रियेत संयम आणि सातत्य या बाबी महत्त्वाच्या ठरतात.
स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीच्या वेळेस पॅनेलच्या सदस्यांचा सर्वच उमेदवारांसाठीचा दृष्टिकोन तटस्थ असतो. कोणत्याही उमेदवाराबाबत त्यांनी कसलाही पूर्वग्रह बाळगलेला नसतो. मुलाखतीदरम्यान उमेदवार दबावमुक्त आणि तणावरहित होऊन तो सहजपणे मुलाखतीला सामोरा जाईल, याची ते काळजी घेतात. उमेदवाराला प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ देतात. स्पर्धा परीक्षेची मुलाखत नेहमीच प्रसन्न वातावरणात पार पडते आणि म्हणूनच उमेदवारांनीही मुलाखतीला तितक्याच सहजपणे आणि उत्साहाने सामोरे जायला हवे.
आजच्या स्पर्धात्मक युगात प्रभावी व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे ठरते. व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ बाहय़ सौंदर्य असा याचा मर्यादित अर्थ नाही, तर व्यक्तीच्या अंगभूत गुणांनाही व्यक्तिमत्त्वात महत्त्वाचे स्थान असते. व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी बुद्धिमत्तेसोबतच निर्णयक्षमता, संवादकौशल्य, दुर्दम्य आत्मविश्वास, बुद्धिमत्तेचा आणि कल्पनेचा सर्जनात्मक वापर, धर्य, नेतृत्वगुण, सकारात्मक वृत्ती, कठोर परिश्रम करण्याची तयारी, दृढ इच्छाशक्ती, लवचीकता, पारदर्शकपणा, स्पष्टपणा, ताíकक विचार, शिष्टाचार या सर्व पलूंचा विकास होण्याची गरज आहे. उमेदवारांनी लक्षात ठेवायला हवे की, प्रभावी व्यक्तिमत्त्वाची निर्मिती ही एक निरंतर प्रक्रिया आहे.
आत्मविश्वास
मुलाखतीच्या दरम्यान उमेदवाराचा आत्मविश्वास जोखला जातो. तो त्याच्या वागण्याबोलण्यात, विचारांमधून दिसायला हवा. असा आत्मविश्वास उमेदवाराला यश मिळविण्यासाठी अंतर्गत प्रेरणा आणि सामथ्र्य देतो. परिश्रमाची पराकाष्ठा केल्याशिवाय आत्मविश्वास जागा होत नाही, हे स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी कायम लक्षात ठेवायला हवे. जर आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून कठोर परिश्रम केले तर उत्तर देताना उमेदवारांचा आत्मविश्वास आपोआप उंचावतो. आत्मिक शक्तीचा विकास होऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व कणखर बनते. प्रगतिपथावर अग्रेसर राहण्यासाठी आत्मविश्वासाच्या भक्कम पायावर व्यक्तिमत्त्वाची इमारत उभी करायला हवी.
प्रयत्नांतील सातत्य
मुलाखतीची तयारी करण्याच्या दृष्टीने  सातत्यपूर्ण प्रयत्नांना अतिशय महत्त्व आहे. स्पर्धा परीक्षेसारख्या दीर्घकालीन प्रक्रियेत सातत्य राखणे हीच मुळात संयमाची परीक्षा असते. एखाद्या उमेदवाराची बुद्धिमत्ता कुशाग्र असली तरीही, जर त्याच्या प्रयत्नांत सातत्य नसेल तर स्पध्रेत तो मागे राहू शकतो. या प्रयत्नांमध्ये उतावळेपणाला अजिबातच जागा असता कामा नये.
शिष्टाचार
ज्ञानाची संपन्नता शिष्ट आणि सौम्य वर्तणुकीच्या कोंदणात अधिक प्रभावी होते. उमेदवाराकडे प्रगल्भ ज्ञान असूनही जर त्याच्या वागण्याबोलण्यात उद्दामपणा, विचारातील हटवादीपणा, जहालपणा, आक्रमक देहबोली या बाबी नजरेस आल्या तर त्या त्याच्या यशाच्या मार्गातील
अडसर ठरू शकतात. उमेदवाराच्या वागण्याबोलण्यातून मुलाखत मंडळातील सदस्यांचे, उमेदवाराबाबत एक नसíगक मत तयार होते. त्याबाबत उमेदवारांनी सतर्क असायला हवे.
सकारात्मक विचार
व्यक्तिमत्त्वाचे उत्तम पोषण होण्याकरता समतोल आणि सकारात्मक विचारांचे योगदान मोलाचे असते. मनात सकारात्मक विचार असतील तर आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वच्छ राहतो. आकर्षक, पारदर्शी, प्रभावशाली आणि समृद्ध व्यक्तिमत्त्वासाठी हे आवश्यक आहे.
दृढ संकल्पशक्ती
दृढ संकल्पामुळेच अवघड ध्येय साध्य होते. ‘मुश्कील नही कुछ अगर ठान लिजीए’ हे तत्त्व लक्षात घेऊन ध्येयपथावर पुढे गेले पाहिजे. संकल्पामध्ये सामथ्र्य असते. यासाठी आपले ध्येय ठरवून मार्गक्रमण केले पाहिजे. दृढ संकल्पासाठी स्थिर मनाची आवश्यकता असते. मन स्थिर असेल तर ते विचलित होणार नाही व तुम्ही ध्येयपथावर पुढे जात राहाल. मनाचे स्थर्य संकल्पशक्ती वाढवू शकते. स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम या विषयीची एक योजना तयार करायला हवी. दृढ इच्छाशक्ती आणि मन स्थिर असले तर सफलता सहज मिळू शकते.
संकल्पशक्ती बळकट करण्यासाठी सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत. त्याकरता नकारात्मक भावनांना बाजूला ठेवा. आपल्या प्रयत्नांचे सातत्याने निरीक्षण करा. आपल्या क्षमतांचे मूल्यमापन करा. आवश्यकतेप्रमाणे त्यांचा विकास करा. स्वत:ला तपासून घ्या. भाग्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:च्या मेहनतीवर विश्वास ठेवा. प्रसिद्ध शायर नूर लखनवी यांचा शेर आहे..
‘मेरे हाथों की लकीरों के
इजाफे हैं गवाह,
मंने पत्थर की तरह खुद को
तराशा है बहोत’
First Published on October 5, 2015 1:07 am
Web Title: personality formation

