Tuesday, August 1, 2017

यूपीएससीची तयारी : आधुनिक जगाचा इतिहास – १ आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक जगाचा इतिहास या घटाविषयी माहिती घेणार आहोत.

यूपीएससीची तयारी : आधुनिक जगाचा इतिहास – १

आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक जगाचा इतिहास या घटाविषयी माहिती घेणार आहोत.

श्रीकांत जाधव | Updated: August 1, 2017 4:01 AM 

आधुनिक जगाच्या इतिहासाची सुरुवात साधारणत: १५ व्या शतकापासून समजली जाते

आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक जगाचा इतिहास या घटाविषयी माहिती घेणार आहोत. अभ्यासक्रमामध्ये-अठराव्या शतकातील घटना जसे औद्योगिक क्रांती, जागतिक महायुद्धे, राष्ट्रांच्या सीमारेषाची पुनर्रचना/पुनर्आखणी, वसाहतीकरण व निवर्साहतीकरण, साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद यांसारखे राजकीय विचारप्रवाह/तत्त्वज्ञान व त्याचे प्रकारे आणि त्याचा समाजावरील प्रभाव अशा पद्धतीने आधुनिक जगाचा अभ्यासक्रम नमूद केलेला आहे. जो साधारणत: १८व्या शतकापासून आपणाला करावा लागतो.
आधुनिक जगाच्या इतिहासाची सुरुवात साधारणत: १५ व्या शतकापासून समजली जाते. युरोपमधील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये प्रबोधन युगामुळे एक मूलभूत बदल होण्यास प्रारंभ झालेला होता. तर्कशक्ती, बुद्घिप्रामाण्यवाद यांसारख्या तत्वांना अनुसरून विचारप्रक्रियेला सुरुवात झालेली होती. शतकानुशतके अस्तिवात असणाऱ्या परंपरांना चिकित्सक पद्धतीने स्वीकारणे सुरू झालेले होते, ज्यामुळे वैज्ञानिक विचारप्रक्रियेला अधिक चालना मिळालेली होती आणि याच्या परिणामस्वरूप अनेक वैज्ञानिक शोध लावण्यात आलेले होते. याच्या जोडीला अनेक भौगोलिक शोध लावले गेले आणि या शोधामुळे वसाहतवाद आणि साम्राज्यवाद याची सुरुवात झालेली होते. युरोपमध्ये १८व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आणि यामुळे जगाच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल होण्यास सुरुवात झालेली होती. अनेक राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञान उदयाला आलेले होते. या राजकीय विचारप्रवाह किंवा तत्त्वज्ञानामध्ये भांडवलवाद, समाजवाद आणि साम्यवाद हे महत्त्वपूर्ण मानले जातात. सद्य:स्थितीमध्येही यांचा प्रभाव दिसून येतो. अशा पद्धतीने एक व्यापक समज आपणाला करून घ्यावी लागते. या विषयाची तयारी करताना आपणाला सर्वप्रथम प्रबोधन युगाची मूलभूत माहिती अभ्यासावी लागते. हा मुद्दा स्पष्टपणे अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आलेला नसला तरी आपणाला याची माहिती असणे गरजेचे आहे; कारण प्रबोधन युगामुळे युरोपच्या सर्वागीण जीवनशैलीमध्ये एक नवचतन्य निर्माण झालेले होते आणि युरोपचे आधुनिक युगामध्ये रूपांतरण सुरू झालेले होते. आधुनिकतेची नवीन मूल्ये उदयास आलेली होती; ज्यामध्ये मानवतावाद, मुक्त समाज, यांसारख्या मूल्यांना अधिक महत्त्व देण्यात आलेले होते. अशा पद्धतीने थोडक्यात या विषयाच्या पाश्र्वभूमीचे आकलन करून घेणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे विषयाची सुसंगत पद्धतीने समज होण्यास मदत होते. या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे व अनेक घटनांची माहिती आपणाला असणे गरजेचे आहे. यातील अनेक घटना (युरोप, अमेरिका, आफ्रिका व आशिया या खंडातील) या समांतर पद्धतीने घडलेल्या आहेत.
आजच्या लेखामध्ये आपण १८व्या आणि १९व्या शतकातील घटनांची माहिती घेणार आहोत आणि यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा आढावा घेऊन याची तयारी कशी करावी याची महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत. या विषयाची तयारी करताना आपणाला साधारणत: युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि आशिया इत्यादी खंडातील देशामधील १८व्या शतकापासून घडलेल्या महत्त्वाच्या घटना व त्यांचे परिणाम आणि यामुळे घडून आलेले बदल यांसारख्या विविधांगी पलूंची माहिती सर्वप्रथम अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. १८व्या शतकातील महत्त्वाच्या घटना जसे राजकीय क्रांती-अमेरिकन व फ्रेंच, औद्योगिक क्रांती, वसाहतवाद आणि साम्राज्यवाद, आशिया, आफ्रिका आणि अमेरिकन खंडामधील युरोपियन साम्राज्यवाद, राजकीय विचारप्रवाह किंवा
