Monday, January 27, 2020

एमपीएससी मंत्र : राज्य कर निरीक्षक पदनिहाय पेपरची तयारी निती आयोगाची रचना, काय्रे, प्रस्तावित योजना / उद्दिष्टे यांचा आढावा घ्यायला हवा.

एमपीएससी मंत्र : राज्य कर निरीक्षक पदनिहाय पेपरची तयारी

निती आयोगाची रचना, काय्रे, प्रस्तावित योजना / उद्दिष्टे यांचा आढावा घ्यायला हवा.

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा
दुय्यम सेवा परीक्षेच्या पदनिहाय पेपरमधील सामायिक अभ्यासक्रमाच्या तयारीबाबत मागील काही लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये राज्य कर निरीक्षक पदाच्या पदनिहाय अभ्यासक्रमाच्या तयारीबाबत चर्चा करू.
*       नियोजन
*    प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षकि योजनेचा अभ्यास करताना योजनांची उद्दिष्टे, ध्येयवाक्ये, प्रतिमाने, सुरू झालेल्या विकास व कल्याणकारी योजना, राजकीय आयाम, कालावधी, ठळक निर्णय, मूल्यांकन यांचा आढावा घ्यायला हवा. निती आयोगाची रचना, काय्रे, प्रस्तावित योजना / उद्दिष्टे यांचा आढावा घ्यायला हवा.
*    सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशांक म्हणजेच रोजगार, दारिद्रय़, भूक, मानवी विकास, व्यवसाय सुलभता याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचे स्थान व राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्राचे स्थान माहीत करून घ्यावे.
*    राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण यांचा अभ्यास करताना ७३ वी व ७४ व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना सोपविलेले अधिकार माहीत करून घ्यावेत.
*    भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेखा यांचा अभ्यास करताना अर्थव्यवस्था विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्या आधारे या उपघटकाची तयारी करता येईल.
*    भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल यांचा अभ्यास करताना आर्थिक व राजकीय अशा दोन्ही आयामांचा विचार करायला हवा. म्हणजेच याबाबतची आर्थिक पार्श्वभूमी आणि याबाबतचे शासकीय पातळीवरील प्रयत्न यांचा अभ्यास करायला हवा.
*       शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास
*   ऊर्जा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर इत्यादी), दळणवळण (पोस्ट, तार व दूरसंचार), रेडिओ, टीव्ही, इंटरनेट या पायाभूत सुविधांचे आर्थिक विकास आणि सामाजिक अभिसरण यातील योगदान आणि भारतातील त्यांच्या विकास व विस्ताराचे टप्पे व त्यासाठीचे प्रयत्न यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. याबाबत ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता यांवर विशेष भर द्यायला हवा.
*    तसेच भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांमधील प्रादेशिक असमतोल, गुंतवणूक, दर्जा व इतर समस्यांचा बारकाईने अभ्यास करावा. इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे पर्याय म्हणून खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ.डी.आय., खासगीकरण या धोरणांमागची भूमिका व त्यातील तरतुदी समजून घ्याव्यात.
*    राज्य व केंद्र सरकारची वेगवेगळ्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठीची धोरणे समजून घ्यावीत तसेच याबाबत चालू घडामोडी माहीत असायला हव्यात.
*       आर्थिक सुधारणा व कायदे
*    पार्श्वभूमी, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा यांचा संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक अभ्यास आवश्यक आहे.
*    केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणांचे टप्पे व त्यांचे परिणाम यांचा आढावा घ्यायला हवा.
*   WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या आणि त्याबाबतच्या चालू घडामोडी समजून घेणे आवश्यक आहे.
*    GST,  विक्रीकर, VAT, WTO इत्यादीशी संबंधित कायदे व नियम मुळातून वाचणे जास्त व्यवहार्य आहे. यातील ठळक तरतुदी माहीत असायलाच हव्यात.
*       आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ
*    जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व काल, वाढ, रचना या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, निर्यातीतील वाढ या बाबींची आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालातून अद्ययावत करून घ्यावी.
*    भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, हळड आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंत:प्रवाह, रचना व वाढ यातील महत्त्वाचे टप्पे समजून घ्यावेत. तसेच चालू घडामोडी माहीत करून घ्याव्यात.
*    प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक (FDI) व्यापार त्याबाबतचे शासकीय धोरण समजून घ्यावे. बहुराष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था, कटा जागतिक बँक, कऊअ इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग या संस्थांचे कार्य, महत्त्वाचे नियम / ठराव, सदस्य, यातील भारताची भूमिका / योगदान समजून घ्यावे.
*      सार्वजनिक वित्त व्यवस्था
*    कर आणि करेतर महसुलाचे स्रोत,केंद्र व राज्य सार्वजनिक खर्च या संकल्पना समजणे आवश्यक आहे.
*    केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, सार्वजनिक खर्चवाढ यांची कारणे समजून घ्यावीत. सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारीत अर्थसंकल्प, वित्तीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी माहीत असायला हव्यात.
*    भारतातील केंद्र व राज्य पातळीवरील करसुधारणांचा आढावा महत्त्वाचे टप्पे, त्यांची पार्श्वभूमी, कारणे, स्वरूप, परिणाम, यशापयश या मुद्दय़ांच्या आधारे घ्यावा.
*    सार्वजनिक ऋणवाढ, रचना आणि भार, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या या बाबी विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी तयार कराव्या. त्यासाठी संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.
*    राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण या संकल्पना समजून घ्याव्यात. तूट नियंत्रणासाठीचे केंद्र, राज्य व रिझव्‍‌र्ह बँकेचे उपक्रम, केंद्र व राज्यस्तरावरील राजकोषीय सुधारणा यांचा आढावा घ्यायला हवा.
First Published on August 2, 2019 12:03 am
Web Title: preparation of state tax inspector designation paper abn 97

शब्दबोध : दिवटा आठवणीतल्या कवितांमध्ये वि. म. कुलकर्णीची ‘ज्योत’ नावाची एक सुंदर कविता आहे.

