नवनीत
Published: Monday, August 4, 2014
'अॅन
अॅपल अ डे कीप्स डॉक्टर अवे' (रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला म्हणजेच
आजाराला स्वत:पासून दूर ठेवा) या म्हणीला प्रमाण मानून आपण सफरचंदाचं सेवन
करत असतो. सफरचंद विकत घेताना ती छान लालसर, ताजी, चमकदार अशी बघून घेतो.
झाडावरून काढून दुकानात ही सफरचंदं पोहोचायला बरेच दिवस जातात, तरी ही
सफरचंदं ताजी, चमकदार कशी दिसतात? या सफरचंदांवर मेण लावलेलं असतं त्यामुळे
ती चमकदार दिसतात. सुरीने या सफरचंदांवर घासलं तर तुम्हाला हे मेण दिसतं. जेव्हा सफरचंद झाडावरून काढली जातात त्या वेळी त्यांच्यावर निसर्गत:च मेणाचं आवरण असतं. सफरचंदामधील बाष्प निघून जाऊन ती शुष्क होऊ नयेत यासाठी निसर्गत:च ही योजना केलेली असते. सफरचंद चांगली स्वच्छ दिसावी म्हणून व्यापारी ती छान घासून पुसतात त्या वेळी हे नसíगक मेण निघून जातं. आता ही सफरचंदं वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवायची असतात त्यासाठी ती टिकावीत म्हणून त्यांच्यावर मेणाचं आवरण लावलं जातं.
फळांवर किंवा चमक येण्यासाठी खाद्यपदार्थावर लावण्यात येणाऱ्या मेणाच्या प्रकारात नसíगक आणि कृत्रिम म्हणजेच पेट्रोलियम बेस असे दोन प्रकार पडतात. नसाíगक मेण म्हणजेच कार्नोबा (पामच्या झाडापासून), मधमाश्यांनी तयार केलेलं मेण, आणि शेलॅक मेण हे होत. शेलॅक मेण लाखेचा कीटक तयार करतो. हे मेण इथॅनॉलमध्ये विरघळवून वापरलं जातं. पेट्रोलियम मेणामध्ये हायड्रोकार्बन असतात. पेट्रोलियम मेण आरोग्याला हानीकारक असतं.
सफरचंदांवर पाम झाडाच्या पानांपासून तयार झालेलं मेण वापरलं जातं. या मेणामध्ये मेदाम्लाचे ईस्टर, हायड्रोकार्बनच्या लांब शृंखला, अल्कोहोल यांचा समावेश असतो. या पामच्या झाडाव्यतिरिक्त इतर वनस्पतींपासूनसुद्धा मेण मिळवता येतं. सफरचंद थोडय़ा कोमट पाण्यात धुतली तर नसíगक मेण जाऊ शकतं. व्यापाऱ्यानं कोणतं मेण वापरलंय हे आपल्याला कळणं अशक्य आहे पण खूप चमकदार फळं दिसली तर जरा सांभाळून!
अनघा वक्टे, (मुंबई) -office@mavipamumbai.org
No comments:
Post a Comment