Wednesday, February 1, 2017

नोकरीची संधी महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन अंतर्गत पुणे व नागपूर येथे सीनिअर ऑफिस असिस्टंट (एचआर) च्या ४

नोकरीची संधी

महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन अंतर्गत पुणे व नागपूर येथे सीनिअर ऑफिस असिस्टंट (एचआर) च्या ४

सुहास पाटील,  द.वा. आंबुलकर | February 1, 2017 4:55 AM


’  सेना दल आरोग्य सेवेअंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाद्वारे पुणे व इतरत्र संधी-
अधिक माहिती व तपशिलासाठी
सेना दलाच्या एएफएमएसच्या http://www.afmcdg1d.gov.in/
या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.
महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन अंतर्गत पुणे व नागपूर येथे सीनिअर ऑफिस असिस्टंट (एचआर) च्या ४ जागा– अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र मेट्रोच्या www.metrorailnagpur.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज जॉइंट जनरल मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो हाउस, २८/२, सी. के. नायडू मार्ग, आनंदनगर, सिव्हिल लाइन्स, नागपूर ४४०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.
*  ललित कला अकादमीमध्ये सुपरवायझर्सच्या ७ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७ ते १३ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली ललित कला अकादमीची जाहिरात पाहावी अथवा अकादमीच्या www.lalitkala.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.
*  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मुंबई येथे प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्सच्या जागा-
अर्जदारांनी मेकॅनिकल वा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केली असावी व त्यांनी जीएटीई- २०१७ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० सप्टेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली माझगाव डॉक शिपबिल्डर्सची जाहिरात पाहावी अथवा www.mazdock.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.
*  नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कं. लिमिटेडला मुंबई येथे कंपनी सचिवाची आवश्यकता-
अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टीच्या   http://www.ncgtc.in/
या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लि. एमएसएमई डेव्हल्पमेंट सेंटर, दुसरा मजला, सी- ११, जी- ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.
*  हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. बंगलोर येथे मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) च्या ७५ जागा-
अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वा सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय जीएटीई- २०१७ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या www.hal-india.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.
*   भारतीय नौकानयन महामंडळ मर्यादित (भारत सरकारचा उपक्रम) मरिन ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, पवई, मुंबई येथे ‘ग्रॅज्युएट मरिन इंजिनीयर’ ४० उमेदवारांच्या मार्च २०१७ बॅचकरिता ८ महिन्यांचे शोअर बेस्ड ट्रेिनग.
त्यानंतर ६+४ महिन्यांचे बोर्ड ट्रेिनग दिले जाईल.
पात्रता – मेकॅनिकल इंजिनीअिरगमधील पदवी ऑनलाइन अर्ज http://www.shipindia.com / या संकेतस्थळावर ूंcareers/fleetpersonnel ’ या विभागात  दि. ६ फेब्रुवारी २०१७ पर्यंत करावेत.
*  इंडियन आर्मीमध्ये एनसीसी विशेष भरती योजना
एनसीसी – पुरुष – ५० पदे. एनसीसी – महिला – ४ पदे. पात्रता – किमान ५०% गुणांसह पदवी (कोणत्याही शाखेतील). पदवीच्या अंतिम वर्षांतील उमेदवार पात्र  एनसीसीमध्ये बी ग्रेड सर्टििफकेट  २ वर्षांचे ट्रेिनग. वयोमर्यादा – १९ ते २५ वष्रे. (उमेदवाराचा जन्म २ जुल १९९२ ते
१ जुल १९९८ दरम्यानचा असावा.)
उंची – पुरुष – १५७.५ सें.मी.,
महिला – १५२ सें.मी.
शारीरिक क्षमता – (१) २.४ कि.मी. १५ मिनिटांत धावणे, (२) २५ सीटअप्स, (ग्ग्ग्) १३ पुशअप्स, (ग्न्) ६ चिनअप्स, (न्) ३-४ मीटर दोरावर चढणे. निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणांनुसार एसएसबी मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातील. उमेदवारांनी एसएसबी सिलेक्शन सेंटर यापकी एक निवडावे. अलाहाबाद, भोपाळ, बंगलोर,
कापुरथाला (पंजाब).
ट्रेिनग – स्टायपेंड रु. २१,०००/- दरमहा. ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमी, चेन्नई येथे ४९ आठवडय़ांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर लेफ्टनंट पदावर नियुक्ती १० वर्षांसाठी. ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी.
ऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in
या संकेत स्थळावर दि. १५ फेब्रुवारी २०१७ (सकाळी १०.00) पर्यंत करावेत.
वेतन – रु. ८०,०००/- सीटीसी. आर्मी ग्रुप इन्शुरन्स रु. ७५लाख.
संपर्कासाठी दूरध्वनी –
०११-२६१७३२१५ (वेळ दु. २ ते ५)

एमपीएससी मंत्र : सामान्य अध्ययन- पेपर -२ मुळात ८०प्रश्नांपकी ७०प्रश्न जरी सोडवता आले तरी आपल्याला पंधरा प्रश्न चुकायला अनुमती असते.

एमपीएससी मंत्र : सामान्य  अध्ययन- पेपर -२

मुळात ८०प्रश्नांपकी ७०प्रश्न जरी सोडवता आले तरी आपल्याला पंधरा प्रश्न चुकायला अनुमती असते.

