Monday, December 31, 2018

प्रादेशिक भाषेतून उच्चशिक्षण : उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद हैदराबाद संस्थानाचा सातवा निजाम नवाब उस्मान अली खान याने १९१८ मध्ये स्थापन केलेले हे विद्यापीठ त्याच्याच नावाने ओळखले जाते.

प्रादेशिक भाषेतून उच्चशिक्षण : उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद

हैदराबाद संस्थानाचा सातवा निजाम नवाब उस्मान अली खान याने १९१८ मध्ये स्थापन केलेले हे विद्यापीठ त्याच्याच नावाने ओळखले जाते.


|| योगेश बोराटे
संस्थेची ओळख
कारकीर्दीच्या शतकोत्तर वाटचालीकडे कूच करणारे हैदराबादचे उस्मानिया विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांमध्ये सातवे, तर त्याच बाबतीत दक्षिण भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ ठरते. हैदराबाद संस्थानाचा सातवा निजाम नवाब उस्मान अली खान याने १९१८ मध्ये स्थापन केलेले हे विद्यापीठ त्याच्याच नावाने ओळखले जाते. ब्रिटिश राजवटीत इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव असताना प्रादेशिक भाषेतून उच्चशिक्षणाचा विचार पुढे नेण्यासाठीच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग म्हणून या विद्यापीठाच्या स्थापनेकडे पाहिले जाते. जागतिक पातळीवर पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात नवी समीकरणे उदयाला येऊ लागली होती. दरम्यानच्याच काळात देशभक्ती आणि प्रादेशिक भाषेतील शिक्षण या दोन मूलभूत प्रेरणांच्या आधाराने भारतामध्ये या विद्यापीठाच्या स्थापनेला गती मिळाली होती. त्यातूनच या संस्थेमधून उर्दू भाषेतून शिक्षणाला सुरुवात झाली. हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारताचा भाग झाल्यानंतरच्या काळात, १९४८ पासून या विद्यापीठाने शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठीचे अधिकृत माध्यम म्हणून इंग्रजी भाषेचा स्वीकार केला. तेलंगणा राज्यातील हैदराबादमध्ये तारनाका या उपनगरात हे विद्यापीठ वसले आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवरच्या सामाजिक-आर्थिक बदलांशी सुसंगत ठरणारे कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी हे विद्यापीठ प्रयत्नशील आहे. विद्यापीठाची ही ऐतिहासिक वाटचाल आणि उच्चशिक्षणाच्या प्रचार- प्रसारासाठी विद्यापीठाने केलेले प्रयत्न विचारात घेत, राष्ट्रीय पातळीवरील ‘एनआयआरएफ’च्या २०१८च्या मानांकनामध्ये या विद्यापीठाला देशामध्ये २८ वे स्थान देण्यात आले आहे.
संकुले आणि सुविधा
तारनाका हे हैदराबादचे एक प्रमुख उपनगर मानले जाते. या उपनगरात जवळपास तेराशे एकरांमध्ये या विद्यापीठाच्या मुख्य शैक्षणिक संकुलाचा विस्तार झाला आहे. त्यामध्ये ८ कँपस कॉलेज आणि ५३ विभागांचा समावेश आहे. या संकुलामध्ये विद्यार्थासाठी विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. नियमित शैक्षणिक सोयी- सुविधांच्या जोडीने त्यामध्ये सेंटर फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट ऑफ मायनॉरिटीज, एम्प्लॉयमेंट इन्फॉम्रेशन अँड गाइडन्स ब्युरो, इंग्लिश लँग्वेज ट्रेिनग सेंटर, इंटरनॅशनल प्लेसमेंट सíव्हसेस, युनिव्हर्सटिी फॉरेन रिलेशन्स ऑफिस, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यासारख्या सुविधांचा समावेश होतो. विद्यापीठाच्या स्थापनेच्याच जोडीने १९१८ साली विद्यापीठाचे ग्रंथालयही सुरू झाले होते. १९६३ पासून सध्याच्या नव्या स्वतंत्र इमारतीमधून या ग्रंथालयाचे कामकाज सुरू झाले. जवळपास साडेपाच लाख पुस्तके व साडेपाच हजार दुर्मीळ हस्तलिखितांनी सुसज्ज असणारे हे मध्यवर्ती ग्रंथालय विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि संशोधकांसाठी उपयुक्त ठरते. या मुख्य संकुलाशिवाय विद्यापीठाने पदव्युत्तर शिक्षणाच्या व्यापक विस्तारासाठी म्हणून पाच जिल्ह्यांमधून जिल्हा पातळीवरील पदव्युत्तर महाविद्यालये सुरू केली आहेत. स्थानिक पातळीवरील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या म्हणून स्वतंत्र महाविद्यालयांमधून मिळणारी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते.
