Thursday, November 9, 2017

नोकरीची संधी विहित नमुन्यातील अर्ज (जाहिरातीत दिल्याप्रमाणे) आवश्यक प्रमाणपत्रांसह स्वीकारण्याचा अंतिम दि. २३ ऑक्टोबर २०१७.

नोकरीची संधी

विहित नमुन्यातील अर्ज (जाहिरातीत दिल्याप्रमाणे) आवश्यक प्रमाणपत्रांसह स्वीकारण्याचा अंतिम दि. २३ ऑक्टोबर २०१७.


पश्चिम रेल्वे, मुंबई – एकूण ५५ अ‍ॅप्रेंटिस पदांची भरती.
(१) इलेक्ट्रिशियन – एकूण ५२ जागा
(अजा – ८, अज – ४, इमाव – १४, खुला – २६).
(२) टर्नर – २ जागा.
(३) वेल्डर (जी अँड एस) – १ जागा.
पात्रता – १० वी ५५% गुण आणि आय.टी.आय.
प्रशिक्षणाचा कालावधी – १ वर्ष. वयोमर्यादा – दि. २६ सप्टेंबर २०१७ रोजी १५ ते २४ वष्रे. (इमाव – २७ वष्रे, अजा/अज – ३० वष्रेपर्यंत)
शुल्क – रु. १००/- चीफ कमिशनर, चर्चगेट, पश्चिम रेल्वे यांना देय असलेल्या पोस्टल ऑर्डर/ डी.डी. स्वरूपात.
निवड – १० वी आणि आय.टी.आय.मधील गुणवत्तेनुसार. विस्तृत जाहिरात दि. ३० सप्टेंबर २०१७ च्या लोकसत्ता/ टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्रांत पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज (जाहिरातीत दिल्याप्रमाणे) आवश्यक प्रमाणपत्रांसह स्वीकारण्याचा अंतिम दि. २३ ऑक्टोबर २०१७.
डायरेक्टोरेट जनरल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स – कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) – एकूण १,०७४ पदांची भरती.
(१) कूक – ३३२ पदे,
(२) स्वीपर – २१२ पदे,
(३) वॉटर करिअर – १७७ पदे,

(४) वॉशरमन – १३१ पदे,
(५) बार्बर – ८५ पदे,
(६) कॉब्लर – ६५ पदे,
(७) टेलर – २८ पदे,
(८) वेटर – २७ पदे,
(९) खोजी – ६ पदे,
(१०) पेंटर – ५ पदे,
(११) कारपेंटर – २ पदे इ.
पात्रता – १० वी उत्तीर्ण, २ वर्षांचा कामाचा अनुभव किंवा आय.टी.आय. उत्तीर्ण (१ वर्षांचा कोर्स) १ वर्षांचा कामाचा अनुभव.
वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१७ रोजी १८ ते २३ वष्रे.
उंची – १६७.५ सें.मी. (अजसाठी १६२.५ सें.मी.). छाती – ७८ ते ८३ सें.मी.
(अजसाठी छाती ७६-८१ सें.मी.). बी.एस.एफ.च्या www.bsf.nic.in या संकेतस्थळावर विहित नमुन्यातील अर्ज आणि अ‍ॅडमिट कार्डची िपट्रआऊट घेऊन पूर्ण भरलेले अर्ज व अ‍ॅडमिट कार्ड संबंधित आरए किंवा मुख्यालयात दि. ३० ऑक्टोबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.
वॅलिड गेट स्कोअरवर आधारित इंजिनीअर्सची एक्झिक्युटिव्ह/मॅनेजमेंट ट्रेनी पदांवर भरती.
नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया – डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) (सिव्हिल इंजिनीअिरग) एकूण ४० पदे (यूर्आ – १९, अजा – ७,
अज – ३, इमाव – ११).
वय – ३० वष्रेपर्यंत. ऑनलाइन अर्ज  http://www.nhai.org/ या संकेतस्थळावर दि. २८ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत करावेत.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड – गेट- २०१८ – मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल.
ऑनलाइन अर्ज  http://careers.bhel.in/ वर दि. ९ जानेवारी, २०१८ ते ३ फेब्रुवारी, २०१८ पर्यंत करावेत. स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, गेट – २०१८ – मेकॅनिकल इंजिनीअिरग, मेटॅलर्जकिल इंजिनीअिरग, इलेक्ट्रिकल, केमिकल, इन्स्ट्रमेंटेशन आणि मायिनग इंजिनीअिरग.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  http://www.sail.co.in/ वर नंतर जाहीर केली जाईल.
First Published on October 12, 2017 12:45 am
Web Title: job opportunities in government sector job vacancy

करिअरमंत्र दरवर्षी प्रत्येक पदाची भरती केली जातेच असे नाही.

करिअरमंत्र

दरवर्षी प्रत्येक पदाची भरती केली जातेच असे नाही.

