Monday, July 31, 2017

पुढची पायरी : कामाची गुणवत्ता आपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजे.

पुढची पायरी : कामाची गुणवत्ता

आपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजे.

डॉ. जयंत पानसे | Updated: July 29, 2017 1:49 AM 
बहुतेक सर्व कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेची चर्चा सुरू होते ती वार्षिक मूल्यमापनाच्या वेळेला किंवा एखाद्या अयशस्वी झालेल्या कामामुळे. कोण कुठे चुकले, त्यामुळे काय झाले, नाहीतर काय झाले असते वगैरे. पण गुणावगुणाबद्दल चर्चा करायच्या या दोन्ही चुकीच्या वेळा आहेत. गुणवत्ता पाळणे ही फक्त एखाद्या वेळी करावयाची गोष्ट नसून ती वर्षभर, नव्हे तर सातत्याने कायमची अंगी बाणवण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे आपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजेआपण करत असलेले प्रत्येक काम आणि प्रकल्प हे सुयोजित गुणवत्तेच्या मापदंडावर तोलूनच झाले पाहिजे..
दुर्दैवाने कामात गुणवत्तेची अंमलबजावणी करणे हे माझे काम नाही, वरिष्ठांचे आहे ही अनेकांची भावना असते. तसेच हे काम फक्त उत्पादन खात्याचे आहे; असाही एक गैरसमज असतो. पण प्रत्येक काम, मग ते कार्यालयातील असो वा कारखान्यातील; गुणवत्तेच्या मापदंडाप्रमाणेच झाले पाहिजे हा आग्रह कंपनीतील प्रत्येकानेच धरला तर आपोआपच सर्व कामे उत्कृष्ट पद्धतीने होतील. साहजिकच कंपनीच्या उत्पादकतेतही लक्षणीय वाढ होईल.
गुणवत्तापूर्ण काम म्हणजे काय?
  • कामाचा उद्देश लक्षात ठेवून केलेले समर्पक काम
  • पहिल्याच प्रयत्नांत केलेले संपूर्ण काम
  • अपेक्षित अशाच स्वरूपात व पद्धतीने केलेले, समाधान देणारे काम
  • कुठलेही दोष अथवा वैगुण्य नसलेले काम
  • मापदंडानुसार केलेले काम
नोकरीच्या पहिल्या वर्षांत गुणवत्तेचा प्रकर्षांने पुरस्कार करणारे एखादे वरिष्ठ भेटले तर तुम्ही स्वत:ला अतिशय भाग्यवान समजा. कारण त्यांच्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत गुणवत्तेनुसार काम करावयाचा ध्यास तुम्ही घ्याल. त्याचा सकारात्मक परिणाम कार्यालयीन कामगिरीवर तर होईलच, पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील होईल. तुम्ही कार्यालयात आणि वैयक्तिक आयुष्यात अतिशय कार्यक्षम व यशस्वी व्हाल.
वरिष्ठांनी तुम्हाला गुणवत्ता पालन कसे करावयाचे शिकवले नाही तरी पुढे दिलेल्या पायऱ्यांप्रमाणे अंमलबजावणी केल्यास तुम्हालाही त्याचा लाभ करून घेता येईल.
  • प्रथम कामाचे स्वरूप व त्यातून काय निष्पत्ती अपेक्षित आहे हे नीट समजावून घ्या.
  • काम किती वेळात पूर्ण करून कुणाकडे अहवाल द्यायचा आहे त्याची माहिती घ्या.
  • कामाच्या संदर्भात सहकाऱ्याकडून काही माहिती हवी असल्यास किंवा द्यावी लागणार असल्यास लगेचच सहकाऱ्याशी संवाद साधून माहितीचे स्वरूप व लागणारा वेळ याबद्दल जबाबदारी निश्चित करा.
  • काम वेळेत व चांगल्या पद्धतीने पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे योग्य क्षमता, ज्ञान, सामग्री व वेळ आहे याची खातरजमा करा.
  • दुर्दैवाने यापैकी काही कमतरता असेल तर नि:संकोचपणे वरिष्ठांकडे ज्ञान/ सामग्री मागा. न मिळाल्यास कामाच्या निष्पत्तीवर या अभावांचा कसा परिणाम होईल ते अभ्यास करून वरिष्ठांना सांगा.
  • कामाच्या संदर्भात अगोदरच गुणवत्तेचे काही दृश्य/ अदृश्य मापदंड आहेत का याचा तपास करा. असतील तर त्या मापदंडाप्रमाणे किंवा त्यापेक्षा चांगले काम करावयाचा प्रयत्न करा.
  • संपूर्ण कामाचे छोटे विभाग करून त्या विभागानुसार काम पूर्ण करा. ते अधिक चांगले व वेळेत होते असे तुम्हाला अनुभवाला येईल.
  • नेहमी कराव्या लागणाऱ्या कामांची प्रतिक्षिप्त क्रिया करा; म्हणजे त्यामध्ये वेगळा विचार करायला न लागल्याने काम नेटके व गतिमान होईल.
विभागवार केलेल्या कामांचे वेळोवेळी स्वत:च परीक्षण करा. ती गुणवत्तेच्या निकषांप्रमाणेच आहेत की नाहीत याची खात्री करा.
शेवटी सर्व विभागवार कामांचे संकलन करा व परत एकदा परीक्षण करा, त्रुटी असतील तर सुधारून घ्या. हे काम करताना काय अडचणी आल्या व त्यावर तुम्ही कशी मात केली याचे एक लिखित तयार करा. ते तुम्हाला पुढचे काम हाताळताना उपयोगी पडेल.
प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण करण्याचे हे साधे व सोपे नियम तुम्ही हे दैनंदिन व्यवहारात पाळा. मग पाहा, वर्षभरात तुमच्यामध्ये सगळ्यांच्या डोळ्यात भरणारा सकारात्मक बदल झालेला दिसून येईल. तुमची उत्पादकता वाढेल, आत्मविश्वास दुणावेल. अशी गुणवत्ता अंगी बाणविण्यासाठी “Quality for the first time, every time!” एवढेच लक्षात ठेवा.
dr.jayant.panse@gmail.com
First Published on July 29, 2017 1:49 am
Web Title: quality of work work issue