करिअरन्यास

करिअरन्यास

आयआयटीमधील इंटिग्रेटेड एम.एस्सी आणि इतर महाविद्यालयांतील इंटिग्रेटेड एम.एस्सी यांमधील नेमका फरक काय? कोणता पर्याय

सुरेश वांदिले | October 5, 2015 07:25 am
आयआयटीमधील इंटिग्रेटेड एम.एस्सी आणि इतर महाविद्यालयांतील इंटिग्रेटेड एम.एस्सी यांमधील नेमका फरक काय? कोणता पर्याय अधिक उत्तम आहे आणि का?
    – मीनल अंभारे.
आपल्या देशात आयआयटीचा अभ्यासक्रम हा अधिक प्रगत आणि स्वायत्त असा समजला जातो. जागतिक दर्जाशी सुसंगत अशी आयआयटीतील शिक्षणपद्धती, नावीन्यतेवर भर, अत्याधुनिक प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला देण्यात येणारा वाव आणि मिळणाऱ्या संधी यामुळे आयआयटीमधील सर्वच विषयांचे अभ्यासक्रम हे इतर महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांपेक्षा सरस ठरतात. काही   अपवाद वगळता इतर महाविद्यालयांतील एकात्मिक अभ्यासक्रमांनी अद्याप त्या तोडीचा दर्जा प्राप्त केलेला नाही. एकात्मिक अभ्यासक्रम केल्यानंतर थेट पदव्युत्तर पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम सलगरीत्या करता येतात शिवाय त्यानंतर पीएच.डीच्या संधी उपलब्ध होतात.
मी बी-फार्मसीच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. एमपीएससी परीक्षांमार्फत या क्षेत्राशी संबंधित कोणती पदे प्राप्त करता येतील?
    – विशाल सरगर
पदवी प्राप्त केल्यावर राज्य सेवा परीक्षेला बसू शकता. त्याद्वारे विविध राजपत्रित अधिकारी पदासाठी निवड होऊ शकते. एम. फार्म आणि अधिव्याख्यातांसाठी आवश्यक अशी अर्हता प्राप्त केल्यास शासकीय औषधनिर्माण महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची नोकरी मिळू शकते. ही निवडप्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगामार्फत राबवली जाते.
मी राज्यशास्त्रात बीए केले असून डीएडही केले आहे. मी विनाअनुदानित प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. मला मोटिव्हेशनल ट्रेनर आणि लाइफकोच म्हणून काम करायचे आहे. याविषयक प्रशिक्षण महाराष्ट्रातील प्रशिक्षण आणि करिअर  संधींची माहिती हवी होती.
    – सचिन िशदे
मोटिव्हेशनल ट्रेनर अथवा लाइफ कोच होण्यासाठी प्रशिक्षण देणारे अधिकृत अभ्यासक्रम शासकीय अथवा खासगी शिक्षणसंस्थांमध्ये उपलब्ध नाहीत. मात्र, काही खासगी संस्था यासंबंधीचे प्रशिक्षण देतात-
* शिक्षागुरू : पत्ता- १२८, बी, फर्स्ट फ्लोअर, ट्रेड सेंटर, साऊथ तुकोगंज,  कांचनबाग जैन मंदिर, हुकूमचंद घंटाघर इंदूर. वेबसाइट- shikshaguru.co.in
* शिवखेरा इन्स्टिटय़ूट ऑफ लीडरशिप अ‍ॅण्ड मॅनेजमेंट : पत्ता- ६, पूर्वी मार्ग-लेफ्ट, वसंत विहार,  न्यू दिल्ली- ११००५७.  वेबसाइट- skilm.in     ईमेल- skilm@shivkhera.com
* झेन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट : पत्ता- एस-६/७, मथुरेश फ्लॅटस, मंजलपूर, वडोदरा- ३९००११.  ईमेल-contact@himanshubuch. com
लाइफकोच वा मोटिव्हेशनल ट्रेनरला वेळेचे व्यवस्थापन, भावभावनांवर नियंत्रण, नातेसंबंध, संवाद कौशल्य, सभाधीटपणा, आत्मविश्वास निर्मिती, सकारात्मक विचारांवर भर, नराश्यभावना दूर सारणे, वाचन कौशल्य, श्रवण कौशल्य, सादरीकरण कौशल्य व तंत्रे, योग्य पेहराव, वर्तणुकीतील दोष दूर करणे, निर्णयक्षमता वाढवणे आदी विषयांवर मार्गदर्शन करणे व सल्लामसलत देणे अपेक्षित असते. हे करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शक, गुरू आणि तत्त्वचिंतक अशी भूमिका बजवावी लागते. यासाठी स्वत:मध्ये अशा गुणांचा समुच्चय असणे आवश्यक आहे. त्याकरता संबंधित विषयांवरील साहित्याचे भरपूर वाचन, चिंतन आणि मनन आवश्यक आहे. या विषयांवर असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या व्यवस्थापकीय कौशल्यांचा व तंत्रांचा समावेश व्यवस्थापनच्या अभ्यासक्रमात केलेला असतो. त्याकरता प्रामुख्याने मनुष्यबळ व्यवस्थापन अभ्यासक्रमांचाही उपयोग होऊ शकतो.
 मी अकरावी कला शाखेत शिकत आहे. मला व्यावसायिक ब्युटिशियन म्हणून करिअर करायचे आहे. या संबंधीच्या उपशाखांची माहिती मिळेल का?  बारावीनंतर या अभ्यासक्रमाकडे वळणे योग्य की पदवीनंतर?
    – कादंबरी भावे, अंबरनाथ.