सुरेश वांदिले | Updated: October 12, 2017 12:42 AM

मी पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला आहे. मला राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबद्दल विस्तृत माहिती द्याल का?
सारंग  खोटे
राज्य शासनाच्या वर्ग १ ते वर्ग ३ पदांच्या नियुक्तीसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतल्या जातात. तुझ्या प्रश्नावरून तुला राजपत्रित अधिकारी पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेविषयी माहिती हवी असल्याचे दिसून येते. राज्य सेवा परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, विक्रीकर अधिकारी, पोलीस उपअधीक्षक अशा विविध पदांसाठी तीन टप्प्यांमध्ये सामाईक परीक्षा घेतली जाते. प्राथमिक परीक्षेद्वारे मुख्य परीक्षेसाठी निवडक उमेदवारांची निवड केली जाते. पदांच्या संख्येनुसार साधारणत: १० पटींमध्ये उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातात. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमधील गुणांचे एकत्रीकरण करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. पदांची संख्या, उमेदवारांचा गुणानुक्रम आणि त्याने दर्शवलेला पसंतीक्रम लक्षात घेऊन उमेदवारांची अंतिम निवड केली जाते. या सर्व प्रक्रियेस एक वर्षांचा कालावधी लागू शकतो. दरवर्षी प्रत्येक पदाची भरती केली जातेच असे नाही.
मी बी.ए. करत आहे, पण मला क्राइम डिपार्टमेंटमध्ये काम करायचे आहे. त्यामुळे मी बी.ए.नंतर नेमके काय  करू?

भागवत वाघ
तुला क्राइम डिपार्टमेंट म्हणजे गुन्हेगारांना पकडणाऱ्या विभागात काम करायचे आहे, असे तुझ्या प्रश्नावरून वाटते. त्यामुळे तू पोलीस विभागात जाणे श्रेयस्कर ठरेल. त्यासाठी तुला चार मार्ग आहेत.
(१) थेट पोलीस भरती. ही भरती पोलीस विभागामार्फत केली जाते.
(२) पोलीस उपनिरीक्षक- या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतली जाते.
(३) पोलीस उपअधीक्षक- या पदासाठी राज्य सेवा लोकसेवा आयोगाची सामाईक परीक्षा द्यावी लागेल. राजपत्रित अधिकारी पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेच्या अंतर्गत मुख्य परीक्षा आणि मुलाखत यावर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. पोलीस उपअधीक्षक पदांची उपलब्धता, गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि उमेदवारांनी दर्शवलेला सेवेचा पसंतीक्रम या बाबींचा विचार करून अंतिम निवड केली जाते.
(४) संघ लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा परीक्षेद्वारे भारतीय पोलीस सेवेसाठी निवड होऊ  शकते. या चार प्रकारे गुन्हेगारांना पकडणाऱ्या पोलीस यंत्रणेत वेगवेगळ्या दर्जाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)
First Published on October 12, 2017 12:42 am
Web Title: career advice career guidance career tips

एमपीएससी मंत्र : इंग्रजीच्या अभ्यासाचे नियोजन आज आपण इंग्रजी या विषयाच्या अभ्यासासाठी कशी तयारी करायची, ते पाहूयात.

एमपीएससी मंत्र : इंग्रजीच्या अभ्यासाचे नियोजन

आज आपण इंग्रजी या विषयाच्या अभ्यासासाठी कशी तयारी करायची, ते पाहूयात.

वसुंधरा भोपळे | Updated: October 11, 2017 2:27 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेखात आपण सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा या तीनही परीक्षांसाठी  मराठी व्याकरण या विषयाच्या अभ्यासाची रणनीती पाहिली. आज आपण इंग्रजी या विषयाच्या अभ्यासासाठी कशी तयारी करायची, ते पाहूयात.
*  अभ्यासक्रम – इंग्रजी हा विभाग अभ्यासाला घेताना सर्वप्रथम आपण आयोगाने नमूद केलेला अभ्यासक्रम पाहिला तर त्यामध्ये  Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and Phrases,  Comprehension of Passages  या घटकांचा समावेश होतो.
*  प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण –  इंग्रजीच्या अभ्यासाची सुरुवातसुद्धा प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि प्रश्नांची अभ्यासक्रमाशी योग्य सांगड घालूनच करावी लागेल. यावरून आपल्याला कोणत्या उपघटकावर अधिक भर द्यावा लागेल, कोणत्या घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा लागेल तसेच कोणत्या घटकांचे पाठांतर करावे लागेल याचा अंदाज काढता येतो. पेपर एकमध्ये इंग्रजी या विषयावर एकूण १०० पैकी ४० प्रश्न विचारले जातात.
*  व्याकरण (Grammar)
या विभागांतर्गत विचारले जाणारे प्रश्न फारसे अवघड नसतात; परंतु थोडेसे फिरवून विचारले जातात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी प्रश्न लक्षपूर्वक वाचून विचारपूर्वक उत्तरे निवडली पाहिजेत. यामध्ये  Spotting Error, Fill in the blanks, Jumbled Sentences, Synonyms, Antonyms, Spellings/Detecting Mis-Spelt words, Sentence Improvement या घटकांवर अधिकाधिक प्रश्न विचारले जातात. Active and Passive Sentences, parts of speech  या घटकांवर देखील काही प्रश्न विचारले जातात.

