Sunday, June 8, 2014

परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व शास्त्रज्ञ करतील, मंत्री नाही!

देश-विदेश

परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व शास्त्रज्ञ करतील, मंत्री नाही!

Published: Sunday, June 8, 2014
वैज्ञानिक परिषदेसाठी परदेशात जाणाऱ्या सर्व शिष्टमंडळांचे नेतृत्व यापुढे नामवंत शास्त्रज्ञ करतील, मंत्री करणार नाहीत, असे शनिवारी केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
परदेशातील कोणत्याही परिषदेसाठी शिष्टमंडळाचे नेतृत्व यापुढे मंत्री करणार नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले. गेल्या ६० वर्षांत बहुधा प्रथमच असा निर्णय घेण्यात आला असावा, असेही ते म्हणाले.
अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याने शास्त्रज्ञांना अधिक संधी उपलब्ध होतील आणि देशातील त्याचप्रमाणे परदेशातील शास्त्रज्ञांशी विचारांची अधिक देवाणघेवाण करता येईल आणि त्याचा लाभ देशालाच होईल, असेही जितेद्र सिंग म्हणाले.
देशात अथवा परदेशात होणाऱ्या सर्व परिषदांमध्ये शास्त्रज्ञांचा आणि तंत्रज्ञांचा योग्य सहभाग हा राजकीय नेत्यांपेक्षा अधिक हवा, अशी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची धारणा असल्याचे सिंग म्हणाले.याच महिन्यांत सॅण्टियागो आणि बोस्टन येथे दोन परिषदा होणार आहेत. यासाठी मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जाणार असल्याचे आपल्याला सांगण्यात आले. मात्र आपण ही प्रथा आता बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ठिकाणी पाठविण्यात येणाऱ्या शास्त्रज्ञांची लवकरच निवड केली जाणार आहे, असेही सिंग यांनी सांगितले.

Thursday, June 5, 2014

विद्यापीठाचे यंदापासून नवे सूत्र '७५:२५'!

विद्यापीठाचे यंदापासून नवे सूत्र '७५:२५'!

Published: Thursday, June 5, 2014
विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचा वाढता विरोध पाहता मुंबई विद्यापीठाने यंदापासून आपल्या परीक्षांच्या निकालांबाबतचे सूत्र बदलले आहे. दोन वर्षांपासून विद्यापीठात चालू असलेले '६०:४०' हे सूत्र आता बदलण्यात आले असून आता '७५:२५' या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठीचे हे सूत्र यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून लागू करण्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने बुधवारी काढले.
दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाने विविध शाखांसाठी श्रेयांक आणि श्रेणी पद्धत लागू केली होती. त्यासाठी ६०:४०चे सूत्रही अवलंबण्यात आले होते. त्यानुसार ६० गूण लेखी परीक्षा आणि महाविद्यालयीन स्तरावर अंतर्गत मूल्यांकनासाठी ४० गूण, असे विभाजन करण्यात आले होते. मात्र या पद्धतीला विद्यार्थी आणि प्राध्यापक या दोन्ही स्तरांतून खूप विरोध झाला होता. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षांपासून '७५:२५' हे सूत्र लागू करण्यात येईल, असे परिपत्रक विद्यापीठाने काढले आहे. या नव्या पद्धतीनुसार ७५ गुणांची परीक्षा विद्यापीठामार्फत घेण्यात येणार आहे, तर अंतर्गत मूल्यांकनाच्या २५ गुणांपैकी २० गुण लेखी परीक्षा आणि ५ गुण विद्यार्थ्यांची उपस्थिती, असे विभाजन करण्यात आले आहे.