विभाग आणि अभ्यासक्रम
विद्यापीठामध्ये एकूण ११ विद्याशाखांमधून ५३ विभाग चालतात. या माध्यमातून विद्यापीठाने २७ पदवी, ६८ पदव्युत्तर पदवी, २४ पदव्युत्तर पदविका आणि १५ प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्याशिवाय एम. फिल आणि पीएच.डी.च्या संशोधनाची सुविधाही या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे. युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सोशल सायन्सेसअंतर्गत विविध विषयांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालतात. युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ सायन्स अंतर्गत विद्यार्थ्यांना अप्लाइड जिओकेमिस्ट्री, अ‍ॅस्ट्रोनॉमी, बायोकेमिस्ट्री, बॉटनी, केमिस्ट्री, जेनेटिक्स, जॉग्रॉफी, जिओफिजिक्स, मॅथेमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, फिजिक्स, स्टॅटेस्टिक्स, झूलॉजी या विभागांमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ लॉमध्ये वेगवेगळ्या विशेष विषयांमधील एलएलएमचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड बिझनेस मॅनेजमेंट अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ कॉमर्समध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ फायनान्स अँड कंट्रोल (एमएफसी), एम. कॉम. (फायनान्स), एम. कॉम. (इन्फम्रेशन सिस्टिम्स) या पर्यायांचा आढावा घेता येतो. तसेच याच कॉलेजमधील डिपार्टमेंट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये एमबीए टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट हा नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम चालतो. या अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘डिप्लोमा इन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट’ (पीजीडी- टीएम) ही पदव्युत्तर पदविका दिली जाते. तर अभ्यासक्रमाची दोन्ही वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘एमबीए टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट’ ही पदव्युत्तर पदवी घेण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये बी. एड., एम. एड. आणि पीएच.डी.चे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ इंजिनीअिरगमध्ये इंजिनीअिरगच्या नानाविध विषयांमधील बी.ई., एम.ई. आणि ‘मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च’ प्रकारामधील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल इंजिनीअिरग, केमिकल टेक्नॉलॉजी आणि फार्मसीशी संबंधित अभ्यासक्रम चालतात.
विद्यापीठाने १९७७ मध्ये ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करस्पॉंडन्स कोस्रेस’ या नावाने दूरशिक्षणाच्या अभ्यासक्रमांना सुरुवात केली. कालानुरूप अभ्यासक्रमांची व्याप्ती वाढवत १९८९ मध्ये या केंद्राचे नावही बदलण्यात आले. सध्या ‘प्रो. जी राम रेड्डी सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन’ म्हणून हे केंद्र ओळखले जाते. सर्व अभ्यासक्रमांसाठीचे मिळून जवळपास ४५ हजार विद्यार्थी या केंद्राद्वारे पुरविल्या जाणाऱ्या दूरशिक्षणाच्या सुविधांचा लाभ घेत आहेत. त्यामध्ये विद्यार्थिनी आणि महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे.
borateys@gmail.com
First Published on October 23, 2018 12:14 am
Web Title: osmania university

Monday, December 17, 2018

कलेचा करिअररंग : डिझाइनमधील शिक्षण आणि कला व्यवसायाभिमुखता हे नीफ्टच्या मास्टर ऑफ डिझाइन (MDES) या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सचे प्रमुख सूत्र आहे.