Basic Grammar वर जर प्रभुत्व असेल तर या विभागातील प्रश्न सोडविणे फारसे कठीण जात नाही.  Sentence Formation च्या पद्धती, उत्तम Reading Ability व योग्य Vocabulary (शब्दसंग्रह) यांच्या माध्यमातून या घटकांवर प्रभुत्व मिळविता येऊ शकते.
त्याचबरोबर पुढील काही मूलभूत तंत्रे विकसित केल्यास परीक्षाभिमुख अभ्यास करणे नक्कीच सुकर होऊ शकते. यापैकी काही महत्त्वाच्या घटकांसाठी पुढे काही तंत्रे दिली आहेत त्यांचा उपयोग करावा.
*  Spotting Error and Sentence Improvement : या घटकावर साधारणपणे ४ ते ५ प्रश्न विचारले जातात. या मध्ये  Grammatical Error शोधायचा असतो. यासाठी सर्व प्रथम पूर्ण वाक्य नीट काळजीपूर्वक वाचावे. बऱ्याच वेळा या टप्प्यावरच आपल्याला समजतो, परंतु वाक्य काळजीपूर्वक वाचूनही जर चूक सापडली नाही तर Subject-Verb Agreement योग्य आहे का ते पाहावे, यानंतरही तुम्ही उत्तराबाबत साशंक असाल तर वाक्याचा प्रत्येक भाग स्वतंत्रपणे अभ्यासून अंतिम उत्तर शोधावे.
*  Fill in the blanks, Sentence Structure : या घटकावर साधारणपणे ५ ते ७ प्रश्न विचारले जातात. यासाठी सर्व प्रथम पूर्ण वाक्य नीट काळजीपूर्वक वाचावे व पर्यायी उत्तरांमधून योग्य तो शब्द गाळलेल्या जागी बसविण्याचा प्रयत्न करावा. यासाठी काही पर्याय  करून योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येते. परंतु अंतिम उत्तर निवडण्यापूर्वी रिकामी जागा भरून वाक्याला योग्य अर्थ प्राप्त होतो का आणि ते वाक्य वाचताना व्याकरणदृष्टय़ा योग्य आहे का ते पहावे.
* Synonyms and Antonyms: या घटकावर साधारणपणे २ ते ३ प्रश्न विचारले जातात. दररोज किमान १० नवे इंग्रजी शब्द आत्मसात करावेत आणि त्यांचा अर्थ समजून घेऊन वाक्यात उपयोग करावा. यासाठी काही, युक्त्या वापरता येऊ शकतील. पाठांतर आणि त्याचा दैनंदिन जीवनातील वापर हा या घटकावर प्रभुत्व मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे.
*   Use of Idioms and Phrases : या घटकावर साधारणपणे ३ ते ५ प्रश्न विचारले जातात. यासाठी Idioms and Phrases चा एकत्र संग्रह करून त्यांचे पाठांतर आणि वाक्यात उपयोग करण्याचा भरपूर सराव करावा.
*  Active and Passive Sentences and Tenses: या घटकावर साधारणपणे ५ ते ७ प्रश्न विचारले जातात. यासाठी Active Voice, Passive Voice यांची उदाहरणे त्यांचे परिवर्तन वाक्यांचे काळ परिवर्तन त्यासाठी असणारे मूलभूत व्याकरणाचे नियम अभ्यासून अधिकाधिक सराव केल्यास हा घटक नक्कीच उत्तम गुण प्राप्त करून देतो.
*   Parts of speech : या घटकावर साधारणपणे ५ ते ७ प्रश्न विचारले जातात. यामध्ये nouns, pronouns, adjectives, verbs, adverbs, prepositions, conjunctions and interjections या प्रमुख आठ  Parts of speech आणि त्यांच्या प्रकारांवर प्रश्न विचारले जातात.
*   Comprehension of Passages
या विभागावर साधारणपणे ५ प्रश्न विचारले जातात. या विभागातील प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आकलनक्षमता सुधारली पाहिजे तसेच भरपूर वाचन आणि सराव यावर भर देणे अपेक्षित आहे.
एकूणच विद्यार्थी मित्रहो, या परीक्षांमध्ये इंग्रजी विषयाची तयारी करण्यासाठी भरपूर पाठांतर, योग्य तो परीक्षभिमुख सराव आणि सराव चाचण्यांच्या माध्यमातून तुम्ही अपेक्षित यश निश्चितच मिळवू शकता. या अभ्यासासाठी  ‘High School English Grammar and Composition’ हे  Wren and Martin यांचे पुस्तक वापरता येईल.
First Published on October 11, 2017 2:27 am
Web Title: important guidance for mpsc exam preparation 2

यूपीएससीची तयारी : शासनकारभार आणि सुशासन आपल्याला नागरिकांची सनद व सार्वजनिक सेवा प्रदान करणाऱ्या यंत्रणेविषयी मूलभूत माहिती हवी.

यूपीएससीची तयारी : शासनकारभार आणि सुशासन

आपल्याला नागरिकांची सनद व सार्वजनिक सेवा प्रदान करणाऱ्या यंत्रणेविषयी मूलभूत माहिती हवी.