शब्दबोध : दिवटा

आठवणीतल्या कवितांमध्ये वि. म. कुलकर्णीची ‘ज्योत’ नावाची एक  सुंदर कविता आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर
आदिमानवाने जेव्हा प्रथम अग्नी निर्माण केला तेव्हाच तो इतर प्राण्यांपासून वेगळा आणि श्रेष्ठ ठरला. मात्र त्याच वेळी अग्नीमुळे मानव निसर्गापासूनही दूर झाला आणि त्याने हळूहळू निसर्गावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली.  शिकारीचे मास अग्नीवर भाजण्यापासून ते अग्नीचा प्रकाशासाठी उपयोग करण्यापर्यंत मानवाने प्रगती केली.प्राण्यांची  चरबी, वनस्पतींची तेले यांचा उपयोग करून ज्योत निर्माण केली. ज्योतीच्या प्रकाशाने रात्रीचा अंधार दूर केला. दिवटी किंवा मशाल हे त्या ज्योतीचेच रूप होय. आठवणीतल्या कवितांमध्ये वि. म. कुलकर्णीची ‘ज्योत’ नावाची एक  सुंदर कविता आहे. ज्योतीचा प्रवास दिवटी, पणती, समई, कंदील, बत्ती असा पुढे सरकत आजच्या बिजलीपर्यंत कसा झाला याचे सुरेख वर्णन कवितेत  आहे. तिची सुरुवातच
आधी होते मी दिवटी  शेतकऱ्यांची आवडती
झाले इवली मग पणती,
घराघरांतून मिणमिणती
या कडव्याने झाली आहे. थोडक्यात दिवटी म्हणजे मशाल.
पूर्वी रात्रीच्या वेळी प्रवास करायचा झाल्यास काही जण मार्ग दाखवण्यासाठी दिवटी हातात घेऊन पुढे चालत. मशाल किंवा दिवटी हातात धरून मार्ग दाखवणाऱ्या अशा व्यक्तींना मशालजी किंवा दिवटा असे म्हणत. ज्ञानेश्वरीत दहाव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,
तयां तत्त्वज्ञां चोखटां
दिवी पोतसाची सुभटा
मग मीचि होऊनी दिवटां
पुढां पुढां चाले.
याचा अर्थ ‘अर्जुना, त्या श्रेष्ठ शुद्ध प्रेमळ भक्तांकरिता तत्त्वज्ञानरूपी मशाल घेऊन मी स्वत: दिवटा होऊन त्यांच्यापुढे दिवस रात्र चालतो’. अशा तऱ्हेने श्रीकृष्ण स्वत:ला दिवटा म्हणजे मार्ग दाखवणारा, वाटाडय़ा म्हणवून घेतात. त्यानंतर मात्र दिवटा या शब्दाला जरा हलका अर्थ प्राप्त झालाय. दिवटा म्हणजे  वाया गेलेला, दुर्गुणी, वाईट  मार्गाला लागलेला असे अर्थ त्याला चिकटले आहेत. अर्थात या नव्या अर्थापेक्षा आपल्या आद्य ज्ञानेश्वरीतला अर्थ ध्यानी घेतला तर  ते दिवटेपण आपल्याला खरोखरच ज्ञानज्योतीकडे नेईल.
First Published on August 2, 2019 12:02 am
Web Title: word sence article abn 97

यूपीएससीची तयारी : भूगोल मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न ‘भारताचा भूगोल’ या घटकावर विचारले जातात.

यूपीएससीची तयारी : भूगोल मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा

मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न ‘भारताचा भूगोल’ या घटकावर विचारले जातात.

(संग्रहित छायाचित्र)

श्रीकांत जाधव
आजच्या लेखामध्ये आपण भारताचा व जगाचा भूगोल कसा अभ्यासावा याचबरोबर मागील मुख्य परीक्षांमध्ये (२०१३-२०१८पर्यंत) या घटकांवर विचरण्यात आलेल्या प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा घेणार आहोत. मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न ‘भारताचा भूगोल’ या घटकावर विचारले जातात. यामध्ये भारताची प्राकृतिक रचना, आर्थिक व सामाजिक पद्घती तसेच लोकसंख्या यासारख्या वैशिष्टय़पूर्ण पलूंवर अधिक भर असतो. याचबरोबर जगाचा भूगोल या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या तुलनेने कमी असते.
या विषयाचे स्वरूप Semi-Scientific असल्यामुळे या विषयाचा संकल्पनात्मक पाया याचबरोबर संबंधित प्रदेशाची प्राकृतिक रचना, आर्थिक व सामाजिक पद्धती तसेच लोकसंख्या इत्यादींची सखोल माहिती असणे परीक्षेच्या दृष्टीने क्रमप्राप्त ठरते. मागील लेखामध्ये आपण या विषयाच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या संदर्भग्रंथांचा आढावा घेतलेला आहे.
भूगोल या घटकावर २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७ व २०१८ च्या मुख्य परीक्षेमध्ये अनुक्रमे ७, १०, ७, ८, ८  आणि ८ प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, भूगोल या विषयामधील जवळपास सर्व घटकांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत आणि सर्वाधिक भर हा भारताच्या भूगोलावर आहे. पण बहुतांश प्रश्न प्राकृतिक आणि आर्थिक घटकांचा एकत्रित संबंध जोडून विचारण्यात आलेले आहेत. यातील अनेक प्रश्नांना विषयाच्या पारंपरिक ज्ञानासह चालू घडामोडींची पार्श्वभूमी जोडण्यात आलेली आहे, हे पुढील विश्लेषणावरून लक्षात येते.
*    २०१३च्या मुख्य परीक्षेत ‘‘दक्षिण भारतातील राज्यामध्ये नवीन साखर उद्योग स्थापन करण्याचा कल वाढत आहे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? समर्थनासह चर्चा करा,’’ हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न भारताच्या आर्थिक भूगोलाशी संबंधित आहे. पण यासाठी काही भौगोलिक कारणे महत्त्वाची ठरतात व
त्यांचा उल्लेख उत्तरामध्ये करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. साखर उद्योग स्थापन करण्यासाठी नैसर्गिकरीत्या पूरक असणारे घटक व उपलब्ध साधनसंपत्ती, सक्षम दळणवळणाचे उपलब्ध पर्याय तसेच यासाठी पूरक असणारी जमीन ज्यामध्ये ऊस हे पीक घेणे अधिक उपयुक्त ठरते, इत्यादी माहितीची चर्चा उत्तरामध्ये करणे अपेक्षित आहे.
*    २०१४ च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘‘उष्णदेशीय चक्रीवादळे ही दक्षिण चिनी समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोचे आखात यांसारख्या प्रदेशात मोठय़ा प्रमाणात मर्यादित असतात, कारण’’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न प्राकृतिक भूगोलातील हवामान घटकाशी संबंधित आहे आणि जगातील तीन भौगोलिक स्थानांशी जोडला गेलेला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित भौगोलिक स्थानांची प्राकृतिक रचना तसेच या प्रदेशातील हवामानपद्धती व याच प्रदेशामध्ये ही चक्रीवादळे इतर प्रदेशाच्या तुलनेत अधिक प्रमाणात असतात याची कारणे माहिती असणे प्रथम आवश्यक आहे. या प्रश्नांचा रोख हा उष्णप्रदेशीय चक्रीवादळे यासाठी नेमके कोणते घटक (प्राकृतिक) जबाबदार आहेत व उत्तरामध्ये फक्त यासाठीची कारणे लिहिणे अपेक्षित आहे ज्यामुळे प्रश्नाला अनुसरून असणारी सुसंगत व समर्पक माहिती उत्तरामध्ये आपण देऊ शकतो.
*    २०१५च्या मुख्य परीक्षेत ‘‘मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही देशातील तीन महानगरे आहेत, पण यामध्ये दिल्लीतील वायुप्रदूषण हे मुंबई व कोलकाता या  महानगरांच्या तुलनेत अधिक असून एक गंभीर समस्या आहे व हे असे का आहे.’’ हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचा कल हवामान व पर्यावरणसंबंधी अनुषंगाने होता, पण याचबरोबर या शहरांची भौगोलिक स्थाने व यासाठी जबाबदार असलेल्या प्राकृतिक घटक, त्याचबरोबर औद्योगिकीकरण व शहरीकरण इत्यादी गोष्टींचा एकत्रित विचार करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. तसेच याच वर्षी ‘‘भारतातील स्मार्ट शहरे स्मार्ट खेडय़ाशिवाय शाश्वत होऊ शकत नाहीत,’’ या विधानाची ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा, हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी स्मार्ट शहरे आणि स्मार्ट खेडे या संकल्पनांमध्ये काय अंतर्भूत आहे याची माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शहरांचे ग्रामीण भागावरील अवलंबत्व कशा प्रकारचे आहे, जर शहरे स्मार्ट करावयाची आहेत तर स्मार्ट खेडय़ाशिवाय स्मार्ट शहरे कशी शाश्वत होऊ शकत नाहीत याचा विचार करून हा प्रश्न सोडवावा लागतो. सद्य:स्थितीत ग्रामीण व नागरी जीवनाशी संबंधित समस्या व त्याच्यासाठी उपयोजित केलेले उपाय तसेच चालू घडामोडीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी वर्तमानपत्रे, योजना व कुरुक्षेत्र तसेच पीआयबी (ढकइ) चे संकेतस्थळ यांसारख्या संदर्भाचा उपयोग होऊ शकतो.
*    २०१६च्या मुख्य परीक्षेत ‘भारतातील प्रमुख शहरांमधील पुरांची समस्या’, ‘भारतातील अंतर्गत जल वाहतूक व समस्या’ इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
*    २०१७च्या मुख्य परीक्षेत ‘‘महासागरीय क्षारतेमधील फरकाची कारणे सांगा आणि याच्या बहुआयामी परिणामांची चर्चा करा’’ हा प्रश्न विचारण्यात आला होता.
*    २०१८च्या मुख्य परीक्षेत ‘‘समुद्री परिस्थितिकीवर मृत क्षेत्रे यांच्या विस्ताराचे कोणकोणते परिणाम होतात?’’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
उपरोक्त नमूद केलेल्या मागील प्रश्नांचा एक संक्षिप्त आढावा तुम्हाला भूगोल या विषयाचा परीक्षाभिमुख पद्धतीने अभ्यास करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. पण याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रश्नाचा नेमका रोख ओळखता येणे आणि अपेक्षित असणारी माहिती उत्तरामध्ये समर्पकपणे देता आली पाहिजे. तसेच प्रत्येक प्रश्नासाठी शब्दमर्यादा दिलेली असते. याचे भान ठेवून परीक्षार्थी विद्यार्थ्यांने उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.
First Published on August 1, 2019 12:19 am
Web Title: review of geography previous question papers abn 97