तत्त्वज्ञान – भांडवलवाद, साम्यवाद, आणि साम्यवाद इत्यादी, तसेच १९व्या शतकातील युरोपातील राज्यक्रांती व राष्ट्रवादाचा उदय. जर्मनीचे एकत्रीकरण व इटलीचे एकत्रीकरण, आधुनिक जपानचा उदय, अमेरिकेतील गृहयुद्ध, इत्यादी महत्त्वाच्या घटना या काळाशी संबंधित आहेत. सर्वाधिक प्रश्न या घटनांना गृहीत धरून विचारले जातात.
२०१३ ते २०१६मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेमध्ये उपरोक्त मुद्दय़ांवर विचारण्यात आलेले प्रश्न खालीलप्रमाणे होते.
‘जपानमधील उशिराने सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीमध्ये निश्चित काही असे घटक होते, जे पश्चिमेतील देशांच्या अनुभवापेक्षा खूपच भिन्न होते. विश्लेषण करा.’
ल्ल ‘युरोपीय प्रतिस्पर्धीयांच्या आक्रमणामुळे आफ्रिकेचे छोटय़ा छोटय़ा कृत्रिमरीत्या निर्मित राज्यामध्ये तुकडे करण्यात आले. विश्लेषण करा.’
ल्ल ‘अमेरिकन क्रांती हा वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव होता. सिद्ध करा.’
ल्ल सर्वप्रथम औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्येच का झाली? औद्योगिकीकरणाच्या काळामधील तेथील लोकांच्या जीवनाच्या
ल्ल गुणवत्तेची चर्चा करा. सद्य:स्थितीमधील भारताच्या जीवन गुणवत्तेशी ती कशी तुलनात्मक आहे?
उपरोक्त प्रश्न हे औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद आणि वसाहतवाद या दोन महत्त्वाच्या घटनासंबंधित आहेत. या प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी साम्राज्यवाद आणि वसाहतवाद हे नेमके काय होते, त्याची सुरुवात कशी झाली, त्यासाठी नेमके कोणते घटक कारणीभूत होते आणि औद्योगिक क्रांतीला वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यामुळे कसा फायदा झाला, या विषयी सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे. या सर्व घटनांची योग्य समज आणि आकलन करण्यासाठी आपणाला प्रबोधन युग आणि त्याचे परिणाम म्हणून युरोपमधील समाजजीवनामध्ये घडून आलेले बदल याचा सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय वसाहतवाद आणि साम्राज्यवाद ही युरोपमधील देशांनी सुरू केलेली प्रक्रिया आणि याअंतर्गत त्यांनी आशिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडामध्ये वसाहती कशा प्रकारे स्थापन करून साम्राज्यवाद निर्माण केला याचे योग्य आकलन करता येत नाही. अमेरिकन क्रांतीसंबंधीचा प्रश्न समजून घेण्यासाठी सर्वप्रथम वाणिज्यवाद काय होता आणि इंग्लंड या देशाने वाणिज्यवादाद्वारे अमेरिकन वसाहतीची आर्थिक नाकेबंदी कशी केलेली होती, इत्यादीची माहिती असणे गरजेचे आहे. या माहितीचा वापर करून अमेरिकन क्रांती हा वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव कशा प्रकारे होता, हे आपणाला सोदाहरण सिद्ध करता येते. हे सर्व प्रश्न विषयाची सखोल माहिती गृहीत धरून विचारण्यात आलेले आहेत.
या घटकाची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शालेय पुस्तकांमधून मूलभूत माहिती अभ्यासावी आणि या विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘अ हिस्ट्री ऑफ दी मॉडर्न वर्ल्ड’ हा राजन चक्रवर्ती लिखित संदर्भ ग्रंथ वाचवा तसेच बाजारामध्ये या विषयावर अनेक गाइड्स स्वरूपात लिहिलेली पुस्तकेही उपलब्ध आहेत. या पुढील लेखात आपण २० व्या शतकाचा आढावा घेणार आहोत.
First Published on August 1, 2017 4:01 am
Web Title: important guidance for upsc preparation

 

Monday, July 31, 2017

पुढची पायरी : कामाची गुणवत्ता आपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजे.

