Wednesday, December 7, 2016

एमपीएससी मंत्र : विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा – अभ्यासाचे नियोजन

या परीक्षांसाठी आयोगाने ठरवून दिलेला निश्चित अभ्यासस्रोत नसल्यामुळे या परीक्षा अवघड ठरतात,

विद्यार्थी मित्रांनो गेल्या लेखात आपण विक्रीकर निरीक्षक परीक्षेचे स्वरूप आणि प्रश्नपत्रिका विश्लेषणाची प्राथमिक माहिती पाहिली. आज आपण अभ्यासाचे नियोजन करताना पार कराव्या लागणाऱ्या टप्प्यांची सविस्तर माहिती घेऊयात.
car02
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे या परीक्षांचे वेगळेपण. पदवीपर्यंत दिल्या गेलेल्या शाळा-कॉलेजांतील परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये प्रामुख्याने खालील फरक दिसून येतो.
या परीक्षांसाठी आयोगाने ठरवून दिलेला निश्चित अभ्यासस्रोत नसल्यामुळे या परीक्षा अवघड ठरतात, परंतु आयोगाच्या अपेक्षा जाणून घेऊन जर योग्य रणनीती अमलात आणली तर या अवघड वाटेवरचा प्रवास नक्कीच पूर्ण करता येतो. आयोग विद्यार्थ्यांशी फक्त तीनच माध्यमांतून संवाद साधतो.
१.   अभ्यासक्रम
२.   प्रश्नपत्रिका
३.   निकाल
आयोगाने या तीन माध्यमांतून जे संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहेत त्यांचा योग्य अन्वयार्थ ज्याला लावता येतो तो या स्पर्धा परीक्षांची बाजी मारून जातो. म्हणूनच विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम आपण या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहूयात.
’   पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम :-
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इ.
५. अर्थव्यवस्था :-
अ) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी
ब) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी
६. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशात्र (झुऑलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजीन).
७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित –
प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि अभ्यासक्रमाशी सांगड या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी २०१३ सालापासून अर्थात परीक्षेचे स्वरूप बदललेल्या सालापासून आत्तापर्यंत STI, PSI U Assistant  (साहाय्यक कक्ष अधिकारी) या पदांसाठी झालेल्या सर्व पूर्वपरीक्षांच्या प्रश्नपत्रिका समोर ठेवून अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते टिपून ठेवले पाहिजे. (STI, PSI U व साहाय्यक कक्ष अधिकारी या तिन्ही पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्वपरीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम समानच असल्यामुळे गेल्या तीन वर्षांतील या सर्वच प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास विद्यार्थ्यांना आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे सुकर होऊ शकते) या प्रकारचे विश्लेषण केल्यानंतर आपल्याला अभ्यासक्रमातील कोणत्या घटकावर अधिक भर द्यायचा आणि कोणत्या घटकावर कमी भर द्यायचा याचा अंदाज येऊ शकतो आणि आपली अभ्यासाची रणनीती निश्चित करता येते.
*   अभ्यासक्रमाची तीन गटांत विभागणी
प्रत्यक्षात अभ्यासाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांनी विषयानुरूप अभ्यासक्रमातील मुद्दय़ांची तीन विभागांत विभागणी करावी.
अ) विभाग १- यामध्ये त्या विषयामधील ज्या ज्या उपघटकांवर आयोगाने आत्तापर्यंत प्रश्न विचारले आहेत त्या सर्व घटकांचा समावेश करणे. उदा.  इतिहास या विभागांतर्गत २०१६ साली विचारलेला प्रश्न – परमहंस सभेची पुढीलपकी कोणती उद्दिष्टे होती? हा प्रश्न ‘परमहंस सभेच्या उद्दिष्टांवर’ असल्यामुळे ‘परमहंस सभा’ हा इतिहास या घटकातील विभाग १ अंतर्गत येणारा घटक होय.
ब) विभाग २ – परमहंस सभेप्रमाणे इतर सामाजिक संस्था ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात समाजसुधारणेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.        उदा. सत्यशोधक समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज, इ. त्यांची उद्दिष्टय़े, स्थापना, स्थापनाकार, इ.
क) विभाग ३- वरील दोन विभागांमध्ये समाविष्ट न झालेले अभ्यासक्रमाचे मुद्दे या विभागामध्ये समाविष्ट करावेत. वरीलप्रमाणे अभ्यासक्रमाची विभागणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना नक्की कोणत्या मुद्दय़ावर कितपत भर द्यावा आणि त्या मुद्दय़ावर प्रश्न कसा येऊ शकेल याचा अंदाज येऊ शकतो. सर्वसाधारणपणे पहिल्या दोन विभागांतील घटकांवर ७० ते ७५ टक्के प्रश्न येतात आणि उर्वरित प्रश्न हे तिसऱ्या विभागावरील असतात, त्यामुळे अभ्यास करताना पहिल्या दोन विभागांतील घटकांवर अधिक भर द्यावा आणि त्या घटकांतील सर्व आयामांची चोख उजळणी करावी.
निकालाचे विश्लेषण केल्यास आपल्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे पूर्वपरीक्षा असो वा मुख्य परीक्षा असो तुम्ही ५० टक्क्यांपर्यंत जरी पोहोचू शकलात तर तुम्हाला पद मिळण्याची शाश्वती नक्कीच असते. त्यामुळे योग्य अभ्यासघटकांची निवड, त्यांची अभ्यासक्रमाशी योग्य सांगड आणि निवडलेल्या घटकांचा सारासार अभ्यास व उजळणी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासस्रोतांबद्दल आपण पुढील लेखांत चर्चा करूयात.
वसुंधरा भोपळे

