थेट कर्ज (इतर मागासवर्गीयांसाठी)
लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
लोकसत्ता टीम | Updated:
November 7, 2017 1:00 AM
- लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
- त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे.
- तो कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
- बीज भांडवल योजना व थेट कर्ज योजनेकरिता शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ९८हजार रुपयांपेक्षा कमी तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख २० हजारापेक्षा कमी असावे.
- कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.
- कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.
- उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने तो प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती.
- जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे.
- व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतार
- शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.
- २ जामीनदारांची प्रमाणपत्रे.
- स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे कर्जदाराचे प्रतिज्ञापत्र.
- तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स.
- व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादीचे दरपत्रक.
First Published on November 7, 2017 1:00 am
Web Title: direct loan for other backward classes
No comments:
Post a Comment