वसुंधरा भोपळे | February 1, 2017 5:01 AM


विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जर हमखास यश मिळवायचे असेल तर सामान्य अध्ययन पेपर दोन अर्थात CSAT मध्ये प्रभुत्व मिळविल्याशिवाय गत्यंतर नाही. वेळेचे बंधन काढून टाकल्यास बारावी पास असणारी कोणतीही व्यक्ती हा पेपर अगदी सहजपणे सोडवू शकते. परंतु राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये खरी कसोटी असते ती दोन तासांत छप्पन्न पानी पेपर सोडविण्याची!
यामध्ये साधारणपणे दहा ते बारा उतारे आणि त्यावरील पन्नास प्रश्न, गणित, बुद्धिमत्ता आणि तर्क अनुमान संबंधित पंचवीस प्रश्न, तसेच विद्यार्थ्यांच्या निर्णय क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या पेचप्रसंगांवरील पाच प्रश्न यांचा समावेश होतो. त्यामुळे CSAT चा चक्रव्यूह भेदायचा असेल तर अचूकता आणि समयनियोजनाचा कस लावावा लागतो. या लेखामध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेतील यशाचा हुकमी एक्का असणाऱ्याचे महत्त्व जाणून घेऊ यात.
*   अंतिम सीमारेखा पातळी आणि CSAT
गेल्या चार वर्षांतील पूर्व परीक्षेच्या निकालावर नजर टाकल्यास एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे परीक्षेचा पॅटर्न बदलल्यापासून अंतिम सीमारेखा पातळी (UT-OFF Line)चा आलेख खाली जाऊन आता पुन्हा वर येत आहे. २०१३ ते २०१६ पर्यंतच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील अंतिम सीमारेखा पातळी अनुक्रमे १७७, १३८, १२५, १५३ अशी आहे. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा आढावा घेतला असता पेपर एकमध्ये सर्वसाधारणपणे ६० ते ८५पर्यंत गुण मिळाले आहेत व पेपर दोनमध्ये सर्वसाधारणपणे ७० ते १२० पर्यंत गुण मिळाले आहेत. त्यामुळे अधिक गुण मिळवून देणारा विषय म्हणून CSAT चे महत्त्व अधोरेखित होते.
*   अभ्यासाचे नियोजन
या पेपरमध्ये अधिकाधिक गुण प्राप्त करण्यासाठी जास्तीत जास्त सराव करून समयनियोजनाचे तंत्र आत्मसात करावे लागते. यासाठी सर्वप्रथम निर्धारित वेळेत आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून तयारीच्या आजच्या टप्प्यावर आपण कोठे आहोत हे जाणून घ्यावे. आयोगाची प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर आपल्याला मिळालेल्या गुणांचे घटक निहाय विश्लेषण करावे. त्यापकी कोणत्या घटकावर आपले प्रभुत्व आहे,  कोणता घटक अजून तयारी केल्यास जमू शकतो, कोणता घटक खूपच
अवघड वाटतो याबद्दल सविस्तर नोंदी करून ठेवाव्यात आणि आपल्या या विश्लेषणातून आपल्या पुढील दोन महिन्यांतील अभ्यासाची रणनीती ठरवावी. जितका पेपर सोडविण्याचा सराव जास्त असेल तितका सक्सेस रेट जास्त असतो, परंतु जेवढय़ा प्रश्नपत्रिका सोडवाल त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे काटेकोर विश्लेषण करून आपण कुठे आहोत आणि अजून आपली मजल कुठेपर्यंत नेता येईल याचा विचार होणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रश्नपत्रिका सोडविण्याचे तंत्र
या पेपरमध्ये जर १०० ते १२५ पर्यंत गुण प्राप्त करायचे असतील तर साधारणपणे ४० ते ५० प्रश्न बरोबर येणे गरजेचे असते. आयोगाचा पेपर साधारणपणे ५६ पानांचा असतो आणि तो तुम्हाला १२० मिनिटांत वाचून सोडवायचा असतो. यावरूनच आपल्याला वापराव्या लागणाऱ्या समयनियोजन कौशल्याचे महत्त्व समजू शकते. मुळात विद्यार्थी जर पहिल्यापासून सलग पेपर सोडवत गेले तर ८०व्या प्रश्नापर्यंत पोहोचूच शकत नाहीत, काही प्रश्न हमखास सोडवायचे राहून जातात. या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी पेपर सोडविण्याचा अगोदरच सराव केला असेल तर ते आपल्याला कठीण वाटणाऱ्या घटकावरील प्रश्न किंवा हमखास वेळ खाणाऱ्या प्रश्नांना बगल देऊन कमी वेळात सुटणारे प्रश्न सोडवू शकतात; जेणेकरून सुटू शकणारे प्रश्न वेळेअभावी सोडवायचे राहात नाहीत. मुळात ८०प्रश्नांपकी ७०प्रश्न जरी सोडवता आले तरी आपल्याला पंधरा प्रश्न चुकायला अनुमती असते. या पंधरा चुकलेल्या प्रश्नांसाठी पाच प्रश्नांचे गुण वजा झाले तरी आपल्याला ५० प्रश्नांचे गुण हमखास मिळू शकतात.
म्हणूनच विद्यार्थी मित्रहो, हा फक्त बुद्धिमत्तेचा कस पाहाणारा विषय नाही तर सर्व अभ्यासतंत्रांचा कस पहाणारा विषय आहे. त्यामुळे स्वत:ची अभ्यासतंत्रे विकसित करण्यासाठी आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवून आपापले कच्चे दुवे हेरून घ्या, त्यांचा सराव करा आणि सराव चाचण्यांमधून आपली तयारी पडताळून पाहा. पुढील भागात आपण घटकनिहाय अभ्यासाच्या नियोजन आणि तंत्रांबद्दल माहिती घेऊ यात.
वसुंधरा भोपळे
First Published on February 1, 2017 5:01 am
Web Title: mpsc success mantra 6
0
SHARES
Share to Google+Google+

करिअरमंत्र विद्यार्थ्यांना कोणत्याही विद्याशाखेतून विशिष्ट गुण मिळवून पास व्हावे लागते.

करिअरमंत्र

विद्यार्थ्यांना कोणत्याही विद्याशाखेतून विशिष्ट गुण मिळवून पास व्हावे लागते.

सुरेश वांदिले | February 2, 2017 12:45 AM


मला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून चालवण्यात येणाऱ्या एमबीए अभ्यासक्रमाबाबत माहिती हवी आहे.
प्रशांत जाधव
एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत ऑनलाइन चाळणी परीक्षा घेतली जाते. यासाठी
विद्यार्थ्यांना कोणत्याही विद्याशाखेतून विशिष्ट गुण मिळवून पास व्हावे लागते. ही मर्यादा खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के, तर राखीव संवर्गासाठी ४० टक्के इतकी असेल. साधारण जुलै महिन्यात ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. संपर्क- http://ycmou.digitaluniversity.ac
 मी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांला आहे. मला नौदलात जायचे आहे. त्यासाठी मी काय करू?
प्रशिका रोकडे
नौदलातील प्रवेशासाठीचे काही मार्ग- (१) १०+२ थेट भरती (अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र/ गणित आणि रसायनशास्त्र, एकूण किमान गुण- ७० टक्के) (२) आर्टिफिसर अप्रेंटिसशिप (अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित, एकूण किमान गुण- ६० टक्के) (३) डायरेक्ट एन्ट्री स्पोर्ट्स (अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र/ गणित आणि रसायनशास्त्र, एकूण किमान गुण- ३३ टक्के), (४) मॅट्रिक रिक्रूट- कूक (अर्हता- १० वी, किमान एकूण गुण- ३३ टक्के), (५) मॅट्रिक रिक्रूटरयुट- स्पोर्ट्स (अर्हता- १० वी, एकूण किमान गुण- ३३ टक्के), (६) म्युझिशियन (अर्हता- १० वी, एकूण किमान गुण- ३३ टक्के), (७) नॉनमॅट्रिक रिक्रूट (अर्हता- १० वी, एकूण किमान गुण- ३३ टक्के), (८) सीनिअर सेकंडरी रिक्रूट (अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित, एकूण किमान गुण- ३३ टक्के), (९) सीनिअर सेकंडरी रिक्रूट- स्पोर्ट्स (अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित, एकूण किमान गुण- ३३ टक्के), (१०) नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी नेव्हल अ‍ॅकॅडमी परीक्षा (अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित, एकूण किमान गुण- ६० टक्के), (११) तुम्ही कम्बाईन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिस परीक्षा देऊन नौदलात जाऊ  शकता. मात्र त्यासाठी आधी आपणास पदवी प्राप्त करावी लागेल.
मी ११ वी विज्ञान (इलेक्ट्रॉनिक्स) या शाखेत शिकत आहे. मला अभियांत्रिकी करून यूपीएससी व एमपीएससी परीक्षा द्यायची आहे. मी त्या परीक्षेविषयी कोणती माहिती मिळवू?
आकाश पाटील
आकाश, तुमची इच्छा अतिशय चांगली आहे. त्यासाठी तुम्ही ‘लोकसत्ता’ दैनिकामधील करिअर वृत्तान्त नियमितरीत्या वाचत राहा. यामध्ये यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेसंबंधी विस्तृत माहिती नियमितरीत्या दिली जाते. दरम्यान, सामान्य अध्ययन, चालू घडामोडी, इंग्रजी व मराठी भाषाकौशल्य मिळवत राहा.
मी अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षांला आहे. मला महाराष्ट्र पोलीस दलात सामील व्हायचे आहे. मी अर्जसुद्धा भरला आहे. मात्र त्याविषयी मला काहीही माहिती नाही. मी काय करू?
दादा पाटील
महाराष्ट्र पोलीस दलात तुम्हाला पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक या मार्गाने तुम्ही थेट प्रवेश मिळवू शकता. पोलीस उपनिरीक्षकपदासाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत प्राथमिक आणि मुख्य परीक्षा घेतली जाते. पोलीस उपअधीक्षक पद हे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सामाईक परीक्षेद्वारे भरले जाते. या परीक्षेतील गुणवत्ता यादीतील आपले स्थान आणि आपण सुचवलेला पर्याय (उपजिल्हाधिकारी/ पोलीस उपअधीक्षक/ विक्रीकर अधिकारी इत्यादी) यावर आधारित नियुक्ती मिळू शकते. संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेद्वारे आपणास महाराष्ट्र कॅडेर मिळाले तर पोलीस अधीक्षक या पदावरची नियुक्ती मिळू शकते.
मी १२ वीमध्ये असून मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. मला बेकिंग आणि पेस्ट्रीमध्ये रस आहे. त्यात करिअर करायचे आहे. मला अमेरिका किंवा दुसऱ्या देशात हे शिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी मला १२ वीनंतर कोणते क्षेत्र निवडावे लागेल? कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ
स्वप्निल आळंदे
तुम्हाला बेकिंगसारख्या विषयात करिअर करायचे आहे, हे छानच आहे. परंतु परदेशातील शिक्षण हे महागडे असते, हे लक्षात घ्या. आपली आणि आपल्या पालकांची तशी आर्थिक तयारी असेल तर या पर्यायाचा विचार करा.
बेकरी आणि पेस्ट्री अभ्यासक्रम चालवणाऱ्या अमेरिकेतल्या काही महत्त्वाच्या संस्था
इन्स्टिटय़ूट ऑफ क्युलिनरी एज्युकेशन न्यूयॉर्क / क्युलिनरी इन्स्टिटय़ूट ऑफ अमेरिका / इंटरनॅशनल क्युलिनरी सेंटर, कॅलिफोर्निया/ लि कॉर्डान ब्ल्यू शिकागो / इंटरनॅशनल क्युलिनरी स्कूल वॉशिंग्टन/ सॅन डिएगो क्युलिनरी इन्स्टिटय़ूट – कॅलिफोर्निया/ रेस्टॉरंट स्कूल अ‍ॅट वालनट हिल कॉलेज फिलाडेल्फिया.
भारतातील नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग या संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय संस्थांमध्ये उत्तम दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते.
महाराष्ट्रातील संस्था- इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट दादर, मुंबई. संपर्क- http://www.ihmctan.edu/
करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com
First Published on February 2, 2017 12:45 am
Web Title: career guidance 17