या संस्थांमार्फत पूर्णवेळ तसेच अर्धवेळ  व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यासंबंधित माहिती पुढीलप्रमाणे आहे- डिप्लोमा ऑफ ब्युटी थेरपी अ‍ॅण्ड हेअर ड्रेसिंग, स्पेशल कोर्स- बॉडी थेरपी/बॉडी मशिन्स, अरोमा थेरपी, स्पा कोस्रेस (डीप टिश्यूज, थाई रिफ्लेक्सॉलॉजी, आयुर्वेद अभ्यंग, कॉर्पोरेट मसाज, स्पा मॅनेजमेंट, हॉट स्टोन, अरोमा थेरपी, थाई मसाज),  नेल आर्ट कोस्रेस,  बेसिक ब्युटी अ‍ॅण्ड बेसिक हेअर कोर्स,  हेअर कटस्/ रिबॉन्डिग/ कलिरग/ हेअर ट्रिटमेन्ट्स/ स्पेशलाइज्ड स्किन ट्रीटमेंट/ बॉडी मसाज, डिप्लोमा इन हेअर ड्रेसिंग (हेअर सायन्स,  श्ॉम्पुईंग, स्टायिलग, क्लासिक कट, कलिरग अ‍ॅण्ड हायलायटिंग, बार्बिरग, सलून मॅनेजमेंट, क्लायंट केअर),  बेसिक स्किन, फेशिअल्स, मॅनिक्युअर अ‍ॅण्ड पेडिक्युअर, वॅिक्सग, थ्रेिडग, सलून एटिकेट, स्किन थिअरी, इलेक्ट्रॉलॉजी, थिअरी ऑफ मसाज, फेशिअल्स, मास्क अ‍ॅण्ड पॅक्स, मॅनिक्युअर अ‍ॅण्ड पेडिक्युअर, वॅिक्सग अ‍ॅण्ड  थ्रेिडग, सलून मॅनेजमेंट आदी अनेक विषय शिकवले जातात. यातील बहुतेक अभ्यासक्रम अल्प मुदतीचे आहेत आणि त्याची किमान अर्हता दहावी-बारावी आहे.  हे अभ्यासक्रम तुला करता येतील. पदवीनंतरचे काही पदविका अभ्यासक्रम या संस्था चालवतात. या क्षेत्रात करिअर करण्याचा आपला पक्का निर्धार केला असेल तर बारावीनंतरचे अभ्यासक्रम करून करिअरचा श्रीगणेश करू शकाल.  तुम्ही या कलेचा प्रत्यक्ष उपयोग किती प्रभावीरीत्या करू शकता यावर तुमचे यश अवलंबून राहील. दरम्यान मुक्त विद्यापीठाची पदवी घेऊन तुम्ही पदविका अथवा त्याहीपेक्षा प्रगत अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू शकाल.
मी सध्या बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. मला छायाचित्रणात रस आहे. बारावीनंतर करता येतील अशा अभ्यासक्रमांची माहिती मिळेल का?
    – अभिषेक ताजणे
छायाचित्रण विषयक अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे-
* जे. जे स्कूल ऑफ आर्टस्-  १ अप्रेंटिस कोर्स इन फोटोग्राफी- कालावधी एक वर्ष (अंशकालीन)  १ बॅचलर ऑफ फाइन आर्टस्. कालावधी- चार वष्रे. या अभ्यासक्रमांतर्गत फोटोग्राफी या विषयात स्पेशलायझेशन करता येते. पत्ता- द रजिस्ट्रार, सर जे जे इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅप्लाइड आर्ट, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई-  ४००००१. वेबसाइट- jjiaa. org
* फग्र्युसन महाविद्यालय- बीएस्सी इन फोटोग्राफी अ‍ॅण्ड ऑडिओ व्हिज्युअल प्रॉडक्शन. कालावधी- ३ वष्रे. अर्हता- बारावी.  पत्ता- प्राचार्य, फग्र्युसन महाविद्यालय,  पुणे- ४११००४.        ईमेल-rincipal@fergussion.edu
* सिम्बॉयसिस स्कूल ऑफ फोटोग्राफी- बॅचलर ऑफ आर्टस् इन व्हिज्युअल आर्टस् अ‍ॅण्ड फोटोग्राफी. कालावधी- तीन वष्रे. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण.  पत्ता- सिम्बॉयसिस स्कूल ऑफ फोटोग्राफी,  सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सटिी नॉलेज व्हिलेज, पोस्ट लव्हाळे, ता- मुळशी, पुणे- ४१२११५. वेबसाइट- www.  ssp. ac. in     ईमेल-enquiry@ssp. ac. in
* भारती विद्यापीठाचे स्कूल ऑफ फोटोग्राफी- डिप्लोमा इन फोटोग्राफी अ‍ॅण्ड डिजिटल इमॅजिन. कालावधी दोन वष्रे. डिप्लोमा कोर्स इन फोटो जर्नालिझम. कालावधी- दोन वष्रे.  पत्ता- भारती विद्यापीठ कॅम्पस, कात्रज डेअरीच्या विरुद्ध दिशेला, पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे- ४११०४६. वेबसाइट-    www.  photography.bharatividyapeeth
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफी-
१ डिप्लोमा इन फॅशन फोटोग्राफी- कालावधी- सहा महिने. १ डिप्लोमा इन टेबलटॉप फोटोग्राफी- कालावधी- पाच महिने. १ डिप्लोमा इन वेिडग अ‍ॅण्ड इव्हेन्ट फोटोग्राफी. कालावधी- सहा महिने. पत्ता- १/२, घामट टेरेस,  दुसरा मजला,  शगून हॉटेलच्या विरुद्ध दिशेला, दादर (पश्चिम) मध्य पूल.
ईमेल-info@focusnip.com वेबसाइट- www. focusnip.com
मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरगच्या तिसऱ्या वर्षांत शिकत आहे. बीई पूर्ण केल्यावर मला प्राध्यापक व्हायचे आहे. त्याकरता एमई करावे लागेल का? प्राध्यापक होण्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतील?   गणित विषयात करिअर करण्यासाठी मला काय करावे लागेल?