एमपीएससी मंत्र : सहायक कक्ष अधिकारी पदनिहाय पेपरची तयारी ग्रामीण प्रशासनामध्ये जिल्हा ते ग्रामपंचायत अशा उतरंडीचे कोष्टक तयार करून अभ्यास करता येईल.

एमपीएससी मंत्र : सहायक कक्ष अधिकारी पदनिहाय पेपरची तयारी

ग्रामीण प्रशासनामध्ये जिल्हा ते ग्रामपंचायत अशा उतरंडीचे कोष्टक तयार करून अभ्यास करता येईल.

फारुक नाईकवाडे
दुय्यम सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील तिन्ही पदांसाठी सामायिक असलेल्या अभ्यासक्रमाच्या तयारीबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या लेखापासून पेपर दोनमधील या पदांच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानावर आधारित प्रत्येक पदासाठी वेगळ्याने विहित केलेल्या अभ्यासक्रमाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.
सहायक कक्ष अधिकारी पदासाठीची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.
*  राजकीय यंत्रणा
* यामध्ये प्रत्यक्ष प्रशासन व शासन धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा व त्यासंबंधी विविध घटकांचा समावेश होतो. महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि पुनर्रचनेचा भाग पेपर १ मधून अभ्यासावा. केंद्र व राज्य शासनाची निवड, रचना, काय्रे, अधिकार, कार्यपद्धती या बाबी तथ्यात्मक आणि संकल्पनात्मक आहेत. याबाबतच्या घटनेतील तरतुदी व्यवस्थित समजून घ्याव्यात.
* लोकसभा / राज्यसभा / विधानसभा / विधान परिषद यांची रचना, कार्यकाळ, पदाधिकारी, सदस्य संख्या, निवडणूक, लोकप्रतिनिधित्व कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी या बाबी बारकाईने अभ्यासाव्यात.
* लोकसभा / राज्यसभा / विधानसभा / विधान परिषद यांचे कामकाज, त्यांच्या समित्या, रचना, काय्रे, अधिकार, कायदा निर्मिती प्रक्रिया, अर्थसंकल्पविषयक कामकाज यांच्या बाबत घटनेतील तरतुदी व्यवस्थित समजून घ्याव्यात. त्यासाठी त्यांची कामकाज नियमावली पाहणे आवश्यक आहे.
* राज्यपालांचे अधिकार, काय्रे, नेमणूक याबाबतच्या तरतुदी समजून घ्याव्यात. महाराष्ट्राच्या राज्यपालांना असलेले विशेषाधिकार व्यवस्थित माहीत असायला हवेत.
* राज्याची विविध संचालनालये तसेच प्रशिक्षण संस्थांची स्थापना, उद्देश, त्यांचे कार्य, रचना, बोधचिन्ह / वाक्य माहीत असावेत.
* जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन
* ग्रामीण प्रशासनामध्ये जिल्हा ते ग्रामपंचायत अशा उतरंडीचे कोष्टक तयार करून अभ्यास करता येईल. यामध्ये पुन्हा महसुली व विकासात्मक व पोलीस प्रशासन वेगवेगळे लक्षात घ्यायला हवे. अधिकाऱ्यांची उतरंड व त्यांचे अधिकार, कार्य, नेमणूक, राजीनामा, पदावरून काढून टाकणे या बाबी समजून घ्यायला हव्यात.
* स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी याच प्रशासनाचा भाग आहेत. त्यांच्या निवडणुकांबाबतच्या तरतुदी, कार्यकाळ, विसर्जति करण्याचे अधिकार, राज्य निवडणूक आयोग, त्याची रचना, कार्येव अधिकार यांचा बारकाईने आढावा घ्यायला हवा.
* शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा त्यांचे प्रकार, निवडणूक, रचना, काय्रे, अधिकार, इ. बाबी व्यवस्थित समजून घेऊन अभ्यास करावा.
* त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्त्यांमधील तरतुदी, त्या अन्वये स्थापन केलेल्या समित्या, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपवलेले विषय हे मुद्दे समजून घ्यावेत.
* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी स्थापन केलेल्या समित्या / आयोग, इ.चा अभ्यास आवश्यक आहे. या समित्यांकडून करण्यात आलेल्या शिफारशी, त्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय व त्यांची अंमलबजावणी यांचा नेमका अभ्यास करायला हवा.
* न्यायमंडळ   
न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ आणि न्याय पालिकेची उतरंड याबाबतच्या घटनेतील तरतुदी माहीत करून घ्याव्यात. न्यायाधीशांच्या नेमणुका, महाभियोग, विशेषाधिकार समजून घ्यावेत.
* सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, कार्येप्राथमिक, दुय्यम अधिकारक्षेत्रे समजून घ्यावीत. सांविधानिक आदेशाचे रक्षण करण्याची न्यायमंडळाची जबाबदारी माहीत करून घ्यावी.
* दुय्यम न्यायालये, त्यातील न्यायाधीशांची नेमणूक, त्यांची अधिकारक्षेत्रे, विशेष न्यायालये याबाबत महत्त्वाच्या तरतुदी माहीत करून घ्याव्यात.
* लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका या मुद्दय़ांबाबत संकल्पनात्मक आणि अद्ययावत चालू घडामोडींच्या अनुषंगाने अभ्यास आवश्यक आहे.
*  नियोजन
*   प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करताना योजनांची उद्दिष्टे, ध्येयवाक्ये, प्रतिमाने, सुरू झालेल्या विकास व कल्याणकारी योजना, राजकीय आयाम, कालावधी, ठळक निर्णय, मूल्यांकन यांचा आढावा घ्यायला हवा. निती आयोगाची रचना, काय्रे, प्रस्तावित योजना / उद्दिष्टे यांचा आढावा घ्यायला हवा.
* सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशांक म्हणजेच रोजगार, दारिद्रय़, भूक, मानवी विकास, व्यवसाय सुलभता याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचे स्थान व राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्राचे स्थान माहीत करून घ्यावे.
*   राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण यांचा अभ्यास करताना त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना सोपविलेले अधिकार माहीत करून घ्यावेत.
*   भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेखा यांचा अभ्यास करताना अर्थव्यवस्था विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्या आधारे या उपघटकाची तयारी करता येईल.
*   भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल यांचा अभ्यास करताना आर्थिक व राजकीय अशा दोन्ही आयामांचा विचार करायला हवा. म्हणजेच याबाबतची आर्थिक पाश्र्वभूमी आणि याबाबतचे शासकीय पातळीवरील प्रयत्न यांचा अभ्यास करायला हवा.
First Published on July 31, 2019 1:22 am
Web Title: mpsc study tips mpsc exam preparation tips mpsc exam 2019 zws 70