वेगळय़ा वाटा : डिजिटल एमबीए ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून घरबसल्या वस्तू विकत घेता येते.

वेगळय़ा वाटा : डिजिटल एमबीए

ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून घरबसल्या वस्तू विकत घेता येते.

प्रा. योगेश हांडगे | February 2, 2017 12:47 AM


संपूर्ण जगभर डिजिटल क्रांती होते आहे. त्यानुसार पंतप्रधानांनीसुद्धा डिजिटल इंडियाची घोषणा केली. जगभरात ई-गव्हर्नन्स आणि ई-कॉमर्सची व्याप्ती वाढते आहे. ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून घरबसल्या वस्तू विकत घेता येते. तिच्या दर्जाबद्दल शंका असल्यास ती वस्तू परत देता येते. किमतीत घासाघीस करता येते. त्यामुळेच अधिकाधिक भारतीय ग्राहक याकडे वळत आहेत आणि ई-कॉमर्सला चालना मिळाली आहे. आगामी काळात जगभरातील मोठी लोकसंख्या डिजिटल अर्थव्यवस्थेला जोडली जाईल. त्यामुळेच येणारा काळ हा डिजिटल बिझनेस मॅनेजमेंटचा असेल. अनेक कंपन्यांनी त्या दिशेला पावले टाकायला सुरुवातही केली आहे. व्यवसायाचे डिजिटल सक्षमीकरण करण्यासाठी लागणारे कौशल्य आणि संसाधने यांची त्यांना गरज भासणार आहे. म्हणूनच या क्षेत्रात करिअरच्या मोठय़ा संधी आहेत. तांत्रिक कौशल्य, व्यवस्थापन आणि सर्जनशीलता असणाऱ्या उत्साही युवावर्गाला या क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी मिळू शकतात.
डिजिटल व्यवसाय व्यवस्थापन (एमबीए)
डिजिटल व्यवस्थापनातील कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि परिपूर्ण ज्ञान देण्याकरिता मुंबई विद्यापीठाने डिजिटल व्यवसाय व्यवस्थापनातील अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामध्ये व्यवसाय विकास आणि मार्केटिंगसंबंधित विषयांचा समावेश आहे. ई-मेल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, वेबसाइट प्लॅनिंग, मोबाइल
आणि वेबमार्केटिंग आदी विषयांचा यात समावेश आहे. या अभ्यासक्रमामध्ये कौशल्य विकसित करण्यासाठीच्या प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला आहे.
आवश्यक गुण
जनसंपर्काची आवड, तंत्रप्रेमी असणे आवश्यक तसेच व्यवस्थापनाची आवड असायला हवी.
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवीधारक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हे आदर्श करिअर ठरू शकते.
एमईटी एशियन मॅनेजमेंट डेव्हलपमेंट सेंटर, मुंबई (http://www.met.edu)
नवकोकण एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (http://www.neims.org.in/
या संस्थांमध्ये या संदर्भातील अभ्यासक्रम चालतात.
करिअर संधी
मार्केटिंग किंवा डिजिटल कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. तो पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांला अनेक संधी मिळू शकतात.
  • इंटरनेट मार्केटिंग स्पेशालिस्ट
  • डिजिटल सेल्स एक्झिक्युटिव्ह,
  • डिजिटल बिझनेस मॅनेजर
First Published on February 2, 2017 12:47 am
Web Title: digital mba

यूपीएससीची तयारी : यूपीएससीच्या तयारीचे बिगूल या परीक्षेच्या तयारीचा प्रारंभ करताना पुढील बाबी लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरते.

यूपीएससीची तयारी : यूपीएससीच्या तयारीचे बिगूल

या परीक्षेच्या तयारीचा प्रारंभ करताना पुढील बाबी लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरते.