    – कादंबरी प्रभू
काही खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बीई झालेल्या विद्यार्थ्यांना तासिका तत्त्वावर शिकवण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी अशा महाविद्यालयांच्या जाहिरातींकडे लक्ष ठेवावे लागेल. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये व्याख्याता/प्राध्यापक म्हणून कायमस्वरूपी नोकरीसाठी एमई/एमटेक अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे.  पीएच.डी पूर्ण केलेली असल्यास अधिक उत्तम. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये व्याख्यातापदी नेमणूक एमपीएससी परीक्षांद्वारे केली जाते. वेगवेगळ्या नामवंत खासगी अभियांत्रिकी संस्थांमधील व्याख्यातापदाच्या जाहिराती सातत्याने प्रकाशित होत असतात. त्याकडे लक्ष ठेवावे. आपल्याला गणित विषयात नेमके कोणते करिअर करायचे आहे, हे तुझ्या प्रश्नातून स्पष्ट होत नाही. जर  तुला गणित विषयात लेक्चरशीप करायची असल्यास अधिकृत मुक्त विद्यापीठातून (उदा- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, विद्यापीठांचे दूरस्थ शिक्षण विभाग) दूरस्थ शिक्षण पद्धतीने गणितातील पदवी/पदव्युत्तर पदवी आधी घ्यावी लागेल.
मी अभियांत्रिकी शेवटच्या वर्षांला शिकत आहे. मला नागरी सेवा परीक्षांची तयारी करायची आहे. याकरता शासनाची एखादी मार्गदर्शक संस्था आहे का?
    – अविनाश पाटील, औरंगाबाद
नागरी सेवा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शासनाच्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत-
* राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था,  हजारीमल सोमण मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या विरुद्ध दिशेला, मुंबई-४००००१.
वेबसाइट-www.siac.org.in. ईमेल-directorsiac@yahoo. com प्रीआयएएस कोचिंग सेंटर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद- ४३१००४. वेबसाइट- www. barnuniversity   ईमेल- barnuaur@bornuvsnl. net.in
* डॉ. आंबेडकर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सेंटर, राजभवन कॉम्प्लेक्स, बाणेर रोड, गणेशिखड, यशदा, पुणे- ४११००७.
वेबसाइट-www.yashada.org/acec  ईमेल- aceyashadaucivilservices@gmail.com
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या प्रतिष्ठित संस्थेची- विशेषत: अहमदाबाद येथील संस्थेविषयी माहिती सांगाल का? या संस्थेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आदित्य बिर्ला आणि ओ. पी. जिंदाल शिष्यवृत्ती कशी मिळवता येईल?
    – सायली खोल्लम
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट ही  राष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य व्यवस्थापन  विषयक शिक्षण-प्रशिक्षण देणारी आणि संशोधन करणारी संस्था आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था कार्यरत असली तरी या संस्थेस अभ्यासक्रम ठरवणे, पदवी प्रदान करणे, संशोधन प्रकल्प निवडणे, शुल्कनिश्चिती आदींबाबत संपूर्ण स्वायत्तता आहे. आयआयएम संस्थांमध्ये अहमदाबाद येथील संस्था आताच्या घडीला सर्वोत्तम मानली जाते. विद्यार्थ्यांचा ओढा या संस्थेकडे सर्वाधिक असतो. या संस्थेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जगभरात अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. अशी संधी प्रत्येक नव्या बॅचमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळत असते.
* ओ. पी. जिंदाल शिष्यवृत्ती अंतर्गत एमबीएला प्रवेश मिळालेल्या सवोत्तम १० विद्यार्थ्यांची दुसऱ्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी निवड होऊ शकते. शिष्यवृत्तीची रक्कम- ८० हजार ते दीड लाख रुपये. अधिक माहिती- www.opjems.com/opjems_scholars. aspx
६आदित्य बिर्ला शिष्यवृत्ती ‘आएआयएम’ला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस मिळू शकते. ही वार्षकि शिष्यवृत्ती एक लाख ७५ हजार रुपये अशी आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. निबंधलेखनसारख्या प्रक्रियांचा अवलंब करून १६ विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ-   www. adityabirlascholars. net
First Published on October 5, 2015 1:06 am
Web Title: careernyas 6