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पदनिहाय पेपर राज्यव्यवस्था घटक दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्ये जवळपास ३०% अभ्यासक्रम हा सामायिक आहे.

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पदनिहाय पेपर राज्यव्यवस्था घटक

दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्ये जवळपास ३०% अभ्यासक्रम हा सामायिक आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा
दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्ये जवळपास ३०% अभ्यासक्रम हा सामायिक आहे. या सामायिक घटकांची तयारी एकत्रितपणे केल्यास स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी जास्त वेळ उपलब्ध होतो. तिन्ही पेपरमध्ये राज्यव्यवस्था घटक हा सामायिक असला तरी त्यातील काही भाग तिन्ही पदांसाठी आहे तर काही भाग केवळ सहायक कक्ष अधिकारी व विक्रीकर निरीक्षक या पदांसाठी आहे.
आयोगाने तिन्ही पदांसाठी पेपर दोनमध्ये विहित केलेला राज्यव्यवस्था घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे :
भारतीय राज्यघटना
(तिन्ही पदांसाठी)
घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे / ठळक वैशिष्टय़े, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे – शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.
(केवळ सहायक कक्ष अधिकारी व विक्रीकर निरीक्षक पदांसाठी)
राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची भूमिका, अधिकार व कार्य, राज्य विधि मंडळ – विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व भूमिका, विधी समित्या.
या घटकाची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.
*     भारताची राज्यघटना
*     घटना कशी तयार झाली याबाबत तयारी करताना घटना समितीची रचना, महाराष्ट्रातील सदस्य, समित्या व त्यांचे सदस्य / अध्यक्ष, समितीच्या बठका व त्यातील प्रसिद्ध चर्चा, समितीचे कार्य याबाबत अभ्यास करणे आवश्यक आहे.
*     तसेच भारतासाठी वेळोवेळी झालेली घटनेची मागणी, राज्यघटनेतील संभाव्य तत्त्वे व त्यामागील भूमिका या बाबी समजून घेणे आवश्यक आहे.
*     घटनेची प्रस्तावना, त्यामागील वेगवेगळ्या नेत्यांच्या भूमिका व प्रतिक्रिया, त्यामध्ये समाविष्ट तत्त्वे / विचार आणि प्रस्तावनेचे घटना समजून घेण्यासाठीचे महत्त्व हे मुद्देही व्यवस्थित समजून घ्यावेत.
2     मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबतची सर्व कलमे मुळातून समजून घेऊन त्यामध्ये समाविष्ट अपवादांसहित पाठच करायला हवीत. त्याबाबतच्या चालू घडामोडी व सर्वोच्च न्यायालयाचे अद्ययावत निकाल माहीत असणे आवश्यक आहे. या तरतुदींबाबत झालेल्या घटनादुरुस्त्या व महत्त्वाचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल यांचा आढावा घेणे गरजेचे आहे.
*     राज्याच्या धोरणाची सर्व नीतिनिर्देशक तत्त्वे समजून घेणे आवश्यकच आहे. मात्र शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका या मुद्दय़ांचा अभ्यासक्रमामध्ये विशेष उल्लेख केलेला असल्याने त्याबाबतची कलमे, तरतुदी व त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेले महत्त्वाचे निर्णय व केलेले कायदे समजून घ्यावेत. उदा. शिक्षण हक्क कायदा, न्यायपालिकांमधील नेमणुकांची कोलेजियम पद्धत व त्याबाबत शासन व न्यायपालिकेमधील संघर्ष इ.
*     राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे ही केंद्र व राज्य संबंध व घटनादुरुस्ती तसेच घटनात्मक पदे यांपुरती मर्यादित ठेवता येतील. मात्र चालू घडामोडींच्या अनुषंगाने त्या त्या कलमांचा महत्त्वाच्या कलमांमध्ये समावेश करणे आवश्यक आहे.
*     केंद्र व राज्य सरकारे यांच्यामध्ये प्रशासकीय, आíथक व कायदेशीर अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे; याबाबतची कलमे समजून घ्यावीत व सातव्या परिशिष्टातील विषयांची विभागणी व्यवस्थित समजून घ्यायला हवी. शक्य असेल तर केंद्र, राज्य व समवर्ती सूचीतील विषय पाठच करावेत.
*     राज्य शासन
हा भाग पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट नाही. फक्त सहायक कक्ष अधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक या पदांसाठीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे.
*     विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुका, राज्यपाल व मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची नेमणूक, कार्यकाळ, पदावरून हटविणे, राजीनामा, हक्क, कर्तव्ये या सर्व मुद्दय़ांशी संबंधित राज्यघटनेतील तरतुदी बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. विधानमंडळातील विधि समित्यांचा अभ्यास त्यांची रचना, काय्रे व अधिकार या मुद्दय़ांच्या आधारे करावा.
*     विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाजाची माहिती असायला हवी. कायदा निर्मिती प्रक्रिया तसेच विविध प्रश्न / ठराव इत्यादी कामकाजाचे महत्त्वाचे नियम माहीत असायला हवेत.
दुय्यम सेवा मुख्य परीक्षेच्या पदनिहाय पेपरमधील सामायिक अभ्यासक्रमाच्या तयारीबाबत आतापर्यंत चर्चा करण्यात आली. पुढील लेखापासून प्रत्येक पदासाठी स्वतंत्र विहित केलेल्या अभ्यासक्रमाची तयारी कशा प्रकारे करावी, याबाबत चर्चा करण्यात येईल.
First Published on July 26, 2019 12:04 am
Web Title: secondary service designation paper state governance components abn 97

यूपीएससीची तयारी : जगाचा आणि भारताचा भूगोल (विषय ओळख) प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयाचा गाभा मानला जातो. कारण याअंतर्गत पृथ्वीचा सर्वागीण अभ्यास केला जातो.

