Thursday, November 23, 2017

नोकरीची संधी आयसीएमआर - नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ

नोकरीची संधी

आयसीएमआर - नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ

सुहास पाटील | Updated: November 2, 2017 3:51 AM
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )
*  आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ (इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) (जाहिरात क्र. एनआयआरआरएच/०१/एस/०९/२०१७) सायंटिस्ट – ‘बी’/‘सी’ पदांची भरती.
सायंटिस्ट-बी (नॉन मेडिकल)  लाइफ सायन्सेस – रिप्रोडक्टिव्ह बायोलॉजी (अजा – १, इमाव – १, यूआर – २, व्हीएच/ओएच – १)
सोशल सायन्सेस (इमाव -१)
वयोमर्यादा – ३५ वर्षरयत.
सायंटिस्ट-सी (नॉन-मेडिकल)
रिप्रोडक्टिव्ह बायोलॉजी (यूआर – २)
व्हेटरिनरी सायन्सेस – (यूआर – १).
वयोमर्यादा – ४० वर्षांपर्यंत.
पात्रता – प्रथम वर्गासह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी. व्हेटरीनरी सायन्सेससाठी ४ वर्षांचा अ‍ॅनिमल फॅसिलिटी लॅबमधील अनुभव आवश्यक.
ऑनलाइन अर्ज www.icmr.nic.in किंवा www.nirrh.res.in या संकेतस्थळांवर
दि. ६ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.
ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी पूर्ण भरलेली, सही केलेली ‘दि डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, जे. एम. स्ट्रीट, परेल, मुंबई – ४०००१२’ या पत्त्यावर दि. १६ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावी.
*  नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, दिल्ली आपल्या देशभरातील आस्थापनांवर पुढील पदांची कंत्राटी पद्धतीने भरती.
लॉ रिसर्च असोसिएट – मुंबई – ३ पदे
(एकूण १६पदे).
पात्रता – कायदा विषयातील पदवी
(फ्रेश किंवा अनुभवी) (किमान सरासरी ५०% गुणांसह उत्तीर्ण)/बार काऊंसिलकडे रजिस्ट्रेशन केलेले असावे.
वयोमर्यादा – दि. १ सप्टेंबर, २०१७ रोजी
३० वर्षांपर्यंत.
एकत्रित वेतन – रु. ३०,०००/- दरमहा.
www.nclt.gov.in  या संकेतस्थळावरील जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज उमेदवारांनी आपल्या रिझ्युमेसोबत आवश्यक त्या कागदपत्रांसह एनसीएलटीच्या दिल्ली कार्यालयात दि. ९ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.
स्टेनोग्राफर्स मुंबई बेंच – ८ पदे, (एकूण २१ पदे).
पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण  इंग्रजी शॉर्टहॅण्ड १०० श.प्र.मि. वेग.
वेतन – रु.४५,०००/- दरमहा.
विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. २७ नोव्हेंबर, २०१७.
अर्ज पाठविण्याचा पत्ता -अनिल कुमार, अंडर सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, रु.नं. ६१४, ब्लॉक नं. ३, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, न्यू दिल्ली – ११०००३.
*  स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘ज्युनियर इंजिनीअर्स (सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सव्‍‌र्हेइंग अ‍ॅण्ड काँट्रक्ट) परीक्षा-२०१७’ दि. ५ जानेवारी ते ८ जानेवारी, २०१८ दरम्यान घेणार. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये (जसे की सीपीडब्ल्यूडी, पोस्ट, एमईएस्, सेंट्रल वॉटर कमिशन इ.) ‘ज्युनियर इंजिनीअर’ पदांसाठी भरती.
वेतन – लेव्हल – ६
(रु. ३५,४००/- १,१२,४००/-) अंदाजे एकूण रु. ४९,०००/-
पात्रता – सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण.
वयोमर्यादा – २७/३०/३२ वर्षेपर्यंत (उच्चतम वयोमर्यादेत सूट इमाव -३  वर्षे, अजा/अज – ५ वर्षेपर्यंत)
परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर आणि देशभरातील इतर.
परीक्षा शुल्क – रु. १००/- (अजा/अज/महिला/विकलांग यांना फी माफ).
ऑनलाइन अर्ज www.ssconline.nic.in या संकेतस्थळावर दि. १७ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.
First Published on November 2, 2017 3:51 am
Web Title: job opportunity in india job vacancies in india indian government jobs 10

एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र कृषि सेवेचा अभ्यास हाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०१७ रोजी होणार आहे.

एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र कृषि सेवेचा अभ्यास

हाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०१७ रोजी होणार आहे.