‘कॅट’चे बदलेले स्वरूप व्यवस्थापन अभ्यासक्रमाची प्रवेशचाचणी असलेल्या ‘कॅट’च्या लेखी परीक्षेत यंदापासून महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

‘कॅट’चे बदलेले स्वरूप

व्यवस्थापन अभ्यासक्रमाची प्रवेशचाचणी असलेल्या ‘कॅट’च्या लेखी परीक्षेत यंदापासून महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

October 5, 2015 07:25 am
व्यवस्थापन अभ्यासक्रमाची प्रवेशचाचणी असलेल्या ‘कॅट’च्या लेखी परीक्षेत यंदापासून महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
या फेरफारांचा आढावा घेतानाच ‘कॅट’ देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी, याचे मार्गदर्शन-
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या इंडियन इन्स्टिटय़ूट्स ऑफ मॅनेजमेंट तसेच आणखी काही नामांकित संस्थांमधील व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा, अशी अनेक विद्यार्थ्यांची मनीषा असते. या संस्थांमधील प्रवेश निश्चित होण्याकरता सामायिक प्रवेश परीक्षेत (CAT-Common Admission Test) उत्तम गुण प्राप्त करणे अत्यावश्यक ठरते. लेखी प्रवेश परीक्षेनंतर व्यक्तिगत मुलाखतीच्या फेरीतही विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावणे गरजेचे असते. मात्र, प्रवेशाच्या विविध फेऱ्यांमध्ये लेखी परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा
मानला जातो.
‘कॅट’ परीक्षेत यंदापासून मोठे बदल करण्यात आले आहेत. ‘कॅट’ची तयारी करणाऱ्या आणि
यंदा ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी हे
बदल समजावून घेत परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे.
यंदाची ‘कॅट’ परीक्षा २९ नोव्हेंबर २०१५ रोजी देशभरातील प्रमुख शहरांमध्ये घेतली जाईल. यंदाच्या परीक्षेतील एक महत्त्वाचा बदल म्हणजे परीक्षेचे तीन विभाग असतील.  याआधी या परीक्षेत केवळ दोन विभाग असायचे. नव्या बदलानुसार, संख्यात्मक कल (क्वान्टिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड), दिलेल्या माहितीचा अर्थ लावणे व तार्किक क्षमतेवर आधारित प्रश्न (डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल थिंकिंग), शाब्दिक व वाचन क्षमतेवर आधारित प्रश्न (व्हर्बल आणि रीडिंग) असे या परीक्षेचे स्वरूप राहणार आहे. सुधारित ‘कॅट’ परीक्षेची वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे आहेत-
* ‘कॅट’ ही संपूर्णपणे ऑनलाइन परीक्षा असून परीक्षेचा कालावधी या वर्षांपासून १७० मिनिटांवरून १८० मिनिटे म्हणजेच तीन तास इतका वाढवण्यात आला आहे. म्हणजेच आधीच्या कालावधीपेक्षा परीक्षेच्या कालावधीत यंदा १० मिनिटांची वाढ करण्यात आली आहे.
* ‘कॅट’च्या नव्या स्वरूपानुसार, या परीक्षेत एकूण १०० प्रश्न असतील. सांख्यिकी विभाग आणि शाब्दिक क्षमता विभागावर प्रत्येकी ३४ प्रश्न विचारले जातील.
* माहितीचा अर्थ लावणे तसेच तार्किक क्षमतेवर आधारित असे ३२ प्रश्न असतील.
* प्रत्येक विभागातील प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी प्रत्येकी ६० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. परीक्षार्थीना एकावेळी एकाच विभागातील प्रश्न सोडवता येतील.
* यावेळी प्रथमच परीक्षार्थीना संगणकाच्या पडद्यावर असलेला कॅलक्युलेटर वापरता येईल.
* ‘कॅट’ परीक्षेतील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आतापर्यंत सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे- विविध पर्यायांपैकी एका योग्य पर्यायाची निवड करणे या प्रकारचे होते (मल्टिपल चॉइस बेस्ड). मात्र, यंदापासून काही प्रश्नांच्या उत्तरांसाठी बहुपर्याय उपलब्ध नसतील (नॉन मल्टिपल चॉइस बेस्ड क्वेश्चन्स). या प्रकारच्या प्रश्नांच्या अचूक उत्तरासाठी प्रत्येकी ३ गुण मिळतील. मात्र, चुकीच्या उत्तरांना किंवा प्रश्नच सोडवला नसेल तर
गुण वजा होणार नाहीत (निगेटिव्ह मार्किंग नाही).
* जे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे आहेत,  त्या प्रश्नांचे उत्तर अचूक आल्यास प्रत्येकी
३ गुण मिळतील आणि चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येकी १ गुण वजा होईल. मात्र, ‘नॉन मल्टिपल चॉइस बेस्ड क्वेश्चन्स’ किती असतील व कोणत्या विभागात असतील यासंबंधी स्पष्टीकरण दिलेले नाही. म्हणजेच असे प्रश्न कितीही असू शकतील व कोणत्याही विभागात असू शकतील.
* हेही लक्षात ठेवायला हवे की, प्रश्नपत्रिकेतील तीन विभागांपैकी कोणता विभाग आधी सोडवावा याचे स्वातंत्र्य परीक्षार्थीना दिलेले नाही. त्यांना ठरावीक क्रमानुसारच प्रश्नपत्रिका सोडवावी लागेल.
* या परीक्षेचा अभ्यास करताना सांख्यिकीविषयक  प्रश्नांचा नियमित सराव करणे अत्यंत
आवश्यक आहे.
* शाब्दिक क्षमतेवरील आधारित प्रश्नांसाठीही नियमित वाचन करणे गरजेचे आहे.
शाब्दिक क्षमता ही एका दिवसात वाढवता येत नाही. त्यासाठी वृत्तपत्रे, पुस्तके, जर्नल्स अशा अनेक मार्गानी प्रयत्न करावा लागतो.
* जो विभाग डेटा इंटरप्रिटेशन व तार्किक  सुसंगतीवर (लॉजिकल रिझनिंग) आधारित आहे अशा विभागातील प्रश्नांसाठीसुद्धा नियमित सराव आवश्यक असतो. या परीक्षेत ऑन स्क्रीन कॅलक्युलेटर वापरण्याची परवानगी जरी दिली असली तरी त्यासाठीसुद्धा सराव लागतो. कॅलक्युलेटरचा वापर करण्यातही बराच वेळ दवडू शकतो, म्हणून सराव करायला हवा. मात्र, त्याचबरोबर कॅलक्युलेटर कमीत कमी वापरावा लागेल अशी तयारी करायला हवी.
अंतिमत: असे म्हणता येईल की, ‘कॅट’ची तयारी करताना अधिकाधिक सराव फायदेशीर ठरतो. अलीकडे सराव परीक्षाही (टू‘ ळी२३२) उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त सराव परीक्षा दिल्याने वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जायचा सराव विद्यार्थ्यांना मिळू शकतो.
व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावरील सवरेत्कृष्ट शिक्षणसंस्थेत प्रवेश घेता यावा याकरता विद्यार्थ्यांनी कसून प्रयत्न करायला हवेत. ‘कॅट’मध्ये यश मिळविण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, कठोर मेहनतीला पर्याय नाही आणि मेहनत करणाऱ्यांना यश मिळणे अशक्य नाही यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायला हवा.
नचिकेत वेचलेकर
nmvechalekar@yahoo.co.in
First Published on October 5, 2015 1:05 am
Web Title: changing pattern of cat common admission test

