Tuesday, June 16, 2015

लाईफस्टाईल [Print] [Email] व्हिडिओ: 'डिझ्ने'चा जादुई वेडिंग केक

लाईफस्टाईल

व्हिडिओ: 'डिझ्ने'चा जादुई वेडिंग केक

Disney is taking wedding cakes to a magical new level by creating interactive cakes
Published: Thursday, June 11, 2015
डिझ्नेची कार्टुन्स आणि त्यांच्या कथा आपल्यापैकी अनेकांच्या बालपणाचा अविभाज्य भाग असतील. त्याच डिझ्नेने आता अनोख्या वेडिंग केक्सच्या माध्यमातून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. डिझ्नेच्या कार्टुन्समधील पात्रे आणि कथा यांच्यात रममाण झालेला बालपणीचा काळ आपल्याला नक्कीच आठवत असेल. मात्र, आता या साऱ्या गोष्टांचा पट चक्क वेडिंग केकवर उलगडताना पहायला मिळेल. यासाठी प्रोजेक्ट मॅपिंग तंत्राचा वापर करण्यात आला असून एका पांढऱ्या रंगाच्या केकवर लाईटसच्या माध्यमातून उलगडणारी परीकथा डोळ्यांचे पारणे फेडते. सुरूवातीला संपूर्ण पांढऱ्या रंगातील केक पाहताना या सगळ्याचा अंदाज येत नाही. मात्र,  या पांढऱ्या केकवर प्रकाशाचा खेळ सुरू झाल्यानंतरचा अनुभव निव्वळ थक्क करणारा असतो.

नवनीत [Print] [Email] कुतूहल - कापसापासून सूतनिर्मिती - भाग ३

नवनीत

कुतूहल - कापसापासून सूतनिर्मिती - भाग ३

thread production from Cotton
Published: Tuesday, June 16, 2015
nav01कापूस पूर्णपणे पिंजून झाल्यावर सलग अशा पेडाच्या आकारात त्याची रचना करणे ही पुढची नसíगक पायरी असते. विपिंजण यंत्रात कापूस पूर्णपणे पिंजून झाल्यावर आणि त्यातील संपूर्ण कचरा काढून टाकल्यावर कापसाच्या तंतूंची रचना ही पेडाच्या आकारात केली जाते. या अखंड आणि सलग पेडास पेळू असे म्हणतात.
खेचण : विपिंजण प्रक्रियेमध्ये तयार होणारा पेळू हा आता सूतकताई प्रक्रियेसाठी वापरला जाण्यासाठी तयार असतो. या पेळूची जाडी त्यापासून कातल्या जाणाऱ्या सुतापेक्षा जवळजवळ २०० ते ५०० पट अधिक असते. त्यामुळे या पेळूची जाडी कमी करून सूतकताई करणे हे पुढचे काम असते; परंतु चांगल्या दर्जाच्या सुतासाठी ज्या गोष्टी पेळूमध्ये आवश्यक असतात त्या वििपजण यंत्रातून निघणाऱ्या पेळूमध्ये नसतात. वििपजण यंत्रातून बाहेर पडणाऱ्या पेळूमध्ये कापसाचे तंतू हे अस्ताव्यस्तपणे रचले गेलेले असतात. याशिवाय वििपजण यंत्रात कापसाचे बहुतांश तंतू हे आकडय़ा (हूक) सारखे वाकडे झालेले असतात. चांगल्या दर्जाचे सूत बनविण्यासाठी पेळूमधील सर्व तंतूंचे आकडे सरळ करून तंतू सरळ करावे लागतात. याशिवाय पेळूमधील तंतूंचा अस्ताव्यस्तपणा काढून सर्व तंतू एकमेकांस आणि पेळूच्या आसास समांतर करावे लागतात.
वििपजण यंत्रातून बाहेर पडणारा पेळू हा त्याच्या संपूर्ण लांबीवर सारख्या जाडीचा असत नाही. त्याच्यामध्ये जाड बारीक असे भाग असतात. अशा पेळूपासून चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या ताकदीचे सूत तयार करता येत नाही. यासाठी हा पेळू सर्व लांबीवर एकसारख्या जाडीचा करावा लागतो.
खेचण प्रक्रियेमध्ये पेळूतील तंतूंचे आकडे काढून त्यांना सरळ करणे, तंतू एकमेकांस आणि पेळूच्या आसास समांतर करणे आणि पेळूची जाडी सर्व ठिकाणी एकसारखी करणे या प्रक्रिया केल्या जातात. यासाठी जे यंत्र वापरले जाते त्याला खेच साचा (ड्रॉ फ्रेम) असे म्हणतात. सहा ते आठ पेळू एकत्रित करून त्याला सहा किंवा आठची खेच दिली जाते. यामुळे पेळू जास्त नियमित स्वरूपाचा होतो.
एकाच टप्प्यात या सर्व क्रिया करणे शक्य असत नाही. यासाठी एकानंतर एक असे दोन खेच साचे वापरले जातात. यातील पहिल्या खेच साच्याला पहिला खेच साचा असे म्हणतात आणि दुसऱ्या साच्याला अंतिम किंवा शेवटचा (फिनिशर) खेच साचा असे म्हणतात.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