यूपीएससीची तयारी : जगाचा आणि भारताचा भूगोल (विषय ओळख)

प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयाचा गाभा मानला जातो. कारण याअंतर्गत पृथ्वीचा  सर्वागीण अभ्यास केला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. अमर जगताप, श्रीकांत जाधव
आजच्या लेखामध्ये आपण मुख्य परीक्षेच्या पेपर एकमधील जगाचा आणि भारताचा भूगोल या विषयाचे स्वरूप आणि व्याप्ती याची चर्चा करणार आहोत. या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये जगाच्या प्राकृतिक भूगोलाचे प्रमुख वैशिष्टय़, जगभरातील महत्त्वाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण (दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यासह), जगाच्या विविध (भारतासह) प्रदेशांतील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील उद्योगाच्या स्थाननिश्चितीसाठी जबाबदार असणारे घटक आणि त्यांचे स्थान, निर्णायक भौगोलिक वैशिष्टय़ांमधील बदल (जलाशये आणि हिमाच्छादने) आणि महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना / घडामोडी उदा. भूकंप, सुनामी, ज्वालामुखी सक्रियता, चक्रीवादळे इत्यादी; भौगोलिक वैशिष्टय़े, वनस्पती आणि त्यांच्या प्रजाती, या बदलाचे परिणाम इत्यादी घटक नमूद करण्यात आले आहेत. थोडक्यात याचे वर्गीकरण प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल (सामाजिक आणि आर्थिक) अशा पद्धतीने करावे लागणार आहे व याचा अभ्यास जगाचा आणि भारताचा भूगोल अशा दोन भागांमध्ये विभागून करावा लागणार आहे.
प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयाचा गाभा मानला जातो. कारण याअंतर्गत पृथ्वीचा  सर्वागीण अभ्यास केला जातो. यामध्ये शिलावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण आणि पर्यावरण इत्यादीशी संबंधित माहितीचा अभ्यास करावा लागतो. प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयातील सर्वाधिक कठीण घटक आहे. कारण हा संकल्पनात्मक बाबीशी अधिक जवळीक साधणारा आहे म्हणून या घटकाचे योग्य आकलन होण्यासाठी या घटकाशी संबंधित संकल्पनांचे योग्य आकलन असणे गरजेचे आहे. शिलावरण यामध्ये खडक, पृथ्वीचे कवच, अंतरंग, अंतरंगातील प्रक्रिया, भू-अंतर्गत व भू-बाह्य बले यांचा अभ्यास करावा लागतो. शिलावारणाचा अभ्यास करणाऱ्या विषयाला भूरूपशास्त्र म्हणतात. या विषयामध्ये भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, विविध कारकांद्वारे निर्मित भूरूपे या घटकांवर निश्चितपणे प्रश्न विचारले जातात. सद्य:स्थितीतील चालू घडामोडीचे महत्त्व पाहता उपयोजित भूरूपशास्त्रासारख्या चालू घडामोडीशी संबंधित घटकांवर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. वातावरणाचा अभ्यास हवामानशास्त्र या विषयामध्ये केला जातो. या घटकामध्ये वातावरणाचे घटक, रचना, हवेचे तापमान व दाब, वारे, मान्सून, जेट प्रवाह, वायुराशी, आवर्त, वृष्टी आणि भारताचे हवामान यांचा अभ्यास करावा लागतो. या विषयामध्ये चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, अनपेक्षित हवामानशास्त्रीय घटनांचा अभ्यास करावा लागतो. जलावरणाचा अभ्यास सागरशास्त्र या विषयामध्ये केला जातो. या घटकामध्ये सागरतळ रचना, सागरी साधनसंपत्ती, सागरजल तापमान, क्षारता, सागरजलाच्या हालचाली यांचा अभ्यास करावा लागतो. या घटकासंदर्भात चालू घडामोडीमधील सागरमाला प्रकल्प, मोत्यांची माळ रणनीती, सागरी हद्दीवरून शेजारील राष्ट्राबरोबर उद्भवणारे वाद या घटकांचा अभ्यास अत्यावशक आहे. जीवावरण घटकाचा अभ्यास जैवभूगोल या घटकामध्ये केला जातो. या घटकावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी आहे. या घटकामध्ये सजीवांचे वितरण, त्यांच्या हालचाली, त्यांच्यावर होणारा मानवी
हस्तक्षेपाचा परिणाम इत्यादी घटकांचा अभ्यास करावा लागतो. पर्यावरण घटकाचा अभ्यास पर्यावरण भूगोलमध्ये केला जातो. पर्यावरणाच्या नैसर्गिक स्थितीच्या अभ्यासामध्ये पर्यावरण परिस्थितिकी, परिसंस्था या संकल्पनांचा अभ्यास करावा. या घटकामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास हा आहे. यामध्ये सर्वात गंभीर समस्या म्हणजे हरितगृह परिणाम व जागतिक तापमानवाढ होय. त्याचप्रमाणे जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे प्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमीचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटना सविस्तर अभ्यासाव्यात. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न झाले आहेत. भारतामध्ये केंद्र सरकारने आखलेल्या योजना, कायदे यांची माहिती घ्यावी. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न उदा. क्योटो करार, पॅरिस परिषद, मॉन्ट्रियल करार, रामसार करार यांचा चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यास आवश्यक आहे.
मानवी भूगोल याअंतर्गत सामाजिक (लोकसंख्या भूगोल व वसाहत भूगोल) आणि आर्थिक भूगोल इत्यादीशी संबंधित माहिती अभ्यासावी लागते. या विषयाची उपरोक्त वर्गीकरणानुसार थोडक्यात उकल करून घेऊ या. मानवी भूगोलामध्ये मानवाच्या लोकसंख्येचा अभ्यास केला जातो.
यामध्ये लोकसंख्याशास्त्रीय घटक उदा. लोकसंख्यावृद्धी, जन्मदर वितरण, मृत्युदर, लिंग गुणोत्तर, कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, लोकसंख्या
लाभांश या घटकांचा २०११च्या जणगणनेच्या आकडेवारीनुसार अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्थलांतर, त्यांची कारणे, प्रकार, परिणाम हा घटक चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यासणे आवश्यक आहे. या घटकांत लोकसंख्याविषयक समस्या, भारताचे लोकसंख्या धोरण, चीनचे जुने लोकसंख्या धोरण व त्याचे सक्तीने अवलंबन केल्याने उद्भवलेले दुष्परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना उदा. वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा इत्यादी. वसाहत भूगोलामध्ये मानवाच्या ग्रामीण व नागरी वसाहतीचा अभ्यास केला जातो. जागतिकीकरणाची अंमलबजावणी केल्यानंतर भारतातील नागरीकरणाचा वेग वाढला आहे. परिणामी स्थलांतर मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी प्रदेशामध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी एू किंवा रें१३ ज्या योजना राबविल्या जात आहेत त्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. वसाहतीचा अभ्यास करताना वसाहतीचे प्रकार, प्रारूप, स्वरूप या घटकांवरदेखील भर देणे आवश्यक आहे.
आर्थिक भूगोलामध्ये मानवी आर्थिक प्रक्रिया व नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास केला जातो. मानवाच्या आर्थिक प्रक्रियांचा अर्थ, त्यांचे प्रकार, उदाहरणे; त्यांची विकसनशील राष्ट्रांमधील स्थिती अभ्यासली जाते. राष्ट्रातील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्रे यांमधील सद्य:स्थिती, त्याबाबतचे सरकारी धोरण, योजना यांचा चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून अभ्यास आवश्यक आहे. उदा. भारतातील प्रस्थावित दुसरी हरितक्रांती, मेक इन इंडिया योजना इत्यादी.
उपरोक्त नमूद घटकांच्या आधारे आपणाला एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करावा लागतो तेव्हा त्यास प्रादेशिक भूगोल असे संबोधले जाते. वढरउ च्या अभ्यासक्रमामध्ये जगाचा आणि भारताचा भूगोल समविष्ट आहे; वरील सर्व अभ्यासक्रमांव्यतिरिक्त भूगोल विषयामध्ये नकाशावर आधारित प्रश्न विचारले जातात. उदा. सद्य:स्थितीत घडलेली एखादी घटना, घटनेचे स्थान नकाशावर शोधावे लागते. या घटना भौगोलिक किंवा इतर विषयांशी संबंधित असतात. नकाशावर आधारित इतर प्रश्नांमध्ये पूर्णत: भौगोलिक स्वरूपाचे परंपरागत ज्ञानावर आधारित विचारले जातात.
First Published on July 25, 2019 12:14 am

शब्दबोध : घातवाफ घातवाफ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे.