पर्यावरणातील पीएच.डी.साठी नॉर्वेमध्ये पाठय़वृत्ती

पर्यावरणातील पीएच.डी.साठी नॉर्वेमध्ये पाठय़वृत्ती

नॉर्वेमधील प्रसिद्ध ऑस्लो विद्यापीठाच्या जैवशास्त्र विभागातर्फे ‘पर्यावरण’ या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या

प्रथमेश आडविलकर | October 5, 2015 07:25 am
नॉर्वेमधील प्रसिद्ध ऑस्लो विद्यापीठाच्या  जैवशास्त्र विभागातर्फे ‘पर्यावरण’ या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. करण्यासाठी पाठय़वृत्ती दिली जाते. पाठय़वृत्तीचा कालावधी तीन वर्षांचा आहे. २०१६ वर्षांकरता दिल्या जाणाऱ्या या पाठय़वृत्तीसाठी विद्यापीठाकडून ८ ऑक्टोबर २०१५ पूर्वी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पाठय़वृत्तीविषयी..
ऑस्लो विद्यापीठ (द युनिव्हर्सटिी ऑफ ऑस्लो) हे जागतिक स्तरावर नावलौकिक असलेले नॉर्वेतील प्रख्यात व सर्वात मोठे विद्यापीठ आहे. शिक्षण व संशोधन क्षेत्रातील जगातल्या मोजक्या उत्कृष्ट केंद्रांपकी एक असलेले हे विद्यापीठ, विविध विद्याशाखांची उपलब्धता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा संशोधन समुदाय याकरता जगभरातील विद्यार्थ्यांचा आणि संशोधकांचा आकर्षणबिंदू राहिले आहे. सुमारे २८ हजार विद्यार्थी व सात हजार कर्मचारी विद्यापीठाची व्यापकता संख्यात्मक पद्धतीनेही अधोरेखित करतात.
विद्यापीठाच्या बायोसायन्सेस विभागापकी सेंटर ऑफ इकॉलॉजिकल अ‍ॅण्ड इव्हॉल्यूशनरी सिंथेसिस (CEES) या केंद्रामध्ये इकॉलॉजी या विषयातील रीसर्च फेलो हे पद रिक्त आहे. या पदाच्या माध्यमातून पाठय़वृत्तिधारकाला त्याचे पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करता येणार आहे. पीएच.डी. कार्यक्रमासह या पदाचा किंवा पाठय़वृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षांचा असेल. पाठय़वृत्तीअंतर्गत या तीन वर्षांदरम्यान संशोधनाच्या या कालावधीकरता पाठय़वृत्तिधारकाला वार्षकि ४,२९,७०० ते ४,८२,८०० नॉर्वेजियन क्रोन्स म्हणजे साधारणत: वार्षकि ३५ लाख ते ४० लाख इतका उत्तम भत्ता मिळू शकतो. याव्यतिरिक्त पाठय़वृत्तिअंतर्गत पाठय़वृत्तिधारकाला इतर सर्व सोयीसुविधा दिल्या जातील.
आवश्यक अर्हता
ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. विद्यापीठाच्या या पाठय़वृत्ती कार्यक्रमांतर्गत पीएच.डी.च्या प्रवेशाकरता व पाठय़वृत्तीसाठी सामान्यपणे पर्यावरण या विषयातील अभ्यासकांना अर्ज करता येईल. या पाठय़वृत्तीसाठीचा अर्जदार संबंधित विषयामधील पदव्युत्तर पदवीधर असावा. त्याने पीएच.डी.साठी इतर कुठेही अर्ज केलेला नसावा. अर्जदाराकडे सांख्यिकी विश्लेषण करण्याची उत्तम क्षमता असावी.  पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्तरावर अर्जदाराचे संशोधन पर्यावरण, सांख्यिकी किंवा संवर्धन जीवशास्त्र विषयक असल्यास तसेच उमेदवाराला व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभव असल्यास उत्तम, पण ती पूर्वअट नाही. एखाद्या संस्थेतील त्या प्रकारच्या संशोधनाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र असावे. अर्जदाराची पदवी-पदव्युत्तर पदवीच्या स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे इंग्रजीवर प्रभुत्व असावे. अर्जदाराने टोफेल किंवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. अर्जदाराचे आरोग्य उत्तम असावे. त्याला या विषयातील कामांची मनापासून आवड असावी. त्याच्याकडे चांगले सहकार्य कौशल्य असावे. सांघिक भावनेने काम करण्याची इच्छा असावी. याबरोबरच अर्जदाराची आंतरविद्याशाखीय वातावरणात काम करण्याची तयारी हवी.
अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या वेबसाइटवर जमा करावा. अर्जामध्ये आपण या पाठय़वृत्तीसाठी कशाप्रकारे योग्य आहोत हे अर्जदाराने क्रमवारीने मांडावे. आपल्या शैक्षणिक व संशोधन पाश्र्वभूमीबद्दल आणि कार्यानुभवाची सविस्तर माहिती देणारे एस.ओ.पी., सी.व्ही., पदवी किंवा पदव्युत्तर अभ्याक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन अहवाल, शोधनिबंधाच्या स्वरूपात प्रकाशित केलेले आपले एखादे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय संशोधन, तसेच शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या व शिफारस देऊ शकणाऱ्या तीन प्राध्यापकांचे
अथवा तज्ज्ञांचे ई-मेल, दूरध्वनी क्रमांक, संपूर्ण पत्ता इत्यादी, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, टोफेल किंवा आयईएलटीएसचे गुणांकन, संशोधन अनुभवाचे प्रशस्तिपत्र इत्यादी गोष्टी अर्जदाराने अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