महेश कोगे | Updated: November 1, 2017 5:29 AM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाणारी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०१७ रोजी होणार आहे. त्यामुळे आजच्या अंकात आपण महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेची माहिती करून घेऊया. त्यायोगे मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि अभ्यासाचे नियोजन कसे करता येईल ते पाहु.
प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन (एक अनिवार्य व एक वैकल्पिक)

*     कृषि विज्ञान हा विषय अनिवार्य असून परिक्षार्थीला कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी यापैकी एका विषयाची वैकल्पिक विषय म्हणून निवड करता येते.
*     मुख्य परीक्षेच्या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका (अनिवार्य आणि वैकल्पिक) फक्त इंग्रजी माध्यमातच असतात.
*    मुख्य परीक्षा अभ्यासक्रम –
* अभ्यासक्रमातील प्रमुख घटक येथे देत आहे. संपूर्ण अभ्यासक्रमासाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
पेपर १ (अनिवार्य)
कृषि विज्ञान (अ‍ॅग्रीकल्चर सायन्स)
*    अ‍ॅग्रॉनॉमी
अ‍ॅग्रॉनॉमीची तत्वे –
* अ‍ॅग्रॉनॉमी – व्याख्या व्याप्ती आणि कृषी शास्त्रज्ञांची भूमिका.
*     पिकांचे वर्गीकरण – भारत आणि महाराष्ट्रातील कृषि हंगाम
*     मशागत (टिलेज) – मशागतीचे जमीन व पिकांच्या वाढीवरील परिणाम.
* बियाणे –
* पेरणी प्रणाली –
* तृण
२) कृषी हवामानशास्त्र – कृषी हवामानशास्त्र व्याख्या, तापमान मापन, सौर किरणे, वातावरणीय दबाव, हायड्रॉलॉजीकल सायकल.
३) जलसिंचन पाणी व्यवस्थापन –
* पाण्याचे स्त्रोत, आद्र्रता, बाष्पीभवन.
* सिंचन
* ड्रेनेज
४) फिल्ड क्रॉप्स –
अ) खरीप पिके       ब) फिल्ड पिके
५) पर्जन्य आधारीत शेती :
महाराष्ट्रातील अ‍ॅग्रॉक्लायमॅटीक झोन.
६) शेती प्रणाली आणि शाश्वत शेती
माती विज्ञान (सॉईल सायन्स) – मातीचे प्राकृतीक आणि रासायनिक गुणधर्म, रचना, प्रकार आणि पिक उत्पादनात मातीचे महत्व.
* कृषि अभियांत्रिकी
’  शेती अवजारे आणि कार्यक्षमता –
अ) शेतीतील कार्यशक्तीचे घटक
ब) मशागत (टीलेज)
क) बियाणे पेरण्याचे तंत्र
ड) पिकांची संरक्षण करणारी उपकरणे
* कृषिप्रक्रिया अभियांत्रिकी
अ) साठवणुकीदरम्यान अन्नधान्यात होणारे बदल
ब) डिटर्मिनेशन ऑफ मॉईश्चर कन्टेन्ट
क) कार्यरत तत्वे
ड) मटेरियल हॅन्डिलग इक्युपमेंट्स
’  माती आणि पाणी संवर्धन, पाणलोट व्यवस्थापन
अ) मृदा व पाण्याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रात
वापरल्या जाणाऱ्या पद्धती.
ब) इरोजन
क) पाणलोट व्यवस्थापन तत्वे
* सूक्ष्म सिंचन आणि डेनेज अभियांत्रिकी
* फार्म स्ट्रक्चर
विश्लेषण – गुण विभागणी