 

नोकरीची संधी उन्हाळी किंवा हिवाळी शिक्षण मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

नोकरीची संधी

उन्हाळी किंवा हिवाळी शिक्षण  मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

सुहास पाटील | Updated: July 29, 2017 1:46 AM 
भारत सरकार, डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेिनग (डीजीटी) मिनिस्ट्री ऑफ स्कील डेव्हलपमेंट आणि आंतरप्रुनरशिप अंतर्गत येणाऱ्या देशभरातील अ‍ॅडव्हान्स ट्रेिनग इन्स्टिटय़ूटस (१४ इन्स्टिटय़ूटस ३३७८ जागा)
(एटीआय) आणि नॅशनल व्होकेशनल ट्रेिनग इन्स्टिटय़ूट/रिजनल व्होकेशनल ट्रेिनग इन्स्टिटय़ूटमध्ये (११ इन्स्टिटय़ूटस – १०६० जागा) क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेिनग स्कीमसाठी (सीआयटीएस) प्रवेश.
(कालावधी – १ र्वष, २ सत्रं)
महाराष्ट्रातील एटीआय वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, सायन, मुंबई येथे (१) फिटर, (२) टर्नर, (३) मशिनिस्ट, (४) वेल्डर, (५) इलेक्ट्रिशियन, (६) कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅिमग असिस्टंट (सीओपीए), (७) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, (८) ड्राफ्ट्समन मेकॅनिक, (९) इन्स्ट्रमेंट मेकॅनिक, (१०) मेकॅनिक मोटर वेहिकल, (११) मेकॅनिक रेडिओ, टीव्ही, (१२) टूल अँड डाय मेकर प्रत्येक ट्रेडच्या ४० जागा प्रशिक्षणासाठी उपलब्ध आहेत.
रिजनल व्होकेशनल ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, काशिनाथ धुरू मार्ग, दादर, मुंबई-४०० ०२८ येथे
(१) सेक्रेटरियल प्रॅक्टिस, (२) ड्रेस मेकिंग, (३) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, (४) आíकटेक्चरल ड्राफ्ट्समन प्रत्येक ट्रेडच्या २० जागांवर प्रवेश उपलब्ध.
पात्रता – क्राफ्ट्समन ट्रेिनग स्कीम (सीटीएस) अंतर्गत संबंधित नॅशनल ट्रेड सर्टििफकेट (आयटीआय्) किंवा संबंधित विषयातील पदविकाधारक ज्यांच्याकडे ३ वर्षांचा शिकविण्याचा अनुभव आहे, असे उमेदवार सेमिस्टर-१ परीक्षेला बसू शकतात आणि सेमिस्टर-२ ला प्रवेश मिळवू शकतात. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात कोर्स सुरू होतो. प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेनुसार एका सेमिस्टरला सीआयटीएससाठी कोर्स फी रु. १,२००/-(अजा/अज उमेदवारांसाठी रु. ३५०/-).
दोन सेमिस्टरचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेिनग (सेमिस्टर पॅटर्न) सर्टििफकेट दिले जाईल. प्रशिक्षणाची वेळ सकाळी ९ ते ५.३० पर्यंत (शनिवार/रविवार सुट्टी). उन्हाळी किंवा हिवाळी शिक्षण  मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
First Published on July 29, 2017 1:46 am
Web Title: job opportunities 82
 