प्रवीण चौगुले | Updated: October 10, 2017 5:34 AM
प्रतिनिधिक छायाचित्र
प्रस्तुत लेखामध्ये आपण शासन कारभार आणि सुशासन तसेच नागरी सेवांची लोकशाहीतील भूमिका या अभ्यासघटकांविषयी चर्चा करू या. १९९० च्या दशकामध्ये कारभारप्रक्रिया/सुशासन (Good governance) या संकल्पनेचा उदय झाला. तोपर्यंत शासन-प्रशासनप्रक्रिया ही केवळ शासनाची एकाधिकारशाही मानली जाई. पण कारभारप्रक्रियेच्या प्रसारामुळे खासगी क्षेत्रानेही यात आपला सहभाग नोंदवला. परिणामी ‘गव्हर्नन्स’ ही संकल्पना प्रशासन व व्यवस्थापन यांना सामावून घेणारी ठरली. म्हणजे ‘गव्हर्नन्स’ या संज्ञेत शासन खासगी क्षेत्र, बिगर शासकीय क्षेत्र व नागरी समाज यांचा अंतर्भाव करण्यात आला. या संकल्पनेच्या उदयामागे
सोव्हिएत रशियाचे पतन, विकास प्रशासनास आलेले अपयश व तिसऱ्या जगातील राष्ट्रांमध्ये निर्माण झालेला परकीय चलन पेच ही कारणे सांगता येतील किंवा उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण या प्रक्रियेचा परिपाक म्हणून चांगली कारभारप्रक्रिया या संकल्पनेचा उदय झाला असे म्हणता येईल.
सार्वजनिक क्षेत्र व्यवस्थापन, शासनाचे उत्तरदायित्व, विकासाचे कायदेशीर प्रारूप, माहिती व पारदर्शकता या चार घटकांचा जागतिक बँकप्रणीत ‘गव्हर्नन्स’च्या संकल्पनेत विचार होतो. ‘गव्हर्नन्स’ ही मूल्यतटस्थ प्रक्रिया असून ‘गुड गव्हर्नन्स’ म्हणजे गुणात्मक, मूल्यात्मक प्रक्रिया होय. आर्थिक उदारीकरण विकेंद्रीकरण, लोकसहभाग, मानवी हक्क, कायद्याचे अधिराज्य, मुक्त प्रसारमाध्यमे, पारदर्शकता, कार्यक्षमता, परिणामकारकता, धोरणात्मक नियोजन इ. घटकांचा सुशासनामध्ये समावेश होतो. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला शासनातील पारदíशता, उत्तरदायित्व, सहभाग, परिणामकारकता वाढविण्यासाठी सरकारने केलेले उपाय अभ्यासावे. यामध्ये माहितीचा अधिकार (RTI), नागरिकांची सनद, लोकसेवा हमी कायदा, व्हिसल ब्लोअर्स कायदा इ. अंतर्भाव होतो. या उपायांची परिणामकारकता, कमजोरी उदा. फळक शी संबंधित प्रकरणे निकाली काढणे, माहिती आयुक्तांची रखडलेली नियुक्ती, फळक कार्यकर्त्यांची सुरक्षा, माहिती आयुक्तांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यामध्ये दिरंगाई इ. बाबी पाहणे सयुक्तिक ठरेल.