२०१६च्या प्रश्नपत्रिकेतील घटकनिहाय गुणांची विभागणी

२०१६ च्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमातील गुणांच्या विभागणीवरून असे दिसून येते की, आयोगाने कृषी अभियांत्रिकी व अ‍ॅग्रॉनॉमी या घटकांना २/३ पेक्षा जास्त वेटेज दिले आहे. दोन्ही घटकांवर अनुक्रमे ४० प्रश्न ८० गुणांसाठी विचारले आहेत. त्यामुळे कृषि विज्ञान या विषयाचा अभ्यास करताना अ‍ॅग्रॉनॉमी व कृषी अभियांत्रिकी या घटकांना प्राधान्यक्रम देणे गरजेचे आहे.
अ‍ॅग्रॉनॉमी या घटकात हवामानशास्त्रीय घटकांचे जसे की, उष्णता, जमिनीतील आद्र्रता, हवा यांचा पिकांवरील परिणाम, मशागतीवर परिणाम करणारे घटक, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), जागतिक हवामानशास्त्र संस्था (WMO), मशागत पद्धती, पिकांनुसार पाण्याची आवश्यकता, शाश्वत शेती, जलसिंचनाच्या पद्धती व पाणी व्यवस्थापन पद्धती,  सेंद्रीय शेती, सौर किरणे, महाराष्ट्रातील कृषी हंगाम, तृणधान्ये, डाळी, व्यावसायिक पिके या उपघटकांवर प्रश्न विचारले आहेत.
माती विज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी या घटकांत जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीचा कस, सेंद्रीय खते, पोषक द्रव्ये, शेती संसाधने, धान्य साठवणूकीस आवश्यक वातावरण, इक्युपमेंट्स हॅन्डिलग, सुक्ष्मसिंचन, ग्रीन हाऊस तंत्रज्ञान, शेती यांत्रिकी या घटकांवर आयोगाने भर दिला आहे. त्यामुळे अभ्यास करतांना संबंधित उपघटकांवर परिक्षार्थीनी लक्ष द्यावे.
संदर्भ सूची
*   प्रिन्सिपल ऑफ अ‍ॅग्रॉनॉमी – रेड्डी
*   राज्य परीक्षा मंडळाची अ‍ॅग्रीकल्चर आणि
*   टेक्नॉलॉजीची ११ वी व १२वी ची पुस्तके
*   पर्यावरण  – शंकर आयएएस अ‍ॅकॅडमी
*   टॉपर्स नोटस् – सुभाष यादव, सचिन सुर्यवंशी
*   जनरल अ‍ॅग्रीकल्चर – मुनीरजी
*   अ कॉम्पेटिटिव्ह बुक ऑफ अ‍ॅग्री  – नेमराज सुंदा
*    ईगल पब्लिकेशन बुक – नागरे
First Published on November 1, 2017 5:26 am
Web Title: study of maharashtra agricultural services

करिअरमंत्र मी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. मला अध्यापन क्षेत्रात करिअर करण्यात रस आहे.

करिअरमंत्र

मी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. मला अध्यापन क्षेत्रात करिअर करण्यात रस आहे.

सुरेश वांदिले | Updated: November 1, 2017 5:34 AM

*   मी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. मला अध्यापन क्षेत्रात करिअर करण्यात रस आहे. तर आता मी बी.एड. किंवा डी.एड. करू शकतो का?
-शिवाजी फिरंगे
तुला प्राथमिक, माध्यमिक वा उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक व्हायचे असल्यास डी.एड./बी.एड. करावे लागेल. मात्र तू एम.टेक केल्यास तुला खासगी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकवण्याची संधी मिळू शकते. पीएचडी करून ठेवल्यास तुला भविष्यात आयआयटी वा इतर शासकीय अभियांत्रिकी संस्थांमध्ये अशी संधी मिळू शकते. काही खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये बी.ई. झालेल्या उमेदवारांनासुद्धा शिकवण्याची संधी देतात. तू राहत असलेल्या परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात जाऊन तुझी इच्छा प्रदर्शित कर.
’   मी बी.ए.ची पदवी घेतली आहे. आता यानंतर मला एम.ए आणि एल.एल.बी असे दोन्ही अभ्यासक्रम करता येतील. परंतु एम.ए. केले तर पदव्युत्तर पदवी दोनच वर्षांत मिळेल. एल.एल.बी केल्यानंतर एल.एल.एम. या पदव्युत्तर पदवीसाठी पाच वर्ष लागतील. माझा गोंधळ उडाला आहे. मी नेमके काय करू? एम.ए की एल.एल.बी? 
-अनिकेत महल्ले
अशा प्रकारे गोंधळ उडणे, काही नवे नाही.
तसेच विचित्रही नाही. सर्वप्रथम तुला एखादी पदवी का घ्यायची आहे, याचा विचार कर. एम.ए. करून तुला काय करायचे आहे आणि एल.एल.बी. केल्यानंतर तुला काय करायचे आहे, ते आधी स्पष्ट करून घे. केवळ ज्ञान प्राप्तीसाठीच शिकायचे असल्यास काहीही केलेस तरी तसा कोणताच फरक पडत नाही. एम.ए. करून थेट नोकरी मिळण्याचा सध्याचा काळ नाही. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा द्यावीच लागेल. जर तुझा कल वकिली करण्याकडे असेल, तर एलएलबी करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. एलएलबीच्या विषयांचे ज्ञान उत्तम मिळवले असल्यास व संवादकौशल्य चांगले विकसित केले तर सनद मिळाल्याबरोबर स्वतंत्र करिअर सुरू होऊ  शकते. एलएलएम केल्यावर स्पेशलाइज्ड वकील म्हणून संधी मिळू शकते. यातील कामगिरी अशिलांच्या पसंतीस उतरली तर तुला अधिक काम मिळू शकते. ज्याप्रमाणे स्पेशलाइज्ड डॉक्टरकडे गर्दी होते, त्याला जराही उसंत मिळत नाही, तसेच इकडेही घडू शकते.
First Published on November 1, 2017 5:16 am
Web Title: expert career guidance for upsc exam 2017

नोकरीची संधी प्रशिक्षण कालावधी डिझेल मेकॅनिक आणि कारपेंटर यांना २ वर्षे इतरांना १ वर्ष.