 

करिअरमंत्र या विद्यापीठातून पदवी घेऊन राज्यसेवा परीक्षा देण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते.

करिअरमंत्र

या विद्यापीठातून पदवी घेऊन राज्यसेवा परीक्षा देण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते.

सुरेश वांदिले | Updated: July 29, 2017 1:44 AM 
मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून १२ वी झालो आहे. मला महाराष्ट्रातील पोलीस शिपाई भरती परीक्षा देता येईल का?
आकाश काळे
यशवतंराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जे अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहेत, ते सर्व शासकीय परीक्षांसाठी ग्राह्य़ धरले जातात. त्यामुळे या विद्यापीठातून बारावी झाली असली तरीही पोलीस शिपाई पदभरतीची परीक्षा विद्यार्थ्यांना देता येते. या विद्यापीठातून पदवी घेऊन राज्यसेवा परीक्षा देण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते.
माझी मुलगी नुकतीच १२ वी उत्तीर्ण झाली आहे. तिला अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेमध्ये रस नाही. तिला संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची आहे. तिने कोणत्या क्षेत्रात पदवी घ्यावी?
जयश्री सुगरे
संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससीच्या परीक्षेसाठी कोणत्याही एका विशिष्ट पदवीची गरज नाही. या परीक्षांमध्ये यश मिळवणारे विद्यार्थी अनेक प्रकारच्या शाखांमधून शिक्षण घेऊन आलेले दिसतात. अमुक एका विद्याशाखेतल्याच विद्यार्थ्यांना यश मिळते असे नव्हे. त्यामुळे आपल्या पाल्याची आवड लक्षात घेऊन कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेत तुम्ही प्रवेश घेऊ शकता. कलाशाखेतील विषयांकडे बऱ्याच मुलांचा ओढा दिसून येतो. या विषयांचे साहित्यही मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. या पर्यायाचाही विचार करता येईल. मराठी, इंग्रजी भाषेची तयारी पदवीपर्यंतच्या काळात उत्तमरीत्या करता येऊ शकते. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य अध्ययन याविषयांच्या अनुषंगाने प्राथमिक व मुख्य परीक्षेत बरेच प्रश्न विचारले जातात. या बाबी लक्षात ठेऊनच विषयांची निवड करता येईल. आत्तापासूनच त्यानुसार अभ्यास केल्यास उत्तम फळ मिळेल.
मी. एम. कॉम झालो आहे. मला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे. मार्गदर्शन करावे.
नितीन पाटील
बँकिंग क्षेत्रात तुम्हाला लिपिक, प्रोबेशनरी ऑफिसर आणि स्पेश्ॉलिस्ट ऑफिसर म्हणून करिअरला सुरुवात करता येईल. या संधी तुला रिझव्‍‌र्ह बँक, सार्वजनिक बँका आणि खासगी बँकांमधून मिळू शकतील.
(१) रिझव्‍‌र्ह बँकेच्या निवड मंडळामार्फत या पदांच्या नियुक्तीसाठी प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती घेतल्या जातात.
(२) बहुतांश सार्वजनिक बँकामधील पदांच्या निवडीसाठी आयबीपीएस (इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन ) मार्फत तीन टप्यांमध्ये परीक्षा घेतली जाते.