ऑस्लो विद्यापीठाच्या या पाठय़वृत्तीसाठी अर्जदारांच्या निवडप्रक्रियेची काठिण्यपातळी अधिक  असते. अर्जदाराची गुणवत्ता व संशोधनातील आवड लक्षात घेऊन त्याची निवड केली जाते. विद्यापीठाकडे मोठय़ा संख्येने अर्ज येत असल्याने त्यातून योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांची नंतर मुलाखत घेतली जाते आणि शेवटी त्यातून अंतिम निवड निश्चित होते.
अंतिम मुदत
या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ ऑक्टोबर २०१५ आहे.
महत्त्वाचा दुवा
http://uio.easycruit.com
itsprathamesh@gmail.com
First Published on October 5, 2015 1:04 am
Web Title: foreign scholarship

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये एमएस्सी- पीएच.डी पात्रताधारकांना संधी उमेदवारांनी पॉलिमर केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी एनर्जी सिस्टीम्स, हायड्रो प्रोसेसिंग, मेकॅनिकल, थर्मल इंजिनीअरिंग, कॅटेलॉसिस यांसारख्या विषयांतील द. वा. आंबुलकर | October 5, 2015 07:25 am 1 भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये एमएस्सी- पीएच.डी पात्रताधारकांना संधी उमेदवारांनी पॉलिमर केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी एनर्जी सिस्टीम्स, हायड्रो प्रोसेसिंग, मेकॅनिकल, थर्मल इंजिनीअरिंग, कॅटेलॉसिस यांसारख्या विषयांतील एमटेक-पीएच.डी पात्रता प्राप्त केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा. अधिक माहितीसाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या www.bpclcareers.com या संकेतस्थळावर ७ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावा. नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये कनिष्ठ अभियंत्यांच्या (सिव्हिल) च्या २० जागा अर्जदारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविका किमान ६० टक्के गुणानी उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ ऑगस्ट-४ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा www.nbccindia.gov.in CAREER या एनबीसीसीच्या या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (एचआरएम), एनबीसीसी लिमिटेड, एनबीसीसी भवन, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर८ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये वरिष्ठ अभियंत्यांच्या १२ जागा वयोमर्यादा ३६ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या www.powergridindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १० ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावा. मिलिटरी इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेसमध्ये कुशल कामगारांसाठी २४१ जागा अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पात्रताधारक आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २६ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ सप्टेंबर २०१५ च्या अंकातील ‘मिलिटरी इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेस’ची जाहिरात पाहावी. आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडर वर्क्‍स इंजिनीअर, लखनऊ, एम. जी. रोड, लखनऊ-२२६००२ या पत्त्यावर १० ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत. नौदलात अभियंत्यांसाठी संधी उमेदवारांनी बीई/बीटेक पात्रता किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांनी बारावीच्या परीक्षेला गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेतलेले असावेत. उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २४ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय नौदलाची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या www.joinindianavy.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १२ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावा. ‘हेवी वॉटर बोर्ड’मध्ये लघुलेखक- स्टेनोग्राफर्सच्या २१ जागा उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता प्राप्त केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी www.hwb.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १५ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सोलर एनर्जीमध्ये एक्झिक्युटिव्ह असिस्टंटच्या ५ जागा अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सोलर एनर्जीची जाहिरात पाहावी. www.mnre.gov.in या इन्स्टिटय़ूटच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १५ ऑक्टोबपर्यंत अर्ज करावा. First Published on October 5, 2015 1:03 am Web Title: employment opportunity 52