नोकरीची संधी

प्रशिक्षण कालावधी डिझेल मेकॅनिक आणि कारपेंटर यांना २ वर्षे इतरांना १ वर्ष.

Updated: November 1, 2017 5:11 AM
पश्चिम रेल्वे, अहमदाबाद (एडीआय) डिव्हिजन, पुढील अप्रेंटिसशिप पदांची भरती.
(१) फिटर (११२ पदे),
(२) मशिनिस्ट (९ पदे),
(३) वेल्डर (२३ पदे),
(४) इलेक्ट्रिशियन (४६ पदे),
(५) डिझेल मेकॅनिक (१६९ पदे),
(६) कारपेंटर (७ पदे),
(७) पेंटर (५ पदे) इ.
प्रशिक्षण कालावधी डिझेल मेकॅनिक आणि कारपेंटर यांना २ वर्षे इतरांना १ वर्ष.
वयोमर्यादा – दि. १३ ऑक्टोबर, २०१७ रोजी १५ ते २४ वर्षे (इमाव – २७ वर्षे, अजा/अज – २९ वर्षे).
अर्जाचे शुल्क – रु. १००/-. इंडियन पोस्टल ऑर्डर/डीडी स्वरूपात.
पात्रता – दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण.
निवड – १०वी आणि आयटीआयच्या गुणांची एकत्रित गुणवत्तेनुसार.
विहित नमुन्यातील अर्ज (जाहिरातीत दिल्यानुसार नवीन नमुन्यानुसार www.wr.indianrailways.gov.in
या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.) आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रतींसोबत डीआरएम ऑफिस, वेस्टर्न रेल्वे, अहमदाबाद या पत्त्यावर पोस्टाने दि. १२ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

*    महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी ट्रान्स्मिशन कं. लि. (जाहिरात क्र. ३/२०१७) असिस्टंट इंजिनीअरच्या एकूण १०० पदांची भरती.
(१) असिस्टंट इंजिनीअर (ट्रान्स) – ५० पदे. पात्रता – बी.ई. (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग).

(२) असिस्टंट इंजिनीअर (सिव्हिल) – बी.ई. (सिव्हिल इंजिनीअरिंग).
वयोमर्यादा – दि. १५ नोव्हेंबर, २०१७ रोजी ३५ वर्षे (मागासवर्गीय – ४० वर्षे, विकलांग – ४५ वर्षेपर्यंत)
निवड पद्धती – ऑनलाइन टेस्टमधील कामगिरीवर आधारित अंतिम निवड.
परीक्षा शुल्क – रु. ७००/-
(मागासवर्गीय रु. ३५०/-). ऑनलाइन अर्ज www.mahatransco.in या संकेतस्थळावर दि. १५ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.
ऑनलाइन टेस्ट डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान होईल.

’   इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स, गृह मंत्रालय, भारत सरकार ‘हेड कॉन्स्टेबल/कम्बॅटंट मिनिस्ट्रियल’च्या एकूण ६२ पदांची भरती.
पुरुष उमेदवार – ४५ पदे, महिला उमेदवार – ८ पदे आणि आयटीबीपीच्या उमेदवारांसाठी ९ पदे.
पात्रता – १२वी उत्तीर्ण टायिपग स्पीड इंग्रजी – ३५ श.प्र.मि. किंवा िहदी – ३० श.प्र.मि.
वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट, २०१७ रोजी १८ ते २५ वर्षे. (इमाव – २८ वर्षे, अजा/अज – ३१ वर्षेपर्यंत) (आयटीबीपी उमेदवारांसाठी ४० वर्षेपर्यंत, अजा/अज – ४५ वर्षेपर्यंत).
शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – किमान १६५ सें.मी. (अज – १६२.५ सें.मी.),
महिला – किमान १५५ सें.मी.(अज – १५० सें.मी.). छाती – पुरुष – ७७-८२ सें.मी.
(अज – ७६-८१ सें.मी.)
निवड पद्धती –
फेज-१ हाइट बार टेस्ट, शारीरिक क्षमता चाचणी, शारीरिक मापदंड मोजणी, बायोमेट्रिक ओळख.
फेज-२
(अ) लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची १०० गुणांसाठी.
तीन तास कालावधी
(अंकगणित, सामान्यज्ञान, इंग्रजी,
कॉम्प्युटर नॉलेज).
(ब) कॉम्प्युटरवर टायिपगची स्किल टेस्ट.
फेज-३ मूळ कागदपत्रे तपासणी.
परीक्षा शुल्क – रु. १००/- (महिला, अजा/अज/माजी सैनिक यांना फी माफ).
www.recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर दि. १३ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत.
First Published on November 1, 2017 5:11 am
Web Title: job opportunity in idia job vacancies in india job vacancies

यूपीएससीची तयारी : अभ्यासक्रमाचे आकलन विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.