कलेचा करिअररंग : डिझाइनमधील  शिक्षण आणि कला

व्यवसायाभिमुखता हे नीफ्टच्या मास्टर ऑफ डिझाइन (MDES) या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सचे प्रमुख सूत्र आहे.


नितीन कुलकर्णी
भारतात आपण दृश्यकलेचा अभ्यास बीएफए (BFA) या पदवी अभ्यासक्रमात केला तेव्हा त्यात व्यवसायाभिमुखतेचा भाग किती होता? असा प्रश्न विचारला तर उत्तर देणे अडचणीचे ठरेल. म्हणजे ललित कला शाखेत चित्र व शिल्प विभागात अजिबातच नव्हता, उपयोजित कला ( जाहिरात कला) व क्राफ्ट यामध्ये नावाला का होईना होता पण प्रत्यक्ष इंडस्ट्रीत काम करायला गेल्यावर आपल्याला नव्याने सर्व शिकावे लागले. (कारण ललित कलेच्या अनेक स्नातकांनी वेगवेगळ्या क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये उपजीविकेचे साधन शोधलेले दिसते.)
मग कलाशिक्षणाने महत्त्वाचे असे काय दिले? एक म्हणजे दृश्यनिर्मितीचे तंत्र अवगत करवले. दुसरे म्हणजे संकल्पना कशी विकसित करायची व कलावस्तूपर्यंत तडीस कशी न्यायची याचे ज्ञान अवगत करवले. या ज्ञानात सृजनशीलतेचा अंतर्भाव होता. म्हणजे बघण्यापासून-जाणवण्याची बोधनाची शक्यता, कल्पनेपासून-संकल्पनेचा विकास आणि संकल्पनेबरहुकूम कलावस्तूची सिद्धता हे टप्पे त्यात होते. या सगळ्यांतून तयार झालेली कलावस्तू वेगवेगळ्या बाजारांमध्ये विकायची कशी हे मात्र अभावानेच शिकवले गेले.
व्यवसायाभिमुखता हे नीफ्टच्या मास्टर ऑफ डिझाइन (MDES) या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सचे प्रमुख सूत्र आहे. अर्थात तुमचे दृश्य संकल्पना विकसित करण्याचे ज्ञान व सृजनशीलता अर्थात Creativity यांना इथे नवीन परिमाण प्राप्त होणारे आहे. आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे हा अभ्यासक्रम आंतरशाखाप्रधान आहे आणि कला व डिझाइनबाह्य़ इतर कुठल्याही शाखेचे स्नातक विद्यार्थी इथे प्रवेश घेऊ शकतात, त्यामुळे एकाच गोष्टीचा अनेक दृष्टिकोनातून विचार करणे सोपे होते. बरेचसे प्रोजेक्ट्स ग्रुपमध्ये करायचे असतात, याचा उपयोग समग्र ज्ञानासाठी होतो. डिझाइन आणि क्रिएटीव्हिटीचा चौकटीबद्ध विचार करता येत नाही. साधारणत: डिझाइनचा उल्लेख आपण आकर्षक आकार किंवा वस्तूचे रूप याअर्थी करतो. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये डिझायनर हे पदही सुरुवातीला तयार झाले ते त्या उत्पादनाला वेगळी आणि आकर्षक ओळख देण्यासाठीच. आज २१व्या शतकाच्या पूर्वार्धात डिझाइनची पाश्र्वभूमी बदलली आहे. वस्तूच्या डिझाइनमधील वेगळेपण केवळ बाह्य़ पातळीवरचे नसून गुणात्मक पातळीवर असण्याची गरज सध्या आहे.