सुशासनाच्या संकल्पनेमध्ये नागरिक मध्यवर्ती आहेत. नागरिककेंद्री प्रशासनामध्ये नागरिकांचा आवाज शासनप्रक्रियेमध्ये उमटला जाणे आवश्यक मानले जाते. नागरिकांची सनद हे एक असे साधन आहे की ज्याद्वारे संघटना पारदर्शक, जबाबदार व नागरिकांशी सुसंवादी बनते. संघटनेने आपल्या सेवा पुरविण्याच्या आदर्शाशी संबंधित केलेल्या वचनबद्धतेची यादी असते. २०१३ च्या मुख्य परीक्षेमध्ये नागरिकांच्या सनदीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. ‘सार्वजनिक सेवा प्रदान करणाऱ्या संघटनांनी नागरिकांची सनद तयार केली पण दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता व नागरिकांच्या समाधानाच्या स्तरामध्ये अनुकूल सुधारणा झाली नाही.’ विश्लेषण करा.
यामध्ये आपल्याला नागरिकांची सनद व सार्वजनिक सेवा प्रदान करणाऱ्या यंत्रणेविषयी मूलभूत माहिती हवी. यानंतर याविषयीच्या चालू घडामोडी जर आपणास अवगत असतील तर या प्रश्नाचे उत्तर प्रभावी होईल. सुमार दर्जाचे आरेखन आणि आशय बहुतांश संघटनांना सनदेचा मसुदा अर्थपूर्ण करता आला नाही, लोकजागृतीचा अभाव, सनद अद्ययावत केली जात नाही, सनद तयार करताना उपभोक्ता आणि एनजीओंशी सल्लामसलत केली जात नाही व बदलांना विरोध या विविध त्रुटी बेंगलोर येथील लोकव्यवहार केंद्राने नागरिकांच्या सनदेचे पुनरावलोकन करून २००७ मध्ये आपल्या अहवालामध्ये नमूद केल्या. उपभोक्त्यांना सनदेप्रमाणे मिळावी व त्यांचे समाधान व्हावे याकरिता नागरिकांची सनद ही व्यूहनीती म्हणून नि:पक्षपातीपणे, जाणीवपूर्वक आणि बांधिलकीतत्त्वाने निर्माण केली व अंमलबजावणी केली तर ‘सुशासना’कडे वाटचाल होईल.
सुशासनाप्रमाणेच माहिती तंत्रज्ञान हा शब्दही लोकप्रशासनामध्ये परवलीचा बनला आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या लोकप्रशासनामध्ये झालेल्या उपयोजनातून ई-प्रशासन (E-Governance) ही संज्ञा निर्माण झाली. विकास प्रकल्प, करभरणा, नागरी सुविधा, तक्रार दाखल करणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, बदली यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. थोडक्यात माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दैनंदिन प्रशासन चालविणे म्हणजे ई-शासन (E-Governance) होय. ई-शासनाचे वर्गीकरण विविध प्रारूपांमध्ये केले जाते. उदा. शासन ते नागरिक (G2C), नागरिक ते शासन (C2G), शासन ते शासन (G2G), शासन ते उद्योग (G2B).
सार्वजनिक सेवा पुरविण्यासाठी अनेक घटकराज्यांनी ई-शासनाचे उपक्रम राबवले. उदा. कर्नाटक-भूमी; आंध्र प्रदेश-ई-सेवा. भारतामध्ये माहिती-तंत्रज्ञानाचा प्रशासनामध्ये वापर करण्यास पुरेशी आधारभूत संरचना, जाणीव जागृतीचा अभाव आदी मर्यादा येतात.
नागरी सेवांची भूमिका या अभ्यासघटकाचे नागरीसेवेने शासनातील स्थर्य राखण्यामध्ये पार पाडलेली भूमिका, विकासात्मक भूमिका, नियामकाची भूमिका आदींच्या अनुषंगाने अध्ययन करावे लागेल. राजकीय कार्यकारी प्रमुख व सनदी सेवक यातील संबंध, जबाबदाऱ्या पार पाडताना अंतर्गत व बाह्य़ दबाव यांचेही आकलन करून घ्यावे. ‘केडर बेस्ड नागरी सेवा हे भारतातील मंदगती बदलांचे कारण आहे का? टीकात्मक परीक्षण करा.’ हा प्रश्न २०१४ च्या मुख्य परीक्षेमध्ये आला होता. केडर बेस्ड नागरी सेवा हे देशातील मंदगती बदलामागे असणाऱ्या कारणांपैकी एक कारण आहे. यामध्ये महत्त्वाची पदे केडर बेस्ड अधिकाऱ्यांकडून कायम राखली जातात. यामध्ये एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये नेमणुकीस मर्यादा येत असल्याने इतर विभागातील प्रतिभावान अधिकाऱ्यांच्या ज्ञानाचा प्रशासनास फायदा होत नाही. या पद्धतीतील कमजोरी, बलस्थाने नमूद करावीत व त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना सुचवल्यास उत्तर परिपूर्ण होईल. पारंपरिक लोकशाही संरचना व संस्कृतीमुळे भारतातील सामाजिक आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत बाधा आणली आहे. भाष्य करा. हा नोकरशाहीच्या भूमिकेशी आणि जबाबदारीशी संबंधित प्रश्न २०१६ ला विचारण्यात आला.
या अभ्यासघटकाच्या मूलभूत आकलनाकरिता गव्हर्नन्स इन इंडिया – एम. लक्ष्मीकांत हा ग्रंथ उपयुक्त आहे. याशिवाय ई-गव्हर्नन्सविषयक बाबी जाणून घेण्यासाठी ई-गव्हर्नन्स – कन्सेप्ट आणि सिग्नीफिकन्स हे इग्नु (IGNOU) चे अभ्याससाहित्य वापरावे. याबरोबरच प्रशासकीय सुधारणा आयोगाचा १२ वा अहवाल ‘सिटीझन सेंट्रीक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ व १३ वा अहवाल ‘प्रमोटिंग ई-गव्हर्नन्स’चे वाचणे फायदेशीर ठरेल. योजना व कुरूक्षेत्र या नियतकालिकांमध्ये सुशासन, ई-गव्हर्नन्स, नागरी सेवा इ. विषयी येणारे विशेष लेख, केस स्टडी पाहाव्यात. पी.आय.बी. व संबंधित मंत्रालयांची संकेतस्थळेही शासनाची धोरणे, कार्यक्रम, प्रकल्प व नवीन पुढाकार याबाबतची माहिती घेण्यास उपयुक्त ठरतात.
First Published on October 10, 2017 5:34 am
Web Title: important guidance for upsc exam preparation 2

पुढची पायरी : रजा कशी घेऊ? अनेक प्रकारच्या रजा उपलब्ध असतात. मुख्य प्रकार म्हणजे नियोजित रजा व अनियोजित रजा.

पुढची पायरी : रजा कशी घेऊ?

अनेक प्रकारच्या रजा उपलब्ध असतात. मुख्य प्रकार म्हणजे नियोजित रजा व अनियोजित रजा.