तुकाराम जाधव | February 2, 2017 12:48 AM


देशातील नागरी सेवा पदांच्या भरतीसाठी केंद्र लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन केले जाते. परीक्षेतील भिन्न टप्पे, विविध विषय, व्यापक अभ्यासक्रम, प्रश्नांचे आव्हानात्मक स्वरूप आणि तीव्र स्वरूपाची स्पर्धा यामुळे यूपीएससी परीक्षा गुंतागुंतीची व आव्हानात्मक ठरते. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीचा प्रारंभ करताना पुढील बाबी लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरते.
यूपीएससी परीक्षेचे स्वरूप – यूपीएससी परीक्षा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत वा व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन निराळ्या टप्प्यांचा समावेश असणारी ही परीक्षा आहे. यातील पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची, बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित आणि नकारात्मक गुणपद्धत असलेली आहे. तसेच पूर्वपरीक्षेचा हा प्राथमिक टप्पा ‘पात्रता चाचणी’ (द४ं’्रऋ८्रल्लॠ ळी२३) स्वरूपाचा आहे. वस्तुनिष्ठ व नकारात्मक गुणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात नेमकेपणा व अचूकता याची हमी देण्याशिवाय पर्यायच नसतो. मूलभूत संकल्पनांचे आकलन, आवश्यक माहितीचे पुन्हा पुन्हा वाचन, अभ्यासाचे मजबुतीकरण, स्मरणशक्तीचा विकास, प्रश्नाखालील चुकीचे पर्याय बाजूला सारून बरोबर पर्यायाकडे जाण्याचे कौशल्य आणि अचूकता या आधारेच पूर्वपरीक्षेत यश संपादन करता येईल. मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची असल्यामुळे त्यानुसार अभ्यासपद्धतीत पूरक बदल करणे अत्यावश्यक ठरते. व्यक्तिमत्त्व चाचणीच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. उमेदवाराने आयोगाकडे पाठवलेली व्यक्तिगत माहिती, वैकल्पिक विषय, चालू घडामोडी आणि नागरी सेवेविषयी काही मूलभूत प्रश्न या अनुषंगाने मुलाखतीत प्रश्न विचारले जातात. मुलाखत ही तोंडी परीक्षा असल्यामुळे सदस्यांनी विचारलेले प्रश्न व्यवस्थितपणे ऐकणे व समजून घेणे, त्याविषयी आपले मत योग्य पद्धतीने मुलाखत मंडळापर्यंत पोहोचवणे, औपचारिक भाषा, आत्मविश्वासपूर्वक देहबोली, संभाषणात आवश्यक इतर सर्व औपचारिकता या सर्वाचे भान ठेवावे लागते. थोडक्यात प्रत्येक टप्प्याचे भिन्नत्व लक्षात घेऊन त्या प्रकारची अभ्यासपद्धती विकसित करावी.
अभ्यासक्रमाचे आकलन – पूर्वपरीक्षेत ‘सामान्य अध्ययन’ आणि ‘नागरी सेवा कलचाचणी’ हे दोन विषय तर मुख्य परीक्षेत निबंध, सामान्य अध्ययन (चार पेपर्स), वैकल्पिक विषय आणि अनिवार्य इंग्रजी तसेच भारतीय भाषा या विषयांचा समावेश आहे. केंद्र लोकसेवा आयोगाने या दोन्ही टप्प्यांतील उपरोक्त विषयांचा अभ्यासक्रम नमूद केलेला आहे. या अभ्यासक्रमाचे सूक्ष्म वाचन व आकलन अत्यावश्यक ठरते. अभ्यासाच्या आकलनाद्वारे एखाद्या ‘विषयाची व्याप्ती’ किती आहे याचा प्राथमिक अंदाज घेता येतो. ‘अभ्यास व वेळेचे नियोजन’ करताना प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे आकलन पायाभूत ठरते. मुलाखतीसाठी औपचारिकपणे अभ्यासक्रम निर्धारित केलेला नसला तर उपरोक्त परिच्छेदात अधोरेखित केलेल्या घटकांची तयारी महत्त्वाची ठरते.
प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण – परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात जे जे विषय समाविष्ट केले आहेत, त्यावरील गेल्या ५-६ वर्षांतील आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अत्यंत उपयुक्त ठरते. पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययन आणि नागरी सेवा कलचाचणी या विषयांच्या किमान २०११ पासूनच्या प्रश्नपत्रिका पाहाव्यात. मुख्य परीक्षेच्या बाबतीत जरी २०१३ पासून नवी परीक्षा योजना स्वीकारली तरी सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषय आणि निबंधाच्या जुन्या पद्धतीतील प्रश्नपत्रिका उपयुक्त ठरतील.

प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे प्रत्येक वर्षांची संबंधित विषयावरील प्रश्नपत्रिका बारकाईने वाचणे; प्रत्येक प्रश्न कोणत्या प्रकरण व अभ्यास घटकावर आधारित आहे हे पाहणे; त्या प्रश्नाचे स्वरूप संकल्पनात्मक, माहितीप्रधान अथवा विश्लेषणात्मक आहे हे लक्षात घेणे; प्रश्नात चालू घडामोडीचे आयाम अथवा संबंधित घटकाच्या भवितव्याविषयी काही विचारले आहे का हे जाणून घेणे होय. प्रश्न वर्णनात्मक, चर्चात्मक, स्पष्टीकरणात्मक, चिकित्सक, मूल्यमापनात्मक की उपाययोजनात्मक आहे याचेही आकलन महत्त्वाचे ठरते. अशा रीतीने मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका बारकाईने अभ्यासल्यास त्या त्या विषयाच्या ‘अभ्यासाची व्याप्ती’ ठरवणे जसे शक्य होईल तसेच अभ्यासास ‘परीक्षाभिमुख’ बनवणे सुलभ जाईल.
संदर्भ पुस्तकांचे संकलन – उपरोक्त बाबींचा विचार केल्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक संदर्भ पुस्तकांची यादी मिळवणे क्रमप्राप्त ठरते. परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न लक्षात घेऊनच संदर्भाची यादी निश्चित करावी. त्या दृष्टीने विचार केल्यास ‘एनसीईआरटी’ची इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यघटना, विज्ञान-तंत्रज्ञान, समाजरचना आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांवरील क्रमिक पुस्तके हा प्राथमिक संदर्भ ठरतो. त्यानंतर प्रत्येक विषयासाठी किमान एक प्रमाणित संदर्भपुस्तक वाचणे महत्त्वाचे ठरते. काही वेळा दुसरा एखादा संदर्भग्रंथ वाचायचा असल्यास त्याचीही तयारी ठेवावी. त्याचप्रमाणे मराठी वर्तमानपत्रासह इंग्रजीतील किमान एक वर्तमानपत्र, काही नियतकालिके आणि भारत वार्षकिी या संदर्भसाहित्याचा समावेश अत्यावश्यक आहे. अशा रीतीने ‘एनसीईआरटी’द्वारा विषयाचा संकल्पनात्मक पाया, प्रमाणित संदर्भग्रंथ याद्वारा संबंधित विषयाचे सखोल आकलन आणि वर्तमानपत्र, नियतकालिकांद्वारे विषयाचे समकालीन (चालू घडामोडी) आयाम पक्के करणे सुलभ जाईल. संदर्भसाहित्याविषयी नेहमी एक काळजी घेणे अत्यावश्यक ठरते, ती म्हणजे भाराभर पुस्तके वाचण्यापेक्षा त्या त्या विषयांचे मूलभूत एखाद-दुसरे संदर्भ पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून तो पक्का करण्यावर भर द्यावा.
नियोजन – प्राथमिक तयारीतील शेवटचा परंतु तेवढाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे अभ्यास व वेळेचे नियोजन होय. वस्तुत यूपीएससी परीक्षेचे स्वरूप, विविध टप्पे, त्यातील विषय, त्यांचा अभ्यासक्रम, त्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्यासाठी वाचावयाची संदर्भ पुस्तके या उपरोक्त चíचलेल्या घटकांचे आकलन ‘नियोजन’ ठरवण्यासाठी पायाभूत ठरते यात शंका नाही. अर्थात ‘अभ्यास व वेळेच्या’ नियोजनाची सविस्तर चर्चा पुढील लेखात करूयात.
First Published on February 2, 2017 12:48 am

शिक्षणाच्या चळवळींत स्त्रिया शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन व्यर्थ आहे ही कल्पना आपल्याकडे ब्रिटिशांच्या काळात आली.

शिक्षणाच्या चळवळींत स्त्रिया

शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन व्यर्थ आहे ही कल्पना आपल्याकडे ब्रिटिशांच्या काळात आली.

