बायोटेक्नॉलॉजीमध्ये संशोधन करण्यासाठी..
उमदेवारांचे वय १० फेब्रुवारी २०१७ रोजी २८ वर्षांहून अधिक नसावे.
द. वा. आंबुलकर |
February 4, 2017 12:25 AM
- फेलोशिपची संख्या व तपशील- निवड परीक्षेद्वारा गुणवत्ता यादीनुसार पहिल्या २७५ संशोधक उमेदवारांची फेलोशिपसाठी निवड करण्यात येईल. याशिवाय वरील निवड परीक्षेद्वारा पुढील १०० उमेदवारांची त्यांच्या गुणांकानुसार प्रतीक्षायादी तयार करण्यात येईल.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी बायोटेक्नॉलॉजीसह बीई./ बीटेक अथवा एमएससी, एमटेक, एमव्हीएससी, बायोटेक्नॉलॉजी कृषी पशुविज्ञान, वैद्यकशास्त्र, मरिन, औद्योगिक पर्यावरण, औषधी निर्माण, अन्नप्रक्रिया, बायो रिसोर्सेस बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिकल इंजिनीअिरग, बायो-सायन्सेस, बायो- इन्फरमॅटिक्स, मॉलिक्युलर अॅण्ड हय़ुमन जिनॅस्टिक्स वा न्युरोसायन्स यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी कमीत कमी ६०% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी ५५%) उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
- वयोमर्यादा- उमदेवारांचे वय १० फेब्रुवारी २०१७ रोजी २८ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
- निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारकांची बायोटेक्नॉलॉजी एलिजिबिलिटी टेस्ट, बीईटी- २०१७ ही निवड परीक्षा घेण्यात येईल. निवड परीक्षा संगणकीय पद्धतीने १९ मार्च २०१७ रोजी घेण्यात येईल.
- अर्जासह भरावयाचे शुल्क- अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून उमेदवारांनी १००० रु. ऑनलाइन संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
- अर्जाचा नमुना व तपशील – अर्जाचा नमुना व तपशिलासाठी डिपार्टमेंट ऑफ बायो टेक्नॉलॉजीच्या http://www.bcil.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख – विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तपशिलासह असणारे अर्ज वरील संकेतस्थळावर १० फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत.
महाराष्ट्रातील युवकांना संरक्षण दलात अधिकारी म्हणून दाखल होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतानाच त्यांची एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला येथील राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश पात्रता परीक्षेची पूर्वतयारी करवून घेण्याच्या दृष्टीने स्थापना करण्यात आलेल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद येथे खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता- अर्जदार महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत व ते मार्च/एप्रिल २०१७ मध्ये होणाऱ्या प्रस्तावित शालान्त परीक्षेला बसणारे असायला हवेत.
विशेष सूचना-
वरील मार्गदर्शक अभ्यासक्रम केवळ मुलांसाठी असल्याने विद्यार्थ्यांनीच अर्ज करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा-
अर्जदार विद्यार्थ्यांची जन्मतारीख २ सप्टेंबर २००० ते ३१ डिसेंबर २००२ च्या दरम्यान असायला हवी.
आवश्यक शारीरिक पात्रता- अर्जदार विद्यार्थ्यांची किमान शारीरिक पात्रता उंची १५७ सेंटिमीटर्स, वजन ४३ किलो व छाती न फुगवता ७४ सेंटिमीटर्स व फुगवून ७९ सेंटिमीटर्स असावी व त्यांना दृष्टिदोष नसावा.
अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांची लेखी निवड परीक्षा सैनिक सेवा पूर्वशिक्षण संस्था, औरंगाबादतर्फे घेण्यात येईल. इंग्रजी माध्यमातील ही निवड परीक्षा राज्य स्तरावर मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर, व औरंगाबाद या परीक्षा केंद्रांवर एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात येईल. परीक्षेची नेमकी तारीख संबंधित उमेदवारांना वेगळी कळविण्यात येईल.
लेखी निवड परीक्षा शालान्त परीक्षेच्या राज्य व केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित व एकूण १५० गुणांची असेल. यामध्ये प्रत्येकी ७५ गुणांच्या गणित व सामान्य क्षमताज्ञान या विषयांचा समावेश असेल.
निवड परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणांकाच्या आधारे त्यांना सैनिकी सेवा पूर्वशिक्षण संस्था, औरंगाबादद्वारे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार त्यांना या मार्गदर्शनपर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून उमेदवारांनी ४८५ रु. राज्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कुठल्याही शाखेत चलनद्वारा भरावेत अथवा ४५० रु.चा डायरेक्टर, एसपीआय- औरंगाबाद यांच्या नावे असलेला व औरंगाबाद येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट प्रवेश अर्जासह पाठवावा.
अधिक माहिती व तपशील- या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबादच्या दूरध्वनी क्र. ०२४०- २३८१३७० वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या www.spiaurangabad.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख :
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद या पत्त्यावर १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
राज्यातील शालान्त परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना १२ वीनंतर खडकवासलाच्या राष्ट्रीय प्रबोधिनीच्या माध्यमातून सैन्यदलात दाखल होऊन आपले करिअर करायचे असेल अशांनी या मार्गदर्शनपर संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
First Published on February 4, 2017 12:25 am
Web Title: biotechnology research
No comments:
Post a Comment