यूपीएससीची तयारी : अभ्यासक्रमाचे आकलन

विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.

श्रीकांत जाधव | Updated: October 31, 2017 5:10 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

आजच्या लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर ३ मध्ये नमूद केलेल्या अभ्यासक्रमाचा आणि या पेपरचे स्वरूप व्याप्ती यांचा थोडक्यात महत्त्वपूर्ण आढावा घेणार आहोत. यूपीएससीने २०१३मध्ये  मुख्य परीक्षेच्या अभ्यासामध्ये बदल केलेला आहे. प्रस्तुत बदलानुसार या पेपरमध्ये  तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक घटकामध्ये अंतर्भूत असणारे मुद्दे याची यादीही देण्यात आलेली आहे.
आर्थिक विकास – या घटकामध्ये भारतीय अर्थव्यवस्था संबंधित मुद्दय़ाचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेशी निगडित आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, नैसर्गिक साधनसंपत्ती व या संपत्तीच्या वापराचे नियोजन, सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी सरकारमार्फत राबविले जाणारे महत्त्वाचे उपक्रम, देशातील बजेट प्रक्रिया (Budgetary process), कृषी आणि कृषी संबंधित संलग्न असणारी क्षेत्रे तसेच कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि देशांतर्गत स्थूल उत्पादनातील वाटा वाढविण्यासाठी सरकारमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आणि या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या व त्या सोडविण्यासाठी सरकारने आखलेली ध्येयधोरणे. औद्योगिक क्षेत्र, सेवाक्षेत्र यांसारख्या आर्थिक विकासाला आणि आर्थिक वृद्धीला अधिक गती देणाऱ्या क्षेत्रासाठी सरकारमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम, योजना, आखण्यात आलेले कायदे, भारतामध्ये परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी आखण्यात आलेली रणनीती व याचबरोबर भारताचे परकीय व्यापार धोरण व निर्यातवाढीसाठी आखलेल्या विविध उपाययोजना, दळणवळण क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सरकारमार्फत केले जाणारे विशेष प्रयत्न, १९९१मध्ये भारताने अवलंबिलेले आर्थिक उदारीकरणाचे धोरण आणि याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, जागतिकीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम इत्यादी महत्त्वपूर्ण मुद्यांचा अभ्यास या घटकाची तयारी करताना करावा लागतो.
तंत्रज्ञान – हा घटक मुख्यत्वे विज्ञान आणि तंत्रज्ञान या अनुषंगाने आहे. या घटकामध्ये भारत सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये विकास घडवून आणण्यासाठी कोणत्या प्रकारच्या धोरणाची आखणी केलेली आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानचा विकास व व्यवहार उपयोगिता, तसेच याचा सर्वसामान्याच्या जीवनावर होणार परिणाम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि दिलेले योगदान तसेच माहिती तंत्रज्ञान, संगणक, अवकाश संशोधन, नॅनो तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा अधिकार संबंधित मुद्दे इत्यादी बाबींचा समावेश आहे आणि यासंबंधी दररोज काहीना काही महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे हा घटक अभ्यासताना उपरोक्त नमूद केलेल्या प्रत्येक बाबीची मूलभूत म्हणजेच संकल्पनासह योग्य समज असावी लागते. थोडक्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान घटक अभ्यासताना विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये लावले जाणारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावरील नवनवीन शोध, या शोधामुळे होणारे फायदे आणि तोटे, संबंधित बौद्धिक संपदा, अधिकार तसेच याचे होणारे परिणाम इत्यादी महत्त्वपूर्ण पलूंवर भर देण्यात येतो.
जैवविविधता, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन – या घटकामध्ये पर्यावरण संवर्धन, पर्यावरण आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास, या ऱ्हासासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण, नदी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व यामुळे उत्पन्न झालेल्या समस्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, भारत सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी पास करण्यात आलेले विविध कायदे व त्यांची उपयुक्तता याचबरोबर पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागतात. आपत्ती व्यवस्थापन यामध्ये आपत्तीचे प्रकार ज्यामध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रकारांचा अंतर्भाव आहे. आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, तसेच आपत्ती निवारणासाठी सरकारमार्फत आखण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापन योजना व कायदे इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागणार आहेत.
सुरक्षा – सद्यस्थितीत भारताला बा आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत आहेत. सुरक्षा या घटकामध्ये भारताच्या बा आणि अंतर्गत सुरक्षासंबंधी मुद्दय़ांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीचा दहशतवाद अर्थात नक्षलवाद, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद, वाढता प्रादेशिकवाद, पूर्वेकडील राज्यामध्ये होणारी घुसखोरी व वांशिक चळवळी, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय सीमांसंबंधी असणारे वादविवाद, संघटित गुन्हेगारी, अवैध पसा हस्तांतरण, सीमेवर अवैधरीत्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी आणि याचे असणारे संघटित स्वरूप, सततचे होणारे भाषिक वाद, राज्याराज्यांतर्गत असणारे वाद, धार्मिक दंगे, सायबर सुरक्षा संबंधित मूलभूत माहिती, माध्यमे आणि सोशल नेटवìकग साइटस याचा होणारा वापर,
ज्याद्वारे देशातील सामाजिक सलोख्याला निर्माण होणारा धोका, सुरक्षतेला निर्माण होणारे आवाहन इत्यादी बाबी आणि याच्या जोडीला या आव्हानांना सामोरे जाताना भारत सरकारने आखलेली रणनीती ज्यामध्ये सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षमरीत्या राबविणे, सीमेलगतच्या भागाचा
विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. तसेच देशाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेल्या विविध सरकारी संस्था आणि संघटना व त्यांना नेमून दिलेले कार्य याचबरोबर सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना व कायदे यांची माहिती असणे आवश्यक आहे.
उपरोक्त चíचलेल्या जवळपास सर्व घटकांमध्ये महत्त्वाच्या संकल्पनांचाही समावेश असतो आणि या संकल्पनांचे योग्य आकलन करणे अपेक्षित आहे ज्यामुळे विषयावर प्रभुत्व निर्माण करणे सोपे होते. आपण यापुढील प्रत्येक लेखामध्ये संबंधित घटकामधील काही महत्त्वाच्या संकल्पनांवरही चर्चा करणार आहोत. उपरोक्त चíचलेले सर्व घटक अभ्यासताना या घटकांसंबंधित घडणाऱ्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचीही तयारी करावी लागणार आहे. अर्थात प्रत्येक घटकाचे मूलभूत ज्ञान असल्याशिवाय चालू घडामोडीचे योग्य आकलन करता येत नाही.
या पुढील लेखामध्ये या पेपरमध्ये नमूद केलेल्या आर्थिक विकास या घटकाची तयारी करण्यासाठी लागणाऱ्या उपयुक्त संदर्भग्रंथाचा तसेच गतवर्षीय मुख्य परीक्षेत या घटकावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते, याची एकत्रित चर्चा करणार आहोत.
First Published on October 31, 2017 5:10 am
Web Title: tips to crack upsc civil services