पुढची पायरी : कामाची गुणवत्ता

आपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजे.

डॉ. जयंत पानसे | Updated: July 29, 2017 1:49 AM 
बहुतेक सर्व कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेची चर्चा सुरू होते ती वार्षिक मूल्यमापनाच्या वेळेला किंवा एखाद्या अयशस्वी झालेल्या कामामुळे. कोण कुठे चुकले, त्यामुळे काय झाले, नाहीतर काय झाले असते वगैरे. पण गुणावगुणाबद्दल चर्चा करायच्या या दोन्ही चुकीच्या वेळा आहेत. गुणवत्ता पाळणे ही फक्त एखाद्या वेळी करावयाची गोष्ट नसून ती वर्षभर, नव्हे तर सातत्याने कायमची अंगी बाणवण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे आपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजेआपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजे..
दुर्दैवाने कामात गुणवत्तेची अंमलबजावणी करणे हे माझे काम नाही, वरिष्ठांचे आहे ही अनेकांची भावना असते. तसेच हे काम फक्त उत्पादन खात्याचे आहे; असाही एक गैरसमज असतो. पण प्रत्येक काम, मग ते कार्यालयातील असो वा कारखान्यातील; गुणवत्तेच्या मापदंडाप्रमाणेच झाले पाहिजे हा आग्रह कंपनीतील प्रत्येकानेच धरला तर आपोआपच सर्व कामे उत्कृष्ट पद्धतीने होतील. साहजिकच कंपनीच्या उत्पादकतेतही लक्षणीय वाढ होईल.
गुणवत्तापूर्ण काम म्हणजे काय?
  • कामाचा उद्देश लक्षात ठेवून केलेले समर्पक काम
  • पहिल्याच प्रयत्नांत केलेले संपूर्ण काम
  • अपेक्षित अशाच स्वरूपात व पद्धतीने केलेले, समाधान देणारे काम
  • कुठलेही दोष अथवा वैगुण्य नसलेले काम
  • मापदंडानुसार केलेले काम
नोकरीच्या पहिल्या वर्षांत गुणवत्तेचा प्रकर्षांने पुरस्कार करणारे एखादे वरिष्ठ भेटले तर तुम्ही स्वत:ला अतिशय भाग्यवान समजा. कारण त्यांच्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत गुणवत्तेनुसार काम करावयाचा ध्यास तुम्ही घ्याल. त्याचा सकारात्मक परिणाम कार्यालयीन कामगिरीवर तर होईलच, पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील होईल. तुम्ही कार्यालयात आणि वैयक्तिक आयुष्यात अतिशय कार्यक्षम व यशस्वी व्हाल.
वरिष्ठांनी तुम्हाला गुणवत्ता पालन कसे करावयाचे शिकवले नाही तरी पुढे दिलेल्या पायऱ्यांप्रमाणे अंमलबजावणी केल्यास तुम्हालाही त्याचा लाभ करून घेता येईल.
  • प्रथम कामाचे स्वरूप व त्यातून काय निष्पत्ती अपेक्षित आहे हे नीट समजावून घ्या.
  • काम किती वेळात पूर्ण करून कुणाकडे अहवाल द्यायचा आहे त्याची माहिती घ्या.
  • कामाच्या संदर्भात सहकाऱ्याकडून काही माहिती हवी असल्यास किंवा द्यावी लागणार असल्यास लगेचच सहकाऱ्याशी संवाद साधून माहितीचे स्वरूप व लागणारा वेळ याबद्दल जबाबदारी निश्चित करा.
  • काम वेळेत व चांगल्या पद्धतीने पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे योग्य क्षमता, ज्ञान, सामग्री व वेळ आहे याची खातरजमा करा.
  • दुर्दैवाने यापैकी काही कमतरता असेल तर नि:संकोचपणे वरिष्ठांकडे ज्ञान/ सामग्री मागा. न मिळाल्यास कामाच्या निष्पत्तीवर या अभावांचा कसा परिणाम होईल ते अभ्यास करून वरिष्ठांना सांगा.
  • कामाच्या संदर्भात अगोदरच गुणवत्तेचे काही दृश्य/ अदृश्य मापदंड आहेत का याचा तपास करा. असतील तर त्या मापदंडाप्रमाणे किंवा त्यापेक्षा चांगले काम करावयाचा प्रयत्न करा.
  • संपूर्ण कामाचे छोटे विभाग करून त्या विभागानुसार काम पूर्ण करा. ते अधिक चांगले व वेळेत होते असे तुम्हाला अनुभवाला येईल.
  • नेहमी कराव्या लागणाऱ्या कामांची प्रतिक्षिप्त क्रिया करा; म्हणजे त्यामध्ये वेगळा विचार करायला न लागल्याने काम नेटके व गतिमान होईल.
विभागवार केलेल्या कामांचे वेळोवेळी स्वत:च परीक्षण करा. ती गुणवत्तेच्या निकषांप्रमाणेच आहेत की नाहीत याची खात्री करा.
शेवटी सर्व विभागवार कामांचे संकलन करा व परत एकदा परीक्षण करा, त्रुटी असतील तर सुधारून घ्या. हे काम करताना काय अडचणी आल्या व त्यावर तुम्ही कशी मात केली याचे एक लिखित तयार करा. ते तुम्हाला पुढचे काम हाताळताना उपयोगी पडेल.
प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण करण्याचे हे साधे व सोपे नियम तुम्ही हे दैनंदिन व्यवहारात पाळा. मग पाहा, वर्षभरात तुमच्यामध्ये सगळ्यांच्या डोळ्यात भरणारा सकारात्मक बदल झालेला दिसून येईल. तुमची उत्पादकता वाढेल, आत्मविश्वास दुणावेल. अशी गुणवत्ता अंगी बाणविण्यासाठी “Quality for the first time, every time!” एवढेच लक्षात ठेवा.
dr.jayant.panse@gmail.com
First Published on July 29, 2017 1:49 am
Web Title: quality of work work issue

