के.जी. टू कॉलेज
Published: Tuesday, August 5, 2014
महिलांवरील
अत्याचार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम उघडली असून आता यापुढे
त्यात तरुणांचाही सहभाग करून घेतला जाणार आहे. छेडछाड विरोधी पथक आणि पोलीस
ठाण्यातील हेल्प डेस्कवर विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार
असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सोमवारी दिली. महिला आणि मुलांविरोधातील अत्याचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांबाबत यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राकेश मारिया यांनी महिला, मुले आणि वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन राबवत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यापुढे अशा प्रत्येक उपक्रमात थेट तरुणांना सहभागी करून घेतले जाणार असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र हेल्प डेस्क तयार करण्यात आले आहेत. तेथे महाविद्यालयातील तरुणांना बसविण्यात येणार आहे. त्यामुळे तक्रारदरांना विश्वास निर्माण होण्यात मदत होईल. याशिवाय महाविद्यालय आणि शाळांमध्ये छेडछाड विरोधी पथक स्थापन करण्यात येणार आहे. या प्रत्येक पथकात विद्यार्थ्यांचा सहभाग करुन घेतला जाणार आहे.
No comments:
Post a Comment