सत्तर-ऐंशीच्या दशकांत शिक्षणाचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक सामाजिक संघटना पुढे सरसावल्या. अनुताई वाघ यांच्या अंगणवाडय़ा, लीलाताई पाटील यांची ‘सृजन-आनंद’, पुणे येथील ‘अक्षर-नंदन’ या शाळेतही विद्या पटवर्धन, सुहास कोल्हेकर, वंदना भागवत यांनी विविध प्रयोग राबवले. मेधा पाटकर, डॉ. राणी बंग, डॉ. मंदाकिनी आमटे, कुसुमताई कर्णिक, रेणू गावस्कर, रेणू दांडेकर ही या शिक्षण क्षेत्रातील भरीव काम करणारी महत्त्वाची नावं आहेत.
शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन व्यर्थ आहे ही कल्पना आपल्याकडे ब्रिटिशांच्या काळात आली. या दृष्टीनं एकोणिसाव्या शतकातला स्त्री-पुरुष शिक्षणाचा इतिहास अत्यंत रोमांचकारक आहे. ब्रिटिशांनी आपल्यावर दीडशे र्वष राज्य केलं, त्याचे अनेक चांगले-वाईट दूरगामी परिणाम झाले. ब्रिटिश सरकारनं त्यांच्या गरजेनुसार भारतीयांना शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि मिशनऱ्यांनी धर्मप्रसाराच्या हेतूनं. परंतु त्यातून चांगली गोष्ट अशी घडली की, इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावानं इथल्या विचारवंतांमध्ये मंथन सुरू झालं आणि सामाजिक सुधारणा त्यांना महत्त्वाच्या वाटू लागल्या. शिक्षण, स्त्री शिक्षण हा त्यातला एक महत्त्वाचा घटक होता. त्यातूनच ब्राह्मणेतर समाजासाठी शिक्षण ही मूलभूत परिवर्तनाची नांदी ठरेल हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात महात्मा फुले यांनी कौटुंबिक, सामाजिक पातळीवरचा विरोध पत्करून सावित्रीबाईंना शिकविलं. १८४८ मध्ये त्यांनी पुण्यात शाळा काढली, १८५१ मध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. समाजानं केलेली हेटाळणी सोसून सावित्रीबाईंमधली आद्यशिक्षिका घडली. महात्मा फुले यांनी सुरू केलेली परिवर्तनाची चळवळ सावित्रीबाईंनी सुरू ठेवली. नवऱ्याच्या आग्रहामुळे विवाहानंतर शिकलेल्या आणि नंतर शिक्षणक्षेत्रात काम केलेल्या स्त्रियांमध्ये सावित्रीबाई, रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक ही ठळक नावं. फुले यांच्या सत्यशोधकी मार्गानं प्रभावित झालेल्या ताराबाई शिंदे यांनी स्त्रीशिक्षणाबद्दल सडेतोड विचार मांडले.
खरेतर, याही आधी १८२४ मध्ये मुंबईत गंगाबाई नावाच्या स्त्रीनं मुलींची शाळा काढली होती असा उल्लेख अरुणा ढेरे यांच्या ‘विस्मृतीचित्रे’ या ग्रंथात सापडतो. परंतु त्यानंतर गंगाबाई दोनच महिन्यांत मृत्युमुखी पडल्या, त्यामुळे ही शाळा बंद पडली. यानंतरच्या काळात भारतभर नवशिक्षितांची एक पिढी उदयाला आली आणि तिनं त्या वेळच्या कलकत्ता, मद्रास, मुंबई, पुणे, बनारस या देशीय वळणाच्या देशनिष्ठ, धर्मनिरपेक्ष शिक्षणसंस्थांची उभारणी केली. ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, टागोर कुटुंब; महाराष्ट्रात म.गो. रानडे, भांडारकर, लोकहितवादी, आगरकर, महर्षी कर्वे, गोपाळ कृष्ण गोखले, सयाजीराव गायकवाड, विठ्ठल रामजी शिंदे, शाहू महाराज, विश्राम रामजी घोले आदी अनेकांच्या प्रयत्नातून शिक्षणाचा रथ प्रगती करीत होता. त्यात अ‍ॅनी बेझंट, मारिया माँटेसरी, मेरी कार्पेन्टर, इ. ए. मोनिंग, रिबेका सिमियन यांसारख्या स्त्रियांचाही मोठा वाटा होता. १८८५ मध्ये कोलकत्यात स्वरूपकुमारी देवी यांनी ‘शक्ति समिती’, १८९२ मध्ये पं. रमाबाई यांनी ‘शारदा सदन’, १९०९ मध्ये रमाबाई रानडे यांनी मुंबईत ‘सेवासदन’ या शिक्षणसंस्थांची स्थापना केली. काशीबाई हेरलेकर, डॉ. काशीबाई नवरंगे यांचीही या कामात साथ मिळाली. १९२३ ते १९७३ या अर्धशतकात ताराबाई मोडक यांनी भारतभर बालशिक्षणाचं बीज रोवलं आणि बालशिक्षणाच्या क्षेत्रात उचित तंत्र निर्माण केलं. १९२४ मध्ये नागपूरच्या जाईबाई चौधरी यांनी चोखामेळा कन्याशाळेची स्थापना केली, तर अंजनाबाई देशभ्रतार यांनी मुलींसाठी वसतिगृह काढलं. त्याचप्रमाणे मुस्लीम मुलींसाठी बेगम जजिरा, आतिया आणि जोहरा फैजी, तसेच रुकीया हुसैन यांनी शिक्षणक्षेत्रात योगदान दिलं या काळात उच्चशिक्षित स्त्रिया या समाजसेविका, स्वातंत्र्यसैनिकही होत्या. त्यात सरलादेवी चौधुराणी, हेमप्रभा मुजुमदार, ज्योतिर्मयी गांगुली अशा अनेक जणी होत्या.
१९३७ मध्ये गांधीजींनी ‘नई तालीम’ ही संकल्पना मांडली. हा कार्यक्रम त्यांनी अशा पद्धतीनं बनवला होता की जेणेकरून मुलं एका राष्ट्रीय समाजाचा भाग बनतील, त्यात जीवनाच्या सर्व अंगांचा विचार केलेला असेल. ‘नई तालीम’ हा गांधीजींच्या शांती आणि अहिंसेच्या तत्त्वांचा आविष्कार होता, असं म्हणता येईल. गांधीजींच्या प्रेरणेनं सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय, मुत्थुलक्ष्मी रेड्डी या स्त्रियांनीही शिक्षण आणि स्वातंत्र्यलढय़ात मोठं काम केलं. त्याचप्रमाणे अबला बोस, सरलादेवी राय, मृणालिनी सेन यांनी शिक्षणसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. साधारणपणे १९०१ ते १९५० हा शिक्षणाचं महत्त्व आणि शिक्षणप्रसार या दृष्टीनं महत्त्वाचा काळ होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मंत्र देऊन तत्कालीन अन्याय्य चातुर्वर्ण समाजरचनेवर प्रहार करायला प्रवृत्त केलं. दलितांची शिक्षणात प्रगती होण्यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालं पाहिजे, तसेच त्यांनी उच्च शिक्षणही घेतलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याचं कळकळीचं आवाहन ते दलित स्त्रियांना करत असत. स्त्रियांनी केवळ कुटुंबाच्या नव्हे तर स्वत:च्या उन्नतीसाठी शिकलं पाहिजे असं ते सांगत. बाबासाहेबांच्या प्रेरणेनं दलितांच्या पिढय़ा शिकू लागल्या त्यात स्त्रियाही होत्या.