 

नोकरीची संधी उन्हाळी किंवा हिवाळी शिक्षण मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

नोकरीची संधी

उन्हाळी किंवा हिवाळी शिक्षण  मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

सुहास पाटील | Updated: July 29, 2017 1:46 AM 
भारत सरकार, डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेिनग (डीजीटी) मिनिस्ट्री ऑफ स्कील डेव्हलपमेंट आणि आंतरप्रुनरशिप अंतर्गत येणाऱ्या देशभरातील अ‍ॅडव्हान्स ट्रेिनग इन्स्टिटय़ूटस (१४ इन्स्टिटय़ूटस ३३७८ जागा)
(एटीआय) आणि नॅशनल व्होकेशनल ट्रेिनग इन्स्टिटय़ूट/रिजनल व्होकेशनल ट्रेिनग इन्स्टिटय़ूटमध्ये (११ इन्स्टिटय़ूटस – १०६० जागा) क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेिनग स्कीमसाठी (सीआयटीएस) प्रवेश.
(कालावधी – १ र्वष, २ सत्रं)
महाराष्ट्रातील एटीआय वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, सायन, मुंबई येथे (१) फिटर, (२) टर्नर, (३) मशिनिस्ट, (४) वेल्डर, (५) इलेक्ट्रिशियन, (६) कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅिमग असिस्टंट (सीओपीए), (७) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, (८) ड्राफ्ट्समन मेकॅनिक, (९) इन्स्ट्रमेंट मेकॅनिक, (१०) मेकॅनिक मोटर वेहिकल, (११) मेकॅनिक रेडिओ, टीव्ही, (१२) टूल अँड डाय मेकर प्रत्येक ट्रेडच्या ४० जागा प्रशिक्षणासाठी उपलब्ध आहेत.
रिजनल व्होकेशनल ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, काशिनाथ धुरू मार्ग, दादर, मुंबई-४०० ०२८ येथे
(१) सेक्रेटरियल प्रॅक्टिस, (२) ड्रेस मेकिंग, (३) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, (४) आíकटेक्चरल ड्राफ्ट्समन प्रत्येक ट्रेडच्या २० जागांवर प्रवेश उपलब्ध.
पात्रता – क्राफ्ट्समन ट्रेिनग स्कीम (सीटीएस) अंतर्गत संबंधित नॅशनल ट्रेड सर्टििफकेट (आयटीआय्) किंवा संबंधित विषयातील पदविकाधारक ज्यांच्याकडे ३ वर्षांचा शिकविण्याचा अनुभव आहे, असे उमेदवार सेमिस्टर-१ परीक्षेला बसू शकतात आणि सेमिस्टर-२ ला प्रवेश मिळवू शकतात. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात कोर्स सुरू होतो. प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेनुसार एका सेमिस्टरला सीआयटीएससाठी कोर्स फी रु. १,२००/-(अजा/अज उमेदवारांसाठी रु. ३५०/-).
दोन सेमिस्टरचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेिनग (सेमिस्टर पॅटर्न) सर्टििफकेट दिले जाईल. प्रशिक्षणाची वेळ सकाळी ९ ते ५.३० पर्यंत (शनिवार/रविवार सुट्टी). उन्हाळी किंवा हिवाळी शिक्षण  मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
First Published on July 29, 2017 1:46 am
Web Title: job opportunities 82
 

