Tuesday, June 16, 2015

नवनीत [Print] [Email] अव्वल क्रिकेटपटू रणजीतसिंह

नवनीत

अव्वल क्रिकेटपटू रणजीतसिंह

swanstanikanchi bakhar Kumar Shri Ranjitsinhji
Published: Monday, June 15, 2015
'के.एस.रणजीतसिंह' किंवा 'रणजी' या नावाने क्रिकेटविश्वात ओळखले जाणारे जामनगरचे जामश्री रणजीतसिंहजी जडेजा हे जगातील नामांकित क्रिकेट खेळाडूंपकी एक होते. रणजीत हा जामनगर राजाचा दत्तकपुत्र असूनही त्याला वारसा हक्क नाकारल्यामुळे ब्रिटिशांनी त्याला शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये पाठविले. लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाल्यावर सन १८९० ते १८९३ या काळात केंब्रिज विद्यापीठाच्या क्रिकेट संघाकडून तो खेळला. एक निष्णात फलंदाज म्हणून रणजीतची ख्याती झाल्यावर तो ससेक्सकडून प्रथम श्रेणी काऊंटी सामने खेळू लागला. ससेक्स काऊंटीमधून सन १८९५ ते १८९७, १८९९ ते १९०४, १९०८ आणि १९१२ या काळात रणजीतने फलंदाजी केली. १८९९ ते १९०३ या काळात त्याने ससेक्सचे कप्तानपदही भूषविले. १८९९ साली एका मोसमात ३००० धावा काढल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात रणजीत एक अव्वल फलंदाज म्हणून ओळखला जाऊ लागला. जुल १८९६ मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडच्या संघातून खेळून रणजीतने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणातील सामन्याच्या दोन इिनग्जमध्ये त्याने ५४ आणि १५४ (नाबाद) अशी धडाकेबंद फलंदाजी केली. रणजीतसिंह एकूण १५ कसोटी सामने खेळला. या सामन्यात दोन शतके आणि सहा अर्धशतके त्याच्या नावावर जमा आहेत. इंग्लिश क्रिकेट संघातून खेळलेला हा पहिला भारतीय पुढे 'ब्लॅक प्रिन्स ऑफ द क्रिकेटियर्स' या नावाने ओळखला जाऊ लागला. १९०७ साली रणजीतसिंहची जामनगर राजेपदी नियुक्ती झाली. त्याच्या मृत्यूनंतर १९३४ सालापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्या नावाने रणजी करंडक हे भारतीय क्रिकेट संघांमधील सामने भरविणे सुरू केले. 'रणजी ट्रॉफी' या क्रिकेट स्पर्धा आजही त्यांची प्रतिष्ठा टिकवून आहेत. जामनगरने भारताला एकूण सहा अव्वल क्रिकेटपटू दिले आहेत. रणजीतसिंहजी, दुलीपसिंहजी, विनू मंकड, सलीम दुराणी, इंद्रजीतसिंह आणि अजय जडेजा.
सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com

No comments:

Post a Comment