२६ जानेवारी १९५० रोजी आपण भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. एकप्रकारे राज्यघटनेच्या माध्यमातून घडलेली ती सामाजिक क्रांतीच होती. स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे पहिले पंतप्रधान पंतप्रधान नेहरू यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानात्मक उच्च दर्जाचं शिक्षण देणाऱ्या आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थांची स्थापना करून आधुनिक भारताची पायाभरणी केली. आपले पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी त्यांच्या १६ वर्षांच्या कारकीर्दीत सक्तीचं           प्राथमिक शिक्षण आणि महिला शिक्षणाचा अंतर्भाव असलेल्या प्रौढ शिक्षणावर भर दिला. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचं त्यांचं ध्येय होतं.
यानंतर ७०-८०च्या दशकांत शिक्षणाचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक सामाजिक संघटना पुढे सरसावल्या. तसेच ‘कारकुनी’ मानसिकतेचे नागरिक निर्माण करणाऱ्या प्रचलित शिक्षणपद्धतीला छेद देऊन स्वतंत्र प्रज्ञेचे विद्यार्थी घडवण्याचे अनेक प्रयोगही झाले. अनुताई वाघ यांचं नाव यासंदर्भात प्रकर्षांनं आठवतं. कोसबाड येथील आदिवासींच्या मुलांच्या घरांपर्यंत त्यांनी शाळा नेल्या. आदिवासींच्या अंगणात पोहोचलेली शाळा म्हणून ‘अंगणवाडी’ हा शब्द तिथेच जन्माला आला. पुढे अंगणवाडी ही संकल्पना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी राबवली. तसेच कोल्हापूर इथे लीलाताई पाटील यांनी ‘सृजन-आनंद’ या शाळेच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग केले. मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सभोवतालचा निसर्ग, समाज, दैनंदिन व्यवहार यातून जीवनाचं ज्ञान त्यांनी घ्यावं, त्यांच्यात विविध कौशल्ये निर्माण व्हावीत आणि मुख्य म्हणजे शिकण्याचा सर्जनशील आनंद त्यांना घेता यावा यासाठी त्यांनी विविध मार्ग चोखाळले. पुणे येथील ‘अक्षर-नंदन’ या शाळेतही विद्या पटवर्धन, सुहास कोल्हेकर, वंदना भागवत यांनी आगळावेगळा प्रयोग राबवला आहे. अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन निर्मितीक्षमतेची मशागत करणाऱ्या विविध गोष्टी करण्यात रमलेली मुलं हे चित्र इथे दिसतं. पुणे जिल्ह्य़ातील चाकणजवळ पाबळ इथे ‘विज्ञानाश्रम’ या संस्थेत व्यवसायाधारित शिक्षण दिलं जातं. ‘मानव्य’ या संस्थेत विजयाताई लवाटे (आता हयात नाहीत) शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिकवत असत. साताऱ्यात वर्षां देशपांडे, शैला जाधव नापास मुलांसाठी काम करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत असतात.
मेधा पाटकर यांच्या ‘जीवनशाळां’मध्ये मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातील मुले ‘लढाई पढाई साथ साथ’ करत असतात. डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग, डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना आदिवासी भागात काम करत असताना शिक्षणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं. आरोग्याबरोबर आदिवासी शिक्षणाकडेही ते लक्ष पुरवतात. त्याचप्रमाणे कुसुमताई कर्णिक, रेणू गावस्कर, रेणू दांडेकर ही या क्षेत्रातील भरीव काम करणारी महत्त्वाची नावं आहेत. ‘सेवासदन’नं विशेष मुलांसाठी सुरू केलेल्या ‘दिलासा केंद्र’च्या स्थापनेत संध्या देवरुखकर यांचा मोलाचा वाटा आहे. पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’ या शिक्षणसंस्थेत मुलांमध्ये राष्ट्रप्रेम, विज्ञान जिज्ञासा, जगण्याची कौशल्ये, कृतिशीलता रुजवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जातात.
९० च्या दशकात शिक्षणक्षेत्रात अभ्यासक आणि कार्यकर्ते म्हणून पुढे आलेली नावं म्हणजे प्रा. जयदेव डोळे, हेरंब कुलकर्णी आणि डॉ. श्रुती पानसे. वर्तमान शिक्षणपद्धतीवर अंकुश ठेवून भाष्य करून वास्तवाचं भान देण्याचं काम हे तिघेजण करत आहेत. आंध्र प्रदेशातील राजमुंद्री जिल्ह्य़ात नफिसा डिसुझा आदिवासींसाठी रात्रशाळा चालवते आहे, तर मध्य प्रदेशात झाबुआ इथे साधना खोचे काम करते आहे.
सरकारी पातळीवर पहिल्यापासून ईबीसी, आरक्षण, सर्व शिक्षा अभियान, मध्यान्ह भोजन योजना इत्यादींच्या माध्यमातून समाजातील मागास गटांतील, मागास जाती-जमातींतील, गरीब, कष्टकरी घरातल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा काही अंशी परिणाम होऊन या वर्गातील मुलं, काही प्रमाणात सरकारी नोकऱ्या मिळवून स्थिर झाली. परंतु बहुजन वर्गातील मोठा भाग आजही शिक्षणापासून वंचित आहे. नुकतीच ऑक्टोबर २०१६ मध्ये राज्य विधीमंडळाने ईबीसीची मर्यादा सहा लाखांपर्यंत वाढवली. परंतु त्यानं परिघाबाहेरच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का?
विशेषत: भटक्या विमुक्त, आदिवासी, असंघटित कामगार यांच्या मुलांपर्यंत या सवलतींचे फायदे पोचणार की नाही, की उत्पन्नाचे खोटे दाखले सादर करून परत प्रस्थापित वर्गच हे फायदे लाटणार आहे, अशी शंका उपस्थित केली जातेय. हेरंब कुलकर्णी यांनी केलेल्या एका सव्‍‌र्हेनुसार शिक्षणाचा दर्जा प्रचंड घसरलेला आहे, त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. २००० नंतर खासगीकरणामुळे शिक्षण महाग होऊन बसलं आहे आणि गरीब कष्टकरी वर्गासाठी ते पुन्हा अप्राप्य झालं आहे. असे अनेक प्रश्न अधांतरी आहेत. असं असलं तरीही, स्त्रियांनी स्त्री आणि एकूणच शिक्षणासाठी झालेल्या सुरुवातीपासूनच्या चळवळीत मारलेली मजल विसरण्यासारखी नक्कीच नाही.
anjalikulkarni1810@gmail.com

