वेगळय़ा वाटा : एथिकल हॅकिगचा मार्ग
एथिकल हॅकिंग हा सायबर सुरक्षेतीलच एक भाग आहे. म्हणजेच नैतिकता राखून केलेली घुसखोरी. ही
प्रा. योगेश हांडगे |
February 1, 2017 4:48 AM
हॅकर्स अर्थात घुसखोर काही संगणक आणि इंटरनेटवर नवीन नाहीत. इतरांच्या संगणकावरून काय काय चालतं, ते कोणत्या संकेतस्थळांवर जातात, काय पाहतात, काय वाचतात, कसे व्यवहार करतात अशा अनेक घटकांवर हे हॅकर्स लक्ष ठेवून असतात. अनेकजण यातून चुकीचा मार्ग निवडतात आणि गुन्हेगारीच्या मार्गाला जातात. एथिकल हॅकर्स मात्र आपल्या कौशल्याचा उपयोग चांगल्या ठिकाणी करून देत असतात. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अशा तज्ज्ञ मंडळींची आपल्याला मोठी गरज आहे.
एथिकल हॅकरची गरज
’ संगणक किंवा इंटरनेटवर साठवलेली माहिती, कागदपत्रे सुरक्षितरीत्या साठवण्यासाठी एथिकल हॅकरची गरज लागते.
’ कुणी संगणक आणि माहितीजालावर कायद्याचे उल्लंघन करत असेल, चुकीच्या ठिकाणी घुसखोरी करत असेल तर त्यातील संभाव्य धोके ओळखून खबरदारीचे उपाय एथिकल हॅकर योजतो.
’ एका अर्थी हा संगणकाचा रखवालदारच असतो. कुणीही कितीही क्लृप्त्या लढवल्या तरी संगणक आणि त्यातील यंत्रणेचा बचाव भामटय़ांपासून करणे, हे एथिकल हॅकरचे काम आहे.
अभ्यासक्रम
’ कोर्स इन सर्टिफाइड एथिकल हॅकिंग
’ डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी
’ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर लॉ.
’ मास्टर ऑफ सायन्स इन सायबर लॉ अॅण्ड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी
अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या संस्था
( https://www.isoeh.com//)
’ नॅशनल लॉ इन्स्टिटय़ूट युनिव्हर्सिटी, भोपाळ (www.nliu.ac.in)
’ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, देवघाट, अलाहाबाद ( www.iiita.ac.in)
’ राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय,
केरवा डॅम रोड, भोपाळ (https://www.rgpv.ac.in)
’ नॅशनल अकादमी ऑफ लीगल स्टडीज अॅण्ड रिसर्च युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद
(https://www.nalsar.ac.in/)
’ गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (http://www.gfsu.edu.in/)
प्रा. योगेश हांडगे
First Published on February 1, 2017 4:48 am
Web Title: certified ethical hacker
No comments:
Post a Comment