(३) काही सार्वजनिक बँका त्यांच्या प्रोबेशनरी ऑफसर्सच्या नियुक्तीसाठी स्वतंत्ररीत्या परीक्षा घेतात. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना एक वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा अभ्यासक्रम करावा लागतो. हा अभ्यासक्रम पूर्ण झाला की त्यांची निवड प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून केली जाते.
(४) काही खासगी बँका चाळणी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करतात. याविषयी संबंधित बँकांच्या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती दिली जाते.
(५) स्टेट बँक ऑफ इंडिया स्वत:ची परीक्षा घेते.
(६) बहुतेक सर्व खासगी आणि काही सार्वजनिक क्षेत्रातील बँका एमबीए इन फायनान्स हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस प्लेसमेंटद्वारे करतात.
पुणेस्थित ‘नॅशनल इंस्टिटय़ूट ऑफ बँकिंग’ या संस्थेचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिस हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये खासगी आणि शासकीय बँकांमध्ये चांगल्या संधी मिळतात. ‘जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ या संस्थेतील एम.एस्सी इन फायनान्स हा अभ्यासक्रमसुद्धा अशी संधी मिळवून देऊ  शकतो. तसेच ‘टाइम्सेप्रो’ या संस्थेमध्येही एमबीए इन बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिस आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिस हे अभ्यासक्रम केल्यावर खासगी बँकांमध्ये संधी मिळू शकते.
ग्रामीण बँकांतील विविध पदांच्या निवडीसाठी आयबीपीएसमार्फत चाळणी परीक्षा घेतली जाते. येत्या काळात आपल्या देशातील बँकिंग सेवांची व्याप्ती फार मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात मोठी भरती केली जात आहे. आयबीपीएसमार्फत पुढील काही महिन्यांत जवळपास काही हजार पदे भरली जातील.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)
First Published on July 29, 2017 1:44 am
Web Title: career guidance career issue 3


 

एमपीएससी मंत्र : भारतीय कृषिव्यवस्था संकल्पनात्मक भाग पेपर १ मध्ये या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास भूगोलाबरोबर संलग्न करण्यात आला आहे.

एमपीएससी मंत्र : भारतीय कृषिव्यवस्था संकल्पनात्मक भाग

पेपर १ मध्ये या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास भूगोलाबरोबर संलग्न करण्यात आला आहे.

रोहिणी शहा  | Updated: July 28, 2017 1:42 AM 
मुख्य परीक्षेच्या वेगवेगळ्या पेपर्समध्ये संबंधित विभागाशी जोडून भारतीय कृषिव्यवस्थेचे वेगवेगळे आयाम विभाजीत करण्यात आले आहेत. अभ्यासाच्या सोयीसाठी अभ्यासक्रमाची फेररचना कशा प्रकारे करावी, त्याची चर्चा मागच्या लेखामध्ये करण्यात आली आहे. पेपर १ मध्ये या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास भूगोलाबरोबर संलग्न करण्यात आला आहे. पेपर ४ मधील कृषीविषयक घटकांचा अभ्यास अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून करणे आयोगास अपेक्षित आहे. स्वतंत्र कृषी घटक म्हणून या सर्व पलूंचा एकत्रित अभ्यास करावा की त्या त्या पेपर्सबरोबर करावा हा आपल्या सोयीप्रमाणे घ्यायचा निर्णय आहे. दोन्ही पेपर्समध्ये कृषी हा उपघटक स्वतंत्र मुद्दा म्हणूनच देण्यात आला आहे. या घटकाच्या सगळ्या पेपर्समधील मुद्दय़ांच्या अभ्यासाबाबत या व पुढील लेखामध्ये एकत्रित चर्चा करण्यात येत आहे.
संकल्पनात्मक मुद्दे