नोकरीची संधी ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ओएनजीसी)

नोकरीची संधी

ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ओएनजीसी)

सुहास पाटील | Updated: October 31, 2017 5:07 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ओएनजीसी) आपल्या देशभरातील २३ ऑपरेटिंग लोकेशन्स (मुंबई (५६० पदे), उरण (१२० पदे), गोवा (२८ पदे), वडोदरा (२११ पदे), अहमदाबाद (५०६ पदे), हाजिरा (१९७ पदे), मेहसाणा (४३३ पदे) इ.) मध्ये अ‍ॅप्रेंटिसच्या एकूण ५,२५० पदांची भरती.
दहावी पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी
*    केबिन/रूम अटेंडंट (मुंबई – ३० पदे, उरण – २ पदे).
*    डेटा एन्ट्री ऑपरेटर (मुंबई – १० पदे).
*    हाऊसकीपर (मुंबई – १० पदे, उरण – ३ पदे).
(डी) स्टोअरकीपर (मुंबई – १५ पदे)
बारावी पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी
*   अकाऊंटंट (मुंबई – ५९ पदे, उरण – ४ पदे, बारावी कॉमर्स/मॅथ्स विषयांसह).
*    लायब्ररी असिस्टंट (मुंबई – ४ पदे, उरण – १ पदे).
*    सेक्रेटरियल असिस्टंट (मुंबई – ३२७ पदे, उरण – २३ पदे).
बी.कॉम्. पात्रताधारकांसाठी – अकाऊंटंट
बी.एस्सी. (फिजिक्स/केमिस्ट्री) पात्रताधारकांसाठी – लॅबोरेटरी असिस्टंट
(मुंबई – २३ पदे, उरण – १० पदे).
आयटीआय पात्रताधारकांसाठी –
*    केबिन रूम अटेंडंट,
*    कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅिमग असिस्टंट (सीओपीए) (मुंबई – ३२ पदे, उरण – ४ पदे),