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये एमएस्सी- पीएच.डी पात्रताधारकांना संधी

उमेदवारांनी पॉलिमर केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी एनर्जी सिस्टीम्स, हायड्रो प्रोसेसिंग, मेकॅनिकल, थर्मल इंजिनीअरिंग, कॅटेलॉसिस यांसारख्या विषयांतील

द. वा. आंबुलकर | October 5, 2015 07:25 am
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये एमएस्सी- पीएच.डी पात्रताधारकांना संधी
उमेदवारांनी पॉलिमर केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी एनर्जी सिस्टीम्स, हायड्रो प्रोसेसिंग, मेकॅनिकल, थर्मल इंजिनीअरिंग, कॅटेलॉसिस यांसारख्या विषयांतील एमटेक-पीएच.डी पात्रता प्राप्त केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा. अधिक माहितीसाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या www.bpclcareers.com या संकेतस्थळावर ७ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.
नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये कनिष्ठ अभियंत्यांच्या (सिव्हिल) च्या २० जागा
अर्जदारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविका किमान ६० टक्के गुणानी उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ ऑगस्ट-४ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा www.nbccindia.gov.in CAREER या एनबीसीसीच्या  या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (एचआरएम), एनबीसीसी लिमिटेड, एनबीसीसी भवन, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर८ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये वरिष्ठ अभियंत्यांच्या १२ जागा
वयोमर्यादा ३६ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या www.powergridindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १० ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.
मिलिटरी इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेसमध्ये कुशल कामगारांसाठी २४१ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पात्रताधारक आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ सप्टेंबर २०१५ च्या अंकातील ‘मिलिटरी इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेस’ची जाहिरात पाहावी. आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडर वर्क्‍स इंजिनीअर, लखनऊ, एम. जी. रोड, लखनऊ-२२६००२ या पत्त्यावर १० ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.
नौदलात अभियंत्यांसाठी संधी
उमेदवारांनी बीई/बीटेक पात्रता किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांनी बारावीच्या परीक्षेला गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेतलेले असावेत. उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २४ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय नौदलाची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या www.joinindianavy.gov.in या संकेतस्थळाला भेट
द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १२ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.
‘हेवी वॉटर बोर्ड’मध्ये लघुलेखक- स्टेनोग्राफर्सच्या २१ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता प्राप्त केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी www.hwb.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १५ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावेत.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सोलर एनर्जीमध्ये एक्झिक्युटिव्ह असिस्टंटच्या ५ जागा
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सोलर एनर्जीची जाहिरात पाहावी. www.mnre.gov.in  या इन्स्टिटय़ूटच्या  संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १५ ऑक्टोबपर्यंत अर्ज करावा.
First Published on October 5, 2015 1:03 am
Web Title: employment opportunity 52

जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्ट ऑफ एम.एस्सी.- जेएमएम- २०१६ बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स तसेच इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- भुवनेश्वर, मुंबई, दिल्ली,

जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्ट ऑफ एम.एस्सी.- जेएमएम- २०१६

बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स तसेच इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- भुवनेश्वर, मुंबई, दिल्ली,

| October 5, 2015 07:25 am
बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स तसेच इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- भुवनेश्वर, मुंबई, दिल्ली, गांधीनगर, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, जोधपूर, कानपूर, खङ्गपूर, चेन्नई, पाटणा, रुडकी व रोपड या आघाडीच्या शिक्षणसंस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या एम.एस्सी. या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्ट फॉर एम.एस्सी.’- ‘जेएमएम- २०१६’ या प्रवेश चाचणीची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदार पदवीधर असावेत. त्यांची गुणांची टक्केवारी किमान ५५ टक्के असावी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी ५० टक्क्य़ांपर्यंत शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर ६ फेब्रुवारी २०१६ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक व पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.
अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व जेएमएम-२०१६ मधील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित संस्थेत उपलब्ध असणाऱ्या एम.एस्सी.- पीएच.डी. या संयुक्त पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येईल.
परीक्षा शुल्क- अर्जदार विद्यार्थ्यांना एक अथवा दोन विषयांसाठी प्रवेश परीक्षा देता येईल. एका विषयाची प्रवेश परीक्षा देण्यासाठी सर्वसाधारण गटातील अर्जदार विद्यार्थ्यांना १,५०० रुपये तर राखीव गटातील विद्यार्थ्यांना ७५० रुपये आणि दोन विषयांची परीक्षा देण्यासाठी क्रमश: २,१०० रुपये व १,०५० रुपये भरणे आवश्यक आहे. वरील प्रवेश शुल्क संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती- जेएमएम-२०१६ या प्रवेश पात्रता परीक्षेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली जेएमएम-२०१६ ची जाहिरात पाहावी. आयआयटी- चेन्नईच्या   jam.iitm.ac.in/jam2016 या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १० ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.
First Published on October 5, 2015 1:01 am
Web Title: joint admission test for m sc