डॉ. जयंत पानसे | Updated: October 7, 2017 2:31 AM

नोकरी नवीन असताना रजा घेणं किंवा मागणं हा मोठा संवेदनशील विषय असतो. कारण रजा घेणारी व्यक्ती म्हणजे काम टाळणारी व्यक्ती असं एक सरसकट समीकरण आपल्याकडे रुढ झालेलं आहे. पण कंपनीने मंजूर केलेल्या रजा योग्य नियोजन करून घेण्यात काहीच चुकीचे नाही. त्यांचे नियोजन मात्र उत्तम हवे.
नोकरीच्या पहिल्या वर्षांत आपण खूप सावध असतो. आपली प्रत्येक कृती वरिष्ठांकडून, सहकाऱ्यांकडून लक्षपूर्वक बघितली जाते व त्याचे मूल्यमापनही होते अशी जाणीव सारखी होत राहते. चांगले वागून व उत्तम काम करून संस्थेचा एक जबाबदार कर्मचारी व्हायचा आपलाही प्रयत्न चालू असतो. अशा वेळी वरिष्ठांकडे जाऊन रजा मागणे अवघडल्यासारखे वाटते. रजा घेणे हे आपल्या अकार्यक्षमतेचे मोजमाप तर होणार नाही ना, अशी भीती वाटत रहाते. पण जर काही अपरिहार्य कारण असेल तर रजा घेणे आवश्यकच ठरते. कामकाजाच्या दृष्टीने रजा घेणे म्हणजे तुमच्यावर सोपविलेल्या कामात खंड पडणे. वरिष्ठ याच बाबीचा विचार प्रथम करतात. कारण त्यांच्या दृष्टीने एखादा कर्मचारी रजेवर गेला तरी कामकाज अखंडित चालू राहणे आवश्यकच असते.
अनेक प्रकारच्या रजा उपलब्ध असतात. मुख्य प्रकार म्हणजे नियोजित रजा व अनियोजित रजा. नियोजित रजांमध्ये मुख्यत: अर्जित रजा (Earned leave) चा समावेश होतो. कायद्याप्रमाणे किंवा प्रत्येक संस्थेच्या रजा नियमावलीप्रमाणे हजर असलेल्या दिवसांच्या प्रमाणात ही रजा मिळते व एका वर्षांत न घेतल्यास, पुढील वर्षी पण जमा होते. अर्जित रजा घेताना वरिष्ठांची पूर्व संमती अत्यावश्यक असते. कायद्याप्रमाणे स्त्री कर्मचाऱ्यांसाठी प्रसूतीसाठी रजा व काही संस्थामध्ये मासिक ऋतुचक्रासाठी चार दिवसांची नियोजित रजाही मिळते. अलीकडे काही सहिष्णू विचारसरणीच्या संस्थांमध्ये स्त्रियांबरोबर पुरुषांनादेखील वडिलांची जबाबदारी उचलण्यासाठी प्रसूतीनंतर काही दिवसांची रजा मिळते. अनियोजित रजेमध्ये नैमित्तिक किंवा प्रासंगिक रजा व आजारपणाच्या रजेचा समावेश होतो. अशा रजा किती असाव्यात हे प्रत्येक संस्थेच्या रजा नियमावलीप्रमाणे ठरते. अनियोजित रजा घेतानासुद्धा वरिष्ठांची पूर्वसंमती घेणे किंवा त्यांना वेळीच सूचित करणे महत्त्वाचे आहे.
रजेचा तिसरा प्रकार देखील आहे आणि तो म्हणजे चक्क दांडी मारणे! म्हणजेच कुठलीही पूर्वसंमती न घेता, पूर्वसूचना न देता रजा घेणे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत अशी मारलेली ‘दांडी’ क्षम्य ठरू शकते; परंतु  दांडी मारण्याची कारणे जर वरिष्ठांना पटली नाहीत किंवा अशा दांडय़ा मारण्याचा आपला इतिहास असेल तर ही दांडी आपल्याला महागात पडू शकते. अशी रजा बिनपगारी करणे, तुमच्या गोपनीय अहवालात तशी नोंद करणे, तुम्हाला लेखी ताकीद देणे किंवा चक्क नोकरीवरून काढून टाकणे, अशा अनेक नकारात्मक गोष्टी होऊ  शकतात.
रजेचे नियोजन हा नोकरीमधील अतिशय संवेदनशील विषय आहे. पण तो यशस्वीरीत्या हाताळल्यास रजेचे फायदे तर मिळतातच व तुमची कार्यालयातील विश्वासार्हतासुद्धा वाढते.
कुठल्याही प्रकारची रजा घेताना पुढील पथ्ये पाळा
  • सर्वात प्रथम आपल्या हातातील कामांना पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज घ्या.
  • रजेच्या काळात तुमचे काम अखंडित राहण्यासाठी कुठला सहकारी मदत करू शकेल ते ओळखून त्याला अनौपचारिकरीत्या मदत करावयाची विनंती करा.
  • तुमचे काम दीर्घ मुदतीचे व प्रकल्प पद्धतीचे असेल तर रजेवर जाण्याआधी जास्त वेळ काम करून ते कमीत कमी अंशत: पूर्ण करावयाचा प्रयत्न करा.
  • रजेच्या काळात उर्वरित काम घरून (work from home) अथवा तुम्ही जेथे जाणार तेथून आंतरजालकाच्या माध्यमातून करता येईल का याचा तपास करा.
  • आता तुमचे वैयक्तिक काम (घरगुती, सहलीला / समारंभास / रुग्णालयात उपचारासाठी जाणे, इ.) किती दिवसांचे असेल त्याप्रमाणे रजेसाठी अर्ज करा.
  • नैमित्तिक किंवा रुग्णालयातील उपचारांसाठी लागणाऱ्या रजेचेसुद्धा नियोजन करता येते.
  • वरिष्ठांशी बोलताना रजेच्या काळात काम अखंडित चालू ठेवण्यासाठी तुम्ही तयार केलेल्या विकल्पांची चर्चा करा व काम बाधित होणार नाही आणि झाल्यासच अतिशय अल्प प्रमाणावर होईल असे त्यांना पटवून द्या.
  • तुम्हाला घ्याव्या लागणाऱ्या रजेच्या काळातील कामाची व्यवस्था झाल्यामुळे तुमची रजा मंजूर होण्याची शक्यता वाढेल.
  • रजेवर असताना शक्य झाल्यास एखाद्या वेळेस वरिष्ठांना व सहकाऱ्यांना फोन करून कामाची
चौकशी करा.
अनियोजित रजा काही आकस्मिक कामामुळे घ्यावी लागणार असे दिसताच प्रथम वरिष्ठांना फोन करून परिस्थितीची कल्पना द्या व पुरेशी पूर्वसूचना न देता आल्याबद्दल खंत व दिलगिरी व्यक्त करा. सहकाऱ्यांनाही फोन करून रजेची कल्पना द्या व मदतीची विनंती करा.
dr.jayant.panse@gmail.com
First Published on October 7, 2017 2:31 am
Web Title: office leave issue how to take leave

Saturday, September 9, 2017

नोकरीची संधी उमेदवाराचा जन्म दि. २ जुल १९९३ ते १ जानेवारी १९९९ दरम्यानचा असावा.