Wednesday, June 4, 2014

आता प्रवेशाचा पेच.. ; बारावीच्या निकालाचा उच्चांक

आता प्रवेशाचा पेच.. ; बारावीच्या निकालाचा उच्चांक

Published: Tuesday, June 3, 2014
बारावीच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार अंतर्गत मूल्यमापनाचे २० टक्के गुण संबंधित शाळांच्या हाती दिल्याचा परिणाम म्हणून यंदा बारावीच्या परीक्षेत राज्यात तब्बल ९०.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासातील हा निकाल उच्चांकी ठरला. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्र्तीर्णतेचा टक्का वाढल्याने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची चुरस तीव्र होणार आहे. ही स्पर्धा वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक असेल. तर कला आणि विज्ञान शाखेसाठी काही ठराविक महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठी झुंज द्यावी लागेल.
यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. यंदा राज्यभरातून ११ लाख ९८ हजार ८५९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातील १० लाख ७९ हजार ३३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ५ लाख १००० विद्यार्थिनी असून, परीक्षेला बसलेल्या मुलींपैकी ९३.५० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर उत्तीर्ण झालेल्या मुलांची संख्या ८७.२३ टक्के आहे. राज्य मंडळाच्या नऊ विभागांमध्ये यंदा कोकण विभागाने आघाडी घेतली असून, या विभागाचा निकाल ९४.८५ टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (८८.३० टक्के) लागला. निकालाचा टक्का वाढल्याने महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीचा पेच निर्माण होणार आहे. काही महाविद्यालयांमध्ये तर कनिष्ठ महाविद्यालयांच्या तुलनेत पदवीच्या जागा कमी असल्याने त्त्याच महाविद्यालतील बारावीच्या विद्यार्थ्यांना सामावून घेतानाच नाकीनऊ येणार आहे. दरवर्षी बारावीला काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने महाविद्यालयांना पदवीकरिता बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा उपलब्ध करून देता येतात. परंतु, यंदा बारावी निकालाचा टक्का सर्वच शाखांमध्ये चांगलाच वधारल्याने पदवीच्या प्रवेशांसाठीची चुरस अटीतटीची असेल. काही महाविद्यालयांना तर यंदा बाहेरच्या विद्यार्थ्यांकरिता जागा उपलब्ध करून देणेही शक्य होणार नाही.   
गुणपत्रिका १० जूनला मिळणार
'विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणपत्रिकेचे वाटप १० जून रोजी दुपारी तीन वाजता संबंधित शाळांमधून केले जाणार आहे. संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट काढता येते.
'संकेतस्थळावरील या गुणपत्रकाच्या आधारे डीएड किंवा इतर प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सुरू करता येईल. मात्र, अधिकृत गुणपत्रिकेच्या आधारेच नंतर प्रवेश अंतिम केले जातील.

'आयडॉल'साठी २५ जूनपासून प्रवेशप्रक्रिया; मुंबई विद्यापीठातर्फे वेळापत्रक जाहीर

'आयडॉल'साठी २५ जूनपासून प्रवेशप्रक्रिया; मुंबई विद्यापीठातर्फे वेळापत्रक जाहीर

Published: Wednesday, June 4, 2014
मुंबई विद्यापीठातील दूर व मुक्त शिक्षण संस्थेने (आयडॉल) सन २०१४-१५साठीच्या प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया www.mu.ac.in/idol  किंवा www.mahaonline.gov.in  या संकेतस्थळांवरून होणार आहे. प्रवेश २५ जून ते ३१ जुलै या कालावधीत होणार आहे. यानंतर १६ ऑगस्टपर्यंत १५० रुपये विलंब शुल्कासह प्रवेश घेता येणार आहे.
'आयडॉल'मधील अभ्यासक्रम
* बीए - इतिहास, राजकीय विज्ञान, सोशिओलॉजी, अर्थशास्त्र, शिक्षण, मानसशास्त्र, वाणिज्य, ग्रामीण विकास, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या विषयांमध्ये उपलब्ध.
* बीकॉम - अकाऊंट आणि मॅनेजमेंट
* बीएस्सी - माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, नॉटिकल तंत्रज्ञान या विषयांमध्ये
* एमए - इतिहास, राजकारण, सोशिओलॉजी, अर्थशास्त्र, इंग्रजी, हिंदी, शिक्षण, मराठी आणि गुजराती या विषयांमध्ये उपलब्ध.
* एमकॉम - अकाऊंट आणि मॅनेजमेंट
* एम/एमएसस्सी - गणित
* एमएसस्सी - माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान या विषयांमध्ये.
* एमसीए - या अभ्यासक्रमासाठी २२ जून रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. त्यातील गुणांनुसार प्रवेश दिले जातील.
* पीजीडीएफएम - वित्त व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदविका.
* पीजडीओआरएम - ऑपरेशन्स रिसर्च फॉर मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर पदविका.

आयडॉल'साठी २५ जूनपासून प्रवेशप्रक्रिया; मुंबई विद्यापीठातर्फे वेळापत्रक जाहीर 

Thursday, January 10, 2013

New Arrival Text books- Foundation Course-II


NEW ARRIVAL
Text Books- S.Y.B.A./B.Com./B.Sc.
Foundation Course recommended by
Dr. A.V.Desai Available at Issue Counter
1) TITLE : Foundation course- II. S.Y.B.A./B.Com./B.Sc. 2012.
     AUTHOR:- Shetye, Sugandha and other's
     PUB :- Rishabh Publishing.
     BB-12451 TO BB-12470= 20 COPY.

Wednesday, January 9, 2013

NEW ARRIVAL BOOKS OF ECONOMICS


Text Books- S.Y.B.A. Macro Economics recommended by
Prof. Amita Lal Available at Issue Counter
1) TITLE : Macro economy. S.Y.B.A.(sem. IV) (paper- II). 2012.
     AUTHOR:- Deshmukh, Mahadeo Shrirang, Vibhute, Somnath S
     PUB :- Sheth Pub. Ltd.
     BB-12408 TO BB-12432= 25 COPY.
2) TITLE : Indian economy. S.Y.B.A.(sem. IV) (paper- III). 2012.
     AUTHOR:- Purkayastha, Chandra, Patil, Shubhangi and Mishra, Mahendra
     PUB : Sheth Pub. Pvt. Ltd.
     BB-12383 TO BB-12407= 25 COPY.