शब्दबोध : घातवाफ

घातवाफ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर
कुठल्याही भाषेचे सामथ्र्य हे त्या भाषेतील शब्दसंपत्तीवर अवलंबून असते. मराठी भाषेचे सौंदर्य आणि सामथ्र्य जाणून घ्यायचे असेल तर आपल्या संतवाङ्मयाचा अभ्यास करायला हवा. ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध यांसारख्या संतसाहित्यात अनेक आशयगर्भ शब्द आपल्याला पदोपदी आढळतात. हे शब्द काळाच्या ओघात लुप्त झाले असले तरी घासूनपुसून नव्याने वापरता येणारे आहेत. घातवाफ हा असाच एक आशयगर्भ शब्द संतवाङ्मयात आपल्याला आढळतो.
घातवाफ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे. अर्थात त्यातील घात हा शब्द आघात, हत्या, वध या अर्थाने आलेला नाही. तसेच घात म्हणजे गुणाकार असाही त्याचा अर्थ नाही. हे सर्व संस्कृतमधील घात शब्दाचे अर्थ आहेत.
आज आपण ज्या शब्दाबद्दल बोलत आहोत, तो घातवाफ हा अस्सल मराठी शब्द आहे. त्यातील घात याचा अर्थ शेतीमधील पेरणी, लावणी  इत्यादीच्या कामाची किंवा ऋतुपरत्वे येणाऱ्या, पिकणाऱ्या धान्याची योग्य वेळ किंवा मोसम अथवा हंगाम असा आहे. उदाहरणार्थ पेरण्याची घात, कापण्याची घात इत्यादी. घात हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ‘या दिवसात उत्तरा व हस्त या पावसाने पेरणीस घात थोडी उशिरा आली आहे’ म्हणजे ‘यंदा पेरणीची योग्य वेळ उशिरा आली’, असा आहे.
घातवाफ हाही स्त्रीलिंगी शब्द आहे. मे महिन्याच्या अखेरीस वळीवाचा जोरदार पाऊस होतो. त्यानंतर पुन्हा कडक ऊन पडते. त्यामुळे जमिनीतून पाण्याच्या वाफा वर येतात. असा, एकदा पर्जन्यवृष्टी होऊन जमिनीतून वाफा निघत असलेला काळ हा पेरणीला अत्यंत उपयुक्त असा काळ असल्याचे मानले आहे. बीज अंकुरण्यासाठी लागणारा ओलावा आणि उबदारपणा त्या वेळी रानात असतो, असा काळ म्हणजेच घातवाफ होय.
घातवाफचा क्रियापद म्हणून वापर केल्यास सांभाळणे, जपणे, साधणे असा त्याचा अर्थ होतो. जसे,
क्षेत्र गुणे बीज अंकुरे।
ते अनंत धा वृत्ची विकार।
घातवाफ ते आदरे।
साधूनि घेतली।
घातीचे दिवस म्हणजे सुगीचे दिवस किंवा सत्तेचा, सुबत्तेचा, भरभराटीचा काळ. सध्या आपल्या मायमराठी भाषेला चांगले दिवस नाहीत. तिच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भविष्यात आपली भाषा नष्ट होईल की काय, अशी भीती अनेकजण व्यक्त करताना दिसतात. परंतु तिला उर्जितावस्था येण्यासाठी प्रयत्न करणारे मात्र त्या तुलनेत बरेच कमी आहेत. खरोखरच मराठी भाषेला असे ‘घातीचे दिवस’ यावेत असे वाटत असेल, तर आपल्या प्राचीन संतवाङ्मयाचा अभ्यास करणे अगत्याचे ठरेल.
First Published on July 25, 2019 12:11 am
Web Title: word sense article abn 97

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पदनिहाय पेपर (भूगोलाची तयारी) या सामायिक घटकांची तयारी एकत्रितपणे केल्यास स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी जास्त वेळ उपलब्ध होतो.

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पदनिहाय पेपर (भूगोलाची तयारी)

या सामायिक घटकांची तयारी एकत्रितपणे केल्यास स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी जास्त वेळ उपलब्ध होतो.