  • कृषीविषयक मूलभूत भौगोलिक व वैज्ञानिक संकल्पना आधी समजून घ्याव्यात. यामध्ये मृदेची निर्मिती प्रक्रिया समजून घ्यायला हवी. मृदेचे घटक विशेषत: पीकवाढीसाठी आवश्यक पोषणतत्त्वे, त्यांचे महत्त्व, त्यांच्या आभावामुळे व अतिपुरवठय़ामुळे पिकांवर होणारे परिणाम (रोग / नुकसान) या बाबी समजून घ्याव्यात. यांच्या नोट्स टेबलमध्ये काढता येतील. मृदेची धूप व दर्जा कमी होणे या समस्या कारणे, उपाय, परिणाम अशा मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासाव्यात. मृदा संधारणाची गरज, आवश्यकता, त्यातील घटक, समस्या, उपाय इत्यादी बाबी समजून घ्याव्यात.
  • कृषी उत्पादकतेमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या जलव्यवस्थापनाचा सर्वागीण अभ्यास आवश्यक आहे. मान्सूनची निर्मिती, महाराष्ट्रातील मान्सूनचे वितरण व त्या आधारे करण्यात आलेले महाराष्ट्रातील कृषी-हवामान विभाग अशा क्रमाने संकल्पना व तथ्ये समजून घ्यावीत.
  • पर्जन्याश्रयी शेती, सिंचित शेती इत्यादी सिंचनावर आधारित शेतीचे प्रकार व्यवस्थित समजून घ्यायला हवेत. पाटबंधाऱ्यांचे प्रकार, वैशिष्टय़े, महत्त्व माहीत असायला हवेत. जलसंधारणाचे महत्त्व, प्रकार, घटक, समस्या, उपाय इत्यादी बाबी समजून घ्याव्यात. या दोन्हींमधील महत्त्वाच्या चालू घडामोडी माहीत असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र शासनाचे दुष्काळ निवारण व इतर कृषी व ग्रामीण विकासासाठीचे उपक्रम, योजना इ. बाबी पेपर ४ मधील अर्थव्यवस्था घटकाशी संलग्न आहेत. त्यामुळे एकत्रित अभ्यास फायद्याचा ठरेल. याबाबत शासनाच्या नव्या योजनांची माहिती असायला हवी.
  • मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन व पशुसंवर्धन या क्षेत्रांची वैशिष्टय़े, गरजा, समस्या, कारणे, उपाय, महत्त्व इत्यादी पलू व्यवस्थित समजून घ्यावेत. या क्षेत्रांच्या संवर्धनासाठीचे शासकीय उपाय व योजना इत्यादींचा आढावा घेणे आवश्यक आहे. कृषीक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर, हरितक्रांती, यांत्रिकीकरण, जीएम बियाणी यांचे स्वरूप, महत्त्व, परिणाम यांची समज विकसित व्हायला हवी. तंत्रज्ञानाच्या वापराचे आíथक, सामाजिक, पर्यावरणीय परिणाम व्यवस्थित समजून घ्यावेत. समस्या व उपायांचा आढावा घ्यावा व चालू घडामोडींबाबत अद्ययावत माहिती असायला हवी.
  • महाराष्ट्रातील कृषी-हवामान विभागांच्या आधारे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा संकल्पनात्मक आणि तथ्यात्मक अभ्यास एकाच वेळी करणे शक्य आहे. मृदेचा प्रकार, महत्त्वाची पिके, जलव्यवस्थापन, सिंचन पद्धती इत्यादींचा अभ्यासस्वरूप, समस्या, कारणे, उपाय या चार पलूंच्या आधारे करावा. समस्यांचा विचार करताना नसíगक स्थान, स्वरूपामुळे निर्माण होणाऱ्या, चुकीच्या पीक पद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या, खतांच्या वापरामुळे, सिंचन पद्धतीमुळे, औद्योगिक व इतर प्रदूषकांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
  • शाश्वत शेती, सेंद्रित शेती, जी. एम. बियाणी, सिंचनाचे प्रकार, शेती व पर्यावरण यांचा परस्पर संबंध समजावून घेणे व त्यांचा तर्कशुद्ध वापर करणे आवश्यक आहे. कृषीविषयक चालू घडामोडींमध्ये जी एम बियाणी, नव्या पीक पद्धती, नवे वाण इत्यादींचा अभ्यास पेपर ४ शीही संबंधित आहे. त्यामुळे याचा अभ्यास गांभीर्याने करणे आवश्यक आहे.
भारतीय कृषिव्यवस्था या घटकाचा संकल्पनात्मक अभ्यास भूगोलाबरोबर संलग्न करण्यात आला आहे तर तथ्यात्मक व विश्लेषणात्मक भाग पेपर ४ मधील अर्थव्यवस्था घटकामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या भागाच्या तयारीबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.
First Published on July 28, 2017 1:42 am
Web Title: indian agriculture is conceptual part
 