 

करिअरमंत्र या विद्यापीठातून पदवी घेऊन राज्यसेवा परीक्षा देण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते.

करिअरमंत्र

या विद्यापीठातून पदवी घेऊन राज्यसेवा परीक्षा देण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते.

सुरेश वांदिले | Updated: July 29, 2017 1:44 AM 
मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून १२ वी झालो आहे. मला महाराष्ट्रातील पोलीस शिपाई भरती परीक्षा देता येईल का?
आकाश काळे
यशवतंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जे अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहेत, ते सर्व शासकीय परीक्षांसाठी ग्राह्य़ धरले जातात. त्यामुळे या विद्यापीठातून बारावी झाली असली तरीही पोलीस शिपाई पदभरतीची परीक्षा विद्यार्थ्यांना देता येते. या विद्यापीठातून पदवी घेऊन राज्यसेवा परीक्षा देण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते.
माझी मुलगी नुकतीच १२ वी उत्तीर्ण झाली आहे. तिला अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेमध्ये रस नाही. तिला संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची आहे. तिने कोणत्या क्षेत्रात पदवी घ्यावी?
जयश्री सुगरे
संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससीच्या परीक्षेसाठी कोणत्याही एका विशिष्ट पदवीची गरज नाही. या परीक्षांमध्ये यश मिळवणारे विद्यार्थी अनेक प्रकारच्या शाखांमधून शिक्षण घेऊन आलेले दिसतात. अमुक एका विद्याशाखेतल्याच विद्यार्थ्यांना यश मिळते असे नव्हे. त्यामुळे आपल्या पाल्याची आवड लक्षात घेऊन कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेत तुम्ही प्रवेश घेऊ शकता. कलाशाखेतील विषयांकडे बऱ्याच मुलांचा ओढा दिसून येतो. या विषयांचे साहित्यही मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. या पर्यायाचाही विचार करता येईल. मराठी, इंग्रजी भाषेची तयारी पदवीपर्यंतच्या काळात उत्तमरीत्या करता येऊ शकते. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य अध्ययन याविषयांच्या अनुषंगाने प्राथमिक व मुख्य परीक्षेत बरेच प्रश्न विचारले जातात. या बाबी लक्षात ठेऊनच विषयांची निवड करता येईल. आत्तापासूनच त्यानुसार अभ्यास केल्यास उत्तम फळ मिळेल.
मी. एम. कॉम झालो आहे. मला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे. मार्गदर्शन करावे.
नितीन पाटील
बँकिंग क्षेत्रात तुम्हाला लिपिक, प्रोबेशनरी ऑफिसर आणि स्पेश्ॉलिस्ट ऑफिसर म्हणून करिअरला सुरुवात करता येईल. या संधी तुला रिझव्‍‌र्ह बँक, सार्वजनिक बँका आणि खासगी बँकांमधून मिळू शकतील.
(१) रिझव्‍‌र्ह बँकेच्या निवड मंडळामार्फत या पदांच्या नियुक्तीसाठी प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती घेतल्या जातात.
(२) बहुतांश सार्वजनिक बँकामधील पदांच्या निवडीसाठी आयबीपीएस (इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ) मार्फत तीन टप्यांमध्ये परीक्षा घेतली जाते.