कुतूहल: कापसापासून सूत निर्मिती - भाग २

कुतूहल: कापसापासून सूत निर्मिती  - भाग २
सूत निर्मितीतील कताई पूर्व प्रक्रियांमध्ये िपजण (ब्लो रूम), वििपजण (काìडग), खेंचण (ड्रॉईंग), िवचरण (कोिम्बग), वात बनविणे (रोिवग) हे विभाग येतात.
कापूस जेव्हा सूत गिरणीत येतो तेव्हा तो कापसाच्या गाठींच्या रूपात येतो. या गाठींमध्ये कापूस हा गाठी बांधण्याच्या यंत्रात मोठय़ा दाबाखाली गाठींमध्ये घट्टपणे बसविलेला असतो. याशिवाय शेतातून वेचला गेलेला कापूस गाठीमध्ये तसाच बांधला गेल्यामुळे शेतात कापूस वेचताना कापसाबरोबर काही इतर अनेक गोष्टी वेचल्या जातात. त्या गाठीतील कापसामध्ये तशाच येतात. यामध्ये कापसाच्या झाडाची वाळलेली पाने, बोंडाची देठे व कवचाचे तुटके भाग, माती व वाळू यांचा समावेश असतो. ह्य़ा पदार्थाना कापसातील कचरा असे म्हणतात.
कताईपूर्व प्रक्रियांमध्ये सर्वात प्रथम ज्या प्रक्रिया कापसावर केल्या जातात त्यांमध्ये कापसातील कचरा काढून टाकणे हे सर्वात महत्त्वाचे कार्य असते. गाठींमध्ये कापूस घट्ट दाबून बसविला असल्यामुळे त्यातील कचराही कापसामध्ये घट्ट असा मिसळलेला असतो. त्यामुळे कापूस िपजून सल केल्याशिवाय कापसातील कचरा काढून टाकता येत नाही. त्यामुळे कताईपूर्व प्रक्रियांमध्ये पहिल्या दोन विभागांत कापूस िपजणे आणि त्याच वेळी कापसातील कचरा काढून टाकणे ही दोन काय्रे केली जातात.
िपजण : या प्रक्रियेमध्ये गाठीतील कापसाचे मोठे गठ्ठे फोडून त्यापासून लहान लहान पुंजके केले जातात. हे करीत असतानाच गाठीतील कापसात असलेल्या कचऱ्यामधील ५०% ते ७०% कचरा काढून टाकला जातो. िपजण प्रक्रिया करण्यासाठी यंत्रांची एक साखळी वापरली जाते.
वििपजण : िपजण विभागातून बाहेर पडणारा कापूस हा कापसाच्या लहान लहान पुंजक्यांच्या स्वरूपात असतो. परंतु चांगल्या दर्जाचे सूत बनविण्यासाठी कापूस पूर्णपणे िपजावा म्हणजे कापसाचा प्रत्येक तंतू एकमेकांपासून वेगळा करावा लागतो आणि कापसातील १००% कचरा काढून टाकावा लागतो. वििपजण प्रक्रियेमध्ये या दोन्ही क्रिया पार पाडल्या जातात. गाठीतील कापसामध्ये आणि सूतामधील कापसामध्ये आणखी महत्त्वाचा फरक म्हणजे गाठीतील तंतू हे सुटे सुटे आणि विस्कळीतपणे विखुरलेले असतात. तर सूतामध्ये कापसाचे एकमेकांपासून सुटे केलेले तंतू हे एका अखंड अशा पेडामध्ये जुळविलेले असतात. या पेडामध्ये हे तंतू एकमेकांस व पेडाच्या आसास समांतर असे असतात. या पेडास पीळ दिल्यावर त्याचे सूत तयार होते.
- चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