पंचायत महिला शक्ती अभियान पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत नागपूर येथे राज्य साहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

पंचायत महिला शक्ती अभियान

पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत नागपूर येथे राज्य साहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

लोकसत्ता टीम | Updated: July 28, 2017 1:39 AM
पंचायत राज संस्थांमधून निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना लोकशाही तत्त्वाविषयी जागृती निर्माण करणे, त्यांना कामकाजाबाबतचे प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे यासाठी एक व्यासपीठ म्हणून पंचायत महिला शक्ती अभियान हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
  • पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत नागपूर येथे राज्य साहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत विभागनिहाय महिला प्रतिनिधींचे संमेलनास आयोजन करण्यात येते.
  • पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावरील लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ गठित करण्यात येतो. प्रत्येक जिल्ह्य़ातून तिन्ही स्तरावरील प्रत्येकी एका महिला प्रतिनिधींची निवड करण्यात येते. अशा ३३ जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ अशा ९९ सदस्यांचा संघ तयार करण्यात येतो. या ९९ सदस्यांतून १८ प्रतिनिधींचे कार्यकारी मंडळ तयार करण्यात येते.
  • लोकनियुक्त महिला प्रतिनिधींच्या संघाची जबाबदारी
  • लैंगिक अन्याय, बालकांचे शोषण, अस्पृश्यता संबंधित विषयाबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे.
  • या बाबतचे ठराव घेऊन उचित कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविणे.
  • महिला सबलीकरणासाठी कृती आराखडा सादर करणे.
  • चार्टर ऑफ डिमांडमध्ये मान्य करण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करणे.
  • या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी, प्रत्येक जिल्ह्य़ात एक युनिट स्थापन करण्यात येते. संघात समाविष्ट असलेल्या जिल्ह्य़ातील ३ महिला तसेच सभापती, महिला व बाल कल्याण समिती आणि उपमुख्य कार्यकोरी अधिकारी (महिला व बाल कल्याण) या ५ जणांचा युनिटमध्ये समावेश आहे. सदर युनिटची बैठक दर २ महिन्याने जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) यांच्या अध्यक्षतेखाली होते.
  • अधिक माहितीसाठी https://rdd.maharashtra.gov.in/1041/Panchayat-Mahila-Shakti-Abhiyan?format=print
First Published on July 28, 2017 1:39 am
Web Title: panchayat mahila shakti abhiyan 2

Tuesday, July 25, 2017

नोकरीची संधी संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै.

नोकरीची संधी

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै.

द. वा. आंबुलकर | Updated: July 21, 2017 1:55 AM 
खाण संरक्षण मंत्रालयात उप-संचालकांच्या २० जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in अथवा http://www.upsc.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै.
इन्कम टॅक्स सेटलमेंट कमीशनमध्ये दिल्ली येथे स्टेनोग्राफर्सच्या ७ जागा-
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली आयकर विभागाची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सेक्रेटरी, प्रिंसिपल बेंच, इन्कम टॅक्स सेटलमेंट कमीशन, ४ था मजला, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ जुलै.
केंद्र सरकारच्या युवा कल्याण मंत्रालयात युवा अधिकाऱ्यांच्या ८ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ८ ते १४ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in अथवा http://www.upsc.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै.
जीएसपीसी एलएनजी लिमिटेडमध्ये शिफ्ट ऑपरेटर/ टेक्नीशियन्सच्या ८ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी जीएसपीसी- एलएनजीच्या www.gspcgroup.com या संकेतस्थळावरील GSPCLNG/ latest- opening या लिंकला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज जीएसपीसी एलएनजी लिमिटेड, बी-१०३, पहिला मजला, आयटी- टॉवर-२, इन्फोसिटी, इन्ट्रोडिया सर्कल जवळ, गांधीनगर, गुजरात- ३८२००९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ जुलै.