*    इलेक्ट्रिशियन (मुंबई – १२ पदे, उरण – २० पदे),
*    इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (मुंबई – २ पदे, उरण – ७ पदे),
*    फिटर (मुंबई – ४ पदे, उरण – २३ पदे),
*    इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स (मुंबई – २८ पदे, उरण – ६ पदे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसुद्धा पात्र आहेत.),
*    लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लँट) (मुंबई – २३ पदे, उरण – १० पदे),
*    मेकॅनिक डिझेल (मुंबई – ४ पदे, उरण – ४ पदे),
*    सेक्रेटरियल असिस्टंट (मुंबई – ३२७ पदे, उरण – २३ पदे),
*    वेल्डर (उरण – ३ पदे),
*    इन्स्ट्रमेंट मेकॅनिक (उरण – ५ पदे),
*     मशिनिस्ट/टर्नर (उरण – ३ पदे).
पात्रता – (१० वी/१२ वी/आयटीआय इ.) परीक्षेत किमान ४५% गुणांची अट. (अजा/अज/विकलांग यांना ४०% गुण आवश्यक)
वयोमर्यादा – सर्व पदांसाठी दि. १ नोव्हेंबर, २०१७ रोजी १८ वर्षे पूर्ण.
निवड पद्धती – पदानुसार पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार.
स्टायपेंड दरमहा – रु. ५,००० ते १०,५००/- ट्रेड आणि लोकेशननुसार. विस्तृत जाहिरात www.ongcindia.com  वर उपलब्ध.
जाहिरातीत दिलेल्या विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज संबंधित लोकेशनवर दि. ३ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत स्पीड पोस्ट/रजिस्टर्ड पोस्टाने पोहोचतील असे पाठवावेत. अर्जासोबतच पुढील कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रतीही जोडाव्यात. एसएससी पासिंग सर्टििफकेट आणि मार्क लिस्ट, आयटीआय मार्क लिस्ट,  जातीचा दाखला (अजा/अज/इमावसाठी), अपंगत्वाचा दाखला (असल्यास), आधार कार्ड.
सर्व पदांसाठी १२ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पुढील पदे वगळता
अकाऊंटंट – पात्रता १२ वी – १४ महिने,
केबिन रूम अटेंडंट – पात्रता – आयटीआय – ६ महिने,
डेटा एन्ट्री ऑपरेटर – सेक्रेटरियल असिस्टंट -पात्रता – १२ वी – १५ महिने,
आयटी अँड ईएसएम – पात्रता – आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड – २४ महिने.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
ओएनजीसी मुंबईसाठी – ‘१/८, एचआर-ईआर , ओएनजीसी मुंबई, एनबीपी, ग्रीन हाईट्स, प्लॉट सी-६९, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई – ४०००५१’.
ओएनजीसी उरणसाठी – ‘१/८, एचआर-ईआर, ओएनजीसी उरण प्लँट, द्रोणागिरी भवन, उरण, जि. रायगड – ४००७०२’ अर्जाच्या लिफाफ्यावर उजव्या कोपऱ्यात ‘अ‍ॅप्रेंटिस अ‍ॅप्लिकेशन’ असे लिहावे.
अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, आधारकार्ड उमेदवाराकडे असणे आवश्यक. उमेदवार कोणत्याही एका ट्रेडसाठी अर्ज करू शकतात.
First Published on October 31, 2017 5:07 am
Web Title: job vacancies in india indian government jobs job vacancies in india

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : नासातर्फे पाठय़वृत्ती दरवर्षीप्रमाणे पीएच.डी. पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : नासातर्फे पाठय़वृत्ती