नोकरीची संधी

उमेदवाराचा जन्म दि. २ जुल १९९३ ते १ जानेवारी १९९९ दरम्यानचा असावा.

सुहास पाटील | Updated: August 17, 2017 3:57 AM
0
Shares
भारतीय नौसेनेत इंजिनीअर्सना एक्झिक्युटिव्ह/टेक्निकल ब्रँचमध्ये अधिकारी होण्यासाठी जून, २०१८ पासून सुरू होणाऱ्या कोस्रेससाठी प्रवेश.
एक्झिक्युटिव्ह ब्रँच.
(अ) जनरल सíव्हस/हैड्रोग्राफी कॅडर,
(ब) एनएआयसी.
टेक्निकल ब्रँच – (क) इंजिनीअरिंग ब्रँच (जनरल सíव्हस), (ड) इलेक्ट्रिकल ब्रँच (जनरल सíव्हस), (ई) नेव्हल आíकटेक्चर.
पात्रता – जनरल सíव्हस/हैड्रोग्राफी कॅडर – कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी.
इतर पदांसाठी – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स टेलि कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/मेटॅलर्जी/ केमिकल/कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/सिव्हिल/नेव्हल आíकटेक्चर/मरिन इ. विषयांतील अभियांत्रिकी पदवी. अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. पदवीला किमान सरासरी ६०% गुण आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. २ जुल १९९३ ते १ जानेवारी १९९९ दरम्यानचा असावा.
उंची – पुरुष – किमान १५७ सें.मी., महिला – १५२ सें.मी. एकापेक्षा जास्त ब्रँच/कॅडरसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्जात आपला पसंतिक्रम द्यावा.
निवड पद्धती – उमेदवारांना सíव्हस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीसाठी गुणवत्ता आणि पसंतिक्रमानुसार निवडले जाईल. एसएसबी मुलाखत नोव्हेंबर, २०१७ ते मार्च, २०job opportunities१८ दरम्यान बंगलोर/भोपाळ/कोइम्बतूर/विशाखापट्टणम् येथे घेतली जाईल ज्याची सूचना उमेदवारांनी दिलेल्या ई-मेलवर किंवा एसएमएसद्वारे दिली जाईल. मुलाखतीसाठी जाण्या-येण्याचे एसी ३ टायरचे रेल्वे भाडे दिले जाईल.
ट्रेिनग – निवडलेल्या उमेदवारांना सब-लेफ्टनंट पदावर नेव्हल ओरिएंटेशन कोर्स (२२/४४ आठवडे कालावधी) साठी नेव्हल अ‍ॅकॅडमी इझिमाला, केरळ येथे पाठविले जाईल. ट्रेिनगदरम्यान पूर्ण वेतन/भत्ते दिले जातील. दरमहा वेतन रु. ७१,६४०/- अधिक इतर भत्ते. ऑनलाइन अर्ज www.joinindiannavy.gov.in वर दि. २५ ऑगस्ट २०१७ पर्यंत आवश्यक प्रमाणपत्रांसह (स्कॅन करून अ‍ॅटॅच करावीत.) करावेत.
इंटेलिजन्स ब्युरो (गृहमंत्रालय, भारत सरकार)मध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-२/ एक्झिक्युटिव्हच्या एकूण १,३०० पदांची भरती.
(यूआर – ९५१, इमाव – १८४, अजा – १०९, अज – ५६) माजी सनिकांसाठी १०% जागा राखीव.
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा – दि. २९ सप्टेंबर २०१७ रोजी १८ ते २७ वष्रे (इमाव – ३० वष्रे, अजा/अज – ३२ वष्रे, परित्यक्ता/विधवा महिलांसाठी ३५ वष्रे, अजा/अजच्या अशा महिलांसाठी ४० वष्रे).
लेखी परीक्षा – टायर-१ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी १०० गुणांसाठी – वेळ ६० मिनिटे. (अ) जनरल अवेअरनेस, (ब) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड, (क) लॉजिकल/अ‍ॅनालिटिकल अ‍ॅबिलिटी, (ड) इंग्लिश लँग्वेज. टायर-२ – वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) स्वरूपाची (अ) निबंध लेखन (३० गुण), (ब) इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आणि एस्से रायटिंग (२० गुण).
एकूण ५० गुण, वेळ ६० मिनिटे.
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – मुंबई आणि नागपूर.
परीक्षा शुल्क – रु. १००/- (महिला/अजा/अज यांना फी माफ). ऑनलाइन अर्ज www.mha.nic.in या संकेतस्थळावर दि. २ सप्टेंबर २०१७, २३.५९ वाजेपर्यंत करावेत.
First Published on August 17, 2017 3:57 am

एमपीएससी मंत्र : शिक्षण प्रसारासाठी राज्य मुक्त विद्यालय शासनाच्या शिक्षण व रोजगाराच्या उपलब्ध असणाऱ्या संधीसाठीही या परीक्षांनी पात्रता मिळेल.