Tuesday, December 6, 2016

यूपीएससीची तयारी : युरोपीय संघ आणि ब्रेक्झिट

यूपीएससीची तयारी : युरोपीय संघ आणि ब्रेक्झिटयूपीएससीची तयारी : युरोपीय संघ आणि ब्रेक्झिट

यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २मध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासघटकाचाही समावेश होतो

यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २मध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासघटकाचाही समावेश होतो. त्याअंतर्गत आपण काही समकालीन मुद्दे अभ्यासणार आहोत.
युरोपीय संघातून (EU) बाहेर पडण्यासाठी २३ जून २०१६ला ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात आले. या सार्वमतामध्ये ब्रेक्झिट समर्थकांना ५२% मते मिळाल्याने ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडणार हे नक्की झाले. या पाश्र्वभूमीवर ब्रेक्झिटचा ब्रिटन व युरोपीय संघावर होणारा परिणाम याविषयी प्रस्तुत लेखामध्ये ऊहापोह करणार आहोत. सर्वप्रथम युरोपीय संघाची पाश्र्वभूमी थोडक्यात अभ्यासणे उचित ठरेल. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपियन देशांनी आपापसात आíथक आणि राजकीय एकीकरण करण्यासाठी युरोपियन संघाची स्थापना केली. १९५७ सालच्या ‘रोम करारा’च्या पाश्र्वभूमीवर ग्रेट ब्रिटन युरोपियन समुदायात सामील झाला. या समूहात राहावे की नाही, याबाबत १९७५ साली घेण्यात आलेल्या सार्वमतात ब्रिटिश जनतेने युरोपियन समुदायात राहण्याचा निर्णय घेतला. १९९३ च्या मॅश्ट्रीच (Mastricht Treaty) कराराच्या माध्यमातून युरोपियन सेंट्रल बँक व युरो ही चलनव्यवस्था निर्माण केली. ब्रिटन युरोपियन समुदायाचा सभासद असूनही युरो चलनव्यवस्थेत आणि युरोपियन व्हिसा व्यवस्थेत सहभागी झालेला नव्हता.
युरोपियन संघामध्ये २८ देशांचा समावेश आहे. युरोपियन संघाच्या घटनेतील ‘लिस्बन करार’ २००७ मधील कलम ५० नुसार या संघातील कोणताही देश बाहेर पडू शकतो. २००९ पासून हे कलम अमलात आलेले आहे. युरो चलन व व्हिसा व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतर युरोपीय ऐक्य अधिक मजबूत होऊन जागतिक राजकारणात एकात्म युरोपची निर्मिती जागतिक राजकारण बहुध्रुवी व स्थिर बनण्यास हातभार लावेल असा कयास होता. मागील काही वर्षांपासून युरो गटामध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. ब्रेक्झिटनंतर ही परिस्थिती अधिकच गंभीर होईल.
सामूहिक हिताला अनुकूल भूमिका घेण्याच्या युरोपीय संघाच्या कार्यपद्धतीमुळे ब्रिटिश कंपन्यांचे व्यापारी अडथळे दूर झाले. बाजारपेठांच्या विस्तारामुळे सुलभ बनलेल्या स्थलांतर प्रकियेतून स्वस्त आणि कुशल मनुष्यबळाचा पुरवठा सर्वच सदस्य राष्ट्रांना होऊ शकला. गेल्या चाळीस वर्षांपासून युरोपियन संघात सहभागी असलेल्या ग्रेट ब्रिटनमध्ये विविध कारणांमुळे युरोपीय संघाबाबत नाराजी आढळून येत होती. यामध्ये युरोपीय संघाची कार्यपद्धती, ब्रिटनचे सार्वभौमत्व, आशिया-आफ्रिका-आखाती देशांमधून युरोपमध्ये स्थलांतर, बेरोजगारी आणि आíथक संकट, इस्लामिक दहशतवादाची शक्यता, इ. कारणांचा समावेश आहे.
पुरेशा प्रमाणात प्रातिनिधिक नसलेल्या युरोपियन आयोगाकडून ब्रिटनच्या भवितव्याबद्दलचे निर्णय घेतले जात असल्याने ब्रिटनमध्ये जनमत संघटित होऊ लागले. युरोपियन संघाच्या राजकीय चौकटीतून निर्माण झालेल्या व्यापारी र्निबधामुळे ब्रिटनला भारत व चीनसारख्या देशांशी स्वतंत्र व्यापारी संबंध प्रस्थापित करता येत नाहीत, अशी भावना ब्रिटनमध्ये पसरल्याने ब्रिटन-युरोपीय संघ संबंधावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येते. युरोपीय संघाचा सदस्य या नात्याने ब्रिटन जे शुल्क युरोपीय संघात जमा करते, त्या प्रमाणात ब्रिटनला लाभ होत नसल्याची भावनाही निर्माण झाली.