नवनीत [Print] [Email] अव्वल क्रिकेटपटू रणजीतसिंह

नवनीत

अव्वल क्रिकेटपटू रणजीतसिंह

swanstanikanchi bakhar Kumar Shri Ranjitsinhji
Published: Monday, June 15, 2015
'के.एस.रणजीतसिंह' किंवा 'रणजी' या नावाने क्रिकेटविश्वात ओळखले जाणारे जामनगरचे जामश्री रणजीतसिंहजी जडेजा हे जगातील नामांकित क्रिकेट खेळाडूंपकी एक होते. रणजीत हा जामनगर राजाचा दत्तकपुत्र असूनही त्याला वारसा हक्क नाकारल्यामुळे ब्रिटिशांनी त्याला शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये पाठविले. लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाल्यावर सन १८९० ते १८९३ या काळात केंब्रिज विद्यापीठाच्या क्रिकेट संघाकडून तो खेळला. एक निष्णात फलंदाज म्हणून रणजीतची ख्याती झाल्यावर तो ससेक्सकडून प्रथम श्रेणी काऊंटी सामने खेळू लागला. ससेक्स काऊंटीमधून सन १८९५ ते १८९७, १८९९ ते १९०४, १९०८ आणि १९१२ या काळात रणजीतने फलंदाजी केली. १८९९ ते १९०३ या काळात त्याने ससेक्सचे कप्तानपदही भूषविले. १८९९ साली एका मोसमात ३००० धावा काढल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात रणजीत एक अव्वल फलंदाज म्हणून ओळखला जाऊ लागला. जुल १८९६ मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडच्या संघातून खेळून रणजीतने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणातील सामन्याच्या दोन इिनग्जमध्ये त्याने ५४ आणि १५४ (नाबाद) अशी धडाकेबंद फलंदाजी केली. रणजीतसिंह एकूण १५ कसोटी सामने खेळला. या सामन्यात दोन शतके आणि सहा अर्धशतके त्याच्या नावावर जमा आहेत. इंग्लिश क्रिकेट संघातून खेळलेला हा पहिला भारतीय पुढे 'ब्लॅक प्रिन्स ऑफ द क्रिकेटियर्स' या नावाने ओळखला जाऊ लागला. १९०७ साली रणजीतसिंहची जामनगर राजेपदी नियुक्ती झाली. त्याच्या मृत्यूनंतर १९३४ सालापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्या नावाने रणजी करंडक हे भारतीय क्रिकेट संघांमधील सामने भरविणे सुरू केले. 'रणजी ट्रॉफी' या क्रिकेट स्पर्धा आजही त्यांची प्रतिष्ठा टिकवून आहेत. जामनगरने भारताला एकूण सहा अव्वल क्रिकेटपटू दिले आहेत. रणजीतसिंहजी, दुलीपसिंहजी, विनू मंकड, सलीम दुराणी, इंद्रजीतसिंह आणि अजय जडेजा.
सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com

Wednesday, June 10, 2015

लाईफस्टाईल [Print] [Email] 'टुथब्रश' रोग प्रादुर्भावाचे एक कारण

लाईफस्टाईल

'टुथब्रश' रोग प्रादुर्भावाचे एक कारण

Beware Your toothbrush may transmit diseases
Published: Monday, June 8, 2015
सामायिक बाथरुमचा वापर करताना आपला टुथब्रश कोठे आणि कशाप्रकारे ठेवावा याची काळजी घेणे आवश्यक आहे कारण या टुथब्रशच्या माध्यमातून संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याची शकता संशोधकांनी वर्तवली आहे.
आपण वापरत असलेल्या टुथब्रशमध्ये आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थांचा समावेश असतो. जेव्हा या टुथब्रशचा दुस-या व्यक्तीच्या तशाचप्रकारच्या टुथब्रशशी संपर्क येतो तेव्हा संसर्गजन्य रोगांचा प्राधूर्भाव होण्याची शक्यता असते. कारण दुस-या व्यक्तीच्या टुथब्रशमधील टाकऊ पदार्थांमध्ये दडून बसलेले जिवाणू, विषाणू तसेच रोग पसरवणारे घटक तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकत असल्याची माहिती अमेरिकेतील क्युनीपाय विद्यापिठाचे लॉरेन अबेर यांनी दिली.
याविषयाचा अभ्यास करण्यासाठी क्युनीपाय विद्यापिठात सामायिक बाथरुमाचा वापर करणा-यांकडून टुथब्रशचे नमुने गोळा करण्यात आले होते. यातील साठ टक्के टुथब्रशमध्ये दुषित घटकांचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. टुथब्रशला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी त्याला कव्हर लावण्याची पध्दत उपयुक्त नसल्याचे सांगत, वाळण्यासाठी हवा न मिळाल्याने टुथब्रश ओलसर राहतो ज्यायोगे जिवाणू आणि विषाणूंवाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते असे अबेर म्हणाले.
रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव होण्यास टुथब्रश हे महत्वाचे माध्यम असू शकते अशी शक्यता वैज्ञानिकांनी 1920 मध्ये वर्तवली होती. तसेच बाथरुममध्ये उघड्यावर ठेवलेल्या टुथब्रशचा बाथरुममधील दुषित घटकांशी संपर्क होण्याचा धोका मोठ्याप्रमावर आहे असे या संशोधनातून समोर आले आहे. या संशोधनाचा अहवाल अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबायोलॉजीच्या वार्षिक सभेत सादर करण्यात आला होता.