नीफ्टमध्ये विद्यार्थी स्वत:चा अभ्यासक्रम कस्टमाइज करू शकतात. त्यासाठी प्रत्येकाला मेंटॉरसुद्धा नेमला जातो. कला आणि डिझाइनचे मूर्त रूप जाणणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. ती प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांवर कार्यान्वित होत असते. – १)मनातील प्रतिमेचे अप्रकट रूप, २) मनातील चित्राचे प्रकट रूप, ३) संकल्पनेचे अंतिम रूप आणि ४)प्रत्यक्ष प्रतिकृती किंवा त्रिमितीय आकृती. या चारपैकी एक किंवा अधिक टप्प्यांमध्ये विद्यार्थी पारंगत असू शकतात. त्याचा उपयोग अभ्यासक्रमात होऊ शकतो. बाऊहाऊसच्या (जर्मनीमध्ये २०व्या शतकात उदयाला आलेली पहिली डिझाइनची शिक्षण प्रणाली) शिक्षण प्रणालीमध्ये कला आणि उद्योगाचा, संवेदनांचा आणि सृजनाचा मेळ साधलेला होता. नीफ्टच्या अभ्यासक्रमातही याचा विचार केला गेलेला आहे.
मास्टर ऑफ डिझाइनमध्ये
१)  डिझाइन थिंकिंग अँड इनोव्हेशन
२)  डिझाइन रिसर्च
३)  व्हिज्युअल कल्चर व ट्रेंड्स रिसर्च  फोरकास्ट
४)  सस्टेनिबीलिटी अँड क्राफ्ट स्टडिज
हे चारही विषय सर्व विद्यार्थ्यांना शिकावे लागतात. तसेच ४ डिपनिंग स्पेशलायझेशनमधून कोणत्याही एकाची निवड करावी लागते. त्यात प्रत्येकी ३ विषय असतात, जे व्यवसायाभिमुख असतात. यामध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीच्या सहकार्याने एक प्रकल्प पूर्ण करायचा असतो.
चार डीपिनग स्पेशलायझेशन अशा प्रकारे –
१) डिझाइन फॉर सोसायटी
२) एक्स्पिरीअन्स डिझाइन
३) डिझाइन स्ट्रॅटेजी,
४)थिअरॉटिकल स्टडिज इन डिझाइन.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या डिझाइन्स आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कामाची संधी विद्यार्थ्यांला मिळते. उदा. Design researchers, UIUX design, experiences designers, design strategist, sustainability manager, innovation manager or innovator, entrepreneur, craft designer, trend forecaster, exhibition designer, set designer व इतर अनेक.
दृश्यकलेच्या पदवीनंतर वेगळा मार्ग चोखाळायचा असेल तसेच त्यासाठी आपल्या नेहमीच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्याची तयारी असेल तर नीफ्टच्या MDES – Design Space ची निवड एक चांगला पर्याय ठरू शकेल.
लेखक नॅशनल इन्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, मुंबईह्ण या संस्थेतील मास्टर ऑफ डिझाइन, डिझाइन स्पेसह्ण या  विभागाचे प्रमुख आहेत.
nitindrak@gmail.com
First Published on October 20, 2018 3:19 am
Web Title: article about design and art in design