(३) काही सार्वजनिक बँका त्यांच्या प्रोबेशनरी ऑफसर्सच्या नियुक्तीसाठी स्वतंत्ररीत्या परीक्षा घेतात. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना एक वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा अभ्यासक्रम करावा लागतो. हा अभ्यासक्रम पूर्ण झाला की त्यांची निवड प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून केली जाते.
(४) काही खासगी बँका चाळणी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करतात. याविषयी संबंधित बँकांच्या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती दिली जाते.
(५) स्टेट बँक ऑफ इंडिया स्वत:ची परीक्षा घेते.
(६) बहुतेक सर्व खासगी आणि काही सार्वजनिक क्षेत्रातील बँका एमबीए इन फायनान्स हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस प्लेसमेंटद्वारे करतात.
पुणेस्थित ‘नॅशनल इंस्टिटय़ूट ऑफ बँकिंग’ या संस्थेचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिस हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये खासगी आणि शासकीय बँकांमध्ये चांगल्या संधी मिळतात. ‘जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ या संस्थेतील एम.एस्सी इन फायनान्स हा अभ्यासक्रमसुद्धा अशी संधी मिळवून देऊ  शकतो. तसेच ‘टाइम्सेप्रो’ या संस्थेमध्येही एमबीए इन बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिस आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिस हे अभ्यासक्रम केल्यावर खासगी बँकांमध्ये संधी मिळू शकते.
ग्रामीण बँकांतील विविध पदांच्या निवडीसाठी आयबीपीएसमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते. येत्या काळात आपल्या देशातील बँकिंग सेवांची व्याप्ती फार मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात मोठी भरती केली जात आहे. आयबीपीएसमार्फत पुढील काही महिन्यांत जवळपास काही हजार पदे भरली जातील.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)
First Published on July 29, 2017 1:44 am
Web Title: career guidance career issue 3


 

एमपीएससी मंत्र : भारतीय कृषिव्यवस्था संकल्पनात्मक भाग पेपर १ मध्ये या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास भूगोलाबरोबर संलग्न करण्यात आला आहे.

एमपीएससी मंत्र : भारतीय कृषिव्यवस्था संकल्पनात्मक भाग

पेपर १ मध्ये या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास भूगोलाबरोबर संलग्न करण्यात आला आहे.

रोहिणी शहा  | Updated: July 28, 2017 1:42 AM 
मुख्य परीक्षेच्या वेगवेगळ्या पेपर्समध्ये संबंधित विभागाशी जोडून भारतीय कृषिव्यवस्थेचे वेगवेगळे आयाम विभाजीत करण्यात आले आहेत. अभ्यासाच्या सोयीसाठी अभ्यासक्रमाची फेररचना कशा प्रकारे करावी, त्याची चर्चा मागच्या लेखामध्ये करण्यात आली आहे. पेपर १ मध्ये या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास भूगोलाबरोबर संलग्न करण्यात आला आहे. पेपर ४ मधील कृषीविषयक घटकांचा अभ्यास अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून करणे आयोगास अपेक्षित आहे. स्वतंत्र कृषी घटक म्हणून या सर्व पलूंचा एकत्रित अभ्यास करावा की त्या त्या पेपर्सबरोबर करावा हा आपल्या सोयीप्रमाणे घ्यायचा निर्णय आहे. दोन्ही पेपर्समध्ये कृषी हा उपघटक स्वतंत्र मुद्दा म्हणूनच देण्यात आला आहे. या घटकाच्या सगळ्या पेपर्समधील मुद्दय़ांच्या अभ्यासाबाबत या व पुढील लेखामध्ये एकत्रित चर्चा करण्यात येत आहे.
संकल्पनात्मक मुद्दे