अल कायदा, तालिबान आणि आयसिस यांसारख्या दहशतवादी संघटना युरोपमध्ये विस्तारत आहेत. यामुळे ब्रिटनबरोबरच इतर युरोपीय देशांमध्ये असंतोष पसरला आहे. हा असंतोष ब्रिटिश राष्ट्रवादाच्या चौकटीत व्यक्त केला जात आहे, असे मानले जाते. यातून विभागीय पातळीवरील महासंघाचा विचार मागे पडत आहे.
उपरोल्लिखित पाश्र्वभूमीवर आणि राजकीय अपरिहार्यतेतून ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी युरोपीय संघातून बाहेर पडण्याबाबत सार्वमत घेण्याचे आश्वासन ब्रिटिश नागरिकांना दिले. त्यानुसार पार पडलेल्या सार्वमतामध्ये ५२% नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केले. यामध्ये सर्वसाधारणपणे उत्तर आर्यलड आणि स्कॉटलंड हे प्रांत युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या कल्पनेला विरोध करताना दिसतात. ब्रेक्झिटमुळे विसाव्या शतकातील आíथक एकीकरणाच्या सिद्धांताला धक्का बसल्याचे मानले जाते.
ब्रेक्झिटच्या निर्णयामुळे ब्रिटनमधील स्कॉटलंड आणि उत्तर आर्यलड या प्रांतांमध्ये ब्रिटनमधून बाहेर पडत युरोपीय संघाबरोबर राहण्याची मागणी पुढे येत आहे. असे झाल्यास ग्रेट ब्रिटनच्या ऐक्याबाबत गंभीर प्रश्नचिन्हे उपस्थित होतील. इंग्लंडपाठोपाठ फ्रान्स व नेदरलँड यांसारखे तुल्यबळ आणि ग्रीससारखे कमकुवत देश युरोपीय संघातून बाहेर पडल्यास या संघटनेवर जर्मनीचे प्रभुत्व निर्माण होऊ शकते. तसेच ब्रेक्झिटच्या माध्यमातून युरोपियन संघाचा युरोपवरील प्रभाव कमी झाल्यास – विशेषत: पूर्व युरोपवर रशियाचा प्रभाव वाढू शकतो. ब्रेक्झिटमुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय हितसंबंध यांना महत्त्व देण्यातून वंशवाद व राष्ट्रवाद या संकल्पना वाढीस लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच सर्व युरोपीय देश नाटोच्या माध्यमातून ‘इस्लामिक स्टेट’ (कर) शी लढा देत आहेत. ब्रेक्झिटमुळे ही लढाई कमकुवत होण्याचा संभव आहे.
इंग्लंडमधील कंपन्यांना युरोपीय समुदायातील अन्य राष्ट्रांबरोबर केलेले करार नव्याने करावे लागतील. या प्रक्रियेत नव्या अटी, शर्ती, कर, पुनर्वसन, नागरिकत्व, स्थलांतर, गुंतवणूक या संदर्भातील सवलतीतील बदल, इ. घटकांमध्ये फेरबदल होणार आहेत. युरोपीय संघाच्या संयुक्त बाजारपेठेतून बाहेर पडल्यास ब्रिटनला प्रादेशिक ऐक्याचे लाभ यापुढे प्राप्त होणार नाहीत. परिणामी, इतर युरोपीय देश ब्रिटनच्या मालावर आणि कंपन्यांवर विविध अटी, नियम, शर्ती लागू करतील. ब्रेक्झिटच्या निर्णयामुळे इतर जागतिक संघटनांच्या स्पध्रेमध्ये युरोपियन संघाचा प्रभाव कमी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
युरोपियन संघातून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे ब्रिटनवर काही प्रतिकूल परिणाम होणार असले तरी काही अनुकूल परिणाम होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. युरोपियन संघातून बाहेर पडूनही नॉर्वे, लिंचोन्शियन आणि आइसलँड या देशांसह युरोपियन इकॉनॉमिक एरियामध्ये सहभागी झाल्यास ब्रिटनला सिंगल मार्केटचे लाभ प्राप्त होऊ शकतात. युरोपीय संघाव्यतिरिक्त अन्य देशांशी मुक्त व्यापारी संबंध प्रस्थापित करता येतात. तसेच आपल्या अर्थव्यवस्थेची फेररचना करत एक नवे स्वतंत्र औद्योगिक धोरण विकसित करता येईल. युरोपियन समुदायाचे स्थलांतर, नागरिकत्व, व्हिसा, रोजगार, करप्रणाली या संदर्भातील नियम लागू होणार नसल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या दहशतवादाच्या समस्येचा मुकाबलाही समर्थपणे करता येईल.
‘ब्रेक्झिट’ या घटनेला विविध पलू असल्याने प्रचलित कुठलाही आíथक सिद्धांत त्याच्या परिणामांचे मूल्यमापन करण्यास असमर्थ आहे. या घटनेचे परिणाम दीर्घकाळ राहतील, तसेच ब्रिटनपुरतेच मर्यादित न राहता युरोपियन समुदायातील इतर देश व जगातील इतर देशांवर याचा दूरगामी परिणाम होईल अशा शक्यता वर्तविली जात आहे.