एमपीएससी मंत्र : शिक्षण प्रसारासाठी राज्य मुक्त विद्यालय

शासनाच्या शिक्षण व रोजगाराच्या उपलब्ध असणाऱ्या संधीसाठीही या परीक्षांनी पात्रता मिळेल.

फारूक नाईकवाडे | Updated: August 16, 2017 2:58 AM
1K
Shares

प्रतिनिधिक छायाचित्र

मानव संसाधन विकासासाठी शिक्षण ही एक महत्त्वाची पायरी आहे. एमपीएससीच्या प्रश्नांचे विश्लेषण केले असता या घटकाशी संबंधित चालू घडामोडींबाबत विश्लेषणात्मक आणि बहुविध अंगानी प्रश्न विचारण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे याबाबत नेमका व मुद्देसूद अभ्यास आवश्यक ठरतो. त्या दृष्टीने राज्य मुक्त विद्यालयाबाबत आवश्यक मुद्दे येथे देण्यात येत आहेत.
केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून National Institute for Open Schooling NIOS  ही स्वतंत्र संस्था सन १९८९ मध्ये स्थापन करण्यात आली आहे. ठकडर ची केंद्रे भारत, नेपाळ व मध्यपूर्वेतील देशांमध्ये आहेत. ठकडर च्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरावरील मुक्त विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय जुलै २०१७ मध्ये घेण्यात आला आहे. हे राज्य मुक्त विद्यालय मंडळ राज्यमंडळाचा एक भाग म्हणून स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय योजनेत प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा यांचा समावेश असेल. शासनाच्या शिक्षण व रोजगाराच्या उपलब्ध असणाऱ्या संधीसाठीही या परीक्षांनी पात्रता मिळेल.
 मुक्त विद्यालयाची उद्दिष्टय़े :
* औपचारिक शिक्षणाला पूरक आणि समांतर अशी शिक्षण पद्धती सुरू करणे.
* शालेय शिक्षणातील गळती आणि अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी करणे.
* शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रौढ व्यक्ती, गृहिणी, कामगार या सर्वाना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे.
* जीवनाला उपयुक्त असे व्यवसायाभिमुख शिक्षण उपलब्ध करून देणे.
*  सुशिक्षित आणि जागरूक नागरिक बनविणे.
* स्थानिक स्तरावर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.
* दिव्यांग विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.
 मुक्त विद्यालयासाठी प्रवेश पात्रता/ विषय योजना-
अ)प्राथमिक स्तर – इयत्ता पाचवी.
उमेदवाराचे वय १० वर्षे पूर्ण असावे.
प्रथम, द्वितीय व तृतीय भाषा, परिसर अभ्यास, गणित हे पाच विषय.
ब) उच्च प्राथमिक स्तर – इयत्ता आठवी
१)उमेदवाराचे वय १३ वर्षे पूर्ण असावे.
२)दोन भाषा विषय आणि सामाजिक शास्त्र, विज्ञान, गणित, National Skill Qualification Framework (NSQF) व्यवसाय / कौशल्य विकास विषय यातील ३ असे ५ विषय.
३)दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष विषयांची तरतूद.
क) माध्यमिक स्तर – इयत्ता दहावी
१) नोंदणी करताना उमेदवाराचे वय १५ वर्षे पूर्ण असावे.
२) उमेदवार किमान पाचवी उत्तीर्ण व किमान दोन वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
३) दोन अनिवार्य भाषा विषय, शालेय वैकल्पिक विषय तसेच पूर्व व्यावसायिक विषय यांपकी ३ असे एकूण ५ विषय.
ड) उच्च माध्यमिक स्तर – बारावी
१) उमेदवारांचे वय १७ वर्षे पूर्ण असावे.
२) उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाची इ. १०वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
३) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाव्यतिरिक्त अन्य परीक्षा मंडळाची इ. १० वी उत्तीर्ण असल्यास किमान दोन वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
४) दोन अनिवार्य भाषा विषय आणि कला/वाणिज्य/विज्ञान शाखेपकी कोणत्याही एका शाखेचे कोणतेही ३ विषय असे ५ विषय.
इतर महत्त्वाच्या तरतुदी
* योजनेमध्ये नोंदणीसाठी कमाल वयाची अट नाही.
* महाराष्ट्र राज्य मुक्तशाळेचे माध्यम मराठी, िहदी, इंग्रजी व उर्दू राहील.
* सर्व स्तरावरील सर्व विषय १०० गुणांसाठी असतील व यामध्ये लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन या दोन्हीचा समावेश असेल.
* सर्व विषयांची परीक्षा एकाच वेळी देण्याचे बंधन असणार नाही. पाच वर्षांत एकूण नऊ परीक्षांना हव्या त्या विषयांची परीक्षा देता येईल.
* दरवर्षी एप्रिल व नोव्हेंबर असे वर्षांतून दोन वेळा परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.
* अभ्यासक्रमातील विविध विषयांसाठी अंतर्गत मूल्यमापन स्वाध्याय पुस्तिका सोडवणे आवश्यक राहील.
मुक्त विद्यालयाची वैशिष्टय़े
* सोयीनुसार अध्ययनाची सवलत.
* अभ्यासक्रमाची लवचीकता.
* व्यावसायिक विषयांची उपलब्धता.
* संचित मूल्यांकनाची व्यवस्था.
* सर्वासाठी शिक्षणाची व्यवस्था.
* दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था.
फारूक नाईकवाडे
First Published on August 16, 2017 2:58 am
Web Title: useful mpsc exam preparation tips