शब्दबोध मूळ फारसी शब्द 'बर्तरफ्'. ज्याचा अर्थ आहे कामावरून, पदावरून पदच्यूत करणे, काढून टाकणे, बाजूस करणे.

शब्दबोध

मूळ फारसी शब्द 'बर्तरफ्'. ज्याचा अर्थ आहे कामावरून, पदावरून पदच्यूत करणे, काढून टाकणे, बाजूस करणे.


डॉ. अमृता इंदुरकर
बडतर्फ
‘अमक्या-अमक्या कारणाने एखाद्याला बडतर्फ केले’ अशा पद्धतीची वाक्ये आपण वर्तमानपत्रात अनेकदा वाचतो. मूळ फारसी शब्द ‘बर्तरफ्’. ज्याचा अर्थ आहे कामावरून, पदावरून पदच्यूत करणे, काढून टाकणे, बाजूस करणे. ऐतिहासिक लेख संग्रहांमधे ‘मुरादखान याची फौज अगदी बर्तर्फ केली’ असा उल्लेख आहे. शिवाय दिल्ली येथील मराठय़ांची राजकारणे या लेखसंग्रहामधे ‘जन्रेल इष्टवरिस यास हिंदुस्थानचे फौजेचा बहालीबर्तर्फीचा मुख्त्यार केला आहे.’ म्हणजे जन्रेलला कुणाला बहाली द्यायची व कुणाला बर्तर्फी द्यायची त्यासाठी नेमला आहे.
पाखर
एखाद्यावर मायेची पाखर घालणे असा वाक्प्रयोग आपण नेहमीच करतो. पाखर घालणेचा संबंध पक्ष्याच्या पंखांशी जोडून हा वाक्प्रयोग तयार झाला. पाखर हा शब्द मूळ कोणत्या भाषेतून आला याबाबत निश्चिती नाही. संस्कृत, प्राकृत, िहदी यांमधून आला असावा असे भाषा अभ्यासकांचे मत आहे. कारण हिंदीत ‘पांखी’ म्हणजे पक्षी. पक्षी रात्रीच्या वेळी आपल्या पिलांना पंखाखाली घेतात किंवा कोंबडी संरक्षणासाठी म्हणून पिलांना पंखाखाली घेते त्यावरून पंख – पाखरू – पाखर असा संबंध जोडता जोडता पाखर घालणे शब्दप्रयोग रूढ झाला. ‘पाखर’चा दुसरा अर्थ आहे;  हत्तीचे किंवा घोडय़ाचे चिलखत. युद्धामध्ये हत्ती, घोडे यांच्या शरीराला इजा होऊ नये म्हणून संरक्षणार्थ जे लोखंडी चिलखत, झूल घालतात त्याला देखील पाखर म्हणतात. दोन्ही अर्थामधे संरक्षण करणे हा समान अर्थ दिसतो त्यामुळे त्याच अर्थावरून पाखर घालणे हा वाक्प्रयोग मराठीत रूढ झाला हे निश्चित.
amrutaind79@gmail.com
First Published on October 20, 2018 3:17 am
Web Title: article about vocabulary words 6

Tuesday, December 11, 2018

करिअर वार्ता : परीक्षा हवी की नको? पिसा म्हणजे ‘प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट’ या चाचणीत २०१० मध्ये सिंगापूरने आपले वर्चस्व दाखवले.

करिअर वार्ता : परीक्षा हवी की नको?

पिसा म्हणजे ‘प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट’ या चाचणीत २०१० मध्ये सिंगापूरने आपले वर्चस्व दाखवले.