  • कृषीविषयक मूलभूत भौगोलिक व वैज्ञानिक संकल्पना आधी समजून घ्याव्यात. यामध्ये मृदेची निर्मिती प्रक्रिया समजून घ्यायला हवी. मृदेचे घटक विशेषत: पीकवाढीसाठी आवश्यक पोषणतत्त्वे, त्यांचे महत्त्व, त्यांच्या आभावामुळे व अतिपुरवठय़ामुळे पिकांवर होणारे परिणाम (रोग / नुकसान) या बाबी समजून घ्याव्यात. यांच्या नोट्स टेबलमध्ये काढता येतील. मृदेची धूप व दर्जा कमी होणे या समस्या कारणे, उपाय, परिणाम अशा मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासाव्यात. मृदा संधारणाची गरज, आवश्यकता, त्यातील घटक, समस्या, उपाय इत्यादी बाबी समजून घ्याव्यात.
  • कृषी उत्पादकतेमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या जलव्यवस्थापनाचा सर्वागीण अभ्यास आवश्यक आहे. मान्सूनची निर्मिती, महाराष्ट्रातील मान्सूनचे वितरण व त्या आधारे करण्यात आलेले महाराष्ट्रातील कृषी-हवामान विभाग अशा क्रमाने संकल्पना व तथ्ये समजून घ्यावीत.
  • पर्जन्याश्रयी शेती, सिंचित शेती इत्यादी सिंचनावर आधारित शेतीचे प्रकार व्यवस्थित समजून घ्यायला हवेत. पाटबंधाऱ्यांचे प्रकार, वैशिष्टय़े, महत्त्व माहीत असायला हवेत. जलसंधारणाचे महत्त्व, प्रकार, घटक, समस्या, उपाय इत्यादी बाबी समजून घ्याव्यात. या दोन्हींमधील महत्त्वाच्या चालू घडामोडी माहीत असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र शासनाचे दुष्काळ निवारण व इतर कृषी व ग्रामीण विकासासाठीचे उपक्रम, योजना इ. बाबी पेपर ४ मधील अर्थव्यवस्था घटकाशी संलग्न आहेत. त्यामुळे एकत्रित अभ्यास फायद्याचा ठरेल. याबाबत शासनाच्या नव्या योजनांची माहिती असायला हवी.
  • मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन व पशुसंवर्धन या क्षेत्रांची वैशिष्टय़े, गरजा, समस्या, कारणे, उपाय, महत्त्व इत्यादी पलू व्यवस्थित समजून घ्यावेत. या क्षेत्रांच्या संवर्धनासाठीचे शासकीय उपाय व योजना इत्यादींचा आढावा घेणे आवश्यक आहे. कृषीक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर, हरितक्रांती, यांत्रिकीकरण, जीएम बियाणी यांचे स्वरूप, महत्त्व, परिणाम यांची समज विकसित व्हायला हवी. तंत्रज्ञानाच्या वापराचे आíथक, सामाजिक, पर्यावरणीय परिणाम व्यवस्थित समजून घ्यावेत. समस्या व उपायांचा आढावा घ्यावा व चालू घडामोडींबाबत अद्ययावत माहिती असायला हवी.
  • महाराष्ट्रातील कृषी-हवामान विभागांच्या आधारे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा संकल्पनात्मक आणि तथ्यात्मक अभ्यास एकाच वेळी करणे शक्य आहे. मृदेचा प्रकार, महत्त्वाची पिके, जलव्यवस्थापन, सिंचन पद्धती इत्यादींचा अभ्यासस्वरूप, समस्या, कारणे, उपाय या चार पलूंच्या आधारे करावा. समस्यांचा विचार करताना नसíगक स्थान, स्वरूपामुळे निर्माण होणाऱ्या, चुकीच्या पीक पद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या, खतांच्या वापरामुळे, सिंचन पद्धतीमुळे, औद्योगिक व इतर प्रदूषकांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
  • शाश्वत शेती, सेंद्रित शेती, जी. एम. बियाणी, सिंचनाचे प्रकार, शेती व पर्यावरण यांचा परस्पर संबंध समजावून घेणे व त्यांचा तर्कशुद्ध वापर करणे आवश्यक आहे. कृषीविषयक चालू घडामोडींमध्ये जी एम बियाणी, नव्या पीक पद्धती, नवे वाण इत्यादींचा अभ्यास पेपर ४ शीही संबंधित आहे. त्यामुळे याचा अभ्यास गांभीर्याने करणे आवश्यक आहे.
भारतीय कृषिव्यवस्था या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास भूगोलाबरोबर संलग्न करण्यात आला आहे तर तथ्यात्मक व विश्लेषणात्मक भाग पेपर ४ मधील अर्थव्यवस्था घटकामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या भागाच्या तयारीबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.
First Published on July 28, 2017 1:42 am
Web Title: indian agriculture is conceptual part
 

पंचायत महिला शक्ती अभियान पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत नागपूर येथे राज्य साहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

पंचायत महिला शक्ती अभियान

पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत नागपूर येथे राज्य साहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