वाङ्मयीन चळवळी आपलं दु:ख मनात कोंडून ठेवणाऱ्या स्त्रिया लेखनातून स्वत:ला मोकळं करू लागल्या.

वाङ्मयीन चळवळी

आपलं दु:ख मनात कोंडून ठेवणाऱ्या स्त्रिया लेखनातून स्वत:ला मोकळं करू लागल्या.

अंजली कुलकर्णी | November 26, 2016 1:15 AM
आपलं दु:ख मनात कोंडून ठेवणाऱ्या स्त्रिया लेखनातून स्वत:ला मोकळं करू लागल्या. आपल्या व्यथा वेदना, अन्याय, अत्याचार, आपल्या लैंगिक प्रेरणा लेखनचावडीवर खुलेपणानं मांडू लागल्या. आजही जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत बदलत चाललेल्या समाजाचं आकलन स्त्रीसाहित्यातून काही अंशी येऊ  लागलंय. या साहित्य चळवळींनी सामाजिक चळवळींना जोम पुरवला. त्या समाजात सर्वदूर पोहोचवल्या.
महाराष्ट्रात एकूणच सामाजिक सुधारणांच्या दृष्टीनं एकोणिसावं आणि विसावं शतक फार महत्त्वाचं ठरलं. या काळात स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता या मूल्यांना अनुसरत विविध सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्नांच्या संदर्भात जाणीव, जागृती झाली आणि समाजातील विविध घटक परिवर्तनाच्या लढाईसाठी सिद्ध झाले. या सगळ्या गतिमान सामाजिक घडामोडींचं प्रतिबिंब तत्कालीन साहित्यकृतींमध्ये पडणं अपरिहार्य होतं. ‘साहित्य हा समाजाचा आरसा’ असं म्हटलं जातं, त्याला अनुसरूनच हे होतं.
साधारणत: १९६० नंतरच्या काळात मराठी साहित्यात वेगानं चलनवलन सुरू झालं. परंतु, त्याआधीही स्त्रिया आणि पुरुष समाजकारण आणि साहित्यकारण यात गुंतलेले होतेच. त्यांच्या लेखनप्रेरणांचा शोध घेताना आपल्याला इतिहासात शंभर वर्षे मागे जावं लागतं आणि तेव्हा लक्षात येतं की, साहित्य चळवळी या त्या-त्या काळातील घटना/घडामोडींची परिणती आहेत. किंबहुना, सामाजिक चळवळी आणि वाङ्मयीन चळवळी या हातात हात घालूनच आलेल्या आहेत आणि परस्परपूरक आहेत. या संदर्भात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘वाङ्मयीन चळवळी आणि दृष्टिकोन’ या पुस्तकात मुद्दा मांडला आहे की, कित्येक वेळा समाजात काही घडलं आणि मग त्यावर लिहिलं गेलं; परंतु, कित्येक वेळा असंही घडलं की, एखाद्या प्रश्नावर आधी लिहिलं गेलं, चर्चा झाली आणि मग कृतीच्या पातळीवर तो विचार उतरला. उदाहरणार्थ, स्त्रियांसंदर्भात उदारमतवादी भूमिका बाळशास्त्री जांभेकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, म.गो. रानडे, आगरकर, लोकहितवादी, बाबासाहेब आंबेडकर इत्यादींनी मांडली आणि त्यानुसार स्त्री शिक्षण, सतीप्रथा विरोध, विधवाविवाह, संमतीवयाचा कायदा इत्यादी अनेक कृती घडल्या. दुसरं उदाहरण म्हणजे इंग्रजांनी अवलंबलेल्या शेतसारा पद्धतीमुळे शेतीत अनेक प्रश्न निर्माण झाले, त्यातून इंग्रजांविरुद्ध अनेक बंडंही झाली, त्यात दुष्काळाची भर पडली. याचं यथार्थ वर्णन ह.ना. आपटे यांच्या ‘काळ तर मोठा कठीण आला’ या कथेत आलं आहे.
याशिवाय तिसरा प्रकार म्हणजे कृती आणि लेखन या दोन्ही पातळ्यांवर एकाच वेळी कार्यरत असणं. महात्मा गांधी, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर,
डॉ. आंबेडकर अशा अनेक धुरिणांची नावं या संदर्भात घेता येतील ज्यांनी प्रबोधनासाठी लेखणीचा समर्थ वापर केला. स्वत: ज्योतिराव फुले यांच्या कृतीची जोड असलेल्या लेखनाने (किंवा लेखनाची जोड असलेल्या कृतीने) शेतकऱ्यांमध्ये मोठी जागृती झाली आणि त्यांच्यातील असंतोषाला वाचा फुटली. ज्योतिरावांनी दलित, ग्रामीण, स्त्रिया आणि सर्व शोषितांच्या दु:खांना आवाज देणारं आणि शोषण व्यवस्थेचा शोध घेणारं लेखन केलं. ‘तृतीय रत्न’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’, ‘शिवाजीराजांचा पोवाडा’ या साहित्यकृतींतून त्यांनी वंचितांना, शोषितांना अस्मितेचं बळ पुरवलं. त्यांनी मुलींसाठी शाळा काढून स्त्रीशिक्षणाच्या प्रश्नाकडे समाजाचं लक्ष वेधलं. सावित्रीबाई फुले यांनी तर आपल्या लेखनात स्पष्टपणे स्त्री शूद्रांना शिक्षण हाच मार्ग असल्याचं सांगितलं. त्यांनी लिहिलं होतं –
स्त्री शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा
शिक्षणाने मनुष्याचे पशुत्व हाटते पाहा
त्याचप्रमाणे पहिली अस्पृश्यांची परिषद भरवणारे शिवराम जानबा कांबळे यांनी १९१० मध्ये ‘सोमवंशीय मित्र’ हे वर्तमानपत्र सुरू केलं. शाहू महाराजांनी १९०६ मध्ये अस्पृश्यांना व्यावसायशिक्षण द्यायला सुरुवात केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी भंगी समाजातील मुलांसाठी शाळा काढली. सयाजीराव गायकवाड यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या. गांधीजींनी अस्पृश्यतेचा प्रश्न महत्त्वाचा मानला. गांधीजींच्या चळवळीत स्त्रिया मोठय़ा प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. महात्मा कर्वे यांनीही विधवांसाठी शिक्षणसंस्था सुरू केल्या. समाजात मोठय़ा प्रमाणावर विधवा विवाह, जरठ-बाल विवाह, केशवपन, सतीप्रथा इत्यादी प्रश्नांवर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. विशेष म्हणजे, या काळात उच्चविद्याविभूषित स्त्रियांचं प्रमाण लक्षणीय पद्धतीनं वाढलं आणि सुधारक लोकनेत्यांच्या मदतीनं नवशिक्षित आणि जागृत स्त्रियांची फळीच निर्माण झाली असा उल्लेख डॉ. अरूणा ढेरे यांनी ‘विस्मृतीचित्रे’ या ग्रंथात केला आहे. बंगाल, मद्रास (चेन्नई), महाराष्ट्र या तिन्ही ठिकाणी स्त्रीशिक्षण आणि स्वातंत्र्य यासाठी आयुष्य वेचणाऱ्या अनेक स्त्रिया कार्यरत झाल्या.
या सगळ्या घडामोडींचे संस्कार ह. ना. आपटे,
वा. म. जोशी, श्री.व्यं. केतकर यांसारख्या लेखकांवर झाल्याशिवाय राहिले नाहीत. तत्कालीन सुधारकांची चरित्रं, आत्मवृत्तं, निबंध, पत्रं, स्त्रियांचे लेख, कथा-कादंबऱ्या, नियतकालिकं हे सर्व लेखन स्त्रीसुधारणेच्या विचारांनी भारलेलं होतं. ‘दर्पण’, ‘ज्ञानोदय’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘विविध ज्ञानविस्तार’ नियतकालिकांतून स्त्रियांनाही अभिव्यक्तीचं माध्यम मिळालं.
काही नियतकालिकं खास स्त्रियांसाठी आणि स्त्रियांनी चालवलेली होती. उदाहरणार्थ का. र. मित्र यांच्या पत्नी मनोरमाबाई यांनी  ‘महाराष्ट्र महिला’, तर रेबेका सिमियन यांनी ‘नित्युपदेशक’ नावाचं मासिक चालवलेलं होतं. विविध नियतकालिकांमधून सरोजिनी नायडू, लक्ष्मीबाई राजवाडे, अबला बोस लिहीत होत्या. त्याचप्रमाणे सोनाबाई केरकरीण (ही कलावंतीण होती), काशीबाई फडके, काशीबाई हेरलेकर, यशोदाबाई आगरकर, पार्वतीबाई आठवले,
