नवनीत
Published: Saturday, July 26, 2014
सिमेंट
काँक्रीटमध्ये लोखंडी सळ्या टाकून मजबुती प्राप्त केली गेली. याच प्रमाणे
प्लास्टिकवर प्रयोग सुरू झाले. अनेक प्रयोगांनंतर 'पॉलिएस्टर' या
प्लास्टिकच्या प्रकारात काचेचे धागे वापरून पाहिजे तशी मजबुती प्राप्त झाली
व १९३०च्या सुमारास काचतंतू युक्त प्लास्टिक (ग्लास रिइनफोस्र्ड
प्लास्टिक) निर्माण झाले. यालाच 'एफआरपी' या नावानं आपल्या देशात ओळखलं
जातं, तर जगात इतरत्र मात्र 'जीआरपी' म्हणजेच 'ग्लास रिइनफोस्र्ड
प्लास्टिक' या नावानं हा पदार्थ ओळखला जातो. वजनाला अॅल्युमिनिअम इतपत
हलकं पण पोलादासारखं मजबूत, गंजण्याचा प्रश्नच नाही. सर्व प्रकारच्या
हवामानाला, समुद्राच्या खाऱ्या पाण्यालासुद्धा वषरेनुवष्रे तोंड देऊन टिकाव
धरणाऱ्या या पदार्थानं क्रांती करून टाकली.काचतंतू म्हणजे प्रत्यक्ष काचेचे धागेच. अती उच्च उष्णतामानावर सिलिका हा पदार्थ(काच) वितळवून प्लॅटिनमच्या सूक्ष्म साच्यातून काचेचे धागे ओढले जातात. नारळाच्या दोरीला ज्याप्रमाणं पीळ द्यावा त्याप्रमाणं पीळ दिला जातो. या पदार्थाचा वितळणांक कमी करण्यासाठी सोडा अॅश (सोडिअम काबरेनेट) आणि चुनखडी (कॅल्शिअम काबरेनेट) वापरतात, तर रसायनविरोधक गुणधर्म वाढविण्यासाठी बोरॅक्स वापरतात. अशा रीतीनं तयार झालेल्या धाग्यांना निरनिराळ्या पद्धतीनं विणून चटई किंवा तागा तयार होतो. यानंतर पॉलिएस्टर या प्लास्टिकमध्ये फायबर ग्लास गुंफलं जातं. हे पॉलिएस्टर 'डायबेसिक अॅसिड व डायबेसिक अल्कोहोल यांच्या संलग्नतेतून तयार होतो. स्टायरिन मोनोमर या द्रवरूप रसायनात त्याला विरघळवून 'पॉलिएस्टर' रेझिन तयार होतो. हे तेलासारखं रेझिन हार्डिनग एजंटच्या सहाय्यानं ठरावीक वेळेत कठीण दगडरूप बनू शकतं. अशा रीतीनं तयार केलेले हे दोन पदार्थ कुठल्याही आकाराच्या साच्यावर एकत्र आणून पसरल्यास काही ठरावीक वेळेनंतर त्याच आकारात कठीण होतात व साच्यातून ठरावीक आकाराची वस्तू तयार होते. पाहिजे तो रंगही त्यात मिसळता येतो.
फायबर ग्लास हा वीजप्रवाह रोधक आहे, शिवाय बऱ्याचशा अॅसिडचा यावर परिणाम होत नाही. या गुणधर्मामुळे या पदार्थाचा इलेक्ट्रिक, केमिकल उद्योगातही उपयोग होऊ लागला. आखाती देशांतून पेट्रोलियम रसायनं साठविण्यासाठी प्रचंड आकाराच्या फायबर ग्लासच्या टाक्या बनविल्या आहेत.
No comments:
Post a Comment