अ‍ॅक्सिस बँकेत मुंबईसह विविध ठिकाणी प्रशिक्षणार्थी पदाच्या संधी-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली अ‍ॅक्सिस बँकेची जाहिरात पहावी अथवा बँकेच्या www.axisbank.com या संकेतस्थळावरील careers या लिंकला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै.
नॅशनल हाय वे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये उप-व्यवस्थापक (टेक्निकल) च्या ४० जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ जून २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल हाय-वे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पहावी अथवा अ‍ॅथॉरिटीच्या www.nhai.org या संकेतस्थळावरील About us-recruitment या लिंकला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै.
First Published on July 21, 2017 1:55 am
Web Title: job opportunities job issue 2


 

यूपीएससीची तयारी : आधुनिक भारताचा इतिहास – १ या शतकामध्ये भारताच्या विविध प्रदेशामध्ये प्रादेशिक देशी सत्ताचा उदय झालेला होता.

यूपीएससीची तयारी : आधुनिक भारताचा इतिहास – १

या शतकामध्ये भारताच्या विविध प्रदेशामध्ये प्रादेशिक देशी सत्ताचा उदय झालेला होता.

श्रीकांत जाधव | Updated: July 20, 2017 1:25 AM 
आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास या घटकाची माहिती घेणार आहोत. सर्वसाधारणपणे आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात १८व्या शतकाच्या सुरुवातीपासून समजली जाते. आजच्या लेखामध्ये आपण १८वे शतक आणि १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजेच १८५७पर्यंतच्या इतिहासाची तयारी कशी करावी, याची चर्चा करणार आहोत. गतवर्षीच्या मुख्यपरीक्षामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या आधारे परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या बाबींकड लक्ष देणार आहोत.
सर्वप्रथम आपण या घटकाची थोडक्यात माहिती घेऊ या. १८ व्या शतकाची काही महत्त्वाची वैशिष्टय़े सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. या शतकामध्ये मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली होती, त्यामुळे सर्वात शक्तिशाली साम्राज्य हा मुघल साम्राज्याचा नावलौकिक कायम राहिलेला नव्हता. या शतकामध्ये भारताच्या विविध प्रदेशामध्ये प्रादेशिक देशी सत्ताचा उदय झालेला होता. यातील काही सत्तांची स्थापना मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रांतीय सुभेदारांनी केलेली होती (उदा. बंगाल, अवध आणि हैदराबाद), तसेच काही सत्तांचा उदय हा मुघल साम्राज्याच्या विरोधात उठाव करून झालेला होता (उदा. मराठे, अफगाण, जाट आणि शीख) व काही सत्ता या स्वतंत्ररीत्या उदयाला आलेल्या होत्या (उदा. राजपूत, म्हैसूर, त्रावणकोर) तसेच याच्या जोडीला १५व्या शतकापासून सागरी मार्गाचा वापर करून युरोपमधून आलेले व्यापारी वर्ग (पोर्तुगीज, डच, ब्रिटिश/इंग्रज, दानिश आणि फ्रेंच) होताच. त्यांची भारतासोबत होणाऱ्या व्यापारावर स्वतची मक्तेदारी प्रस्थापित करण्यासाठी लागलेली स्पर्धा आणि यामध्ये अंतिमत: इंग्रजाचा झालेला विजय या महत्त्वाच्या घटनांच्या सखोल माहितीचा सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो. याचबरोबर भारतामध्ये ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेचा इतिहास अभ्यासताना नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे ब्रिटिशांना भारतात सत्ता स्थापन करता आली याची योग्य आणि मुद्देसूद माहिती असावी लागते. तसेच याच्या जोडीला ब्रिटिश सत्तेचा भारतावर झालेला परिणाम या अंतर्गत आपणाला राजकीय आíथक, सामाजिक व  सांस्कृतिक परिणामाची माहिती असावी लागते. गव्हर्नर जनरल व त्यांचे कार्य व  ब्रिटिशांनी भारतामध्ये स्थापन केलेली प्रशासन व्यवस्था आणि ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे व त्यांचा परिणाम, याचबरोबर या कालखंडातील भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्ती व त्यांनी केलेले कार्य याची माहिती असणे गरजेचे आहे. भारतीयांनी या कालखंडामध्ये ब्रिटिशांना कशा पद्धतीने प्रतिसाद दिलेला होता व या प्रतिसादामुळे भारतीयांच्या राजकीय, आíथक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये नेमका कोणता बदल झालेला होता, याची सखोल माहिती असावी लागते. अशा पद्धतीने या घटकाचा अभ्यास आपणाला करावा लागतो हे खालील मागील काही वष्रे विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या विश्लेषणांवरून आपण समजून घेऊ शकतो.
२०१३मधील मुख्य परीक्षेत, ‘वेगवेगळ्या पद्धतीने लॉर्ड डलहौसीने आधुनिक भारताचा पाया रचला. विस्तार करा.’ हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न समजून घेताना आपणाला लॉर्ड डलहौसीने  राजकीय, आíथक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कोणत्या पद्धतीची कामगिरी केलेली होती याचा दाखला द्यावा लागतो. तसेच त्याने आधुनिक भारताचा पाया कसा रचला याचे कारणमीमांसेसहित उत्तर लिहावे लागते. यामुळे उत्तर अधिक मुद्देसुद्द व समर्पक आणि प्रश्नांचा योग्य आशय प्रमाणित करणारे ठरते.
२०१४ च्या मुख्य परीक्षेत ‘१७६१ मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. पानिपत येथेच अनेक साम्राज्यांना धक्का देणाऱ्या लढाया का झाल्या?’ हा प्रश्न एका विशिष्ट ठिकाणाचा संदर्भ देऊन विचारण्यात आलेला आह. याचे आकलन करताना आपणाला १५२६मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईचा संदर्भ लक्षात घ्यावा लागेल. त्यानुसार हे स्थान व्यूहात्मकदृष्टय़ा कसे महत्त्वाचे होते या अनुषंगाने उत्तर लिहावे लागते. हा प्रश्न परीक्षार्थीचे विषयाचे ज्ञान व समज कशी आहे याचा कस लावणारा आहे. याच वर्षी ‘ब्रिटिशांच्या आíथक धोरणाच्या १८व्या शतकाच्या मध्यापासून ते स्वातंत्र्यपर्यंतच्या विविध पलूचे समीक्षात्मक विश्लेषण करा’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचे आकलन करताना आपणाला ब्रिटिश ध्येयधोरणे ही ब्रिटिश साम्राज्यवादाला कशी पूरक होती आणि जास्तीतजास्त याचा फायदा व्यापारासाठी कसा होईल हा मूलभूत विचार ब्रिटिशांच्या आíथक धोरणाच्या रणनीतीचा भाग होता हे समजून घेणे गरजेचे आहे आणि त्यानुसार काळानुरूप ब्रिटिशांच्या आíथक धोरणाच्या रणनीतीमध्ये कोणते बदल करण्यात आले याचा उदाहरणासह परामर्श उत्तरामध्ये देणे अपेक्षित आहे.