लोकसत्ता टीम | Updated: July 28, 2017 1:39 AM
पंचायत राज संस्थांमधून निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना लोकशाही तत्त्वाविषयी जागृती निर्माण करणे, त्यांना कामकाजाबाबतचे प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे यासाठी एक व्यासपीठ म्हणून पंचायत महिला शक्ती अभियान हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
  • पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत नागपूर येथे राज्य साहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत विभागनिहाय महिला प्रतिनिधींचे संमेलनास आयोजन करण्यात येते.
  • पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावरील लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ गठित करण्यात येतो. प्रत्येक जिल्ह्य़ातून तिन्ही स्तरावरील प्रत्येकी एका महिला प्रतिनिधींची निवड करण्यात येते. अशा ३३ जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ अशा ९९ सदस्यांचा संघ तयार करण्यात येतो. या ९९ सदस्यांतून १८ प्रतिनिधींचे कार्यकारी मंडळ तयार करण्यात येते.
  • लोकनियुक्त महिला प्रतिनिधींच्या संघाची जबाबदारी
  • लैंगिक अन्याय, बालकांचे शोषण, अस्पृश्यता संबंधित विषयाबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे.
  • या बाबतचे ठराव घेऊन उचित कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविणे.
  • महिला सबलीकरणासाठी कृती आराखडा सादर करणे.
  • चार्टर ऑफ डिमांडमध्ये मान्य करण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करणे.
  • या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी, प्रत्येक जिल्ह्य़ात एक युनिट स्थापन करण्यात येते. संघात समाविष्ट असलेल्या जिल्ह्य़ातील ३ महिला तसेच सभापती, महिला व बाल कल्याण समिती आणि उपमुख्य कार्यकोरी अधिकारी (महिला व बाल कल्याण) या ५ जणांचा युनिटमध्ये समावेश आहे. सदर युनिटची बैठक दर २ महिन्याने जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) यांच्या अध्यक्षतेखाली होते.
  • अधिक माहितीसाठी https://rdd.maharashtra.gov.in/1041/Panchayat-Mahila-Shakti-Abhiyan?format=print
First Published on July 28, 2017 1:39 am
Web Title: panchayat mahila shakti abhiyan 2

Tuesday, July 25, 2017

नोकरीची संधी संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै.

नोकरीची संधी

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै.

द. वा. आंबुलकर | Updated: July 21, 2017 1:55 AM 
खाण संरक्षण मंत्रालयात उप-संचालकांच्या २० जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in अथवा http://www.upsc.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै.
इन्कम टॅक्स सेटलमेंट कमीशनमध्ये दिल्ली येथे स्टेनोग्राफर्सच्या ७ जागा-
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली आयकर विभागाची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सेक्रेटरी, प्रिंसिपल बेंच, इन्कम टॅक्स सेटलमेंट कमीशन, ४ था मजला, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ जुलै.
केंद्र सरकारच्या युवा कल्याण मंत्रालयात युवा अधिकाऱ्यांच्या ८ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ८ ते १४ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in अथवा http://www.upsc.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै.
जीएसपीसी एलएनजी लिमिटेडमध्ये शिफ्ट ऑपरेटर/ टेक्नीशियन्सच्या ८ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी जीएसपीसी- एलएनजीच्या www.gspcgroup.com या संकेतस्थळावरील GSPCLNG/ latest- opening या लिंकला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज जीएसपीसी एलएनजी लिमिटेड, बी-१०३, पहिला मजला, आयटी- टॉवर-२, इन्फोसिटी, इन्ट्रोडिया सर्कल जवळ, गांधीनगर, गुजरात- ३८२००९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ जुलै.

अ‍ॅक्सिस बँकेत मुंबईसह विविध ठिकाणी प्रशिक्षणार्थी पदाच्या संधी-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली अ‍ॅक्सिस बँकेची जाहिरात पहावी अथवा बँकेच्या www.axisbank.com या संकेतस्थळावरील careers या लिंकला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै.
नॅशनल हाय वे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये उप-व्यवस्थापक (टेक्निकल) च्या ४० जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ जून २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल हाय-वे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पहावी अथवा अ‍ॅथॉरिटीच्या www.nhai.org या संकेतस्थळावरील About us-recruitment या लिंकला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै.
First Published on July 21, 2017 1:55 am
Web Title: job opportunities job issue 2