Tuesday, June 9, 2015

नवनीत [Print] [Email] कुतूहल: बांगडी साचा - भाग १

नवनीत

कुतूहल: बांगडी साचा - भाग १

Loksatta navneet interesting information
Published: Wednesday, June 10, 2015
कुतूहल: बांगडी साचा - भाग १
सूतकताईच्या इतिहासामध्ये हातकताईपासून म्यूल साच्यापर्यंत अनेक कताई तंत्रे विकसित होऊन त्यांचा उपयोग काही काळापुरता झालेला आपण पाहिला. ह्य़ा त्रुटी नाहीशा करून एक परिपूर्ण कताई साचा विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञ सातत्याने प्रयत्न करीत होते.
अमेरिकेतील होर्ड आयलंड येथील जॉन थॉर्प याने ई. स. १८२८-२९ मध्ये बांगडी साच्याचे (िरग फ्रेम) तंत्रज्ञान विकसित केले. याच्यामध्ये पुढे तेथील जेंक्स याने काही सुधारणा केल्या. त्यामुळे काही वेळा बांगडी साच्याचा मूळ संशोधक म्हणून जेंक्स याचा उल्लेख केला जातो. १८३० पासून काही यंत्रे बनविणाऱ्या कंपन्यांनी बांगडी साचा तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु यंत्र उद्योगमधील आघाडीवर असलेल्या व्हाइटीन मशीन वर्क्‍सने १९४० मध्ये आणि लॉवेल मशीन शॉप यांनी १९५० साली बांगडी साच्याचे उत्पादन सुरू केल्यावर बांगडी साच्याचे तंत्रज्ञान कताई उद्योगात पकड घेऊ लागले. बांगडी चाते : या यंत्रामध्ये सुताला पीळ देऊन सूत बॉबिनवर गुंडाळण्यासाठी जे चाते वापरले जाते त्याच्याभोवती बांगडी (िरग) सारखे एक गोल कडे असते. त्याच्यावरून या चात्याला बांगडी चाते (िरग िस्पडल) असे नाव पडले. बॉबिन चात्यावर बसविलेली असते. चात्याभोवती असलेल्या बांगडीवर इंग्रजी 'सी' या अक्षराच्या आकाराची एक तार (ट्रॅव्हलर) बांगडीच्या वरच्या कडेवर अडकवलेली असते. ही तार बांगडीवर चात्याभोवती फिरते. बांगडी साच्यामध्ये वातीची बॉबिनवरील वात सुरुवातीचा घटक म्हणून वापरली जाते. या वातीची जाडी खेच रुळांच्या साहाय्याने कमी केली जाते. खेच रुळांमधून बाहेर पडणारा शेडा (स्ट्रॅण्ड) पुढे बांगडीवर फिरणाऱ्या तारेमधून ओवून घेऊन बॉबिनवर गुंडाळला जातो. बॉबिन चात्यावर घट्ट बसविलेली असते. त्यामुळे चाते फिरविले असता बॉबिन चात्याच्याच गतीने फिरू लागते. चात्याबरोबर बॉबिन जेव्हा फिरू लागते तेव्हा खेच रुळांकडून येणारा शेडा हा तारेमधून ओवल्यामुळे बॉबिनबरोबर तारदेखील बांगडीवर बॉबिनभोवती फिरू लागते. तारेच्या आणि सुताच्या या गोलाकार फिरण्यामुळे शेडय़ास पीळ बसू लागतो व सूत तयार होऊ लागते. बॉबिनच्या फिरण्यामुळे जरी तार ही बांगडीच्या कडेवर सभोवताली फिरू लागते तरी बॉबिनची आणि तारेची फिरण्याची गती सारखी नसते. तारेची गती ही बॉबिनच्या गतीपेक्षा थोडीशी कमी असते. तार व बॉबिनमधील या गती फरकामुळे तयार झालेले सूत हे बॉबिनवर गुंडाळले जाते.
चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org

के.जी. टू कॉलेज [Print] [Email] महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती

के.जी. टू कॉलेज

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती

Published: Wednesday, June 10, 2015
राज्यातील सर्व प्रकारच्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ उपलब्ध व्हावी आणि सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी, आधार कार्ड काढण्याची सक्ती करण्यात आली आहे.
'उच्च व तंत्रशिक्षण विभागा'ने या संदर्भात परिपत्रक काढून आपल्या विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांना हे आदेश दिले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचा तपशील संगणकावर तात्काळ उपलब्ध व्हावा यादृष्टीने, तसेच विविध योजनांतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना अचूकपणे लाभ देण्यासाठी आधार क्रमांकाची व त्यांच्या बँक खात्याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात विभागाने सर्व सरकारी, अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना सूचना केली आहे.