नवनीत
संस्थानांची बखर - सयाजीरावांची कलासक्ती
Published: Tuesday, June 30, 2015
राजेपद मिळण्यापूर्वी खेडय़ात राहणाऱ्या, अशिक्षित
गोपाळने आपल्या कुशाग्र बुद्धीने केवळ सहा वर्षांत पुस्तकी शिक्षणाबरोबर
अनेक गोष्टी आत्मसात केल्या. पुढे आपल्या कारकीर्दीत चोख प्रशासनाबरोबर
सांस्कृतिक क्षेत्रातही अनेक कलांचे संवर्धन महाराजा सयाजीरावांनी केले.
त्यांचे वय १८ वष्रे झाल्यावर त्यांचा विवाह तंजावरचे सरदार मोहिते यांची
कन्या लक्ष्मीबाई उर्फ चिमणाबाई प्रथम हिच्याशी झाला.त्या काळात संस्थानिकांकडे असलेले दरबारी नर्तक, कवी, संगीतकार, कलाकार हे त्या संस्थानिकाचे भूषण समजले जाई. काही ठिकाणी विवाहप्रसंगी देण्याच्या हुंडय़ामध्ये नर्तक, गायक, यांचाही समावेश होता. चिमणाबाई (प्रथम) स्वत भरतनाटय़म् आणि कर्नाटक संगीतामध्ये जाणकार होती. लग्नानंतर चिमणाबाईने आपल्याबरोबर नर्तक गायकांचा एक संच बडोद्याला आणला. त्यात नटवनर अप्पास्वामी आणि त्याची पत्नी कांतिमती हे प्रमुख होते. अप्पास्वामीच्या मृत्यूनंतर कांतीमती आणि तिचा मुलगा कुबेरनाथ हे बडोदा सोडून दाक्षिणात्य चित्रपट उद्योगात गेले होते. परंतु राजे प्रतापसिंगांच्या आग्रहावरून बडोद्यातील कलाभवन पॅलेसमध्ये संगीत शिक्षक म्हणून परत आले.
पुढे कुबेरनाथ तांजोरकरांनी त्यांचा मुलगा रमेश तांजोरकर याच्याबरोबर स्वतची तांजोर डान्स म्युझिक अँड आर्ट रिसर्च सेंटर ही कलाशिक्षणाची संस्था स्थापन केली. सयाजीरावांनी बडोद्यात कलेचे शिक्षण देण्यासाठी कलाभवन ही संस्था सुरू केली. या संस्थेत त्यांनी चित्रकला, शिल्पकला, रंगकाम, विणकाम इत्यादी विषयांचे वर्ग सुरू केले. पुढे या संस्थेत भारतीय संगीत, भरतनाटय़म्, वाद्यवादन यांचेही शिक्षण सुरू झाले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com
No comments:
Post a Comment