पं. रमाबाईंचं चरित्र लिहिणारी मनोरमा मेधावी, गांधीचरित्र लिहिणाऱ्या अवंतिकाबाई गोखले अशा अनेक जणी त्या काळात लिहीतही होत्या आणि यापैकी बहुतेक जणी कोणत्या ना कोणत्या सामाजिक संस्थेशी जोडलेल्या होत्या. ‘विस्मृतीचित्रे’मधून आपल्याला या स्त्रियांची ओळख होते.
परंतु, खऱ्या अर्थानं चळवळ म्हणून वाङ्मयीन चळवळींना प्रारंभ झाला तो १९६० नंतरच्या काळात. अर्थात, त्यालाही सामाजिक परिस्थितीची पाश्र्वभूमी होती. या कालखंडात दलित, ग्रामीण, आदिवासी, कामगार, मुस्लीम आणि स्त्रीवादी साहित्याच्या चळवळींचे मोठे प्रवाह निर्माण झाले. या साहित्यिक चळवळी आणि त्याआधीच उदयाला आलेली मार्क्‍सवादी साहित्याची चळवळ या मानवी जीवनाशी निगडित होत्या आणि परिवर्तनाची मागणी करीत होत्या.
याचा पहिला आविष्कार ६०च्या दशकात दलित साहित्यातून झाला. बाबासाहेबांच्या समर्थ नेतृत्वानं अस्मिता जागृत झालेला, आजवर दबलेला दलित वर्ग लिहू लागला आणि मराठी साहित्यात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. आजवरच्या कोंडमाऱ्याचा तीव्र उद्रेक झाला आणि पेटत्या विस्तवातल्या निखाऱ्यागत अवघ्या मराठी साहित्यावर त्याच्या आवेगाचा प्रकाश पसरला. त्यातही, दलित म्हणून आणि स्त्री म्हणून असलेल्या दुहेरी अवहेलनेच्या दु:खाचा स्पर्श दलित स्त्रीसाहित्याला होता. समाज उतरंडीखाली दबलेली दलित स्त्री लिहू लागली तेव्हा खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या घटकाला आकाश मिळालं. त्या काळात हिरा बनसोडे, ज्योती लांजेवार, सुगंधा शेंडे, कुमुद पावडे, सुरेखा भगत लिहीत होत्या. आजही उर्मिला पवार, प्रज्ञा दया पवार, छाया कोरेगावकर, प्रतिभा अहिरे, संध्या रंगारी साहित्यातून व्यवस्थेला प्रश्न विचारत आहेत, बाईच्या समग्रतेला भिडणारं साहित्य निर्माण करत आहेत.
१९७५च्या सुमारास ग्रामीण साहित्याच्या प्रवाहानं उचल खाल्ली आणि आजवर ‘ग्रामीण साहित्य’ म्हणून जे स्वप्नरंजनपर, कृतक, काल्पनिक आणि ग्रामीण माणसाची हेटाळणी करणारं साहित्य लिहिलं जात होतं, त्याची जागा खेडय़ातील वास्तवाचं यथार्थ चित्रण करणाऱ्या, शेतीमातीतील माणसांच्या व्यथावेदनांना शब्द देणाऱ्या, ग्रामीण भागातील, शेतीतील शोषणव्यवस्थेचा शोध घेणाऱ्या साहित्यानं घेतली. खरं तर ज्योतीरावांचा ‘शेतकऱ्यांचा आसूड’ आपल्यापाशी होता. सावित्रीबाई, बहिणाबाई लिहीत होत्या. वि. रा. शिंदे यांचं शोषितांमध्ये कार्य सुरू होतं, गांधीजींनी स्वयंपूर्ण खेडय़ाचं स्वप्न पाहिलं होतं. त्याचं प्रतिबिंब तत्कालीन श्री.म. माटेंसारख्या लेखनात पडलं होतं. नंतरच्या काळात व्यंकटेश माडगूळकर, खरात, पाटील, यादव, शेळके, बोराडे, महानोर असे अनेकजण समर्थपणे लिहू लागले आणि ग्रामीण साहित्याकडे बघण्याची समाजाची दृष्टी बदलली. या काळात बहुसंख्येनं ग्रामीण स्त्रिया लिहीत नव्हत्या. परंतु १९८० पासून प्रतिमा इंगोले इत्यादीनी ही कसर भरून काढली. आज कल्पना दुधाळ, उर्मिला चाकूरकर, नीलम माणगावे अशा अनेक जणी ग्रामीण वास्तवाचे आणि त्यातल्या स्त्रीच्या वेगळ्या व्यथांचे पदर उलगडत आहेत.
त्याचप्रमाणे, आदिवासी चळवळीतून आत्मबळ मिळालेल्या कुसुम आलाम, उषा अत्रामसारख्या कवयित्री, लेखिका जल, जंगल, जमीन यांच्या आधारानं गुजराण करणाऱ्या आदिवासींचे हिरावले जाणारे नैसर्गिक हक्क, उद्ध्वस्त होत चाललेलं पर्यावरण या विरोधात साहित्यातून आवाज उठवत आहेत.
तसेच, हमीद दलवाईंच्या पुढाकारानं सुरू झालेल्या मुस्लीम सत्यशोधक मंडळ आणि मुस्लीम महिला आंदोलनातून प्रबोधनवादी विचार मिळालेल्या मराठीभाषक मुस्लीम महिला मोकळ्या होऊन लिहू लागल्या. तीन-तलाक, बुरखा, बहुपत्नीत्व या अन्यायकारक रूढींवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. त्यात मुमताज रहिमतपुरे यांनी संपूर्ण हयातीत संघर्ष केला. इतका की, त्यांच्या मृत्यूनंतर मुस्लीम कट्टरपंथीयांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्याशिवाय, नसीमा हुरजूक, आशा अपराध, मेहरुन्निसा दलवाई, तस्निम पटेल, मलिका अमरशेख, बेनझीर तांबोळी, नसीमा देशमुख, रुबिना पटेल, डॉ. जुल्फिकार बानो देसाई, प्रा. नसीमा पठाण अशा असंख्यजणी हिरिरीनं लिहीत होत्या आणि आहेत.
दलित साहित्याच्या आगेमागे ख्रिस्ती साहित्याचीही लाट आली. आधीच्या काळात लक्ष्मीबाई टिळक,
पं रमाबाई इत्यादी स्त्रियांनी अंतर्मुख करणारं लेखन केलं; तर आज सिसिलिया काव्‍‌र्हालो, अनुपमा उजगरे इत्यादी स्त्रिया लेखनातून स्त्रीवादी जाणिवा व्यक्त करीत आहेत.
स्त्रियांच्या या सगळ्या आविष्कारांमागे दलित, ग्रामीण, आदिवासी, भटक्या विमुक्त, मुस्लीम आणि कामगार चळवळींच्या प्रेरणा होत्याच, परंतु त्याच्या जोडीनं १९७५ मध्ये आलेल्या स्त्रीमुक्ती चळ्वळीचा प्रभाव स्त्रीसाहित्यावर होता. १९७५ मध्ये युनोनं आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि ७५-८५ आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून जाहीर केलं. त्यातून निर्माण झालेल्या स्त्रीमुक्ती (नंतर स्त्रीवादी) चळवळीनं सामाजिक पर्यावरण व्यापून टाकलं. महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत किमान जाणिवेच्या पातळीवर स्त्रीवादी विचार पोहोचवण्यात स्त्रीवादी चळवळ यशस्वी ठरली. परिणामी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आत्मभान जागृत झालेल्या स्त्रिया लिहित्या झाल्या. बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे
माझं सुख माझं सुख, हंडय़ा झुंबरं टांगलं
माझं दु:ख माझं दु:ख तयघरात कोंडलं
असं म्हणून आपलं दु:ख उरात कोंडून ठेवणाऱ्या स्त्रिया लेखनातून स्वत:ला मोकळं करू लागल्या. आपल्या व्यथा वेदना, अन्याय, अत्याचार, आपल्या लैंगिक प्रेरणा लेखनचावडीवर खुलेपणानं मांडू लागल्या. आजही जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत बदलत चाललेल्या समाजाचं आकलन स्त्रीसाहित्यातून काही अंशी येऊ  लागलंय.
या साहित्य चळवळींनी सामाजिक चळवळींना जोम पुरवला. त्या समाजात सर्वदूर पोहोचवल्या. सामाजिक चळवळींचा विचार, मूल्यं, तत्त्वं साहित्यातून समाजापर्यंत पोहोचली. त्यावर चर्चा, मंथन घडलं. एक प्रकारे सामाजिक चळवळींना आधार देणारं, समर्थन करणारं ते एक प्रभावी व्यासपीठच ठरलं. एवढं श्रेय साहित्य चळवळींना नक्कीच देता येईल.
अंजली कुलकर्णी anjalikulkarni1810@gmail.com