सिंगापूरला शालेय शिक्षणातील एक आघाडीचा देश मानले जाते. पिसा म्हणजे ‘प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट’ या चाचणीत २०१० मध्ये सिंगापूरने आपले वर्चस्व दाखवले. आपल्या मुलांना ही चाचणी देता यावी यासाठी सध्या आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. पिसाचे निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर सिंगापूरच्या शिक्षण पद्धतीचा बोलबाला सुरू झाला. त्यानंतर तेथील चुणचुणीत, हुशार बालकांच्या सामान्यज्ञान, गणिती ज्ञानाची चुणूक दाखवणाऱ्या ध्वनिचित्रफिती, सिंगापूरच्या पाचवी, सहावीच्या वर्गासाठी असलेल्या परीक्षेतील गणिते अशा अनेक गोष्टींनी समाजमाध्यमांवर फेर धरला. आपल्याकडेही सिंगापूरसारखी ही पद्धती राबवण्याची चर्चा, दावे सातत्याने मात्र सोयीस्करपणे होत असतात. त्यासाठी तेथील शाळांना सुट्टी असताना अधिकारी सिंगापूरचा दौराही करून येतात. जो शिक्षण हक्क कायदा आपल्याकडे २००९ मध्ये अमलात आला तो कायदा २००३ मध्येच सिंगापूरमध्ये लागू झाला. त्यानुसार तेथील प्राथमिक वर्गातील मुलांना मोफत शिक्षण दिले जाते.
तर.. शिक्षणात अनेक वेगवेगळे प्रयोग करून जगाचे लक्ष वेधणाऱ्या सिंगापूरने नुकताच एक निर्णय घेतलाय, तो म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील परीक्षा, इयत्ता, चाचण्या हे सगळे बासनात बांधून ठेवण्याचा. सिंगापूरच्या शिक्षणमंत्र्यांनी याबद्दल नुकतीच घोषणा केली. ‘शिकणे म्हणजे स्पर्धा नाही,’ याची जाणीव मुलांना व्हावी हा या निर्णयामागील उद्देश. विद्यार्थी पुढील इयत्तेत गेला अथवा नाही हा मुद्दाच आता तेथे गौण होणार आहे.
शाळेच्या प्रगतिपुस्तकात यापुढे किमान आणि कमाल गुण, उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण झाल्याचा उल्लेख, विषयांच्या श्रेणी अशा कशाचाही उल्लेख प्रगतिपुस्तकांवर असणार नाही. पहिली आणि दुसरीसाठी साचेबद्ध परीक्षाही असणार नाहीत. मात्र परीक्षा नाहीत म्हणजे अभ्यास नाही असा काही तेथील नूर नाही. परीक्षा नसल्या तरी गृहपाठ, उपक्रम, समूहचर्चा, प्रश्नमंजूषा, खेळ या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. ती जबाबदारी शिक्षकांची असणार आहे. मात्र हे मूल्यमापन क्रमांक, गुण अशा परिभाषेत असणार नाही. जेणेकरून परीक्षा आणि स्पर्धेमुळे येणारा ताण, तुलनेमुळे येणारी निराशा या सगळ्यातून मुलांची सुटका होईल. त्याचप्रमाणे शिक्षक-पालकांच्या बैठकीत पालकांना दर महिन्याला मुलांच्या प्रगतीची माहिती देण्यात येईल. प्रगतिपुस्तकात गुण नसले तरी मुलांच्यातील बलस्थाने, कमतरता कळाव्यात, ती नेमकी कोणत्या पातळीवर आहेत, त्यांच्यातील कौशल्यांचा विकास किती झाला आहे हे कळावे यासाठी प्रगतिपुस्तकात काही वेगळे रकाने तयार करण्यात येणार आहेत. आपल्याकडे मात्र शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घ्याव्यात की नाही या मुद्दय़ावर सुरू झालेली शिक्षण विभागाची परीक्षा अद्यापही संपलेली नाही. उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर खाडाखोड करत कच्चे काम केले जाते, तसे कच्चे काम करत करत परीक्षेवर उत्तर शोधण्यासाठी दरवर्षी नवे नवे प्रयोग सुरू आहेत.
संकलन – रसिका मुळ्ये
First Published on October 20, 2018 3:15 am
Web Title: article about career talks 2

प्रश्नांचे विश्लेषण : गट क मुख्य परीक्षा सामायिक अभ्यासक्रम गट ब आणि क यांच्या मुख्य परीक्षा समांतरपणे होत असल्याने त्यांच्या बाबतची चर्चा या स्तंभातून समांतरपणे करण्यात येईल

प्रश्नांचे विश्लेषण : गट क मुख्य परीक्षा सामायिक अभ्यासक्रम

गट ब आणि क यांच्या मुख्य परीक्षा समांतरपणे होत असल्याने त्यांच्या बाबतची चर्चा या स्तंभातून समांतरपणे करण्यात येईल

|| रोहिणी शहा
गट ब आणि क यांच्या मुख्य परीक्षा समांतरपणे होत असल्याने त्यांच्या बाबतची चर्चा या स्तंभातून समांतरपणे करण्यात येईल, असे मागील लेखामध्ये म्हटले आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक या गट ब पदाच्या मुख्य परीक्षा पेपर दोनचे विश्लेषण व त्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. गट क सेवांच्या मुख्य परीक्षेतील पेपर दोनमधील सामायिक अभ्यासक्रमाच्या तयारीबाबतची चर्चा करण्यात आली आहे. या भागावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण या लेखामध्ये करण्यात येत आहे.