२०१५च्या मुख्य परीक्षेत या कालखंडाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. २०१६च्या मुख्य परीक्षेत ‘स्पष्ट करा की १८५७चा उठाव हा वसाहतिक भारतातील ब्रिटिश धोरणाच्या विकासातील महत्त्वाची घटना होती’. असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी कंपनी काळातील ब्रिटिश धोरणे याची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे, त्याशिवाय हा प्रश्न योग्य पद्धतीने लिहिता येत नाही कारण १८५७च्या उठावानंतर जे काही बदल करण्यात आलेले होते याला कंपनी काळात राबविण्यात आलेली ब्रिटिश धोरणे कारणीभूत होती आणि उत्तरे लिहिताना या धोरणाचा उत्तरामध्ये दाखला देऊनच उत्तर लिहावे लागते व १८५७च्या उठावाचे महत्त्व नमूद करावे लागते.
उपरोक्त प्रश्नाच्या विश्लेषणावरून आपणाला या घटकाची तयारी कशी करावी याची एक सुस्पष्ट दिशा मिळते. या घटकाचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी आपणाला बिपिनचंद्र लिखित ‘आधुनिक भारत’ हे जुने एनसीईआरटीचे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बी. एल. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टशिन’ या संदर्भग्रंथाचा उपयोग होतो. यापुढील लेखामध्ये आपण आधुनिक भारताच्या १८५७ ते १९४७ पर्यंतच्या कालखंडाचा सर्वागीण आढावा घेणार आहोत.
First Published on July 20, 2017 1:25 am
Web Title: history of modern india 4