Monday, December 5, 2016

New Arrival Books- Date -22th Oct.2016.



New Arrival Books   Date:- 22/10/2016.
Sr.No.
Title
Author
Publisher
Acc. No.
1
An Introduction to many valued and fuzzy logic
Merrie Bergmann
Cambridge University Press
32721
2.
Multidimensiunal Hyper bolic partial differential equations.
S. B. Gavange.
Clarendon Oxford
32722
3.
Discovering the life span
Robert S. Feldman
Pearson
32793 to 32797
4.
Mann mein hai vishwas
(M)
Vishwas Nangare Pital
Rajhans Pub.
32798 to 32799
5.
Wadildhari manse (M)
Shanta Shelke
Suresh Agency
32810 to 32819
6.
Napas mulanchi gosta (M)
Arun Shevle
Ruturanga
32800 to 32809
7.
Dr. Jekyll & Mr. Hyde
R. L. Stevenson
Rupa
32890 to 32895
8.
Mahasamar Panipat
Mrs. Soumantini Khopkar
Simant Publisher
32896 to 32900
9
Indian Sociologist
B. K. Nagala
Rawat Publisher
32901 to 32902
10
Smart Cities: through secured governance a pathway to accetarated growth
Dr.P. Sekhar
Micro Media Marketing Pvt.Ltd.
33145
11
Leadership Wisdom: from the Monk who sold his Ferrari
Robin Sharma
Jaico
33144
12
Zalach pahije (M)
Pralhad Keshav Atre
Dimpal Pub.
33025
13
Aatreya subhashite (M)
Pralhad Keshav Atre
Dimpal Pub.
33024
14
Changuna (M)
Pralhad Keshav Atre
Dimpal Pub.
33027
15
Fakta Hayku (M)
Shirish Pai
Dimpal Pub.
33026
16
Aadhunik Hindi Kavya pravaha (H)
S.Dr. Bramheshwar Nath Ray
Shileja Pub.
33281 to 33285
17
Hindi hasya vanga (H)
Editor- Dr. Sudhakar Mishra
Saahityayan
33286 to 33290