दरवर्षीप्रमाणे पीएच.डी. पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

प्रथमेश आडविलकर | Updated: October 28, 2017 1:56 AM

खगोलशास्त्र व अंतराळ संशोधनातील जगातल्या अग्रगण्य संशोधन संस्थेकडून म्हणजेच नासाकडून विद्यार्थ्यांसाठी पाठय़वृत्ती कार्यक्रम आखला आहे. पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र किंवा संबंधित शाखेतील विविध विषयांतील पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना NASA Hubble Fellowship Program (NHFP) च्या माध्यमातून पाठय़वृत्ती दिली जाते. त्याअंतर्गत दरवर्षीप्रमाणे पीएच.डी. पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व त्यासहित पाठय़वृत्तीचे लाभ असे या पाठय़वृत्तीचे स्वरूप आहे. त्यासाठी अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
पाठय़वृत्तीविषयी –
नासा या अमेरिकन संस्थेला आपण अंतराळ तंत्रज्ञानातील जागतिक स्तरावर बोलबाला झालेली संस्था म्हणून ओळखतो. येथे संशोधन करायला मिळावे, ही अनेकांची इच्छा असते. अमेरिकेतील अनेक प्रमुख विद्यापीठांच्या सहकार्याने नासा विविध शैक्षणिक व संशोधन उपक्रम राबवण्यामध्ये नेहमी पुढाकार घेत असते. नासा व अमेरिकी विद्यापीठांकडून संयुक्तपणे दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी मोफत प्रवेश व पाठय़वृत्तीचे लाभ दिले जातात. पदार्थविज्ञान, खगोलशास्त्रज्ञ, अंतराळशास्त्रज्ञ किंवा संबंधित शाखेतील विविध विषयांतील पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी NASA Hubble Fellowship Program (NHFP) या नावाने या संस्थांकडून पाठय़वृत्ती कार्यक्रम राबवला जातो. २०१८ साली सुरू होणाऱ्या या पाठय़वृत्ती कार्यक्रमाअंतर्गत पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमासाठी एकूण २४ अर्जदारांची निवड केली जाणार आहे. पाठय़वृत्ती कार्यक्रम व पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम या दोन्हींचा कालावधी तीन वर्षांचा आहे. अर्जदाराच्या प्रस्तावित संशोधन विषयांतील पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम अमेरिकेतील ज्या कोणत्या संशोधन संस्थेत किंवा विद्यापीठामध्ये उपलब्ध असेल तिथे तो अर्जदारास पूर्ण करावयाचा आहे. या पाठय़वृत्ती कार्यक्रमासाठी नासाची आर्थिक मदत अर्जदाराला तीन वर्षांसाठी मिळणार आहे. यासंबंधित अधिक माहिती त्याने दुव्यामध्ये दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन  मिळवावी.
ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र किंवा संबंधित शाखेतील विषयांमध्ये पीएच.डी.धारक असावा. त्याने दि. १ जानेवारी २०१५ पूर्वी पीएच.डी. पदवी मिळवलेली असावी. अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. अर्जदाराचा किमान एक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम लेखक म्हणून प्रकाशित झालेला असावा. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराने आयईएलटीएस किंवा टोफेल या इंग्रजीच्या परीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेमध्ये त्यांना किमान आवश्यक बँडस् किंवा गुण मिळालेले असावेत. अर्जदाराचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. संशोधनाव्यतिरिक्त त्याच्याकडे कार्यानुभव असेल तर त्याने तो तसा त्याच्या एसओपी व सीव्हीमध्ये नमूद करावा. या पाठय़वृत्तीसाठी त्याने पूर्ण केलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित जमा करावा.
अर्ज प्रक्रिया –
या पाठय़वृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून यादीमध्ये दिलेल्या कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह संस्थेच्या संकेतस्थळावरच जमा करायचा आहे. अर्जासह अर्जदाराने त्याचे एसओपी, सीव्ही, आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी एका परीक्षेचे गुण, पीएच.डी. पूर्ण केल्याचे विद्यापीठाचे प्रशस्तीपत्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केलेले शोधनिबंध, सध्या चालू असलेल्या व यापूर्वी केलेल्या संशोधनाचा एक लघुप्रबंध व त्यावरच आधारित त्याच्या प्रस्तावित संशोधनाचा (research proposal) लघुप्रबंध इत्यादी गोष्टी संस्थेला अपेक्षित असलेल्या स्वरूपात पाठवाव्यात. अर्जदाराच्या प्रस्तावित संशोधनाचा लघुप्रबंध नासाच्या सध्या खगोलशास्त्रातील चालू असलेल्या संशोधनाशी साधम्र्य दाखवणारा असावा. अर्जदाराने त्याच्या संशोधनाशी परिचित असलेल्या तीन तज्ज्ञांकडून शिफारसपत्रे घ्यावीत. अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत जरी दि. २ नोव्हेंबर २०१७ असली तरीही तज्ज्ञांसाठी शिफारसपत्रे पाठवण्याची अंतिम मुदत मात्र दि. ९ नोव्हेंबर २०१७ ही आहे. तज्ज्ञांनी शिफारसपत्र पाठवताना मात्र पीडीएफ स्वरूपात पाठवावयाची आहेत.
निवड प्रक्रिया –
  • अर्जदाराची संशोधनातील गुणवत्ता लक्षात घेऊन त्याच्या अर्जाची तपासणी केली जाईल. तपासणीमधून गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल. समितीचा निर्णय अंतिम राहील. अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.
उपयुक्त संकेतस्थळ –
https://nhfp.stsci.edu/
अंतिम मुदत –
  • या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २ नोव्हेंबर २०१७ आहे. तर अर्जदाराच्या वतीने तज्ज्ञांना शिफारसपत्रे जमा करावयाची अंतिम मुदत दि. ९ नोव्हेंबर २०१७ ही आहे.
itsprathamesh@gmail.com
First Published on October 28, 2017 1:56 am
Web Title: nasa study nasa hubble fellowship program
0
Shares