फारुक नाईकवाडे
दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्ये जवळपास ३० टक्के अभ्यासक्रम हा सामायिक आहे. या सामायिक घटकांची तयारी एकत्रितपणे केल्यास स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी जास्त वेळ उपलब्ध होतो. या लेखामध्ये सामायिक अभ्यासक्रमाच्या भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.
तिन्ही पदांसाठी पेपर दोनमध्ये विहित केलेला भूगोल घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासक्रम –
महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक  विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतर, त्याचे स्रोत आणि स्थलांतरित ठिकाणांवरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे पुनर्वसन.
या घटकाची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल –
*  महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल (रचनात्मक)
*   यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्य हवामान विभागांचा नकाशाच्या आधारे अभ्यास करणे अवश्यक आहे. प्रत्येक विभागाची भौगोलिक वैशिष्टय़े, हवामानाचे वैशिष्टय़पूर्ण घटक, त्यामुळे होणारी मृदा, पिके, इतर आर्थिक उत्पादनांमध्ये या वैशिष्टय़ांचे योगदान या बाबी समजून घ्याव्यात. महाराष्ट्राचे हवामान विभाग हे दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पश्चिम ते पूर्व अशा क्रमाने अभ्यास केल्यास मान्सून, पर्जन्याचे वितरण, तापमानातील फरक यांचा तुलनात्मक अभ्यासही शक्य होईल.
*   राज्यातील नद्यांचा अभ्यास हा नदी खोऱ्यांचा / प्रणालींचा घटक म्हणून करणे आवश्यक आहे. पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे. या प्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी. उदा. महाराष्ट्रात उत्तर ते दक्षिण पुढील क्रमाने प्रणाली आढळतात. सातपुडा पर्वत तापी पूर्णा खोरे – सातमाळा अजिंठा डोंगररांगा – गोदावरी खोरे – हरिशचंद्र बालाघाट डोंगर – भीमा नदी खोरे – शंभू महादेव डोंगर – कृष्णा खोरे.
*  नैसर्गिक संपत्ती
*   महाराष्ट्रातील महत्त्वाची वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता क्षेत्रे यांचा भौगोलिक व पर्यावरणीय वैशिष्टय़े व महत्त्व या दृष्टीने अभ्यास करावा. वनांचे आर्थिक महत्त्व समजून घ्यावे.
*   महाराष्ट्रातील खनिजांचे उत्पादन होणारी क्षेत्रे, त्यांची भूशास्त्रीय रचना, उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता, खाणींचे प्रकार या बाबी समजून घ्याव्यात.
*   भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार पुढील मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यासावेत. खडकांचा प्रकार, निर्मिती, कोठे आढळतो, भौगोलिक व वैज्ञानिक वैशिष्टय़े, रचना, आर्थिक महत्त्व.
*  राजकीय
*   प्रशासकीय विभागातील जिल्हे, त्यांची मुख्यालये व त्यांची वैशिष्टय़े, जिल्ह्य़ांची कालानुक्रमे निर्मिती, महत्त्वाची शहरे, आर्थिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे याविषयी कोष्टक मांडणी करून टिपणे काढावीत.
*   राज्यातील जिह्यांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिह्यांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी / डोंगर / नैसर्गिक भूरूपे या बाबी अभ्यासक्रमामध्ये वेगळ्याने नमूद केलेल्या नसल्या तरी त्यांचा अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.
*  लोकसंख्यात्मक भूगोल
* भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंग गुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्दय़ांच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्युदर, बाल लिंग गुणोत्तर, माता मृत्युदर, अर्भक मृत्युदर, बाल मृत्युदर यांची माहिती असायला हवी.
* वसाहतींचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व पाहायला हवेत. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वसाहत आहे हे समजून घेता आले तर उत्तम. पण माहिती नसल्यास वसाहतींचे प्रकार नीट अभ्यासले असतील तर एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी कोणत्या प्रकारे वसाहत विकसित झालेली असू शकेल याचा अंदाज नक्की बांधता येऊ शकतो. असा अंदाज बांधण्याचा सराव तयारीच्या वेळी केल्यास एकूणच या घटकाची तयारी चांगली होईल.
* स्थलांतराची कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय, इ. दृष्टींनी अभ्यास आवश्यक आहे. या बाबतीत ‘आकडेवारी’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्ययावत करून घ्यायला हवी.
* झोपडपट्टीची व्याख्या, तेथील परिस्थिती, त्यांच्या निर्मितीची कारणे यांचा आढावा घ्यायला हवा. झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यातील ठळक बाबी माहिती असाव्यात. तसेच त्या दृष्टीने अद्ययावत चालू घडामोडीही माहिती असायला हव्यात.
चालू घडामोडींमध्ये खाणी, धरणे, महत्त्वाचे प्रकल्प यांबाबत नवे निर्णय, त्यांबाबत पर्यावरणीय मुद्दे, लोकांचा विरोध / स्वीकार ही तथ्यात्मक माहिती करून घ्यावी. तसेच राज्यातील नैसर्गिक तसेच इतर गंभीर आपत्तींची अद्ययावत माहिती असायला हवी.
First Published on July 24, 2019 4:23 am
Web Title: mpsc exam 2019 mpsc exam tips mpsc exam guidance zws 70

चिनी इतिहासाचा साक्षीदार.. पेकिंग विद्यापीठ, चीन पेकिंग विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे चार किंवा सहा वर्षांच्या कालावधीचे आहेत.

चिनी इतिहासाचा साक्षीदार.. पेकिंग विद्यापीठ, चीन

पेकिंग विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे चार किंवा सहा वर्षांच्या कालावधीचे आहेत.

|| प्रथमेश आडविलकर
विद्यापीठाची ओळख – चीनमधील राष्ट्रीय स्तरावरील पहिले आणि सर्वात जुने असलेले पेकिंग विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले तिसाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. किंग साम्राज्याच्या राजवटीत या विद्यापीठाची स्थापना १८९८ साली ‘इम्पेरियल युनिव्हर्सिटी ऑफ पेकिंग’ या नावाने करण्यात आली. १९१२ साली विद्यापीठास सध्याचे नाव देण्यात आले. चीनमधील ऐतिहासिक चळवळींमध्ये या विद्यापीठाने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. पेकिंग विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ असून चीनमधील प्रतिष्ठित ‘सी-9 लीग’ या चिनी विद्यापीठांच्या संघटनेचा एक महत्त्वपूर्ण सदस्य आहे. राजधानी बीजिंगच्या पश्चिमेकडे असलेल्या हैदियान जिल्ह्य़ात पेकिंग विद्यापीठाचा ‘यान युआन’ हा मुख्य कॅम्पस वसलेला आहे. विद्यापीठामध्ये सध्या सात हजारपेक्षाही अधिक पूर्णवेळ प्राध्यापक आहेत, तर चाळीस हजारांहूनही जास्त विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेला आहे.
अभ्यासक्रम – पेकिंग विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे चार किंवा सहा वर्षांच्या कालावधीचे आहेत. विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन किंवा तीन वर्षांच्या कालावधीचे आहेत, तर येथील पीएचडी अभ्यासक्रम हे चार ते सहा वर्षांच्या कालावधीचे आहेत. याशिवाय विद्यापीठाने नॉन-डिग्री कोस्रेसचीसुद्धा रचना केलेली आहे. यामध्ये व्हिजिटिंग, रिसर्च स्कॉलर, प्रि-युनिव्हर्सिटी, को-ऑपरेटिव्ह आणि प्रत्येक विभागातील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश होतो. पेकिंग विद्यापीठामधील पदवीपासून ते पीएचडी स्तरावरील सर्व शैक्षणिक अभ्यासक्रम सहा विभागांकडून चालवले जातात. विद्यापीठात ‘सायन्सेस, इन्फॉम्रेशन अ‍ॅण्ड इंजिनीअिरग, ह्य़ुमॅनिटीज, सोशल सायन्सेस, इकोनॉमिक्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, हेल्थ सायन्स सेंटर’ हे प्रमुख सहा विभाग आहेत. या सहा प्रमुख विभागांतर्गत एकूण सत्तर इतर विभाग आणि महाविद्यालये कार्यरत आहेत. जवळपास १२९ पदवी अभ्यासक्रम, २८० पदवी अभ्यासक्रम आणि २५४ डॉक्टरल अभ्यासक्रम या सर्व महाविद्यालये आणि विभागांकडून शिस्तबद्ध रीतीने राबवले जातात. यांपकी बहुतांश अभ्यासक्रम इंग्रजी भाषेमध्ये चालवले जातात. या सर्व विभागांकडून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संगीत, इंग्रजी, मानसशास्त्र, आरोग्य संशोधन,  जैव-अभियांत्रिकी, पर्यावरण शास्त्र, भूभौतिकी, भौगोलिक शास्त्र,  धातू शास्त्र आणि अभियांत्रिकी, विमान तंत्रज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान,  बायोइंजिनीअिरग, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी,  व्यवस्थापन शास्त्र,  विद्युत अभियांत्रिकी, संगणक शास्त्र,  यंत्र अभियांत्रिकी, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, साहित्य, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र  इत्यादी विषय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध करून दिले जातात.
सुविधा – पेकिंग विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय केली गेली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राहणे अपेक्षित आहे. विद्यापीठाकडून विविध स्वरूपात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात यांसारख्या पर्यायांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त विद्यापीठाकडून हेल्थ इन्शुरन्स, हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर, करिअर सपोर्ट सेंटर, जिम, लायब्ररी, कम्युनिटीज, क्लब्स, म्युझियम, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा मदत केंद्र यांसारख्या इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या सर्व गोष्टींबद्दल विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे.
वैशिष्टय़
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चिनी सरकारने एकविसाव्या शतकात जागतिक दर्जाचे विद्यापीठ तयार करण्याच्या हेतूने उच्चशिक्षणाचा प्रचार करण्यासाठी पेकिंग विद्यापीठाला शासकीय विषय पत्रिकेच्या शीर्षस्थानी ठेवले. म्हणूनच सन २००० मध्ये बीजिंग मेडिकल युनिव्हर्सिटी पेकिंग विद्यापीठामध्ये विलीन झाल्यानंतर पेकिंग विद्यापीठाचे शैक्षणिक संरचना आणखी मजबूत झालेली आहे. विद्यापीठातील अध्यापकवर्ग उत्कृष्ट असून संशोधन क्षेत्रात त्यांनी स्वत:ला जागतिक स्तरावर सिद्ध केलेले आहे. पेकिंग विद्यापीठाच्या दाव्यानुसार विद्यापीठाला या गोष्टीचा नेहमीच अभिमान राहिलेला आहे. येथील एकूण प्राध्यापकांपकी ४८ प्राध्यापक ‘चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या प्रथितयश संस्थेचे सदस्य आहेत. याशिवाय नऊ प्राध्यापक ‘चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीयिरग’ तर इतर २१ प्राध्यापक ‘थर्ड वर्ल्ड अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ या नामवंत संस्थांचे सदस्य आहेत.