First Published on October 19, 2018 2:05 am
Web Title: group c main exam curriculum

नोकरीची संधी कायदा विषयातील पदवी आणि उमेदवार सनदधारक असावा.

नोकरीची संधी

कायदा विषयातील पदवी आणि उमेदवार सनदधारक असावा.


|| सुहास पाटील
suhassitaram@yahoo.com
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्राच्या अधीनस्थ असलेल्या पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिह्यांतील विधि अधिकारी गट-ब – ३ पदे आणि विधि अधिकारी – १६ पदे अशी एकूण १९ पदांची कंत्राटी पद्धतीने भरती. (११ महिन्यांसाठी)
पात्रता – कायदा विषयातील पदवी आणि उमेदवार सनदधारक असावा.
वयोमर्यादा – ६० वर्षेपर्यंत.
मासिक देय रक्कम – विधि अधिकारी – गट-ब
रु. २५,०००/- अधिक रु. ३,०००/- दूरध्वनी व प्रवास खर्च. विधि अधिकारी – रु. २०,०००/- अधिक रु. ३,०००/- दूरध्वनी व प्रवास खर्च.
निवड पद्धती – परीक्षा एकूण १०० गुण.
(अ) ५० गुण लघुत्तरी प्रश्न.
(ब) ४० गुण दीघरेत्तरी प्रश्न.
(क) १० गुण मुलाखतीकरिता.
लेखी परीक्षेचा व मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना नंतर पत्राद्वारे/संकेतस्थळावर/एस्एम्एस्द्वारे कळविण्यात येईल.
परीक्षा शुल्क – रु. ५००/- डिमांड ड्राफ्टद्वारे (P.A. to Spl. I.G. Police Konkan Range, Navi Mumbai यांचे नावे) अर्जासोबत पत्रव्यवहाराकरिता उमेदवाराचा पत्ता असलेले दोन लिफाफे, शैक्षणिक पात्रता, अनुभवाच्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती आणि २.५ सें.मी. आकाराचे दोन रंगीत फोटो जोडावेत. अर्जाचा नमुना www.thaneruralpolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित २६ ऑक्टोबर २०१८ (१८.०० वाजेपर्यंत) पोहोचतील असे पाठवावेत. ‘अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, खारकर आळी, ठाणे पोलीस स्कूलसमोर, कोर्ट नाका, ठाणे (प.)’

भारत सरकार, भाभा अणू संशोधन केंद्र (बी.ए.आर.सी.) (जाहिरात क्र. ३/२०१८ (आर.व्ही.)) होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट (एचबीएनआय) या अभिमत विद्यापीठातून ‘रेडिओलॉजिकल फिजिक्समध्ये पदविका’ (डीआयपी.आर.पी.) या १ वर्षांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता बी.ए.आर.सी. अर्ज मागवीत आहे.
अभ्यासक्रमाचा कालावधी –
डिसेंबर २०१८ ते नोव्हेंबर २०१९.
जागांची संख्या – बिगर पुरस्कृत – २५,
पुरस्कृत – ५.
पात्रता – एम.एस्सी. (फिजिक्स) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण (बी.एस्सी. (फिजिक्स) ला किमान ६०%  गुण आवश्यक). ग्रेड सिस्टीमच्या बाबतीत विद्यापीठातून प्राप्त मार्क्‍स कन्व्हर्शन स्किमच्या टक्केवारीची श्रेणी अर्जासोबत जोडावी. एम.एस्सी.च्या अंतिम निकालाची प्रतीक्षा करणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा – दि. १ डिसेंबर २०१८ रोजी २६ वर्षे (इमाव – २९ वर्षे, अजा/अज – ३१ वर्षेपर्यंत, अपंग (उभे राहणे, हालचाल करू शकणारे) – ३६ वर्षेपर्यंत).
(पुरस्कृत उमेदवारांकरिता – ४० वर्षेपर्यंत)
स्टायपेंड – दरमहा रु. २५,०००/-
(अपुरस्कृत उमेदवारांकरिता)
कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (प्रवेश परीक्षा)
दि. ११ नोव्हेंबर २०१८ रोजी. बी.ए.आर.सी., मुंबई येथे होईल आणि त्यानंतर मुलाखत होईल.  अर्ज कसा करावा यावरील सविस्तर माहिती आणि अर्जाच्या नमुन्याकरिता बी.ए.आर.सी. आणि एचबीएनआयच्या संकेतस्थळांना भेट द्या. http://www.barc.gov.in व  http://www.hbni.ac.in अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख सोमवार दि. २९ ऑक्टोबर २०१८
First Published on October 19, 2018 2:02 am
Web Title: loksatta job opportunity 33