Monday, January 20, 2020

प्रश्नवेध एमपीएससी : महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा संयुक्त पेपर सराव प्रश्न संयुक्त पेपर सराव प्रश्न

प्रश्नवेध एमपीएससी : महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा संयुक्त पेपर सराव प्रश्न

संयुक्त पेपर सराव प्रश्न


(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा
*     प्रश्न १) राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कोणत्या तारखेस साजरा करण्यात येतो?
१) २५ फेब्रुवारी
२) २७ एप्रिल
३) २९ जून
४) ३१ ऑगस्ट
*     प्रश्न ) भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री होण्याचा मान कोणास प्राप्त आहे?
१) इंदिरा गांधी
२) सुषमा स्वराज
३) निर्मला सीतारामन
४) वरीलपैकी नाही
*      प्रश्न ३) पुढीलपैकी कोणत्या उत्पादनास जून २०१९मध्ये भौगोलिक निर्देशांक देण्यात आला आहे?
१) सांगलीची हळद
२) कोल्हापुरी चप्पल
३) सोलापुरी चादर
४) सातारी कंदी पेढे
*      प्रश्न ४)पुढीलपैकी कोणत्या राज्याने महिला कामगारांना रात्रपाळीमध्ये काम करण्याची मुभा देण्यासाठी फॅक्टरी कायदा १९४८मध्ये दुरुस्ती केली आहे?
१) केरळ
२) गोवा
३) कर्नाटक
४) महाराष्ट्र
*     प्रश्न ५) त्रिनेत्र हे काय आहे?
१) भारतीय वायुदलाचे टेहळणी विमान
२) इस्रोने प्रक्षेपित केलेला टेहळणी उपग्रह
३) शासकीय कार्यलयातील सी.सी.टीव्ही प्रणाली
४) भारतीय रेल्वेसाठी रडार प्रणाली
*      प्रश्न ६. हिमा दास व सरबज्योत सिंग हे खेळाडू अनुक्रमे —– व ——- या खेळांशी संबंधित आहेत.
१) अ‍ॅथलेटिक्स व नेमबाजी
२) बॉक्सिंग व तिरंदाजी
३) क्रिकेट व हॉकी
४) बॅडमिंटन व ज्युडो
*      प्रश्न ७) पुढीलपैकी कोणात्या राज्याने सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जून २०१९मध्ये सुरू केली आहे?
१) पश्चिम बंगाल
२) छत्तीसगढ
३) राजस्थान
४) महाराष्ट्र
*      प्रश्न ८) सतराव्या लोकसभेचे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
१) सुमित्रा महाजन
२) ओम बिर्ला
३) व्यंकय्या नायडू
४) मीरा कुमार
*      प्रश्न ९. आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
१) १ मे
२) २७ जून
३) १५ ऑगस्ट
४) १० डिसेंबर
उत्तरे व स्पष्टीकरणे
*      प्र. क्र. १ – योग्य पर्याय क्र.(३) भारतीय पंचवार्षकि योजनांमध्ये महत्त्वाचे प्रतिमान तयार करणारे सांख्यिकी तज्ज्ञ पी. सी. महलनोबीस यांचा जन्म दिवस २९ जून हा दरवर्षी  राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महालनोबीस यांनी भारतीय सांख्यिकी प्रणाली स्थापन केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस मानला जातो. तसेच सांख्यिकी शाखेचे दैनंदिन महत्त्व अधोरेखित करण्यासाठीही तो साजरा करण्यात येतो.
*      प्र.क्र. २ – योग्य पर्याय क्र.(१) भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय अर्थमंत्री इंदिरा गांधी होत्या. मात्र पंतप्रधान असताना त्यांनी हा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वतंत्रपणे सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला आहेत.
*      प्र.क्र.३ – योग्य पर्याय क्र.(२) कोल्हापुरी चप्पल. या पादत्राणांचे उत्पादन बाराव्या शतकापासून सुरू असून छत्रपती शाहू महाराजांनी २०व्या शतकामध्ये त्याला प्रोत्साहन दिले आणि हे उत्पादन एक वैशिष्टय़पूर्ण ब्रँड म्हणून प्रस्थापित झाले. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्हे आणि कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, विजापूर आणि बागलकोट हे जिल्हे येथील उत्पादक WF GI tag वापरू शकतील.
*      प्र.क्र.४ – योग्य पर्याय क्र.(२) सायंकाळी ७ ते सकाळी ६ या कालावधीमध्ये महिला कामगारांकडून कार्य करून घेण्यास फॅक्टरी कायदा १९४८ मनाई करतो. या तरतुदीमध्ये बदल करून या कालावधीमध्ये महिला कामगारांना काम करण्याची मुभा देण्यासाठी गोवा शासनाने मंजुरी दिली आहे.
*      प्र.क्र.५. – योग्य पर्याय क्र.(४) भारतीय रेल्वेसाठी धुके व तत्सम कमी दृश्यमान परिस्थितीमध्ये रुळांवरील अडथळे समजावेत यासाठी त्रिनेत्र ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
*      प्र.क्र.६ – योग्य पर्याय क्र.(१)
*      प्र.क्र.७ – योग्य पर्याय क्र.(४) राज्यामध्ये पुढील पाच वर्षांत १ लाख सूक्ष्म, लघू किंवा मध्यम उद्योगांची (units) उभारणी करून १० लाख रोजगार निर्माण करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यातील ४० टक्के उद्योग हे ग्रामीण भागात विकसित करण्यात येतील. तसेच तालुका पातळीवर ५० औद्योगिक पार्क्‍सची स्थापना करण्यात येईल.
*      प्र.क्र.८ – योग्य पर्याय क्र.(२) लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळाणकर होते तर लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती मीरा कुमार या होत्या.
*      प्र. क्र. ९ – योग्य पर्याय क्र.     (२) सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांचे शाश्वत विकास उद्दिष्टे साधण्यासाठी तसेच कल्पकता व नावीन्यपूर्णतेस प्रोत्साहन देण्यामध्ये असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सन २०१७ पासून दरवर्षी २७ जून रोजी आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग दिवस साजरा करण्यात येतो.
First Published on July 20, 2019 12:07 am
Web Title: Maharashtra Secondary Examination Mpsc Abn 97