करिअर मंत्र मी यंदा बी.ए.ची परीक्षा दिली आहे. इंग्रजी विषय आहे. एनसीसी सर्टिफिकेट उत्तीर्ण झालो आहे.

करिअर मंत्र

मी यंदा बी.ए.ची परीक्षा दिली आहे. इंग्रजी विषय आहे. एनसीसी सर्टिफिकेट उत्तीर्ण झालो आहे.

|| डॉ. श्रीराम गीत
  • मी यंदा बी.ए.ची परीक्षा दिली आहे. इंग्रजी विषय आहे. एनसीसी सर्टिफिकेट उत्तीर्ण झालो आहे. वय २१ आहे. लॉ किंवा मास्टर्स इन सोशल वर्कला प्रवेश घेण्याचा विचार आहे. माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार मला कोणत्या संधी असतील? पुढचे शिक्षण कोणते घ्यावे? – अक्रम रुकसाना दिलबर मणेर
आपण गुणांची टक्केवारी दिलेली नाहीत, म्हणून मोघमात सांगायचे झाल्यास, एमएसडब्ल्यू करून एनजीओद्वारे काम व नोकरी नक्की मिळेल. कदाचित सरकारी क्षेत्रात शिरकाव होऊ शकतो. लॉनंतर प्रॅक्टिस सुरू होण्याचा कालावधी मोठा राहतो. शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशनसाठीचा रस्ता सी सर्टिफिकेटद्वारे उपयुक्त ठरू शकतो.
त्याचाही विचार करावा. निमलष्करी दलात नोकरीचा प्रयत्न करणेही शक्य आहेच. त्याचाही विचार करावा.
  • मी स्टॅटिस्टिक्समध्ये बी.एस्सी. केले आहे. मला मास्टर्स करायचे आहे. त्यासाठी कोणते विद्यापीठ चांगले आहे? मास्टर्सनंतर कशाप्रकारे वाव राहील? – मानसी निलंगीकर
आपल्या गुणांचा कोणताच उल्लेख नाही. मास्टर्ससाठी तीव्र स्पर्धा असते व प्रवेश परीक्षा घेऊनच प्रत्येक विद्यापीठ प्रवेश देते. सर्वात उत्तम संस्था ‘इंडियन स्टॅटिस्टिक्स इन्स्टिटय़ूट, कलकत्ता’ आहे. नंतर संशोधन संस्थांत संख्याशास्त्रीय विश्लेषक म्हणून काम सुरू होते.
  • मी यंदा बारावीची परीक्षा दिली आहे. मला फोटोग्राफीची आवड आहे व त्यातच करिअर करायची इच्छा आहे. त्यासाठी पदवी अभ्यासक्रम कोणता व संधी कोणत्या मिळतील?  – अक्षज
फिल्म अँड व्हिडीओ, फोटोग्राफी किंवा बॅचलर्स इन मास कॉम हा अभ्यासक्रम करून मग सिनेमॅटोग्राफी असे अभ्यासक्रम विविध खासगी विद्यापीठात उपलब्ध आहेत. त्यानंतर उमेदवारीमध्ये चार-पाच वर्षे जातातच. हमखास संधी कोणीच सांगू शकत नाही. स्वत:च्या कौशल्यावर संधी मिळते. नीट विचार करावा आणि निर्णय घ्यावा.
First Published on October 19, 2018 1:57 am
Web Title: loksatta career mantra 22